बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:15

नमस्कार!

बँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच इथेही आहे . टेबलाच्या अलीकडे आणि पलीकडे . ग्राहक म्हणून योग्य सेवा देणे हे नक्कीच कर्मचार्यांचे काम आहे . सगळेच कर्मचारी कामसू नसतात त्याप्रमाणे काम टाळणारे हि नसतात . मीही एका बँकेत काम केल आहे . माफ करा पण ज्येष्ठ नागरिकही फार त्रास देतात . निवृत्त असल्यामुळे वेळ काढणे हा एक प्रकार अनुभवला आहे . रोज / दिवसाआड बँकेत येउन बसणे , कर्मचार्यांना धमक्या देणे , त्यांच्या विनाकारण तक्रारी करणे हे हि पहिले आहे . सगळेच असे असतात असे नाही पण काही लोक हेकट असतात . कितीही समजावा ऐकत नाहीत . नवीन लोकांना शिकार केल जात कारण जुने / कायमस्वरूपी असलेले लोक जुमानत नाहीत . असो मी येथे वाद घालणार नाही पण कर्मचारी मग तो कुठली असो तो हि शेवटी माणूस आहे त्यालाही मर्यादा आहेत ,समस्या आहेत . कधीतरी स्वतःला त्याच्या जागी ठेवून पहा . Happy

हो दिव्यश्री, अगदी बरोबर.
समोरच्याला समजून घेणे कठीण असते, पण ते केले तर खुप वेळा सर्व सोपे होऊन जाते.

दिव्यश्री यानी मांडलेली ही बाजूदेखील चर्चेसाठी उपयुक्त अशीच आहे. बॅन्केत नोकरी करणारे कुणी सदस्य असतील तर त्यानीही या संदर्भात त्यांची भूमिका तसेच अनुभव मांडले तर ते वाचनीय होतील.

एका राष्ट्रीकृत बॅन्केत एकदा असेही दृष्य मी पाहिले आहे की काहीतरी तांत्रिक कारणास्तव प्रिंटर्स बंद पडले असल्याने पासबुक भरून दिली जात नव्हती....मात्र आर्थिक व्यवहार चालू होते. तर एक ज्येष्ठ कस्टमर काऊंटरमागील त्या कॅशिअरला इतके झापत होते की प्रिंटर बंद पडणे म्हणजे त्याच कर्मचार्‍याने दाखविलेला हलगर्जीपणा असणार हाच मुद्दा. [पैसे तर मिळाले होते, तेव्हा पासबुक आज नाही तर उद्या भरून घेतल्यास चालू शकले असते...]. कॅशिअर शक्यतो अशा विनम्र भाषेत, "सर, तुम्ही इतक्या मोठ्या आवाजात माझ्याशी वाद घालू नका. समोर मॅनेजर यांची रूम आहे, तिथे तक्रार नोंदवा....ते करतील तुमचे शंकानिरसन..." असे सांगत होता. पण त्याचा उपयोग शून्यच दिसला.

झक्की त्यांना समजल तुम्ही फोरीन हून आलात म्हणून स्पेशल ट्रीट मेंट
मी आपला खुषीत होतो की मला चांगला अनुभव आला. कारण आ़जकाल तसे परदेशातून अनेक लोक येतात भारतात.
पण तुम्ही सगळे तर तक्रारी करताहात, म्हणून मला जरा वाईट शंका आली. कदाचित माझ्या अंगाला एव्हढा दुर्गंध येत असेल की मला एकदाचे बँकेतून बाहेर हाकलले तर बरे असे वाटले असेल सर्वांना.
तसेहि म्हणतात की म्हातार्‍या माणसांच्या अंगाला वास येतो. इथे म्हणतात भारतीयांच्या अंगाला वास येतो!
मग मी तर काय, भारतीय म्हातारा!!

