युवराजसिंग – एका अष्टपैलू युगाचा अस्त

Submitted by प्रमोद् ताम्बे on 8 April, 2014 - 08:29

युवराजसिंग – एका अष्टपैलू युगाचा अस्त

yuvee.jpg

भारताने यंदाचा T20 विश्व-चषक गमावला याला कारणीभूत असलेला एक महत्वाचा वाटेकरी आहे “युवराज सिंग” आणि याबद्दल देशभरातून त्याच्यावर नाराजी व प्रच्छन्न टीका होतांना दिसते आहे. तरीही त्त्याची काही चाहते मंडळी त्याच्या जुन्या पराक्रमांची आठवण करून देत त्याची भलावण करतांना म्हणतात की ‘ केवळ एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरलात कसे ?
मला त्यांना विचारावेसे वाटते की “ मग तुम्हाला आणखी किती दिवस पुरावी असे वाटते युवराजला ही अशी इतिहासातील त्याच्या जुन्या गत-पराक्रमांची शिदोरी ? भारतीय क्रिकेट जगतासाठी एकेकाळी युवराजने घडवलेला इतिहास आम्ही कोणीच नाकारत नाही.कारण ते एक अबाधित सत्य आहे. मात्र वर्तमानातील कटू वास्तवाला सामोरे जाताना इतिहासात रमून जाऊन व इतिहासालाच कवटाळून बसून कसे चालेल ? भूतकाळात युवीने काय काय पराक्रम गाजवले याचे पोवाडे गाण्याइतकेच वर्तमानातील प्रखर कटू वास्तव काय सांगते तेही पहाणे माझ्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे , नाही का ? असामान्य धिराने व जिद्दीने कँसरवर मात करुन भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून दिला याबद्दलचे युवराजचे श्रेय आम्ही कधीच नाकारत नाही.सर्व क्रिकेटविश्व त्यासाठी त्याचे कायमच ऋणी राहील , मात्र या पुण्याईच्या जोरावर व कँसरवर मात करुन पुन्हा एकदा जिद्दीने क्रिकेटच्या मैदानावर उतरल्याने मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन युवराज आता आणखी किती दिवस संधीची भीक मागत रहाणार ?
विश्व-चषक स्पर्धेतील केवळ एका सामन्यात नव्हे तर या वेळच्या संपूर्ण दौर्याेतच (एक सामना वगळता) युवीने ना कधी फलंदाजीत आक्रमकता,आत्मविश्वास,संयम दाखवला ना त्याच्या क्षेत्र रक्षणात चपळता दिसली.अगदी साधा झेलही तो नाही घेऊ शकला.फलंदाजीत तर सदैव तो बिचकत खेळत असल्याचेच जाणवले. ज्या एकमेव सामन्यात त्याने अर्ध शतक केले त्यातही त्याची सुरवात अत्यंत संथ व बिचकतच झाली हेच सत्य आहे. त्याने खेळलेल्या अखेरच्या सर्वच मालिकातून एकाच जाणीव दृढ होत गेली की आता युवराज मधील क्रिकेट संपले आहे. तरीही मला राहून राहू एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत रहाते की तुम्ही त्याची अंध चाहते मंडळी डोळ्यावर कातडे पांघरून न बसता का नाही हे मान्य करून सत्याचा स्विकार करत ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखातील विचार वाचून खेद वाटला. आपल्याकडचे कला-क्रीडा रसिक कसे सैल, स्वैर ताशेरे ओढतात ह्याचे उदाहरण आहे हा लेख! युवराज कसा महान आहे हे तुम्हाला सांगत बसण्यात वेळ घालवण्यात अर्थ आहे असे वाटत नाही.

निवड समिती, कर्णधार व संबंधित तज्ञ अश्या प्रकारे विचार करत नाहीत हे नशीब!

लेखाचे शीर्षक वाचून असे वाटले की युवराजने निवृत्ती जाहीर केल्याची बातमी आली की काय! तसे काही होऊ नये अशी इच्छा आता व्यक्त करावीशी वाटत आहे कारण हा असा दबाव आणणार्‍यांची संख्या (फेसबूकवरील गेल्या दोन दिवसात वाचलेले अभिप्राय लक्षात घेता) बरीच वाढत आहे.

