युवराजसिंग – एका अष्टपैलू युगाचा अस्त

Submitted by प्रमोद् ताम्बे on 8 April, 2014 - 08:29

युवराजसिंग – एका अष्टपैलू युगाचा अस्त

yuvee.jpg

भारताने यंदाचा T20 विश्व-चषक गमावला याला कारणीभूत असलेला एक महत्वाचा वाटेकरी आहे “युवराज सिंग” आणि याबद्दल देशभरातून त्याच्यावर नाराजी व प्रच्छन्न टीका होतांना दिसते आहे. तरीही त्त्याची काही चाहते मंडळी त्याच्या जुन्या पराक्रमांची आठवण करून देत त्याची भलावण करतांना म्हणतात की ‘ केवळ एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरलात कसे ?
मला त्यांना विचारावेसे वाटते की “ मग तुम्हाला आणखी किती दिवस पुरावी असे वाटते युवराजला ही अशी इतिहासातील त्याच्या जुन्या गत-पराक्रमांची शिदोरी ? भारतीय क्रिकेट जगतासाठी एकेकाळी युवराजने घडवलेला इतिहास आम्ही कोणीच नाकारत नाही.कारण ते एक अबाधित सत्य आहे. मात्र वर्तमानातील कटू वास्तवाला सामोरे जाताना इतिहासात रमून जाऊन व इतिहासालाच कवटाळून बसून कसे चालेल ? भूतकाळात युवीने काय काय पराक्रम गाजवले याचे पोवाडे गाण्याइतकेच वर्तमानातील प्रखर कटू वास्तव काय सांगते तेही पहाणे माझ्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे , नाही का ? असामान्य धिराने व जिद्दीने कँसरवर मात करुन भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून दिला याबद्दलचे युवराजचे श्रेय आम्ही कधीच नाकारत नाही.सर्व क्रिकेटविश्व त्यासाठी त्याचे कायमच ऋणी राहील , मात्र या पुण्याईच्या जोरावर व कँसरवर मात करुन पुन्हा एकदा जिद्दीने क्रिकेटच्या मैदानावर उतरल्याने मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन युवराज आता आणखी किती दिवस संधीची भीक मागत रहाणार ?
विश्व-चषक स्पर्धेतील केवळ एका सामन्यात नव्हे तर या वेळच्या संपूर्ण दौर्याेतच (एक सामना वगळता) युवीने ना कधी फलंदाजीत आक्रमकता,आत्मविश्वास,संयम दाखवला ना त्याच्या क्षेत्र रक्षणात चपळता दिसली.अगदी साधा झेलही तो नाही घेऊ शकला.फलंदाजीत तर सदैव तो बिचकत खेळत असल्याचेच जाणवले. ज्या एकमेव सामन्यात त्याने अर्ध शतक केले त्यातही त्याची सुरवात अत्यंत संथ व बिचकतच झाली हेच सत्य आहे. त्याने खेळलेल्या अखेरच्या सर्वच मालिकातून एकाच जाणीव दृढ होत गेली की आता युवराज मधील क्रिकेट संपले आहे. तरीही मला राहून राहू एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत रहाते की तुम्ही त्याची अंध चाहते मंडळी डोळ्यावर कातडे पांघरून न बसता का नाही हे मान्य करून सत्याचा स्विकार करत ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तस पण हा गेम FIX होता. आठवा ५०-५० षटकांचा अन्तीप सामना. आपलाही एक श्रेष्ठ खेळाडू निवृत्त झाला होता.
त्याची परतफेड केली आहे भारताने. :G:-G:खोखो:

बेफिकीर म्हणतात ‘ पन्नास हजारांच्या जमावाच्या दबावापुढे एकटा खेळाडू खेळणार! त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे का? हार मान्य होऊ शकत नाही का? त्याच्या एकट्यामुळे सामना हातातून गेला हे विधान निव्वळ वरवरचे निरिक्षण दर्शवते.’
यावर माझे म्हणणे असे आहे की : मी तरी एकट्या युवराजला दोषी धरलेलाच नाही. ? त्याच्या एकट्यामुळे सामना हातातून गेला असेही मी कुठेच म्हटलेले नाही. मी सुरुवातीलाच म्हटलेच आहे की “ अपयशातील एक महत्वाचा वाटेकरी” म्हणजेच बाकीचेही खेळाडू कमी-जास्त प्रमाणात वाटेकरी आहेतच. प्रत्येकाचा ऊहापोह करायचला मी काही ‘अपयशाचे पोस्ट-मॉरटेम’ या विषयावर लेख लिहीत नव्हतो तर माझा मुख्य मुद्दा आहे की ‘अष्टपैलु युवराज ‘ सध्या बॅड पॅच मधून जात नसून त्याच्यातील क्रिकेट आता संपुष्टात आले आहे.
बेफिकीर पुढे असेही म्हणतात की ‘त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे का? हार मान्य होऊ शकत नाही का? यावर मला असे कधीच वाटले नाही की त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे. पण माझे एक अतिशय परखड व स्पष्ट मत आहे की हे सेलिब्रेटी असलेले क्रिकेट खेळाडू सामना जिंकले काय किंवा हरले काय,प्रत्यक्ष मैदानावर न येताही नुसते १५ जणांच्या टिममध्ये त्यांचे नुसते सिलेक्शन जरी झाले असले की त्यांना मानधनापोटी अमाप पैसा मिळतच असतो. याने त्यांचे समाधान न झाल्याने ते पैशासाठी जाहिरातींमध्ये काम करून पैसे मिळवतच असतात. यातच भर म्हणून श्रीसंत सारखे काही सेलिब्रेटी क्रिकेटपटू तर निव्वळ पैशासाठी मॅच फिक्सिंग सारख्या निंद्य मार्गाचाही अवलंब करण्यास आता मागे-पुढे पहात नाहीत असेही नुकतेच उजेडात आले आहे. थोडक्यात काय तर हे क्रिकेटपटू आपल्या देशासाठी नव्हे तर पैशासाठी खेळतात. मग जर हे व्यावसायिक आहेत तर जोपर्यंत त्यांच्यात ‘क्रिकेट’ आहे हे सिद्ध होत आहे तोपर्यंतच त्यांना संघात स्थान दिले जावे. आणि म्हणूनच मी असे विधान केले आहे की ‘ही जुन्या यशाची शिदोरी व सहानुभूती त्यांना किती दिवस पुरणार ? ’ मला तर सुचवावेसे वाटते की एखाद्या खेळाडूची संघात निवड होऊन त्याचेबरोबर जेंव्हा करार केला जातो त्या करारातच एक अशी अट घातली जावी की ‘जोपर्यंत तो खेळाडूसंघात असेल तो पर्यंत त्याला जाहिरातीत काम स्विकारता येणार नाही.’
प्रस्तुत लेख हा फक्त युवराजच्या क्रिकेटशी संबंधित असल्याने त्यात इतरांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा अंतर्भाव करणे अप्रस्तुत ठरले असते असे वाटल्याने त्यांचा परामर्श घेला नाही.कृपया याचा अर्थ ते मुद्दे अयोग्य आहेत असा काढू नये.
बेफिकीर यांना मात्र माझे मुद्दे फारच मिरच्यांसारखे झोंबलेले दिसतात याचे कारण म्हणजे एक तर ते युवराजला देवाचे जागी पुजत असावेत किंवा त्यांनी त्याचे वकीलपत्र तरी घेतले असावे आणि म्हणूनच ते इतक्या आवेशाने व हिरीरीने युवराजचे लटके समर्थन करतांना दिसत आहेत.आणि त्यामुळे त्याचे विरोधात जो कोणी काही बोलेल अथवा लिहेल त्याचे मागे ते सर्वशक्तिनिशी तुटून पडतांना दिसतात. पण ‘वैवकु’ यांनी वर म्हटल्याप्रमाणे “कुणी कशीही स्पष्टीकरणे दिली तरी सत्य बदलत नाही
युवराजच कारणीभूत आहे तर आहे हे मान्यच केले पाहिजे भलेही त्याच्याबद्दल कुणाला कितीही प्रेम असो सत्य ते सत्यच !!!
कुणाला जर फारच वाईट वाटणार असेल तर असे म्हणू की युवी पराभवाचे निमित्त ठरला म्हणून पण तोच निमित्त ठरला हे नाकारता येणारच नाही.”