>>निवृत्त असल्यामुळे वेळ काढणे हा एक प्रकार अनुभवला आहे . रोज / दिवसाआड बँकेत येउन बसणे , कर्मचार्यांना धमक्या देणे , त्यांच्या विनाकारण तक्रारी करणे हे हि पहिले आहे Lol
पाहिलेलं नाही, पण ऐकलं आहे. वडलांचे एक मित्र, वय वर्षे ८२, (बँकवाल्यांच्या दुर्दैवानं) बँकेच्या अगदी बाजूला राहतात. आठवड्यातून किमान दोनदातरी काहीतरी कारण काढून बँकेत जातात. वादावादी करतात. त्यांना वयपरत्त्वे ऐकू येत नाही. हिअरिंग एड लावत नाहीत. काही भले कर्मचारी संभाषणात स्वतःला काय म्हणायचंय ते कागदावर लिहून त्यांना वाचायला देतात. यांना त्याचाही राग येतो. 'घरात इन्व्हर्टर लावत नाही. वीज गेली की हा बँकेत जातो.' अशी वडलांची थिअरी आहे. Proud

आयसीआयसीआय चा वाइट अनुभव आला.
अकाउन्ट बन्द करुन टाकले.
आता फक्त एकाच नॅशनलाइज्ड बॅन्केत अकाउन्ट आहे.
सर्व काम नेटकं सुरु आहे.

झकासराव....

"...आयसीआयसीआय चा वाइट अनुभव आला...."

जरा विस्तृतपणे सांगणार का ? कारण मला याच बॅन्केकडून अत्यंत उत्कृष्ट तर्‍हेची सेवा मिळते असे सांगणारे डझनवारी कस्टमर्स भेटलेले आहेत.

घरात इन्व्हर्टर लावत नाही. वीज गेली की हा बँकेत जातो

यावर बरेच लोक हसले. का ते समजले नाही. त्या बिचार्‍याजवळ पैसे नाहीत इन्व्हर्टर आणायला म्हणून?
खरे तर मूर्खासारखा वादविवाद घालत बसतो म्हणून मला हसू येते. मी, भारतात तरी, बँकेत अनेक लोक नुसतेच बसून राहिलेले पाहिले आहेत, . तसे बसावे गप्प.

१०,०००/- च्या खालच्या रकमासाठी भली मोठी लाईन असायची. १०,०००/- च्या वरच्या रकमासाठीच्या काऊंतरवर एक बाई स्वेटर विणत बसली असायची. <<< कहर आहे Proud

सुदैवाने मला प्रायव्हेट बँकांचा अनुभव चांगला आलाय. <<< दक्षिणा, जे० ना० ना वेगळी वागणूक मिळते असा मुद्दा आहे.

प्रायव्हेट बँकांमध्ये टेलर काऊंटरवर सिनियर सिटिझन्ससाठी वेगळी रांग/ काऊंटर सोय असते. तिथे ते डिरेक्ट जाऊ शकतात. त्या काऊंटरवर इतरांना उभे राहणे अलाऊड नाही. सरकारीचे माहित नाही. पण ज्याअर्थी प्रायव्हेट बँकांमधे अशी सोय आहे त्याअर्थी आरबीआयने फतवा काढल्याशिवाय नाही, सरकारीत पण असेल.

आजकाल सगळे बँकर्स ओम्बड्स्मनला वचकून असतात. एखाद ठिकाणी खूप त्रास झाला तर सरळ ओम्बड्स्मनला तक्रार करायची.

प्रायव्हेट बँकांमध्ये बर्‍यापैकी ग्राहकाला गळाला लावणे हा प्रकार असतो त्यामुळे योग्य उत्पादन मिळाले नाही तर ग्राहकाला त्रास होऊ शकतो. आजकाल प्रायव्हेट बँकांमध्ये बहुतेक सगळे एंजि. ग्रॅड्स, एम्बीए आणि आय्टी रिजेक्ट्स असे असतात. पूर्ण शाखेत सहसा ऑपरेशन्स मॅनेजर ह्या व्यक्तीला सगळे कायदेकानू माहित असतात. बाकी सगळे पोपट्पंची करणार्‍या विक्रेत्यांची भरताड असते. बहुधा ब्रॅन्च मॅनेजर हा सुद्धा अट्टल विक्रेता असल्याने ब्रॅन्च मॅनेजर झालेला असतो. सरकारी बँकेत सगळ्यांना सगळ्या प्रोसिजर्स माहित असतात. आता त्यांना काम करायचे नसते किंवा प्रचंड ग्राहक संख्या आणि किमान कर्मचारीवर्ग हा वेगळा मुद्दा (दुसरा मुद्दा प्रायव्हेट बँकांमध्ये सरकारीपेक्षा अधिक वाईट परिस्थिती असते.)

