Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:15
नमस्कार!
बँक व तत्सम कचेर्या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या मूळे तुम्हाला पगार
आमच्या मूळे तुम्हाला पगार मिळतो , तुमच सगळ चालत हा माज ही असतो काही लोकांना . मग ते बस कंडक्टर पासून पुढे कोणालाही अशी मुक्ताफळे ऐकवू शकतात / उधळू शकतात .
कोट्यावधींच्या ठेवी असणारे / रोजचे व्यवहार लाखात असणारे असा माज नाही करत . उलट ते लोक अतिशय नम्र असतात . काही लोक अर्ध्याच हळकुंडामध्ये पिवळे होतात . उथळ पाण्याला जसा खळखळाट फार असतो तसं यांच असत . बर मग याच तत्वाने प्रत्येक घर /प्रत्येकच पोट कोणावर तरी चालत / अवलंबून असत . मग ती व्यक्ती अगदी डॉ/ वकील असो किंवा कुठला कर्मचारी . हि व्यवस्थाच अशी आहे . अगदी माणूस जंगलात गेला तरी तो जाण्यासाठी झाडांवर / फळांवर अवलंबून राहीलच कि . ज्याप्रमाणे टाळी एका हाताने वाजत नाही त्याप्रमाणेच अशा गोष्टी एकाच बाजूने घडत नाहीत . एका हाताने चुटकी वाजते पण त्याला हि दोन बोट लागतातच .
दिव्यश्री असे घडतच नाही असेही
दिव्यश्री असे घडतच नाही असेही क्लेम नाही करता येत.. आपल्या वाटण्याबरहुकुम लोक नाही वागत.
पत्ते नसतील खेळत तर फोनवर बोलत बसतात तासन्तास. मी निगडीच्या मबॅ मधे भावाचे घर विकून आलेले पैसे त्याच्याबरोबर जमा करायला मागच्या एप्रिलमधे गेले असता, माझ्या हातात कॅश मोठी आहे हे माहित असूनही कॅशियर बाई त्यांच्या पुतणी / भाचीला डब्यात बिघडलेली भाजी कशी आणली आहे याचे फोनवर साग्रसंग्रीत वर्णन करित होत्या, शेवटी मी त्याना सांगितले की आता लगेच पैसे नाही घेतले तर मॅनेजर कडे मला तक्रार करावी लागेल तेव्हा त्यानी कुठे फोन ठेवला.
जसे सर्व कर्मचारी वाईट असतात हे म्हणणे चूक आहे तसेच लोकाना आलेले वाईट अनुभव नाकारू नाही शकत आपण.
दिव्यश्री.. मला हे पूर्णपणे
दिव्यश्री.. मला हे पूर्णपणे मान्य आहे. वैयक्तीक आहे तरी पण मला हा अनुभव लिहावासा वाटतो.
बँक ऑफ बरोडाच्या, फोर्ट युनिव्हर्सिटीचे ऑडीट मी करत होतो. ( आर्टिकल म्हणून ) त्या काळात कॉम्प्यूटर्स नव्हते, मोठमोठी रजिस्टर्स असायची. त्यावेळी तिचे काम नसताना तिथली एक कर्मचारी जेनी फर्नांडीस मला
आपणहून मदत करायची. रोजच आमच्या गप्पा व्हायच्या.
ऑडीट झाल्यावर काही दिवसांनी मी रिपोर्ट द्यायला गेलो आणि थेट मॅनेजरच्याच ऑफिसमधे गेलो. त्यावेळी जेनीचा कुणाशीतरी वाद होताना दिसला.. म्हणून मी तिला न भेटता निघालो.
परत काही दिवसांनी मी आणखी एका कामासाठी गेलो तर तिने मला अडवले. सरळ विचारले कि त्या दिवशी मला न भेटता का गेलास ? मी म्हणालो तूझा मूड ठिक नव्हता त्या दिवशी.. त्यावर तिचे उत्तर.. तू फक्त हॅलो म्हणाला असतास तर मूड ठिक झाला असता.
