'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

एखाद्या समलैंगिकावर त्याच्या घरचेच अन्याय करत असतील, तर तो मदत मागत नाही, तोपर्यंत मी तरी काय करणार ना ? >> आपण काय करू शकतो हे (पिडीत - अपिडीत) समलिंगी व्यक्ती समोर येईपर्यंत थांबायची गरज आहे का? मला उगीच पडलेले काही प्रश्न लिहितीये. उत्तरे स्वतःशी तपासली तर आपण स्वतः आपल्याला कधी कधी चकित करतो.
अ. समलैंगिक जोडपे असेल तर त्यांना आपल्या घरच्या कार्याला (सत्यनारायण पूजा, लग्न इ) बोलवाल का?
ब. समलैंगिक स्त्रीला ओटी भरणे, हळदी कुंकू अशा "सवाष्ण-आवश्यक" कार्यक्रमांना बोलवाल का? बोलावल तर कसे वागवाल?
क. व्यवहारात मित्र/मैत्रिणी एकमेकांच्या 'जोडीदार'चा उल्लेख करताना नवरा-बायको असे लिंगवाचक शब्द वापरता का?
ड. पुरुष कलीगने 'पितृत्त्व रजा' घेतली तर त्याची बायको बाळंत झाली हेच एक गृहीतक मनात असते का? त्याबद्दल शंका असेल तर ती दूर करण्याचा यशस्वी (होईपर्यंत) प्रयत्न करत राहता का?
इ. मुलांशी बोलताना तुझी मम्मी-पप्पा असे सामन्यपणे बोलले जाते. तुझे "पालक" हा लिंगनिरपेक्ष शब्द फार मायाविरहीत वाटतो का? बोली भाषेतील हा छोटा बदल फार जाचक आहे का?
फ. समलिंगी व्यक्तीने आपला जोडीदार जाचक आहे/ब्रेकअप होईल अशी तक्रार केली तर एका भिन्नलिंगी जोडप्याबद्दल असेल तशीच काळजी वाटेल का? का एक बाई दुसर्या बाईला मारहाण करते तर तुझे हात काय मेंदी साठी आहेत काय अशी काही प्रतिक्रिया असेल?

समलिंगी लेसबियन मुलगा, समलिंगी गे मुलगी, >>> हे प्रकार नसतात
<<
मामी किती हे घोर अज्ञान?
अहो,
लेस्बिअन म्हणजे मुली आवडतात, मग ज्याला मुली आवडतात तो मुलगा लेस्बिअन. त्याने समलैंगिक लेस्बिअन संबंध ठेवले तर तो समलिंगी लेस्बिअन =))
जौद्या. कठीण आहे ते.
फक्त अन फक्त बी साठी आहे.

बी,
तुस्सी महान हो. तोफु कुबुल करो Wink

(यापुढे ते ३ इडियट्स जे काय करतात ती लेस्बिअन गे अ‍ॅक्ट -उर्फ ढुंगी डान्स- करावी)

>>>

बी | 23 January, 2014 - 12:38

शास्त्रज्ञांना तरी अस का वाटत की मनुष्य हा एक तर पुरुष वा स्त्रि म्हणून जन्माला यावा?!!! मनुष्य जातिचे हे ८ प्रकार म्हणजे: मुलगा, मुलगी, समलिंगी गे मुलगा, समलिंगी लेसबियन मुलगा, समलिंगी गे मुलगी, समलिंगी लेसबियन मुलगी, भिन्नलिंगी मुलगा, भिन्नलिंगी मुलगी - हे ८ प्रकार ह्यापुर्वी देखील जन्माला आले असतीलच. म्हणजे अनेक प्राचीन काळापासून मनुष्य असा जन्म प्रकारात मोडत आला आहे. त्यावेळेसच्या लोकांनी कधी ह्याचा कुठे उहापोह केल्याचे वाचनात नाही. आठवा: शिखंडी (महाभारतातील एक पात्र). <<<

हहगलो पेक्ष अधिक हसायचे असल्यास एखादी स्मायली उपलब्ध होईल का?

प्राचीन काळापासून मनुष्य असा जन्म प्रकारात मोडत आला आहे. त्यावेळेसच्या लोकांनी कधी ह्याचा कुठे उहापोह केल्याचे वाचनात नाही. <<< बी, खजुराहो, कोणार्क वगैरे ठिकाणी एकदा जाऊन ये. तिथे बरेच स्पश्ट उहापोह केलेले दिसतील.....

बी, खजुराहो, कोणार्क वगैरे ठिकाणी एकदा जाऊन ये. तिथे बरेच स्पश्ट उहापोह केलेले दिसतील.....<<<

खजुराहोला कसे जायचे असा एक धागा निघेल आता Light 1

किंवा खजुराहो येथे भोजनाची सोय कशी आहे वगैरे!

(अवांतराबद्दल क्षमस्व)

-'नैसर्गीक भिन्नलिंगी बेफिकीर'!

अजून काही वर्षांनी मुतार्यांवर लिहलेले असेल ,समलिंगिकरता -->,भिन्नलिंगीकरता -->

चिनूक्स,

आपला इथला प्रतिसाद वाचला. तिथे दिलेल्या दुव्यावरचा लेखही वाचला. मला काय वाटलं ते लिहितो.

