ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे
हा फोटो जरूर पहा
https://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...
साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती
खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .
डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत )
Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे
हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .
वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो
या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .
या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .
साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ?
मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .
बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .
भारी!! एकदम प्रेरणादायी
भारी!! एकदम प्रेरणादायी लेख!!
तुमचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा!!
अभिनंदन केदार! खरच चिकाटीच
अभिनंदन केदार! खरच चिकाटीच महत्वाची आहे. तु ती दाखवल्याने कौतुक वाटते. माझ्यात तीचीच कमतरता आहे. ती कशी वाढवावी??
हा लेख ईथे फोटोसकट टाकल्याने खुप धन्यवाद!
केदार खूप छान लिहिलायस तुझा
केदार खूप छान लिहिलायस तुझा प्रवास.
़ कीप इट अप!
मनःपूर्वक अभिनंदन केदार!! फार
मनःपूर्वक अभिनंदन केदार!! फार छान लिहिलं आहे.
झकासराव , केदार, पिंची मध्ये
झकासराव ,
केदार, पिंची मध्ये आहेस का रहायला.
एकदा भेटलो की अजुन जास्त हवा भरेल आणि पुन्हा सुरवात होइल माझी. स्मित >> हो , पिंपळे गुरव .नक्की भेटू
निवांत पाटील,
केदार्, पुन्हा अभिनंदन आणि स्टील आय एम टेलिंग, अ लॉट स्कोप फॉर बिझिनेस स्मित >>
हो , पिंपळे गुरव .नक्की
हो , पिंपळे गुरव .नक्की भेटू>> मग वाढीव वजनी मन्डळाच ( :फिदी:) वजन कमी करणे ह्या उद्देशाचं गटग करुच करु.
अरे वा स्वतंत्र लेख आला
अरे वा स्वतंत्र लेख आला तर......
तुमचं अभिनंदन....
मी पण असाच लेख लिहिणार होते.... बिफोर आफ्टर फोटो टाकुन.... आधी अनेक बाफ वर लिइलं होतं....
माझा प्रवास फक्त एकाच बाबतीत वेगळा होता... की मी लहान पणा पासुन जाडी होते. माझ्या लग्नात ( पंचविशीत) माझे वजन ९८ किलो होते. अति खाणे वा चपळ नसणे हा माझा प्रॉब्लेम कधीच नव्हता. ( मी भरतनाट्यम शिकलेली आहे. प्रचंड अॅक्टिव्ह तेंव्हा ही होते आता ही आहे) त्यामुळे वजन आता ४३ वर्षाची असताना कमी करणे हे चॅलेंज होते.
मधल्या काळात ( लग्न ते अत्ता) बाळंतपण, एकंदर सुखवस्तू पणा, ह्यामुळे वजन अजूनच वाढले ते १०२ पर्यंत पोहोचले. घर, मुलगी, ऑफिस, तिकडची प्रचंड टेंशन्स, सासू सासरे आजारी, नवरा खुप बीझी, घरात कामवालीशी सासर्यांचे सतत चे खटके त्यामुळे कामवाली सोडून जाणे इ.इइ..... अशा अएक आघाड्यांवर लढता लढता वाढलेल्या वजना कडे सतत होणारे दुर्लक्ष.... शेवटी केलेला निर्धार.....
आज वजन ७९ आहे...... म्हणजेच साधारण २३ किलो कमी १८ ऑगस्ट २०१३ ते ३१ जाने. २०१४ अशा ५ महिन्यात मी अमुलाग्र बदलले. उंची कमी असल्याने अजुन ही आयडियल वेट पर्यंत पोहोचलेली नाही. ते होणारही नाही ( उंची ५ फूट ३ इंच... आयडियल वेट ५५ ते ६० किलो) पण नीदान ७० पर्यंत आणायचे आहे..... बघु कसे जमतय ते ....
मी तर पहिली येणार मग त्या
मी तर पहिली येणार मग त्या गटगला (पण पिंची गटग नुसती खादाडीची असतात त्याचं काय? )
मस्त मोहन की मीरा
मस्त मोहन की मीरा
मोकामी, १०२ ते ७९ पण भला मोठा
मोकामी, १०२ ते ७९ पण भला मोठा पल्ला आहे
७० नक्की होईल
आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला आशिर्वाद (पक्षी कानपिचकवणी का काय ते) द्या
मीरा, खुप प्रेरणादायक आहे
मीरा, खुप प्रेरणादायक आहे तुमचा प्रवास.. खुप खुप अभिनंदन आणि ७० साठी भरपूर शुभेच्छा
केदार. तुझे प्रचंड भरभरुन
केदार. तुझे प्रचंड भरभरुन अभिनंदन. मीही या फेजमधुन गेलोय. तुझा १०५कि. च्या वेळचा रिपोर्ट व आताचा रिपोर्ट हा सुद्धा बाकी सगळ्यांसाठी इन्स्पिरेशनल ठरेल. चहावरुन काही धाग्यांवर आपलं थोडं जहाल-मवाळ होतं पण हेतू एकच होता.