प्रायव्हेट बँकांमध्ये एकदा कर्मचारी ९.५० ला काऊंटरवर बसला तर दुपारी चारपर्यंत बाथरूमला जाता येत नाही इतकी नॉन-स्टॉप गर्दी असते. टेलर्स आणि वेल्कम डेस्क ह्या काऊंटरवरचे कर्मचारी संध्याकाळी पाच शिवाय दुपारचे जेवण जेवत नाहीत. शनिवारी अर्धा दिवस बँक ग्राहकांसाठी उघडी असली तरी सकाळी नऊ ला बँकेत पोचलेला कर्मचारी संध्याकाळी सात शिवाय शाखेबाहेर पडत नाही, विकडेला सकाळी ९.३० ला पोचलेला कर्मचारी रत्री ९.३० ते १०.०० शिवाय बाहेर पडत नाही.

>>>>> आयसीआयसीआय चा वाइट अनुभव आला.अकाउन्ट बन्द करुन टाकले.आता फक्त एकाच नॅशनलाइज्ड बॅन्केत अकाउन्ट आहे. सर्व काम नेटकं सुरु आहे. <<<<<
झकोबा, अरे मागल्यासाली तुला बघित ला तेव्हा तर तू चान्गला त.ता. होतास, आता इतक्यातच ज्ये.ना. कसा काय बनलास? Wink

पैसे घेणारा आणि देणारा कोण हे ही कळत नाही पटकन.. कारण नावचं नीट लिहिलेली नाहीत..
<<
जवानीतल्या दिवसांची गोष्ट आहे. तेव्हा माझे ब्यांक अन पैसे सांभाळायला अकांऊंटंट नोकरीवर नव्हता.
स्वतःच ते काम करावे लागत असे. दुपारी पावणे २ वाजता दुकान आवरून पैसे भरायला ब्यांकेत गेलो. एकाही पिंजर्‍यात एकही पाखरू नह्वतं. रिसिव्हींग क्याशियर अन टेलर अश्या काहीतरी पाट्या अस्तात बहुतेक.
थोड्यावेळाने एक हीरो एका पिंजर्‍यात आले.
पिंजर्‍यासमोर लाईन.
माझा नंबर आल्यावर मी त्यांना विचारले, कि साहेब, तुम्ही पैसे घेणार का?
उत्तर आले, 'मग काय उपटायला बसलो आहे का इथे?'
प्रचण्ड आवाज चढवून त्याला सांगितलं होतं की काऊंटरच्या बाहेर ये, मग काय उपटतात ते दाखवतो. मी तिकडे आलो तर दरोडा घालायला आला म्हणून बोंब मारशील.

बँक ऑफ महाराष्ट्रचाच अनुभव आहे हादेखिल.

माझी आई ज्या ज्या बँकेत जायची त्या त्या सर्व बँकांकडून अतिशय चांगली सेवा तिला मिळाली आहे.मागच्या वर्षी तिची एक मोठ्या रकमेची एफ.डी.मॅच्युअरझाल्याने काही कारणामुळे पैसे withdraw केले.सारस्वत बँककडून ,आईला फोन गेला की नक्की तुम्हीच पैसे काढले का? कदाचित इतर बँक्सही अशी खबरदारी घेत असतीलही.
त्याउलट माझे एक नातलग बँकेत थोडीफार कटकट करत असत.त्यावरून एकदा बँकवाल्यानी म्हटले'ते मि.अमुक तमुक तुमचे कोण हो? आईने नाते सांगितल्यावर त्यांनी रि॑क्वेस्ट केली की परत त्यांना बँकमधे पाठवू नका. ते उगाच भांडत बसतात!

