बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:15

नमस्कार!

बँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> इब्लिस इतर धाग्यावर बँकवाले म्हणतायत की ग्राहकांची देहबोली चांगली नसली की असे होते.. तुमची नव्हती वाटते <<<<
त्यावेळेस इब्लिसाच्या माबोवरील इतर मजकुराच्या विपरित त्याची देहबोली फार म्हणजे फारच्च जिव्हाळ्याची असली पाहिजे, त्याशिवाय का ब्यान्क म्यानेजर गाडी चालवायला बसला? Proud

बायदिवे, विनिता, मी ब्यान्कवाला नैये बर्का! पण नोकरीनिमित्ताने ब्यान्कान्शी माझा पहिल्यापासून संबंध आला आहे! (पण मी फायनान्सची कामेही बघत नाही बर्का)

Sorry! My trouble threshold is on higher side so bank employee can't easily trouble me. I keep eye on my target and then once my work is done there is always a complaint register present Happy

I was a banker and I know where they went wrong. I catch them up against the word of law. I once recovered debited non-aqb maint charges from my closed a/c. Happy

Presently I am fighting with fund houses if I can get work done, I will write a story here Happy

Rajasi, the point is why one has to resort so frequently to fighting and complaining while dealing with Banks. Is it a happy state of affairs or Banks need to do something about it, urgently & seriously !! बर्‍याचदां कामाच अतिरेक व ताण, हें कारण सांगितलं जातं; त्यांत तथ्य आहे का व असलंच तर त्यावर उपाय नको शोधायला. ग्राहकाना त्रास होतोय ही बाब दुय्यम समजणं म्हणजे 'सर्व्हिस इंडस्ट्री'चा पायाच डळमळीत करणं हें बँकांच्या व कर्मचार्‍यांच्या मनावर बिंबवणं म्हणूनच महत्वाचं.

माझी दोन्ही कडे खाती आहेत सरकारी बँकांमध्ये आणि प्रायव्हेट बँक मध्ये सुद्धा .सगळी कडे आलेले अनुभव चांगलेच आहेत .होम लोन च्या बाबतीत मात्र सरकारी ब्यान्कांमध्ये खूप कागदपत्र मागतात असा अनुभव त्यापेक्षा प्रायव्हेट बँक मध्ये पटकन मिळत त्यामुळे म्हटलं जातच फीक्स डिपोझिटस सरकारी ब्यांकेत कराव्यात आणि लोन मात्र प्रायव्हेट बँकेतून घ्याव Happy

राजसी आणि भाऊ नमसकर, कृपया देवनागरीत लिहायचे अन मराठित मजकुर द्यायचे कष्ट घ्याल का?
(नैतर लोकं नावे ठेवतील की बघा ही रिटायर्ड माणसे कशी हेकटपणे इन्ग्रजीतच लिहिताहेत Wink )

सॉरी! limbutimbu. आता मला पीसी मिळाला.

भाऊ नमसकर>>> the point is why one has to resort so frequently to fighting and complaining while dealing with Banks. Is it a happy state of affairs or Banks need to do something about it, urgently & seriously !!>>> खरंच का? नेहमी कुठे भांडाव लागतं? कधी उगिच्च उशीर लागतोय असं आपल्याला वाटल किंवा नेमका संबंधित कर्मचारी चालढकल करणारा असेल तरच ना? खूपजण बँकांची कामं गरज आणि निरुपाय म्हणून करतात. आवडीनी केली तर नाही त्रास होत. सरकारी बँकांची पॉलिसी आणि प्रोसिजर्सचे नियम बर्‍यापैकी किचकट आणे म्हणून वेळ्खाऊ असतात. प्रायवेट बँकांत काम तुलनेने भराभर होतात पण कोणाचा पायपोस कोणात नसतो आणि पॉलिसी आणि प्रोसिजर्स यांची बर्‍यापैकी पायमल्ली होते.