<एखाद्या खेळाडूची संघात निवड होऊन त्याचेबरोबर जेंव्हा करार केला जातो त्या करारातच एक अशी अट घातली जावी की ‘जोपर्यंत तो खेळाडूसंघात असेल तो पर्यंत त्याला जाहिरातीत काम स्विकारता येणार नाही.> +१

>>>मला तर सुचवावेसे वाटते की एखाद्या खेळाडूची संघात निवड होऊन त्याचेबरोबर जेंव्हा करार केला जातो त्या करारातच एक अशी अट घातली जावी की ‘जोपर्यंत तो खेळाडूसंघात असेल तो पर्यंत त्याला जाहिरातीत काम स्विकारता येणार नाही.’<<<

अगदी अगदी! मला तर पुढे जाऊन असेही म्हणावेसे वाटते की टीव्ही कंपन्यांनी टीव्हीबरोबर रिमोट आणि ऑन ऑफचे स्विचही देऊ नये म्हणजे कोणाला असे म्हणता येणार नाही की तुम्ही टीव्ही बंद करू शकता की!

प्रमोद तांबे, एकीकडे तुम्ही म्हणताय "मी तरी एकट्या युवराजला दोषी धरलेलाच नाही." आणि शेवटी "युवराज कारणीभूत आहे तर आहे हे मान्यच केले पाहिजे भलेही".. !

पराभवाच्या कारणांमध्ये युवराजचा खेळ आहेच त्याबद्दल दुमत नाही.. इथे प्रश्न हा आहे की आपण म्हणजे फॅन्सनी त्यावर रिअ‍ॅक्ट कसं व्हावं किंवा हे जे काही रिअ‍ॅक्ट होतो आहे ते बरोबर आहे का ह्याचा !