युवराज एक अष्टपैलू असा महान खेळाडू " होता " हे मी आधीच मान्य केले आहे .पण तो आता भूतकाळ झालाय असेच माझे स्पष्ट मत आहे. व ते त्याचा कॅन्सर मधून बरे होऊन पुनरागमन केल्यानंतरचा आजवरचा त्याचा खेळ पाहूनच वास्तवावर बनले आहे. माझ्यामते "होता" व आहे यातील फरक तुम्हीही नक्कीच ओळखला असणार पण ........
जाऊ देना ,कारण कला-क्रीडा रसिक कसे सैल, स्वैर ताशेरे ओढतात असे म्हणणे म्हणजेच तुम्ही स्वत:च न्यायाधीश असल्याचे समजता.

मलाही बेफिकीर यान्च्यासारखेच वाटले. भारतीयान्ची मानसीकताच आहे की उगवत्या सूर्याला सलाम. जेव्हा एप्रिल ११ मध्ये वर्ल्ड कप जिन्कलो तेव्हा याना डोक्यावर घेऊन नाचलो. आणी आता हरलो तर छि थु सुरु.

मला वाटते की व्यक्तीपूजा आणी अती अपेक्षा यान्च्यावर मात केली तर सुधरतील आपले देश आणी क्रिकेट प्रेमी. नाहीतर आहेच पालथ्या घड्यावर पाणी. १९७१ साली ( नक्की ७१ च ना? ) अजीत वाडेकर हरले ( कॅप्टन म्हणून) त्यावेळीच हे प्रकार सुरु झाले, कारण त्या आधी वाडेकर जिन्कले तेव्हा हार पेढे आणी डिस्को सुरु होता देशात.

मग नन्तर थयथयाट सुरु झाला सालाबाद प्रमाणे. अरे सुधरा रे. काय हे. आपल्या कडे ना सगळेच आखुड शिन्गी बहु दुधी पाहिजे असते. सासुला सून चान्गली हवी असते, सुनेला सासु. नवर्‍याला बायको प्रेयसी सारखी चिरतरुण हवी असते. च्यायला वैताग आला!

युवराज माझा आवडता नाह्हीच्चे. पण होतेय ते बर नव्ह!

ही बघा मूळ लेखातील आपली वक्तव्ये, जी आपण एका न्यायाधीशाच्या थाटात केलेली आहेत. न्यायाधीशाशी बोलायचे झाल्यावर सामान्य नागरिकाच्या आवाजात बोलून चालणार नाही, त्यामुळे इतरांनाही तसा आव आणावा लागतो.

================

भारताने यंदाचा T20 विश्व-चषक गमावला याला कारणीभूत असलेला एक महत्वाचा वाटेकरी आहे “युवराज सिंग” <<<

हे कसे ठरले? रहाणे व धोनीही 'वाईड यॉर्कर्स' खेळू शकले नाहीत. आपले यशस्वी गोलंदाज पिटले गेले. श्रीलंकेकडे गेमप्लॅन होता, तो संघ आपल्यापेक्षा चांगले खेळला.

मला त्यांना विचारावेसे वाटते की “ मग तुम्हाला आणखी किती दिवस पुरावी असे वाटते युवराजला ही अशी इतिहासातील त्याच्या जुन्या गत-पराक्रमांची शिदोरी ? <<<

तुमचा हा प्रश्न देशाचे लाडके सच्चीन आणि गावसकर ह्यांच्यासकट कित्येकांसाठी विचारला जाऊ शकतो, पण तो मुद्दा नाही. युवराजबाबत तुम्ही हा लेख लिहिण्यास एखाददोन खेळींमुळे प्रवृत्त झाला आहात

भारतीय क्रिकेट जगतासाठी एकेकाळी युवराजने घडवलेला इतिहास आम्ही कोणीच नाकारत नाही.<<<

आभारी आहे, पण 'आम्ही' म्हणजे कोण?

मात्र या पुण्याईच्या जोरावर व कँसरवर मात करुन पुन्हा एकदा जिद्दीने क्रिकेटच्या मैदानावर उतरल्याने मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन युवराज आता आणखी किती दिवस संधीची भीक मागत रहाणार ?<<<

भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळवण्यास युवराजपेक्षा सरस अश्या शेकडो खेळाडूंच्या रांगा लागलेल्या असाव्यात व त्यांचे परफॉर्मन्सेस सिद्ध झालेले असावेत अश्या थाटात तुम्ही हे वक्तव्य केलेले आहेत.