माझे वय त्यावेळी १९ तर ती ३० ची. पुढे अनेक वर्षे आमचा पत्रव्यवहार राहिला आणि या घटनेला आता ३२ वर्षे झाली.
एखादा कर्मचारी चिडला असेल तर मॅनेजरची वाट न बघता दुसृया एका ग्राहकाने मध्यस्थी करायला काय हरकत आहे ? असे क्वचितच कधी घडते. साधी विथड्रॉवल स्लिप भरायची असो कि डिपॉझिट स्लिप. एखाद्या अशिक्षित
ग्राहकाला बँक कर्मचार्याचीच मदत घ्यावी लागते. इतर ग्राहक क्वचितच मदत करताना मला तरी दिसले.
समजा वाद झालाच तर उपस्थित ग्राहक एकतर तटस्थ तरी राहतात नाहीतर ग्राहकाचीच बाजू घेतात.
अश्यावेळी बँक कर्मचारी आणि ग्राहक असे दोन तट पडतात.
दिनेशजी हे अगदी खरे आहे...
दिनेशजी हे अगदी खरे आहे...
होय . नाकारू शकत नाही .
होय . नाकारू शकत नाही . नाकारू नये . पण तेच न काही लोकांमुळे सगळ्याच कर्मचार्यांना बोल लावले जातात . गव्हाबरोबर किडे रगडले जाणे . माझ म्हणन इतकंच आहे कि सगळेच लोक असे कामचुकार आणि निर्ढावलेले नसतात . मात्र कामचुकार आणि निर्ढावलेल्या कर्माचार्यांच्या वागणुकीची जास्तीजास्त शिक्षा , त्रास अशाच कर्मचार्यांना होतो जे स्वतःचे काम योग्य रीतीने आणि निष्ठेने करतात .
दिनेश.... "...इतर ग्राहक
दिनेश....
"...इतर ग्राहक क्वचितच मदत करताना मला तरी दिसले...."
~ या इतर ग्राहक गटात तुम्ही मलाही सामील करा. कारण हे काम मी बॅन्केत गेल्यावर अगदी न चुकता करतो. माझेही बॅन्क ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे. इथे लागलीच नंबर कधीच येत नाही....वाट पाहात उभे राहण अटळ असते. अशावेळी जर कुणाला विथड्रॉवल स्लीप, पैसे भरण्याची स्लीप, नोटांचे वर्णन अशी काही कामे करून घ्यायची असतात तर ते मी आनंदाने करून देतो. कित्येक ग्राहक असेही पाहिले आहेत की हजारो रुपये त्याना खात्यातून काढायचे असतात...पण बरोबर पेन आणत नाहीत, दोन रुपयाचाही. तिथे आल्यावर मागत राहातात....द्यावाच लागतो अशावेळी....[ द्यायचा तो द्यायचा, शिवाय लिहून झाल्यावर तो गृहस्थ परत देतो की नाही त्याचीही वाट पाहाणे हा एक प्रकार असतोच].
जाऊ द्या, दिव्यश्री! इथे
जाऊ द्या, दिव्यश्री! इथे घसाफोड करून काही उपयोग नाही. हा बाफ फक्त बँन्केच्या कर्मचार्यांच्या नावानी कंठशोष करायला आहे. थंड घ्या आणि मजा बघा
इथे खरं बोलून काही उपयोग नाही. ह्या लोकांना असेच तुसडे बँक कर्मचारी वाट्याला येणार आणि रांगेत उभं राहण्यात आयुष्य जाणार
कामं होतात का वाट बघा
These people deserves those people
Truth about banking -- सांगाव असा विचार होता घोटाले का आणि कसे होतात? पण ह्या मंडळींना तोंडात साखर ठेवून पाठीत सुरा खुपसणारेच योग्य 
माझ्या हातात कॅश मोठी आहे हे
माझ्या हातात कॅश मोठी आहे हे माहित असूनही >>> हात्तिच्या! स्वतःची मोठी कॅश धरायची भिती वाटते
अश्यावेळी बँक कर्मचारी आणि
अश्यावेळी बँक कर्मचारी आणि ग्राहक असे दोन तट पडतात.>>>दिनेशदा नवीन कर्मचार्यांचे हाल कुत्रेही खात नाही .हल्ली तर ग्राहकच देव म्हणून चूक असो नसो कर्मचारीच दोषी . त्यालाच सगळ्यांसमोर झापातात आणि ग्राहका समोर अक्षरशः लाळघोटेपणा करतात . बँक युनियन फक्त कायमस्वरुपी असणाऱ्या कर्मचार्यान्साठीच असते . जे लोक कायम स्वरूपी नसतात त्यांना अतिशय वा ई ट वागणूक मिळते दोन्ही कडून . एकीकडे बँकतले सो Called अधिकारी आणि दुसरीकडे ग्राहक राजा / देव . १२ -१३ तास राबून लोकंच्या शिव्या खायच्या चूक नसताना आणि पगार किती तर सांगायलाही लाजच वाटेल असा .