नचि, तू देखील हा आहार व व्यायाम सुरु कर. तुझी बॉडी ठरवेल किती वजन ठेवायचं ते..!
पुन्हा एकदा अभिनंदन व आभार... आणि हो.. संकल्प अबाधित रहाण्यासाठी शुभेच्छा!
छान केदार.. hypothyroid
छान केदार..
hypothyroid असताना वजन कमी होन्याचा वेग खुप कमी असतो का? हा वेग कसा वाढवावा?
मोकीमी, अतिशय प्रेरणादायी कथा
मोकीमी, अतिशय प्रेरणादायी कथा आहे तुमच्याकडे. कृपया लवकर टाकाच!
आ.न.,
-गा.पै.
केदार........एक कडक सॅल्यूट
केदार........एक कडक सॅल्यूट !! खूप कळकळीनं लिहिलं आहेस रे.....!!
मोहन की मीरा...... तुझं पण तितकंच कौतुक
नक्कीच मोटीव्हेशन मिळालंय
धन्यवाद जयवी हेम , चहावरुन
धन्यवाद जयवी
हेम ,
चहावरुन काही धाग्यांवर आपलं थोडं जहाल-मवाळ होतं पण हेतू एकच होता. >> +१
मोकिमी __/\__
मोकिमी __/\__
फारच सुरेख लिखाण. आता हे
फारच सुरेख लिखाण.
आता हे नक्की जमवते.
हा धागा वाचुन कालच सायकल घेऊन
हा धागा वाचुन कालच सायकल घेऊन आलेय.
सकाळी ६ ला उठुन सायकलिंग करायला घेतलं पण दमायला झालं, जमेचना...
सरळ रस्त्यावर नीट चालत होती सायकल पण चढावर चढतच नव्हती
एकदा तर इतकं हताश वाटलं की घरी जावंस वाटलं पण मग मनाला सांगितलं की एकेकाळी भोसरी ते चिंचवड शाळेत सायकलने जायचीस तू. काही अवघड नाहीये. जमेल. एकाच दिवशी सगळं जमेल असं नाही. सुरुवात तरी कर...
मग थांबत थांबत ३ किलोमिटर चालवली. खर बोलू तर आज काहीच व्यायाम झाला नाहीये कारण १५ मिनिट सायकलिंग आणि ५ मिनिट आराम असच चालू होतं... पण सुरुवात तरी झाली.
विशेष म्हणजे ओळखीचे लोकं माझ्याकडे बघुन हसत होते त्याने मला लाज न वाटता स्फुरण चढत होतं की थांबा आणखी काही महीन्यांनी पहातेच कसे हसताय मला ते.
काहीही होवो मी सायकलिंग सोडणार नाही
थँक्स केदार आणि थँक्स मायबोली
आता थोडंस गाईड करा. दिवसाला किती किमी सायकल चालवायला हवी? चढावर उभं राहुन चालवली तर सेम इफेक्ट मिळेल का? अधुन मधुन पाणी प्यावं का? आणखी काय काळजी घ्यावी? स्पोर्टशुज जास्त जड होऊन पाय दुखतील का?
थँक्स फॉर शेअरिंग केदार!
थँक्स फॉर शेअरिंग केदार!
रिया. << हा धागा वाचुन कालच
रिया.
<< हा धागा वाचुन कालच सायकल घेऊन आलेय.
सकाळी ६ ला उठुन सायकलिंग करायला घेतलं पण दमायला झालं, जमेचना...
सरळ रस्त्यावर नीट चालत होती सायकल पण चढावर चढतच नव्हती >>
केदार जाधव ह्यांनी रस्त्यावर चालवायची सायकल वापरून व्यायाम केलेला नाहीये. एका जागी स्थिर राहून व्यायाम करता येणारी वेगळी सायकल व्यायामाची साधने विकणार्या दुकानांतून मिळते ती वापरली आहे.
तुम्हीदेखील तीच वापरा. रस्त्यावर सायकल चालविण्यात जोखीम जास्त आहे. तसेच प्रदुषणाचा त्रास जास्त प्रमाणात होतो. समजा पाच किमी अंतर तुम्ही स्वयंचलित दुचाकीने जाल तर दहा मिनीटे लागतील आणि सायकलने अर्धा तास. म्हणजे तुम्ही त्याच अंतराकरिता रस्त्यावर तिप्पट वेळ काढणार. तसेच दम लागल्याने श्वसनाचा वेग वाढणार म्हणजे प्रदुषित हवा जास्त प्रमाणात फुप्फुसांत जाणार.
त्यापेक्षा Indoor Cycle बरी. ऊन, पाऊस, थंडी, वारा कसलाच त्रास नाही. नियमित व्यायामाची हमी.