त्याने खेळलेल्या अखेरच्या सर्वच मालिकातून एकाच जाणीव दृढ होत गेली की आता युवराज मधील क्रिकेट संपले आहे. <<<

हेही विधान न्यायाधीशासारखेच आहे. तुम्ही घरी बसून ताशेरे ओढणार, पन्नास हजारांच्या जमावाच्या दबावापुढे एकटा खेळाडू खेळणार! त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे का? हार मान्य होऊ शकत नाही का? त्याच्या एकट्यामुळे सामना हातातून गेला हे विधान निव्वळ वरवरचे निरिक्षण दर्शवते. पहिल्या इनिंग्जला खेळपट्टीवर ओल होती. लोकांचे पायही सटकत होते. श्रीलंकेने वाईड यॉर्कर्स अतिशय सातत्याने व वाईड बॉल पडू न देता टाकलेले होते. धोनी तर हेही म्हणाला होता (टॉस हारल्याहारल्याच) की आम्ही टॉस जिंकला असता तरी आम्ही आधी बोलिंग स्वीकारली असती. आता संघाचा कर्णधार प्रत्यक्ष त्या परिस्थितीत वावरून मत देतोय आणि तुम्ही इथे इंटरनेटवर त्या मताला महत्व न देता युवराजमुळे सामना गेला म्हणत आहात. कोण बोलत आहे न्यायाधीशाच्या थाटात?

तरीही मला राहून राहू एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत रहाते की तुम्ही त्याची अंध चाहते मंडळी ......<<<

तुमच्याकडे स्टॅट्स आहेत तशी 'अंध' (?) चाहत्यांकडेही आहेत. नुसती स्टॅट्स पाहिली तर युवराजला अजुन वर्षभर तर (आपल्यासारख्या) संघाने संधी द्यायलाच हवी.

मलाही खेळ पाहताना युवराजचा प्रचंड राग येत होता (माझे ब्लड प्रेशर हाय झाले होते) पण आपल्याला हे मान्य करावेच लागेल कि तो दिवस श्रीलंकेचा होता. जरी आपण १७० केले असते तरी ते त्यांनी पार केले असतेच. युवराजची ढिलाई फारच Obvious झाली.

सगळ्यात पहिला दोष जातो..टीम मॅनेजमेंट आणि धोनीवर.. युवराज फॉर्म मधे नाही हे जर आपल्यातल्या काही बॅट हातातही न घेतलेल्यांना कळत असेल तर ते त्यांना कळले नाही? धोनीने आधी रैनाला पाठवायला हवे होते आणि नंतर स्वतः यायला हवे होते. युवराज स्ट्रगल करत असेलही तरी फायनल ही स्ट्रगल करायची जागा नव्हती..

दोष द्यायचाच झाला तर तो पुढीलप्रमाणेही देता येइल.
१. रहाणे ८ धावात ३ धावा काढुन बाद झाला. त्याने जास्त धावा काढायला हव्या होत्या.
२. रोहित शर्मा अगदी बेजबाबदार फटक्यावर बाद कसा झाला?
३. कोहलीला जर समजत होते की युवराज अडखळत आहे तर त्याने स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली नाही?

मलाही आता असे वाटत आहे की युवराजचा खेळ घसरत चालला आहे पण केवळ एका वाईट खेळीवर एखादा खेळाडु संपला असे सहसा होत नाही. आणि चाहत्यांना आपण फायनल गमावल्याचा जो राग आला आहे त्याला वाट हवी म्हणुन ते सगळे युवराजवर निघत आहे. हळुहळु लोक विसरतील आणि आय पी एल मधे जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याला परत डोक्यावरही घेतील.

३. कोहलीला जर समजत होते की युवराज अडखळत आहे तर त्याने स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली नाही?<<<

हा प्रश्न चुकीचा आहे, क्षमस्व! कोहलीला स्ट्राईक मिळू शकत नव्हता. आता युवराज किंवा धोनीकडून आपल्याकडे स्ट्राईक येणारच नाही हे काही कोहलीला आधी समजणे शक्य नाही. त्याने स्ट्राईक रोटेट करण्यासाठी म्हणा किंवा मोठा फटका न गेल्यामुळे एक धाव घेऊन दुसर्‍याकडे स्ट्राईक दिला. पण दुसर्‍याला तो परतवताच आला नाही ह्याला कारण वाईड यॉर्कर्सवर खेळता न येणे!