राजसी ताई तुमच्या सगळ्या
राजसी ताई तुमच्या सगळ्या पोस्टला अनुमोदन . पाहिजे तितके मोदक / शाही मोदक .
शेरास सव्वाशेर भेटतोच कधीतरी कुठे ना कुठे . इथे फारसं कोणी ओळखत नाही मग जळजळ काढायची इथे येउन तेही कोणत्या तरी आयडी आड . स्वतःच्या चुका सांगू शकतील का अशा . इतक्या रेट्याने .
राजसी ताई>>> अहो दिव्यश्री,
राजसी ताई>>> अहो दिव्यश्री, मी तुम्हाला पोस्ट्सवरून अनुभवी इ. वाटले असले तरी नाहीये
प्लीजच ताई म्हणू नका
(आंटी मत कहो ना ! स्टाईल) 
पगार किती तर सांगायलाही लाजच
पगार किती तर सांगायलाही लाजच वाटेल असा .>>> प्लीज सांगू नका हं, झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे
सगळेजण माझ्याकडे दयेने बघायला लागले तर माझ्या self-esteem, self-respect ला ठेच लागेल हो!
पैशाची श्रीमंती हे फॅक्ट कमी आणि perception जास्त असतं ना!
प्लीजच ताई म्हणू नका अरेरे
प्लीजच ताई म्हणू नका अरेरे (आंटी मत कहो ना ! स्टाईल) स्मित>>> ओके .


प्लीज सांगू नका हं, झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे डोळा मारा >>> हो .खर आहे .
मोठा वासा पोकळ साचा वारा जाई ....:G
मी जेंव्हा लागले होते बँकेत सगळे जण कौतुकाच्या नजरेने बघायचे . बर्याच लोकांनी पगारही विचारला होता अशी लाज वाटायची कि काही विचारू नका . आणि मग सांगितला कि खोट बोलतेय अस वाटायचं मग मी काही जणांना बोलले पासबुकच घेऊन फिरते आता सगळीकडे तुमच्या खात्रीसाठी .
ऑन सिरियस नोट स्त्रियांसाठी बँकेतला जॉब खरचं अतिशय हलाखीचा असा आहे . जावे त्यांच्या वंशा अस आहे ते . एकदा तर मला अगदी गुंडागर्दीचा अनुभव सुद्धा आला आहे . तेही समोरची व्यक्ती अडाणी/कमी शिकलेली / बँकेचे नियम माहिती नाही पण स्थानिक रहिवासी , बडी असामी म्हणून . असो . काही चांगले लोक देखील भेटले .
(No subject)
माझ्या हातात कॅश मोठी आहे हे
माझ्या हातात कॅश मोठी आहे हे माहित असूनही >>> हात्तिच्या! स्वतःची मोठी कॅश धरायची भिती वाटते<<<
तुम्हाला नाही समजणार, पण अशा वेळेस जर काऊंटरमागच्या कॅशियरला माहिती आहे तर तो / ती ट्रॅन्सॅक्शन अर्धवट ठेऊन फोनवर गप्पा मारतात आणि तुम्ही या गोष्टीला ग्राहकाची भिती असे हेटाळून गम्मत करता म्हणूनच लोक असे अनुभव इथे लिहित आहेत.