माझे (बँकेतले) चार पैसे: माझे SBI च्या माझ्या गावाच्या शाखेत खाते होते. तेव्हा नुकत्याच SBI च्या सर्व शाखा एकाच नेटवर्कवर जोडल्या गेल्या होत्या. NCL मध्ये रुजू झाल्यावर पगार SBI च्या account मध्ये direct deposit होईल तेव्हा SBI चे खाते उघडणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले. NCL समोरच एक SBI ची शाखा आहे. मी म्हटलं की माझं SBI account आहे. आणि आता जर सगळ्या शाखा एकाच नेटवर्क मध्ये असतील तर तुम्हाला कोणत्याही SBI च्या account वर पैसे जमा करता येतील. पण लॉजिकने चालेल तर ती सरकारी संस्था कुठली? मला पुन्हा त्या SBI शाखेत खाते उघडावे लागले. आणि मग तेव्हाच मला माझा पगार मिळाला! आशा आहे की आता तरी सुधारणा झाली असेल!
नियम, लॉजिक आणि सोय ह्यांचा काही ताळमेळ नसावा असे नेहमी नेहमी का घडते!!

एका नातेवाईकांबरोबर घडलेला किस्सा. (किस्सा ऐकीव -आडनाव बदलले आहे)

नातेवाईक बाई स्वातंत्र्यसैनिक होत्या. त्याचे राज्या सरकारचे पेन्शन त्यांना मिळत होते. पेन्शनची रक्कम आपोआपच वाढत होती. पेन्शन वाढले म्हणून कोणी जाऊन तक्रार करत नाही तशी त्यांनीही केली नाहीच. (त्या ९० च्या वर वयाच्या होत्या त्यामुळे रकमेच्या आकड्याचे आकलन सुद्धा झाले नसेल त्यांना). नंतर त्या गेल्या (देवाघरी). त्यांच्या मुलीनी बँकेतली त्यांची रक्कम क्लेम करण्यासाठी व अकाउंट बंद करण्यासाठी नॉमिनी म्हणून अर्ज दिला. काही २०-२२ हजार रक्कम होती त्यांची बँकेत. तर अकाउंट बंद करण्यासाठी त्या गेल्या असताना, बँकेतल्या कर्मचार्‍यांनी त्यांना नाव विचारले...उत्तर-"साळवेकर".....नक्की साळवेकर? पुन्हा कर्मचारी आत. जरा वेळ बसा....घामाघूम्....परत बाहेर्....आता दोघे जण बाहेर्...परत नाव विचारले...साळवेकर्?...हो! परत आत.....
कर्मचार्‍यांची प्रतिसादावरून आज्जीबाईंच्या मुलीला काहीतरी गडबड असावी असे वाटले.
नंतर बँक मॅनेजर बाहेर आला व मुलीला केबीनमधे बोलावले.
नंतर त्याने सांगितले ते असे,
साळवेकर नावचे आज्जीबाईंचे आकाउंट स्पेलिंग मिस्टेकमुळे किंवा इतर काही कारणामुळे "वाळवेक"र अश्या नावाच्या अकाउंटला टॅग झाले होते. हे वाळवेकर सेंट्रल ग्व्हर्न्मेंट चे पेन्शनर. त्यामुळे पेन्शनची रक्कम आपोआप वाढत गेली. काही कर्मधर्म संयोगामुळे हे वाळवेकर "गेलेले" असूनही अनेक वर्षे कोणीच नॉमिनी रक्कम क्लेम करावयास आला नव्हता. त्यांचे पेन्शन आज्ज्जीबाईंना मिळत होते. म्हणजे आज्जीबाईंना जास्तीची गेलेली रक्कम काही लाखांत असावी. त्यामुळे आज्जींचे अकाउंट क्लोज केले असते तर हे सगळे सरफेसला आले असते व मग मोठा लोचा झाला असता. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असत्या. बँक मॅनेजरने आता एवढे जास्तीचे पैसे तुमच्याकडे ऑलरेडी आले आहेत आणि आता दोन्ही पार्टीज हयात नाहीत त्यामुळे तुम्ही कृपया हे अकाउंट बंद करू नका व त्यातले पैसे सोडून द्यावे असा सल्ला देवून प्रकरणावर पडदा टाकला.