<< कृपया देवनागरीत लिहायचे अन मराठित मजकुर द्यायचे कष्ट घ्याल का?>> क्षमस्व. माझ्या संगणकावर मराठी फाँटची जरा गोचीच झालीय. " प्रतिसाद तपासा"वर क्लिक करून मगच मराठी आलं तर लिहीतां येतं. तरी पण चुकलंच. मान्य.
[याचा रिटायरमेंट/ज्येष्ठ नागरिकत्वाशीं इथं संबंध जोडणं मात्र अनुचित वाटलं ]

<< नेहमी कुठे भांडाव लागतं?>>राजसी, नेहमी नव्हे , पण बर्‍याचदां; तुमच्याच पोस्ट्मधेही हा सूर आहे !! Wink

पण बर्‍याचदां; तुमच्याच पोस्ट्मधेही हा सूर आहे !! >>>> Happy माझा वेळ जात नसेल तर समोरच्याला त्रास द्याय्ला भांडणासाठी तात्विक मुद्दे शोधून काढायचे Wink

सरकारी बँकांमध्ये कर्मचारी बहुतेक टेबलाखालून पैसे देऊन किंवा कोणाची तरी वट दाखवून नोकरीवर आलेले असतात, मग ते मालक असल्यासारखे वागणारच

<सरकारी बँकांमध्ये कर्मचारी बहुतेक टेबलाखालून पैसे देऊन किंवा कोणाची तरी वट दाखवून नोकरीवर आलेले असतात, मग ते मालक असल्यासारखे वागणारच>
मीही असेच ऐकले होते. पण यातले काहीही नसताना BSRB च्या प्रोसेसमधून (लेखी परीक्षा, इंटरव्ह्यु) पार पडून हाती कॉल लेटर आले होते. कपाळी बँक ऑफ महाराष्ट्र लिहिली होती. पण अगदी आडनिडे, कधीही न ऐकलेले गाव आले होते त्यामुळे जॉइन झालो नाही. माझ्या माहितीत जे बँक कर्मचारी आहेत त्यातल्या कुणी या मार्गाचा अवलंब केलेला नाही.

सरकारी बँकांमध्ये युनियन बळकट असतात. त्याचा कामावर परिणाम होत असेल का?

बर्‍याचदां कामाच अतिरेक व ताण, हें कारण सांगितलं जातं; त्यांत तथ्य आहे का >>> भाऊ.. कसला अतिरेक नि ताण.. फुकटचा गर्व असतो राष्ट्रीयकृत बँकेचा कर्मचारी म्हणून.. अर्थात एखाद दुसरे अपवाद असतात.. पण बरेचशे चालढकल करण्यात धन्यता मानतात.. निमित्त नियमांवर बोट दाखवतात.. पण येणार्‍या ग्राहकावर आपली बँक चालते हे लक्षात घेतय कोण.. इच्छा असेल तर मार्ग काढता येतो.. RBI पण म्हणा नियमावली देताना ग्राहकांना त्रास होउ नये वा ग्राहकांचे हित जपून निर्णय घ्यावा असेच सांगत असते..

गजा.. सुट्टे पैसे देण्यास कुठल्याच बँकेत हरकत नसते.. पण कॅशियर उगीच तो त्रास घेत नाही.. नि टाळायचे झाले तर मग खाते आहे का असे विचारले जाते.. बसल्या बसल्या 'बचत/चालू खाते'चे मार्केटिंग करण्याचा आव आणतात.. सुट्टे पैसे नाही आहेत सांगितले की कॅशियरचे काम होते.. तो बांधिल नसतो ग्राहकसेवेसाठी... Proud खरे तर ग्राहकाशी नाते जुळवायचे असेल तर आधी सेवा दयायलाच हवी.. पण त्याचवेळी बँकेच्या दृष्टीने एखादा माणूस खाते नसुनही फकस्त सुट्टे पैसे घेण्यासाठीच नियमितपणे बँकेत जाणार असेल तर त्याचा उद्धार नक्कीच !! बाकी सुट्टेच पैसे सोडा फाटलेली नोटदेखील बदलून घेउ शकतो.. पण कॅशियर नक्कीच उडवून लावणार.. कारण पुढे त्याला ह्याचा हिशोब ठेवावा लागतो.. मग ते RBI कडे बदलीसाठी पाठवणे वगैरे.. शेवटी काय फुकटचा कामाचा व्याप.. त्यापेक्षा ग्राहकाला पिटाळून लावले तर बरे नाही का.. !! Happy असो.. इथे तुझ्या बर्‍याच शंकांचे निरसन होईल.. http://www.rbi.org.in/currency/FAqs.html