वर लोकानी लिहिलेले बँकेचे चांगलेही अनुभव दिलेत ते नाही का वाचता आले आणि इतरानी त्याला दिलेले अनुमोदन नाही का लक्षात आले....
जसे सर्व कर्मचारी वाईट असतात हे म्हणणे चूक आहे तसेच लोकाना आलेले वाईट अनुभव नाकारू नाही शकत आपण.. हे मी रिपिट करू इच्छिते.
अरे बापरे, दिव्यश्री, तुम्ही
अरे बापरे, दिव्यश्री, तुम्ही इतक्या वैयक्तिक पातळीवर का घेतल्यासारखं का लिहित आहात? माझ्या प्रतिसादावर या कमेन्ट्स आहेत असं मला वाटलं म्हणून एवढंच इथे लिहिते
- मी कुठलीही ड्यु आयडी नाही. जो २००० साली आयडी होता तोच अजून आहे
- मी पोस्टचं स्वसंपादन वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे तुम्हाला चिंता नको. मी जे लिहिलं आहे ते तसंच राहील (जर अॅडमिनने उडवलं नाही तर).
बाकी मला बॅन्केचे जेवढे वाईट अनुभव आहेत तेवढेच चांगलेही आहेत. त्यामुळे त्या वादात मला पडायचंच नाहीये. पण जर चूक ग्राहकाची होती तरी बॅन्क गप्प का बसली? कारण त्यांची त्यापेक्षाही मोठी चूक होतीच. म्हणूनच. एखादी चूक झाली असेल तर जो कुणी दोषी त्यावर कारवाई झालीच पाहिजे. तो कायद्याचा प्रश्न आहे. बॅन्क कर्मचार्यांनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी त्या ग्राहकाच्या दोषावरही पांघरूण घातलं असंच म्हणलं पाहिजे मग. आणि जे चूक ते चूकच.
हो आणि पब्लिकसेक्टर मधल्या सगळ्यांचेच पगार बहुतांशी करदात्यांच्या पैशाच्या अप्रत्यक्ष टेकूतून होत असतात. तेव्हा पब्लिकसेक्टर मधल्या प्रत्येकाची पब्लिक ला उत्तम सर्व्हिस द्यायची जबाबदारी आहेच आहे. मी स्वतःही सरकारी पैशांतून कामं करते तेव्हा मला ती जबाबदारी व्यवस्थित कळते, ती मी पाळते. म्हणूनच वरचं वाक्य लिहित आहे.
यापुढे माझ्या प्रतिसादावर काय लिहायचं ते लिहा.
हेमाशेपो.
ट्रॅन्सॅक्शन अर्धवट ठेऊन
ट्रॅन्सॅक्शन अर्धवट ठेऊन फोनवर गप्पा मारतात>>> अर्धवट कुठे? त्या / ती ने तुमचे ट्रॅन्सॅक्शन सुरूच नव्हतं केलं ना? पहिल्या पोस्ट्नुसार उलट तुम्ही त्यांच्या पुतणी / भाचीला डब्यात बिघडलेली भाजी कशी आणली आहे याचे फोनवर साग्रसंग्रीत वर्णन अर्धवट ठेवायला भाग पाडलेत, मॅनेजरची धमकी देऊन ..... ती देवमाणूस होती म्हणून फोन ठेवून तुम्ही धमकी दिलीत तरी तुमचे काम केले. एखादी असती तर तुम्ही धमकी दिलीत म्हणून तुमच्या दहा नोटा फेक असल्याची शंका व्यक्त करून .... कॅश घ्यायला नकार देऊ शकली असती, शिवाय फेक नोटा प्रकरण पूर्ण कायदेशीरदृष्या तिने तडीस न्यायचे ठरवले असते तर तुम्हाला कुठून घर विकले असे झाले असते.