पगारासाठी सुरुवातीच्या काळात तरी इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर वापरत असतील का याबद्दल शंका आहे. संस्थेतल्या प्रत्येक कर्मचार्‍याला पगाराचा वेगळा चेक देण्यापेक्षा त्यांना एका ठिकाणी (एका बँकेच्या एका शाखेत) खाती उघडायला सांगितली जातात. प्रत्येकाच्या खात्यात किती रक्कम जमा करायची याची यादी+पत्र बँकेत दिले जाते. यात अनेकांचे श्रम व वेळ वाचतो. यात तशी मोठीच सोय आहे. तुमच्या हातात चेक दिला तर तो जमा करण्यासाठी बँकेत जाणे, क्रेडिट होण्याचा वेळ हे वाचतात.
उलट कमी पेयीजसाठी इसीएस वापरणे (मी काम केले त्या काळात तरी) जास्त कटकटीचे होते.
आता तर बँकेत न जाताही कुणाच्याही खात्यात पैसे जमा करायची सोय आहे. पण पगारासाठी तसे कोणी करत असतील का याची कल्पना नाही.

>>पगारासाठी सुरुवातीच्या काळात तरी इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर वापरत असतील का याबद्दल शंका आहे. संस्थेतल्या प्रत्येक कर्मचार्‍याला पगाराचा वेगळा चेक देण्यापेक्षा त्यांना एका ठिकाणी (एका बँकेच्या एका शाखेत) खाती उघडायला सांगितली जातात.<<
एका शाखेत कल्पना नाही, पण प्राइस वाॅटरहाउस आमचा पगार ग्रिंडलेज बँकेत इ- ट्रांसफर करायचे - १९८७ नंतर; आणी मी माझ्या जवळच्या ब्रँच मधुन पैसे काढायचो.

कुठल्याही बँकेत काम करणे / नौकरी करणे अतिशय जोखमीचे काम आहे . रोजची कॅश रोज Tally (?) करावी लागते . ते काम झाल्याशिवाय कोणीही बँकेबाहेर पाऊल ठेवू शकत नाही . कुठल्याही चुकीसाठी बर्याच वेळा एका पेक्षा अधिक लोकांना जबाबदारी घ्यावी लागते . विशेषतः क्लार्क आणि पासिंग ऑफिसर . जर .क्लार्कने चूक केली आणि ती ऑफिसरच्या लक्षात आली नाही कॅरी फोरवर्ड झाली तर त्याची जबाबदारी त्या दोघांवर सारख्याच प्रमाणात असते . दोघांना मिळून नुकसान भरपाई करावी लागते . अजून त्या चुकीमध्ये कशिअर सुद्धा येऊ शकतो कधी कधी. अशा वेळेस सगळ्यांना भरपाई मिळून द्यावी लागते .

कधी कधी बँकेतल्या लोकांना आउट ऑफ द वे जाऊन मदत करावी लागते . त्याबद्दल बोलताना कोणीच दिसत नाही . असो .