सर्वात महत्वाचा मुद्दा:

हे निरिक्षण करता येण्यासाठी एकाग्रतेने खेळणार्‍या व मैदानाभोवती बसलेल्या खेळाडूंचे चेहरे न्याहाळावे लागतात असे मी आपले छातीठोकपणे लिहीत आहे.

युवराजने विकेट फेकण्याचा किमान दोनवेळा प्रयत्न केला पण बादही झाला नाही. (आठवा - धोनी सातत्याने स्वतःच्या गुडघ्यावर अस्वस्थपणे हात आपटत होता, मध्येच दोन क्षण आत जाऊन आला, उठताना नमस्कार केल्यासारखे काहीतरी केले. अस्वस्थता प्रचंड होती. 'संधीची भीक मागणारा' म्हणून ज्याची संभावना केली जात आहे तो युवराज इतका माठ तरी नाही की केवळ एकवीस बॉल्स खेळता यावेत म्हणून कसाही खेळत बसेल. त्याला इतके तरी नक्कीच समजत असणार की आत्ता तो चमकला तर पुढची संधी त्याला आपसूक मिळेल.)

अहो! काहीही काय लिहिता! प्लीज शीर्षक बदलणार का? शीर्षक वाचून धस्स झालं! वाटलं युवीने फार सिरीयसली घेतलं की काय! युवी चांगला खेळाडू आहे मैदानावर आणि मैदानाबाहेरही!
Everybody has bad days! Have some sportsman spirit if you can!

अहो! काहीही काय लिहिता! प्लीज शीर्षक बदलणार का? शीर्षक वाचून धस्स झालं!>>>> आगदि आगदि.मला तर न आवडणारा विचार हि एक क्षण आला.देव त्याला भरपूर आयुरारोग्य देवो....

प्लीस ते 'अस्त' वगरे काढुन टाका

शीर्षकातून सनसनाटी (कशी निर्माण करावी ) याचं मस्त उदाहरण.
बाकी क्रिकेटबद्दलची बिनबुडाची मनोरंजक मते ठासून सांगणे हे तर सर्वसामान्यच आहे पार पूर्वीच्या काळापासून. आजकाल तुरंत परीक्षण आणि तुरंत विश्लेषणाचे कोलीतही गावलेय हातात, क्रिकेटच्या अति(प्र)सारामुळे. तेव्हा चालू द्या. Happy

बेफ़िकीर >> +१

सांघिक खेळात फक्त एकालाच दोष देणे किती योग्य आहे.

बरेच मुद्दे नाही पटले....'युवराज आता आणखी किती दिवस संधीची भीक मागत रहाणार'... तो भिक मागतोय म्हणून तो संघात आहे का ?
युवराज ऑलरेडी एकदिवसीय सामन्यातून वगळला गेलाय.

खेळात प्रत्येकाला बॅड पॅच येत असतो, आणि तो संधाच्या मदतीने सरु देखिल शकतो...आढवा सचिनचा टेनिस एल्बो.

Yuvraj can be criticized, but he should not be crucified - Sachin

कुणी कशीही स्पष्टीकरणे दिली तरी सत्य बदलत नाही
युवराजच कारणीभूत आहे तर आहे हे मान्यच केले पाहिजे भलेही त्याच्याबद्दल कुणाला कितीही प्रेम असो सत्य ते सत्य !!
कुणाला जर फारच वाईट वाटणार असेल तर असे म्हणू की युवी पराभवाचे निमित्त ठरला म्हणून पण तोच निमित्त ठरला हे नाकारता येणारच नाही

एका खेळाडूने नीट खेळी केली नाही म्हणून एव्हढे आकांड तांडव, आणि पाच पाच वर्षे जे नेते काहीही प्रकाश पाडत नाही त्यांना ही लोक पुन्हा पुन्हा निवडून देतात.

मेरा भारत आणि असे लोक महान.

एव्हढा विचार आपले नेते निवडतांनाही केला तर......

वादे वादे जायते तत्वबोधः अशा भुमिकेतुन चर्चा / वाद करावा असे माझे मत आहे. इथे तर 'बेफिकिर' हे ज्या आवेशाने व हिरिरीने युवराजच्या वतीने प्रतिवाद करु लागले की जणु काही युवराजने यांना त्याचे वकिलपत्रच दिले आहे. सत्यावर /वास्तवावर आधारित टीका सुद्धा त्रयस्थ / तटस्थपणे व खिलाडू वृत्तीने स्विकारता आली पाहिजे.