हा बीबी त्यासाठी नाही, पण
हा बीबी त्यासाठी नाही, पण परदेशातील बँकांतील माझ्या अनुभवांविषयी लिहिण्यासारखे बरेच आहे. कधीतरी जमवायचेय.
हो आणि पब्लिकसेक्टर मधल्या
हो आणि पब्लिकसेक्टर मधल्या सगळ्यांचेच पगार बहुतांशी करदात्यांच्या पैशाच्या अप्रत्यक्ष टेकूतून होत असतात. तेव्हा पब्लिकसेक्टर मधल्या प्रत्येकाची पब्लिक ला उत्तम सर्व्हिस द्यायची जबाबदारी आहेच आहे. >>> अहो! भारतात जेमतेम ३% करदाते आहेत .... जर फक्त करदात्यांनीच खाती उघडली तर मग ह्या अश्या बाफ ची आणि एवढ्या बँकांची आणि पर्यायाने कर्मचार्यांची काही गरज नाही.
सॉरीच हं दिव्यश्री. तुम्हाला चिल सांगून मीच गरम झालेले दिसते
@राजसी>> म्हणजे बघा बँक
@राजसी>> म्हणजे बघा बँक कर्मचारी काय काय विचार करू शकतात त्यांची चूक दाखविली तर.....(आणि करतही असतील), मला आलेला अनुभव माझ्यासाठी चांगलाच आहे असे जरी तुम्ही ठासून सांगितले, आणि तुम्ही माझी कितीही टर उडवली तरी सत्य काही बदलत नाही.
हेमाशेपो...
कधी चुकून चांगला अनुभव आला तर
कधी चुकून चांगला अनुभव आला तर नक्की लिहीन.
पण कॅशियरच्या पिंजर्यात बसून 'इथे काय उपटायला बसलोय का?' असला डायलॉग मारणार्याचा अनुभवच प्रातिनिधिक दिसतो. अन तसल्या लोकांचे जे काय करायचे तेही मला करता येतेच.
स्ट्रगलिंग डेजमधे ७० हजारांचं लोन सॅन्क्शन करताना अत्यंत हलकट वागणूक देणारे बँकवाले आज माझ्या केबिनमधे येऊन हवे ते अन तितके लोन सँक्शन करून देतात. माझ्यासमोर उभे राहून सर इथे फक्त सही द्या म्हणतात. सणासुदीला ड्रायफ्रूटचे बॉक्सेस येतात बँकेकडून ऑफिशियली.
पैशाचा माज असा असतो. आजकाल पैसे आहेत म्हणून मी नम्रपणे वागत नसतो, तर मला बिनबोभाट घरपोच सेवा मिळते म्हणून मी चिडचिड करीत नाही. अन मोठे अकाऊंट म्हणून ते नमुने देखिल नीट वागतात.
एका अकाऊंटचे व्यवहार कोट्यावधीचे आहेत म्हणून तुम्ही नीट वागत असाल, तर पेन्शन मधून बँकेला किती पैसे मिळतात त्याचा हिशोब बाहेरच्या लोकांनी सांगितला पाहिजे का? काउंटरमागे बसल्यावर नीट वागायला काय त्रास होतो लोकांना?
सत्रा फॉर्म्स भरायला लावताना फॉर्म नीट असतो का हो? त्यातल्या कुठल्या रकान्यात काय भरणे अपेक्षित आहे, याची माहिती कुणी कुठे देत असतो का हो? मागल्या वर्षी भरलेल्या त्याच फॉर्मच्या झेरॉक्सवरून यंदाचा भरला, तर टेबलवर बदलून आलेली महामाया हा चुकीचा आहे असं सांगत डोकं का खाते? अन काय भरू विचारलं, तर 'सुशिक्षित दिसता' असे डायलॉग मारते, तिथे चूक कुणाची असते?
हा परत बँक ऑफ महाराष्ट्रचा अनुभव होता.
पुण्यातलाच.
***
वरदा, she is talking about me. not you.