राष्ट्रीयकृत बँकांच्या असल्या कृपेमुळे बहुतांशी ग्राहकवर्ग मग को-ऑपरेटीव बँकेकडे वळतात.. अर्थात तिथेही चांगला अनुभव येइलच असे नाही पण त्यातला त्यात बरे म्हणायचे ! पण एक गंमत अशी की को-ऑपरेटीव बँकांमध्ये एखादे काम करण्यास वा पैशे भरताना वा देताना उशीर झाला तर जो ग्राहक बोंबाबोंब करतो तोच ग्राहक राष्ट्रीयकृत बँकेत निमुटपणे बसून आपला नंबर कधी येइल वा समोरुन कधी प्रतिसाद येइल याची वाट बघत बसतो.. याला राष्ट्रीयबँकेचा दरारा म्हणावा की अजुन काय... पण कुठली बँक चांगली ठरवण्यापेक्षा कुठला कर्मचारी वर्ग काय व कसा प्रतिसाद देतो ते महत्त्वाचे..

वर कोणितरी म्हटल्या प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्या कल्चरचा तो एक भाग आहे. उमेदवारीच्या काळात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन ब्रँच (हॉर्निमन सर्कल) ला जायचो. त्या बेंकेतली सगळी मंडळी ११ वाजल्यानंतर ऑफिसात यायची, १-२ मधे जेवणाचा ब्रेक, ३-४ फोर्टला खरेदि, भाजी वगैरे आणि ५-६ च्या दरम्यान घरी निघायची. मधल्या वेळेत जमलं तर काम. असं असुन सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया त्याकाळी अत्यंत प्रॉफिटेबल होती... Happy

मला भारतातल्या बँकांचे फार चांगले अनुभव आलेत. २००५ साली तसा मला अकाऊंट उघडायला दीड महिना लागला, पण त्यानंतर माझा पगार बँकेत जमा व मी ए टी एम मधून पैसे काढत असे. नि मा़झे तिथले रहाणे संपल्यावर पुण्यातल्या बँकेत अकाऊंट असूनहि मुंबईत अकाऊंट बंद करू शकलो. दहा मिनिटात.

अनेक वर्षांपूर्वी मी पुण्यास गेलो असता अचानक ट्रॅव्हलर्स चेक कॅश करायची वेळ आली. पण मा़झ्याजवळ पासपोर्ट नव्हता. पण मी मा़झ्या मामेभावाबरोबर बँकेत गेलो होतो, माझ्या दोन तीन मामेभावांचे त्या बँकेत गेली अनेक वर्षे खाते आहे व तुम्हा सर्व भारतीयांसारखे त्यांचेहि शंभर कोटी रुपये बँकेत आहेत. म्हणून त्या मॅनेजरने मला माझे २५०० रुपये (किस झाडकी पत्ती!) दिले व म्हणाला कृपया दोन तीन दिवसात पासपोर्टाच्या फोटो असलेल्या पानाची कॉपी पाठवून द्या, म्हणजे ऑडिटला अडचण येणार नाही.
नंतर २०१२ ला एकदा पार्ल्याला पुनः ट्रॅव्हलर्स चेक कॅश करायला बँकेत गेलो. बाहेर प्रचंड ऊन, मी म्हंटले जरा एक दोन तास इथेच बसावे एअर कंडीशनमधे. गर्दी होतीच. तरी एका माणसाने बरोब्बर मलाच म्हंटले, साहेब चला तुम्ही, मी म्हंटले असू दे, असू दे, मी माझा नंबर आला की जाईन, पण त्याने हट्टच धरला. मग मी गेलो त्याच्यासमोर बसलो. तिकडून एक जण पेढ्याचे ताट घेऊन आला, मला एक पेढा दिला. माझ्या शेजारी बसलेला माणूस बिचारा हात पुढे करून बसला, तर त्याला सांगितले हे पेढे सर्वांसाठी नाहीत!

तसे इथल्या बँकेत पण फुकट बिस्किटे चहा कॉफी असते, पण पेढा?!

गप्पांचा धागा वाहाता असल्यामुळे इकडे पुन्हा लिहितो आहे .
पेन्शनचा दुरूपयोग करू नये याकरिता त्याचे नियम एकच आहेत .ज्येनां नी स्वत: सही करून ते प्रत्येकवेळी पैसे काढले पाहिजे .आजारींसाठी डॉक्टरचे सर्टि० प्रत्येकवेळी नवीन देऊन नातेवाइकाने पैसे काढायचे नियम आहे .पोस्ट आणि काही बैंका हा नियम कसोशिने पाळतात ते वाईट ठरतात .माझी आत्या अमेरिकेत जाऊन आजारी पडल्यावर तिचे पोस्टातले पेन्शन बुडले .
आता महा०बैंकेने सासूला एटिएम काड आणि चेकबुक दिले .अशी सवलत देणाऱ्या बैंका चांगल्या ठरतात .भांडणे होतात अमुक ठिकाणी असं आहे इथेही द्या .नोव्हेंबरमध्ये नुतनीकरण सर्टिफिकेट देइपर्यंत याचा दुरुपयोग होऊ शकतो .