< एकट्या युवीमुळे मॅच गेली असे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे.>+१

पराभवाची संपूर्ण जबाबदारी धोनीची आहे. युवराजने form मध्ये नाही हे माहित असूनही त्याला आधी पाठवला…. त्याने स्वतः किंवा रैना ला batting ला यायला हवे होते.

जिंकलेल्या स्पर्धेत एखादा खेळाडू अप्रतिम खेळला तर त्याचं वारेमाप कौतुक होतं, विजय हा सांघिक आहे हें सोईस्करपणे विसरूनही ; मग तोच खेळाडू नि:संशयपणे रटाळ व अनुचित खेळ करून एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाच्या अपयशाला कारणीभूत झाला, तर त्याच्यावर टीका होणं व ती त्याने खिलाडूवृत्तीने स्विकारणं योग्य नाही का ? कैफने देखील कांहीं अफलातून व समयोचित खेळी केल्या होत्या पण नंतर त्याला नाही तो फॉर्म टिकवता आला . कुणी कां नाही गळा काढला त्याला वगळण्यात आलं तेंव्हां ? कारण, त्याने वैयक्तिक 'ग्लॅमर'चं वलय नव्हतं निर्माण केलं !!
बेफिकीरजी, एखादा फलंदाज स्वतःला बाद करून घेण्यातही अपयशी ठरत असेल तर त्याने गंभीरपणे क्रिकेट खेळणं सुरूं ठेवावं कीं नाहीं याचा विचार करावा . आणि, धोनी अधून मधून उठून बाहेर जात होता तो हात- पाय हलवून रक्ताभिसरण वाढवायला; बॅटींगला गेल्यावर पहिल्या चेंडूपासूनच त्याला फटकेबाजी करावीच लागणार होती याची जाणीव होती त्याला.

वादे वादे जायते तत्वबोधः अशा भुमिकेतुन चर्चा / वाद करावा असे माझे मत आहे. इथे तर 'बेफिकिर' हे ज्या आवेशाने व हिरिरीने युवराजच्या वतीने प्रतिवाद करु लागले की जणु काही युवराजने यांना त्याचे वकिलपत्रच दिले आहे. सत्यावर /वास्तवावर आधारित टीका सुद्धा त्रयस्थ / तटस्थपणे व खिलाडू वृत्तीने स्विकारता आली पाहिजे.<<<

कृपया उपदेश करू नका. आधी नाही तो वाद काढायचा आणि मग त्यातून तत्वबोध व्हायला पाहिजे असा आक्रोश करायचा ह्याला काहीही अर्थ नाही.

>>>बेफिकीरजी, एखादा फलंदाज स्वतःला बाद करून घेण्यातही अपयशी ठरत असेल तर त्याने गंभीरपणे क्रिकेट खेळणं सुरूं ठेवावं कीं नाहीं याचा विचार करावा <<<

भाऊसाहेब, 'स्वतःला बाद करून घेण्यातही अपयशी ठरणे' हे युवराजच्या बाबतीत अनेकदा वगैरे झालेले नाही आहे, त्या सामन्यात प्रथमच असे झाल्याचे दिसले. त्याला अजिबात वेळ द्यायची तयारी नसण्याची भूमिका जितक्या तीव्रतेने घेतली जात आहे तितक्या तीव्रतेने इतरही खेळाडूंबाबत भूमिका घेतली असती तर मजाच आली असती. गावसकर, रवी शास्त्री, कांबळी, मांजरेकर, अन्शुमन गायकवाड, अझरउद्दीन, सेहवाग हे सगळेच भोवर्‍यात अडकले असते. आगरकर माझा एक आवडता अष्टपैलू खेळाडू होता, पण त्याला कित्येकदा अशी संधी देण्यात आली. सहा सहा वेळा सलग शून्यावर बाद होऊनही. युवराजच्या बाबतीत इतकी घाई का? श्रीलंकेच्या गोलंदाजीला, खेळपट्टीला, धोनी जे काही बोलत आहे त्याला, ह्या सगळ्याला काहीच अर्थ, काहीच महत्व नाही का?