अरे देवा ...अहो वरदा ते मी
अरे देवा ...अहो वरदा ते मी तुम्हाला उद्देशून नाही लिहील हो . ते दुसर्याच लोकांसाठी . तुमच्या साठी नाही . गैरसमज झालाय तुमचा तो काढून टाका प्लीज . मी तुम्हाला ओळखते . म्हणजे मला तुमचा इथला वावर माहिती आहे . पाहिला आहे .
सगळ्यांनीच चिल्पिल घ्या बर
सगळ्यांनीच चिल्पिल घ्या बर
ज्यांच्या साठी उपद्य्वाप चालू आहे ते कुठे आहेत ????
आणि ऑफ कोर्स, माझ्या
आणि ऑफ कोर्स,
माझ्या बँकेतल्या माणसाच्या पगारातला १ पैसा तरी माझ्यामुळेच मिळत असतो. अन सगळाच्या सगळाच पगार माझ्यासारख्या खातेदार व कर्जदारांमुळेच मिळतो. कोणतीही बँक काही नोटा छापून पगार करीत नसते नोकरांचा.
वरतून कुणी टिनपॉट म्यानेजर स्वतःच्या खिशातून कर्ज दिल्यागत रुबाब करू लागला, तर त्याला झटका द्यावाच लागतो.
माझ्या दुकानात येणार्या गिर्हाइकामुळेच माझे दुकान चालत असते, इतकी अक्कल प्रत्येक दुकानदाराला असते. पण दुकान चालो - न चालो, पगार तर मिळेलच! अशी कन्सेप्ट डोक्यात बसली, की दुकानातले नोकर काउंटरमागे बसून गिर्हाईकाला रुबाब दाखवायला लागतात. माझ्या दुकानातला नोकर असा वागला तर मी तिथल्या तिथे हाकलून देतो त्याला नोकरीवरून.
सरकारी ब्यांकांचे खासगीकरण होण्याला युनियन्सचा प्रचण्ड विरोध का आहे बरे?
@विनिता आणि इतर, तुम्ही सगळे
@विनिता आणि इतर, तुम्ही सगळे ज्याला त्रास म्हणता आहात तो काही त्रास नाही It's just the way of life, मी फक्त नक्की त्रास कशाला म्हणता येऊ शकेल ते थोडं विस्तृत करून सांगितले. It's all about everyone's interpersonal relationship with others. सारखंच जर का " मी तुझा पगार करतो म्हणून तू माझा नोकर तर घे तुझे पैसे आणि बसा आपापल्या घरी" सगळ्यांना सगळ्यांची गरज आहे.
अत्यंत सुरेख व संग्राह्य
अत्यंत सुरेख व संग्राह्य चर्चा!
स्टेट बँकेच्या पौड रोड शाखेत
स्टेट बँकेच्या पौड रोड शाखेत मी हे स्वतः पाहिलेलं आहे. अतिशय थर्ड क्लास लोक आहेत.
माझं अॅ टि एम कार्ड साठी दोनदा अॅप्लिकेशन केलं (एकदा खाते उघडताना). दोन्ही वेळा आलं नाही.
मग मला सांगितलं की अमुक साहेबांना भेटा. मी भेटलो. सकाळी दहा वाजता मला सांगितलं की दुपारी तीन नंतर या. च्यामायला ह्यांच्या, आम्ही काय पिकनिकला गेल्यासारखं वॉटरबॅग आणि डबा घेऊन जायचं का, तुम्हाला हवं तेव्हा यायला. अतिशय भिक्कार लोक.
ज्यांच्या सांगण्यावरून
ज्यांच्या सांगण्यावरून 'ज्येष्ठ नागरिक 'हा ग्रुप सुरु झाला ते तांबे काका कुठे आहेत ?
ज्यांच्या सांगण्यावरून
ज्यांच्या सांगण्यावरून 'ज्येष्ठ नागरिक 'हा ग्रुप सुरु झाला ते तांबे काका कुठे आहेत ?<<<
त्यांना येथे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ खोडे दिसल्याने ते येथे यायला बिचकलेले आहेत.
(No subject)
Pages