एकदा एक व्यक्ती अचानक हॉस्पिटल मध्ये भरती झाली . त्यांची पत्नी बँकेत आली . त्या अतिशय घाबरलेल्या आणि चिंताग्रस्त होत्या . मुलबाळ नाही, नातलग नाहीत जवळ . साठीच्या आसपास असतील बिचार्या एकट्या सगळी धावपळ करत होत्या . त्यावेळी बँकेतल्या लोकांनी त्यांना खूप सहकार्य केल . अगदी त्यांची जबाबदारी नसताना , केवळ माणुसकीच्या नात्याने . सगळे कर्मचारी बोलले कि पुढच पुढे बघू आता यांची गरज , वेळ महत्वाची आहे . आपण याचं काम केल पाहिजे . त्यांनी मनापासून सगळ्यांचे आभार मानले . पुढे ते गृहस्थ बरे झाले . त्यांनीही बँकेत येउन सगळ्यांचे आभार मानले .त्यावेळी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी होत .
बँकेतले लोकही हाडामासाचेच असतात . तेही माणूसच आहेत . दानव ,राक्षस नाहीत . काही मुठभर लोकांमुळे त्यांची छबी / प्रतिमा तशी बनली आहे . वरच्या घटने मध्ये अनेकांची जर खरचं नौकरी गेली असती तर त्यांच्या कुटुंबाच काय झाल असत विचार करून पहा एकदा शांतपणे . वरच्या अधिकार्याला बर्याच वेळा असे निर्णय घ्यावे लागतात . कारण एक चुकीचा निर्णय अनेक लोकांवर अन्याय करू शकतो .

दिव्यश्री +१०००....
(नेहमी मी +१ च देतो. या पोस्टला मुद्दाम +१००० दिले आहेत.)
ज्येष्ठ नागरिकांना बँकेतले कर्मचारी आउट ऑफ द वे जाऊन, प्रसंगी नियम थोडे बाजूस ठेवून मदत करतात हे अनुभवले आहे.
पण अनुभव उगाळताना तेच लोक मात्र कुठे त्रास झाला असेल तेच लक्षात ठेवतात.

वरच्या घटने मध्ये अनेकांची जर खरचं नौकरी गेली असती तर>>> म्हणजे??? चूक बॅन्केची होती ना? जर इतक्या जोखमीचं काम असतं तर नीट करायला नको का? आणि वर्षानुवर्षं अशा चुका लक्षात येत नाहीत यात बॅन्केची जबाबदारी नाही?
कुठलीही नोकरी ही जबाबदारीचीच असते, काही विशिष्ट जोखीम पत्करायलाच लागते. त्यासाठीच पगार मिळतो! तुम्ही तुमच्या कामात चूक केलीत तर त्याची भरपाई तुम्हालाच करायची असते.

तीही माणसंच आहेत हे मान्य आहे, पण म्हणून वरचं समर्थन अजिबातच मान्य नाही. माझ्या जवळच्या नातेवाईक, कुटुम्बामधे अनेकांनी बॅन्केत विविध पदांवर नोकर्‍या केल्या आहेत पण कधी बॅन्केच्या चुकांचं असं समर्थन केल्याचं ऐकिवात नाही. जी काही जबाबदारी, वर्कलोड असायचं ते 'पार्ट ऑफ द जॉब' म्हणून स्वाभाविकरित्या स्वीकारलेलंच पाहिलेलं आहे.

दिव्यश्री....

नियमात राहून काम करणारे लोक असतातच, त्यात काही गैर नाही. पण प्रसंगी त्या नियमांना काहीसे बाजूला ठेऊन प्रसंगाचे महत्त्व ओळखून ग्राहकाला सहकार्य करणारे कर्मचारी पाहिले की मग त्रयस्थाला देखील त्याबद्दल आनंद होतो.

तुम्ही दिलेले उदाहरण म्हणजे उत्कृष्ट सेवेचा आरसाच आहे.

पेन्शन वाढले म्हणून कोणी जाऊन तक्रार करत नाही तशी त्यांनीही केली नाहीच.>>>इथेच पहिली चूक आहे तीही मूळ आणि अतिशय महत्वाची अशी आहे . का नाही जास्तीचे पैसे जमा झाले असे बँकेच्या निदर्शनास आणून दिले तिथल्या तिथे ती चूक दुरुस्त करता आली असती . जास्त पैशाचा मोह झालाच न शेवटी . बर त्या वयस्कर होत्या मग घरातील कोणी जबाबदार व्यक्तीने तरी हे काम तातडीने करायला हवे होते . असो आता हे बोलण्यात अर्थ नाही . हे सगळ जरतर वर चालूच राहील .