आपण, जे स्वतःला विश्लेषक समजतो ते अनेकदा आपल्या मनातील इच्छांनुसार बायेस्ड बोलत असतो. प्रत्यक्ष त्या परिस्थितीत खेळणार्‍याचा अनुभव काय असू शकेल हे आपण 'फील' कसे करू शकू? (आता ह्यावर मायबोलीवर फार सुप्रसिद्ध असलेले विधान कृपया कोणी डकवू नये की क्रिकेट खेळलो तरच क्रिकेटवर बोलावे की काय आम्ही, वगैरे. आपला एक पराभव झालेला आहे आणि तो सरस संघाकडून झालेला आहे. कारणमीमांसेत युवराजची ढिसाळ फलंदाजी येणे स्वाभाविक आहे पण म्हणून त्याचा अस्त वगैरे करून टाकणे हे काहीच्या काही आहे).

आगरकर माझा एक आवडता अष्टपैलू खेळाडू होता, पण त्याला कित्येकदा अशी संधी देण्यात आली. सहा सहा वेळा सलग शून्यावर बाद होऊनही. >>> बेफी आगरकर हा गोलंदाज होता...आणि ६ वेळा जेव्हा तो शुन्यावर आउट झाला ते सगळे कसोटीसामने होते कुठलेही अंतिम सामना नव्हता.. टी२० सामन्यात शुन्य रन काढले का ? प्रश्न टी२० चा आहे तुम्ही कसोटी सामन्याचे उदाहरण देत आहेत Wink

. प्रत्यक्ष त्या परिस्थितीत खेळणार्‍याचा अनुभव काय असू शकेल हे आपण 'फील' कसे करू शकू? >>> ज्या खेळपट्टीवर समोरुन कोहली धुत होता त्या खेळपट्टीवर किमान जास्त अपेक्षा नाही पण १ रन काढुन कोहलीला स्ट्राईक कसा मिळेल याचा विचार न करता प्रत्येक चेंडु सीमापार घालवण्याचा जो प्रयत्न चालु होता त्यावर आक्षेप आहे..(हे लक्षात घ्या)

बेफी आगरकर हा गोलंदाज होता...<<< Uhoh फक्त गोलंदाज नव्हता तो, त्याने फलंदाजी करून किमान दोन ते तीन सामने जिंकून दिले आहेत.

आणि ६ वेळा जेव्हा तो शुन्यावर आउट झाला ते सगळे कसोटीसामने होते कुठलेही अंतिम सामना नव्हता.<<<

अच्छा, म्हणून चालते का?

वा!

ज्या खेळपट्टीवर समोरुन कोहली धुत होता त्या खेळपट्टीवर किमान जास्त अपेक्षा नाही पण १ रन काढुन कोहलीला स्ट्राईक कसा मिळेल याचा विचार न करता प्रत्येक चेंडु सीमापार घालवण्याचा जो प्रयत्न चालु होता त्यावर आक्षेप आहे..(हे लक्षात घ्या)<<<

रहाणे - स्ट्राईक रेट ३७

धोनी - स्ट्राईक रेट ५० ते ६० च्या दरम्यान

दोघांचाही स्ट्राईक रेट युवराजइतकाच!

टाका काढून धोनीला, होऊदेत त्याच्याही युगाचा अस्त वगैरे!

नाहीतरी ह्या टुर्नामेंटमध्ये एक खेळाडू म्हणून त्याने काय केले? कर्णधार म्हणून फायनलपर्यंत संघाला पोचवले म्हणालात तर काही प्रमाणात मान्य तरी होईल, पण स्वतः काय केले? द्या हाकलून! रैना एक तसाच! चांगला कोहली खेळतोय तर मध्येच येऊन १० बॉल्समध्ये १७ रन्स करून कशाला मॅच फिरवायची? कोहलीने दिलीच असती की जिंकून? द्या रैनाला हाकलून! आणा पुन्हा तेंडुलकर आण सेहवागला!

परदेशात धोनीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त मानहानीकारक पराभव नुकतेच झालेले आहेत. द्या हाकलून धोनीला, पाडा अजुन एक लेख, होऊदे अस्त!

रहाणे - स्ट्राईक रेट ३७ >>> नुकताच पाउस पडुन गेलेला .. स्विंग बॉल होत होते हे विसरले बहुतेक बेफी.. उगाच कैच्याकै लॉजिक लावायचे

Pages