<< स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन ब्रँच (हॉर्निमन सर्कल) ला जायचो. >> ही केंव्हाची गोष्ट आहे , हें महत्वाचं. फार पूर्वी एकंदरीतच कामाचा टेम्पो संथ असे, कामाच्या पद्धति/स्किमस सोप्या असत व स्पर्धेचा ताणही फारसा नसे. आतां बँकेबद्दल तक्रारी असल्या तरीही तिथं सर्वसाधारणपणे कामाचा ताण असल्याचंही जाणवतं. तक्रारीचा सूर लावताना मीं याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य नाही वाटत.

राजसी आणि भाऊ नमसकर, देवनागरि अन मराठी भाषावापराबद्दल धन्यवाद Happy (कधी कधी तान्त्रिक अडचणींमुळे माझेही असे होते)

>>>> सरकारी बँकांमध्ये युनियन बळकट असतात. त्याचा कामावर परिणाम होत असेल का? <<<<< भरत, काही प्रमाणात याचा परिणाम नक्कीच होतो. याव्यतिरिक्तही कारण आहेत, पण ती नक्कीच जाहिर फोरम वर बोलण्यालिहिण्य सारखी नाहीत.
मान मोडून मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक काम करत रहाणारे कारकुन/अधिकारी मी बघितलेत, तसेच सरकारी जावई असल्यासारखे, रिकामटेकडे बसणारे युनियन अधिकारी/पदाधिकारी व सरकारी जावई देखिल बघितलेत. या सर्वांचा एकत्रीत परिणाम होतो. काम करणारा काम करुन मरतो, रिकामटेकडे मोकळेच रहातात. हा प्रश्न व्यवस्थापनाचा आहे असे म्हणून सोडून देता येत नाही.
रिकामटेकड्यान्चा तसाही उपयोग नसेल, त्यान्चेकडे ग्राहकास/मला अडवुन धरण्याची जागा/अधिकार नसेल, तर आम्ही बिनधास्त त्यान्ची तोन्डावर खिल्ली उडवायचो अन ते देखिल निर्लज्ज्य पणे हसुन दाद द्यायचे. असो.

<<महाराष्ट्र ब्यांकेत शोधून - शोधून बिनडोक लोकांची भरती करतात की काय कुणास ठाऊक<< अगदी अग्दी.. एकेक नग भरलेले आहेत तिथे. +१

मी एका ऑफीसर बाईंना तुम्ही आता लवकरच रिटाय्र्ड होणार असाल नाहीका असे काम न झाल्यावर हेटाळायचो. फोन करुन स्टेटमेंट द्यालका विचारायचो आणि हो म्हणल्यावरच जायचो पण बाई उद्या याल का म्हणायच्या.

बँक ऑफ महाराष्ट्रचा आणखी एक कहर २००८ साली तळेगावात १०,०००/- रुपयांच्या खालच्या रकमा काढण्यासाठी एक कॉउटर आणि १०,००० रुपयांच्या वरच्या रकमासाठी दुसरा. १०,०००/- च्या खालच्या रकमासाठी भली मोठी लाईन असायची. १०,०००/- च्या वरच्या रकमासाठीच्या काऊंतरवर एक बाई स्वेटर विणत बसली असायची. मी दर वेळेला ब्रांच मॅनेजरला विचारायचो की काही वेळा करता त्या काउंटरवरुन १०,०००/- च्या खालच्या रकमा दिल्या तर रिझर्व बँक बुडेल का हो ? यावर मंद हसुन ते म्हणायचे हे तुम्ही त्या बाईंना का नाही सांगत ?

नितिनचंद्र.. त्या ब्रँचचा मॅनेजर शेळपट होता ह्याचा अर्थ..