बेफिकीर म्हणतात ‘ पन्नास हजारांच्या जमावाच्या दबावापुढे एकटा खेळाडू खेळणार! त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे का? हार मान्य होऊ शकत नाही का? त्याच्या एकट्यामुळे सामना हातातून गेला हे विधान निव्वळ वरवरचे निरिक्षण दर्शवते.’
यावर माझे म्हणणे असे आहे की : मी तरी एकट्या युवराजला दोषी धरलेलाच नाही. ? त्याच्या एकट्यामुळे सामना हातातून गेला असेही मी कुठेच म्हटलेले नाही. मी सुरुवातीलाच म्हटलेच आहे की “ अपयशातील एक महत्वाचा वाटेकरी” म्हणजेच बाकीचेही खेळाडू कमी-जास्त प्रमाणात वाटेकरी आहेतच. प्रत्येकाचा ऊहापोह करायचला मी काही ‘अपयशाचे पोस्ट-मॉरटेम’ या विषयावर लेख लिहीत नव्हतो तर माझा मुख्य मुद्दा आहे की ‘अष्टपैलु युवराज ‘ सध्या बॅड पॅच मधून जात नसून त्याच्यातील क्रिकेट आता संपुष्टात आले आहे.
बेफिकीर पुढे असेही म्हणतात की ‘त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे का? हार मान्य होऊ शकत नाही का? यावर मला असे कधीच वाटले नाही की त्याने रोज ग्रेटच खेळायला हवे. पण माझे एक अतिशय परखड व स्पष्ट मत आहे की हे सेलिब्रेटी असलेले क्रिकेट खेळाडू सामना जिंकले काय किंवा हरले काय,प्रत्यक्ष मैदानावर न येताही नुसते १५ जणांच्या टिममध्ये त्यांचे नुसते सिलेक्शन जारी झाले असले की त्यांना मानधनापोटी अमाप पैसा मिळतच असतो. याने त्यांचे समाधान न झाल्याने ते पैशासाठी जाहिरातींमध्ये काम करून पैसे मिळवतच असतात. यातच भर म्हणून श्रीसंत सारखे काही सेलिब्रेटी क्रिकेटपटू तर निव्वळ पैशासाठी मॅच फिक्सिंग सारख्या निंद्य मार्गाचाही अवलंब करण्यास आता मागे-पुढे पहात नाहीत असेही नुकतेच उजेडात आले आहे. थोडक्यात काय तर हे क्रिकेटपटू आपल्या देशासाठी नव्हे तर पैशासाठी खेळतात. मग जर हे व्यावसायिक आहेत तर जोपर्यंत त्यांच्यात ‘क्रिकेट’ आहे हे सिद्ध होत आहे तोपर्यंतच त्यांना संघात स्थान दिले जावे. आणि म्हणूनच मी असे विधान केले आहे की ‘ही जुन्या यशाची शिदोरी व सहानुभूती त्यांना किती दिवस पुरणार ? ’ मला तर सुचवावेसे वाटते की एखाद्या खेळाडूची संघात निवड होऊन त्याचेबरोबर जेंव्हा करार केला जातो त्या करारातच एक अशी अट घातली जावी की ‘जोपर्यंत तो खेळाडूसंघात असेल तो पर्यन्त त्याला जाहिरातीत काम स्विकारता येणार नाही.’
प्रस्तुत लेख हा फक्त युवराजच्या क्रिकेटशी संबंधित असल्याने त्यात इतरांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा अंतर्भाव करणे अप्रस्तुत ठरले असते असे वाटल्याने त्यांचा परामर्श घेला नाही.कृपया याचा अर्थ ते मुद्दे अयोग्य आहेत असा काढू नये.
बेफिकीर यांना मात्र माझे मुद्दे फारच मिरच्यांसारखे झोंबलेले दिसतात याचे कारण म्हणजे एक तर ते युवराजला देवाचे जागी पुजत असावेत किंवा त्यांनी त्याचे वकीलपत्र तरी घेतले असावे आणि म्हणूनच ते एतक्या आवेशाने व हिरीरीने युवराजचे लटके समर्थन करतांना दिसत आहेत.आणि त्यामुळे त्याचे विरोधात जो कोणी काही बोलेल अथवा लिहेल त्याचे मागे ते सर्वशक्तिनिशी तुटून पडतांना दिसतात. पण ‘वैवकु’ यांनी वर म्हटल्याप्रमाणे “कुणी कशीही स्पष्टीकरणे दिली तरी सत्य बदलत नाही
युवराजच कारणीभूत आहे तर आहे हे मान्यच केले पाहिजे भलेही त्याच्याबद्दल कुणाला कितीही प्रेम असो सत्य ते सत्यच !!!
कुणाला जर फारच वाईट वाटणार असेल तर असे म्हणू की युवी पराभवाचे निमित्त ठरला म्हणून पण तोच निमित्त ठरला हे नाकारता येणारच नाही.”

ते तुमच्या उत्तराची/ प्रतीसादाची वाट बघत असतील, आणी तुम्ही त्यान्चा आधीचा प्रतीसाद अनदेखा केला की काय अशी त्याना शन्का आली असेल म्हणून डबल टन्कला असेल.

तर उत्तर द्या......

बेफ़िकीर यांच्या सगळ्या पोस्ट्सना अनुमोदन.

आपण हरलो ह्यामुळे निराश होणं, त्यावेळी युवराजचा राग येणं समजू शकते पण मॅच हरणार ह्याचा अंदाज अल्यावर लगेच युवराजको OLX पे बेच डालो असे मेसेज पाठवणे नक्कीच चूक आहे.