हे फक्त एक उदाहरण झाल असे कित्त्येक नमुने रोजच्या रोज बघायला मिळतात . ओळखीतल्या बाईना १५००० रुपयांचा भुर्दंड झाला होता . रात्री १२-१ च्या दरम्यान मध्यम वर्गातील व्यक्तीने एवढी रक्कम कुठून आणायची ? त्यांनी कसे बसे पैसे जमा केले मगच घरी जाऊ शकल्या . दोन लहान मुली घरी झोपल्या होत्या .त्यांना घरी ठेवून त्यांच्या नवर्याला ते पैसे उभे करावे लागले . बर्याच वेळा ती लबाड व्यक्ती कर्मचार्यांच्या लक्षात येते .पण अर्थातच ती व्यक्ती उलटते . नाही म्हणते . इथेच कुठेतरी वाचले आहे कि अशा एक व्यक्तीने जास्तीच्या पैशातून रिक्षा खरेदी केली . बँकेतल्या लोकाना बोलले कि माझी चूक नाही मी काय करू . मी पैसे परत करणार नाही .
आता परत वरची घटना त्या घटने मध्ये ती व्यक्ती सुद्धा तितकीच दोषी मानली जावी जितके बँकेतले कर्मचारी . कारण त्यांनी ते बँकेच्या लक्षात आणून दिले नाही . चूक क्लार्कचीही आहे ज्याने नावात घोटाळा केला . कदाचित तो आज निवृत्त झाला असेल / या जगात नसेलही कदाचित . पुन्हा तेच सांगते एकाच्या चुकीची शिक्षा किती तरी जणाना भोगावी लागली असती . सगळी कडे पाट्या टाकायची कामे होतात तसेच इथेही झाले असेल . मी कोणाच्याही चुकीच समर्थन करत नाही करणार नाही . माझी चूक असेल तरही नाही . न्यायालयात देखील बोलले जाते १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये . आणि खरोखर कित्येक अपराधी सुटतात . इथे तर काही लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता .
मिसळपाव या संस्थळा सारखी इथेही स्वसंपादनाची सोय ठेवू नये खरतर कारण काही सुज्ञ, सुशिक्षित , सुसंस्कृत लोक वाट्टेल तशी बेजबाबदार वाक्य लिहितात आणि नंतर बरोबर ती वाक्ये काढून टाकतात . वरती देखील एका सदस्याने असेच केले आहे . सरसकट सगळ्या कर्मचार्यांना नालायक ठरवले होते काल आज ते दिसत नाही . असो . पुन्हा सांगते मी इथे कोणाच्या चूकींचे समर्थन करायला , वाद घालायला लिहित नाही . सगळी चर्चा एकाच बाजूने चालली होती काही सन्माननीय अपवाद वगळता म्हणून मी मध्ये लिहील . कारण चर्चा हि दोन्ही बाजू विचारात घेऊन झली तरच ती निकोप होईल अन्यथा सगळे कर्मचारी कामचुकार , नालायक ई . असा त्याचा निष्कर्ष होऊ शकतो

इथे बरेच लोक नोकर्या करतात कुणीही इथे जाहीर सांगाव कि त्यांना अस खेळता येत आणि त्या खेळण्याचे त्यांना पैसे मिळतात म्हणून . बँक तर सार्वजिक ठिकाण आहे तिथे अस कोणी खेळू शकेल अस मला वाटत नाही . आजकाल तंत्रज्ञान बरच पुढे गेलंय काहीही शक्य आहे. समोर ५० लोक डोक्यावर उभे असताना कोणीच अस खेळू शकणार नाही . हा जोक बराच जुना आहे काही नवीन असेल तर जरूर टाका . Happy

Pages