कॉसमॉस बँकेतला आचरट प्रकार... पैसे भरायचे असतील तर आधी स्क्रोल करुन घ्यावे लागते.. स्क्रोल करण्यासाठी लांब रांग असते कारण हेल्प डेस्क वर असलेली व्यक्ती एकाच वेळी सगळी कामे करत असते..
त्यांच्याकडे टेलर सिस्टीम आहे तरीही ह्याच्यासाठी प्रचंड वेळ घालवतात..
पैसे घेणारा आणि देणारा कोण हे ही कळत नाही पटकन.. कारण नावचं नीट लिहिलेली नाहीत..

एस बी आय च्या पौड रोड (पुणे) शाखेत बचत खाते सगळ्या सुविधांसकट (ए टि एम, नेट बँकिंग वगैरे) उघडून ते पाच वर्ष चालवून दाखवा.

चालुद्या, मला काय वाटले, माबो वर ज्येना "आम्ही ज्येना, पण आम्हाला बुव्वा चांगलाच अनुभव येतो ब्यान्केत, तुमचेच काहीतरी चुकले असणार!!" असे म्हणायला लागले तर आपण अनुभव लिहून चूक केली की काय! Uhoh

मला वाटतं, बँकांबद्दल लिहिताना त्यांच्या एखाद्या शाखेतला तो अनुभव असेल तर त्या शाखेचे नाव द्यावे.
मला बँक ऑफ इंडिया, चेंंबूर नाका शाखा यांचा नेहमीच चांगला अनुभव आलाय. माझे प्रत्यक्ष जाणे सहा महिन्यातून एकदाच होते आणि त्या काळात जे नियम बदललेले असतात, त्याची माहिती उत्तमप्रकारे दिली जाते.
नवीन स्कीम्स असतील तर त्याही व्यवस्थित सांगितल्या जातात. एखादी स्कीम चांगली नसेल ( माझ्यासाठी ) तर तसेही सांगतात.

त्या ब्रांचला नेहमीच गर्दी असते. चेंबूर, माहूल परीसरातील अनेक निरक्षर लोक तिथे येत असतात. त्यांना हरप्रकारे मदत करावी लागते. त्यासाठी पण त्यांची अडवणूक केल्याचे कधी दिसत नाही.

एकदा ए. टी. एम. मधे कॅश नव्हती. तर तिथल्या सिक्यूरीटी गार्डनेही आता कॅश मिळणार नाही पण बॅलन्स बघू शकता, असेही नम्रपणे सांगितले. ए. टी. एम. कार्ड तर मी अर्ज करून विसरलो होतो. सहा महिन्यांनी परत गेलो तरी व्यवस्थित ठेवले होते.

सिनियर सिटीझन्स ना नंबर देण्यातच प्राधान्य देण्यात येते. आणि त्यांचे नंबर्स काऊंटरवरही प्रधानतेने घेतले जातात. कॅश माझ्यासमोरच मोजा असेही आवर्जून सांगितले जाते.

माझ्या शेजारी बसलेला माणूस बिचारा हात पुढे करून बसला, तर त्याला सांगितले हे पेढे सर्वांसाठी नाहीत!

तसे इथल्या बँकेत पण फुकट बिस्किटे चहा कॉफी असते, पण पेढा? >>> Lol

धन्य ते गांधीजी, धन्य त्या इंदिराबाई आणि धन्य ते झक्की.

(संदर्भ निडाआ )

सुदैवाने मला प्रायव्हेट बँकांचा अनुभव चांगला आलाय. पहिल्यांदा आयसीआयसीआय आपटे रोड आणि आता एच डी एफ सी भांडारकर रोड. माझं बँकेत जाणंच होत नाही सगळं ऑनलाईनच करते मी. पण तरिही कधी जाण्याची गरज पडली तर तिथे खूप सहकार्य मिळतं. मी दोन वेळेला गेले तेव्हा चौकशी च्या टेबलावर खूप मोठी लाईन होती पण दोन्ही वेळेला एक व्हॉलेंटियर येऊन चौकशी करून मला नक्की काय करायचं आहे हे जाणून घेऊन मार्गदर्शन करून दुसर्‍या काऊंटरवर घेऊन गेली. शिवाय डीडी वगैरे सुधा अगदी १०-१५ मिनिटात काढून मिळाला मला.

राज स्टेट ब्यांकेत नव्हते आणि नाहीये Happy
झक्की त्यांना समजल तुम्ही फोरीन हून आलात म्हणून स्पेशल ट्रीट मेंट Happy
मज्जा आहे बुवा एका माणसाची Lol
<<काम करणारा काम करुन मरतो, रिकामटेकडे मोकळेच रहातात>> लिंबू भाऊ +१

Pages