मला तर सुचवावेसे वाटते की एखाद्या खेळाडूची संघात निवड होऊन त्याचेबरोबर जेंव्हा करार केला जातो त्या करारातच एक अशी अट घातली जावी की ‘जोपर्यंत तो खेळाडूसंघात असेल तो पर्यंत त्याला जाहिरातीत काम स्विकारता येणार नाही.’ > >तो संघात नसताना त्याला जाहिरातीमधे कोण घेणार ? त्याने जाहिरातीत मधे काम करण्याचा नि खेळण्याचा भाग वेगळा ठेवता येणे अशी अपेक्षा ठेवणे इतपत ठिक आहे पण अशा अटी कशाच्या बेसीसवर घालणार ?

मला तर त्या मॅचचा खरा मुजरीम धोनीच वाटतो. उद्या तो रैनाला ओपनिंगला पाठवेल आणि तिथे रैना फ्लॉप गेला तर शिव्या तुम्ही रैनाला घालाल की धोनीला? इथे असे प्रत्यक्षपणे लक्षात येत नाही कारण युवराज हा मिडल ऑर्डरचा खेळाडूच आहे, पण त्याचा फॉर्म आणि त्याची खेळायची शैली बघता धोनीने हा जुगार खेळला, जो फसल्याने शिव्या युवराजला पडत आहेत, पण सक्सेस झाला असता तर कदाचित धोनीचे पाठीराखे त्याच्या निर्णयाचे कौतुक करत श्रेय घ्यायला पुढे आले असते.

युवराज फलंदाजीला आल्याआल्याच मी घरच्यांना बोल्लो होतो की काय फालतू निर्णय आहे हा, रैना ला का नाही पाठवला, युवराज सेट व्हायला टाईम घेतो आणि श्रीलंकन हुशार गोलंदाज त्याला जखडून ठेवण्याची शक्यता होतीच.

सर्वांना विश्वचषकाचा सामना आठवत असेलच, त्यात तर युवराज फॉर्मला असूनसुद्धा धोनीने श्रीलंकेविरुद्ध त्याला मागे ठेऊन स्वता फलंदाजीला उतरला. मग यावेळी का अशी चूक केली. खरे तर युवराजचा डळमळलेला आत्मविश्वास पाहता त्याला संघात स्थानही मिळू नये. पण बहुधा धोनीला तो विश्वचषक स्पर्धांमधील लकी मॅस्कॉट वाटत असेल. २०-२० चा पहिला विश्वचषक आणि २०११ चा ५०-५० चा विश्वचषक यात त्याच्या भरीव कामगिरीने जिंकलो होतो. पण ईथे मात्र धोनी चुकला.

श्रीलंकेने शेवटी जी गोलंदाजी केली त्यात शेवटच्या ४ षटकात खुद्द धोनीने ७ चेंडू खेळून ३-४ धावा केल्या आणि सेट असलेल्या कोहलीनेही १० चेंडू खेळून जेमतेम ११ धावा केल्या. बाउंडरी यांना पण मारता आली नाही. याला कारण श्रीलंकेची अचूक गोलंदाजी हे आहेच पण त्याबरोबर आपण मोमेंटम घालवून बसलो होतो हे देखील एक कारण आहे. जे रैनाला पाठवले असते तर उलट वाढले असते.

असो, इथे धोनीवर राग नाही की त्यावर टिका करायची नाहीयेच, पण जिथे तिथे युवराजला गरजेपेक्षा जास्त पडत असलेल्या शिव्या बघून हि पोस्ट टंकावीशी वाटली.

सध्याच्या आयपीएल मध्ये युवराजचे स्ट्रोक्स पाहून असे वाटतेय की आजही तो ६ चेंडूत ६ षटकार मारायची क्षमता राखून आहे.
निर्विवादपणे वर्ल्डक्लास स्ट्रोकप्लेअर !
त्याला ऑस्ट्रेलियामधील विश्वचषकात अंतिम १४ मध्ये बघायला आवडेल. Happy

Pages