@ बोबडे बोल-----मुक्तेश्वर ,
@ बोबडे बोल-----मुक्तेश्वर , तुमच्च्या दोन जेवणांमध्ये दहा तासांचा फ़रक. मध्ये तुम्ही काहीच खात नाही? जर तसे असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ही हेल्दी सवय नसावी. माबोवरच्या डॉंक्टरांनी/आरोग्यतज्ञांनी कृपया हे चूक की बरोबर सांगावे.>> हो हो मीच मागे डॉ. नी. अॅसिडीटी बद्दल चौकशी केली असता. डॉ. नी मधात काही खाण्या संबंधी सुचविले. पण मी गेली १५ वर्षे झालीत क्वचित बिस्कीट/ कचोरी खातो. बाकी २ टाईम मधे काहीच नसते. डॉ. नी कचोरी/बिस्किट न खाता, थोडे जेवण्या संबधी सुचविले होते. अजुन तरी चालु केले नाही. त्रास, फक्त सर्दी, अॅसिडीटी मधामधात्.बाकी प्रकॄती क्षेम आहे. तसाही बैठ जॉब आहे. काम कमी असले ५ नंतर टेटे खेळतो.
चेतन, मी घेतली आता सायकल आणि
चेतन, मी घेतली आता सायकल
आणि सायकल चालवायला जाते तिथे जास्त वहानं येतं नाहीत त्यामुळे प्रदुषणाचा त्रास जरा कमी.
रिया, सायकलिंग फॉर बिगिनर्स
रिया, सायकलिंग फॉर बिगिनर्स असे थोडे सर्च करा गूगलवर, बर्याच टिप्स मिळतील (त्या वेचून निवडून घ्या कारण काही टिप्स अगदी दोन टोकाच्या असतील).
साधारण तासभर सायकल चालवायची असे ध्येय ठेवा. ते कधी गाठायचे (२-३-४ महिने वगैरे) ते देखील ठरवा. तासभर अश्यासाठी म्हटले कारण साधारण दिवसात तासभर तरी व्यायाम करावा म्हणुन. सायकल चालवण्यासाठी जे मसल बळकट करावे लागतात त्यासाठी इतर पुरक व्यायाम तुम्हाला इंटरनेटवर मिळतीलच.
इतरही व्यायाम करावे लागतील?
इतरही व्यायाम करावे लागतील?
भ्याआआ....
असो शोधते थँक्स
एक तास सायकल चालवायची हेच ध्येय आहे. आज पहिला दिवस म्हणून अर्धातास चालवली
अभिनंदन केदार! मी पण कमी
अभिनंदन केदार!
मी पण कमी केलंय वजन.... जास्त नाही, ५ किलो.
माझा वजनाचा प्रवास, ६० किलो, जॉब सुरु झाल्यावर ६४ किलो, लग्नानंतर ६९.५ किलो
होस्टेलला जास्त खायचो, पण होस्टेल ते इंस्टी बर्याच फेर्या व्हायच्या सायकलवर आणि ते अंतर १ते १.५ किमी होतं, शिवाय ४ थ्या मजल्यावर रुम, नो लिफ्ट, ह्याबरोबरीला सकळी १५-२० मिनिटे व्यायाम, एवढ सगळ मिळुन वजन नियंत्रित होतं.
लग्नानंतर डब्यात extra पदार्थ सुरु झाले, व्यायाम चालु होता पण खाण थोडं वाढलेलं, ट्रेकिंग पण थोडं कमी झालं, एकदा सिंहगड चढताना प्रंचंड दमलो, वाढलेल्या वजनाचा परिणाम दिसत होता.
नंतर एकदा हफिसातल्या टेस्ट मध्ये cholesterol थोड जास्त आलं, तेंव्हा ठरवलं की आता काहीहि करुन वजन कमी करायचच..खाण्यावर नियंत्रन आणि व्यायामा (२०मिनि) बरोबर जॉगिंग (२० मिनि) पण सुरु केलं (एव्हढा व्यायाम पुरेसा नाही, पण आळस कंट्रोल करणं अवघड जातय) , झालं शेवटी कमी वजन,६९ अरुन ६४ पर्यंत आलोय (जुन्या पाटलुनि आणि जिन्सा परत बसायला लगल्या ), अजुन २ किलो कमी करायचय, बघुया कधी होतंय ते.
आणि हो मला ५ किलो कमी करायला २ महिने लागले
अभिनंदन रिया काहीही होवो मी
अभिनंदन रिया
काहीही होवो मी सायकलिंग सोडणार नाही स्मित >> हाच Attitude कायम ठेव
एक तास सायकल चालवायची हेच ध्येय आहे. आज पहिला दिवस म्हणून अर्धातास चालवली स्मित >>
असच कर . हळू हळू ५ मिनिटे वाढवत जा म्हणजे एकदम त्रास वाटणार नाही . कंटाळा आला तर एखाद दिवशी तेवढा वेळ चाल . पण दिवस वाया घालवू नको .
येस मी तेच विचार करत होते की
येस
मी तेच विचार करत होते की आज अर्धातास आणि लगेच उद्या एक तास केलं तर कसं होईल माझं
थँक्स
केदार शप्पत महान आहेस,
केदार शप्पत महान आहेस, अवाजवी वजन वाढल्यावर हताश होऊन प्रयत्न सोडून देणारी बरीच मंडळी पाहीलेयत मी
तुझे प्रयत्न आफाट आहेत, ज्यांनी प्रयत्न सोडलेयत त्यांना नक्की वाचायला देणार हे
भारी रे केदार.. अभिनंदन !
भारी रे केदार.. अभिनंदन !
Pages