१. सुरुवातीला Historical background दिलीये. तीत जो रिलीजन वर्णिलेला आहे तो युरोपीय आहे. युरोपीय ख्रिश्चनीटीने भिन्नलिंगी संबंधांवरसुद्धा अनेक निर्बंध लादले होते. समरतींची बातच सोडा. त्यामानाने भारतातली पारंपारिक समाजाची लैंगिक पार्श्वभूमी बरीच वेगळी आहे.

२. पुढे फ्रॉईड पासून हूकर पर्यंत अनेक संशोधकांची मते वर्णिलेली आहेत. त्यात एक नाव आहे किन्सी (Kinsey). या माणसाचे रिपोर्टस अतिशय वादग्रस्त आहेत. त्याने बालकांच्या उत्कटबिंदूंचा (children's orgasm) अभ्यास केला होता.

यावर पुढे काही बोलायची गरज आहे का? मी अपप्रचार करत नाहीये हे तुमच्या ध्यानी आलं असेलंच!

३. तुम्ही म्हणालात की :

>> आता पुण्यातल्या या १०,००० तरुणांनी किंवा भारतातल्या (अधिकृत) पंचवीस लाख समलिंगी व्यक्तींनी असं
>> काय अराजक माजवलं आहे की ज्यामुळे तुम्हांला त्या धोकादायक वाटतात?

२०११ साली कॅनडातल्या संसदेसमोर डॉ. क्विन्सी नामक एका तत्ज्ञाने माहीती पुरवली की बालरतीत्व हे समरतीत्वाप्रमाणे एक लैंगिक निर्देशन आहे (Pedophilia ia a sexual orientation like homosexuality).

यावर हसावं का रडावं?

जर समरतींना नैसर्गिक म्हणून मान्यता दिली तर पुढील पायरी बालरतींच्या कायदेशीर मान्यत्वाची असेल, हे स्पष्ट दिसतं ना?

४. परत तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या निष्कर्षांवर (conclusions section) येऊया.

४.१
>> The foregoing should not be construed as an argument that sexual minority individuals
>> are free from mental illness and psychological distress. Indeed, given the stresses
>> created by sexual stigma and prejudice, it would be surprising if some of them did not
>> manifest psychological problems (Meyer, 2003).

समरती व्यक्तींच्या मनात ताण उत्पन्न होतो. निसर्गदत्त रचनेच्या विरुद्ध वर्तन केल्याने तणाव येणारंच. त्यास उर्वरित समाज जबाबदार नाही.

४.२
>> The data from some studies suggest that, although most sexual minority individuals are
>> well adjusted, nonheterosexuals may be at somewhat heightened risk for depression,
>> anxiety, and related problems, compared to exclusive heterosexuals (Cochran & Mays,
>> 2006).

समरती लोक बर्‍यापैकी समायोजित (adjust) झाले तरी त्यांच्यात व्याकुळता, नैराश्य हे विकार का उफाळून येतात? आणि हे विकार दूर कसे करायचे?

असो.

एकंदरीत, गे पणा मान्य केल्याने गे लोकांच्या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे चर्चेचा रोख उर्वरित समाजाकडे नसावा.

आ.न.,
-गा.पै.

<<<समलिंगी लेसबियन मुलगा, समलिंगी गे मुलगा >>>

शब्दांची निवडीमुळे हे चुक वाटत असल तरी मला वाटत इथे ट्रान्स्जेन्डर पॉप्युलेशन अभिप्रेत असाव. म्हणजे एखादा पुरूष जो जन्माला येताना पुरुष देहात जन्मला असला तरी त्याची स्वप्रतिमा स्त्री ची आहे आणि म्हणुन जोडीदार म्हणुन पुरुषाचा शोध आहे आणि व्हाइस व्हर्सा. नॉर्मल लेस्बिअन किंवा गे पॉप्युलेशन मध्ये जोडीदार म्हणुन समलैंगिक व्यक्ति हव्या असल्या तरीहि त्यांची स्वप्रतिमा विरुध्दलिंगी नसते. सामान्यपणे समलैंगिक व्यक्तिंबरोबरच ह्यांचा उल्लेख केला जातो. 'मायनॉरिटी हेल्थ' हा विषय अभासला होता त्यावरुन हा निष्कर्श काढला.

सिमन्तीनी, चांगले प्रश्न.... खरं तर असा विचार कधी मनात येईल असं वाटलही नव्हतं.
बायको बाळंत झाली, हे कारण सोडुन 'पितृत्व रजा' मिळण्याचे दुसरेही काही नियम आहेत का ? ते कळलं नाही. असो.
अ,ब,क - काहीच अडचण नाही.
इ - पालक या शब्दाला 'ज्याला आईवडील नाही' असा... असं काहीसं डोक्यात बसलय खरं. बहुदा अर्जावरील आई/वडील्/पालकांचे नाव.... यावरुन असेल.
फ - निश्चितच काळजी वाटेल, शेवटी माणुसकी आहे की नाही ?

>>जर समरतींना नैसर्गिक म्हणून मान्यता दिली तर पुढील पायरी बालरतींच्या कायदेशीर मान्यत्वाची असेल, हे स्पष्ट दिसतं ना?

याला Fear Mongering म्हणतात. महाराष्ट्रातील स्त्रिया विकच्छ नेसू लागल्या तेव्हा काही चिंतातुरांना हे असेच सुरु राहिले तर पुढची पायरी बायका विवस्त्र फिरतील काय अशी शंका येत असे.जिथे जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाली तिथे कुत्र्याशी, मांजराशी, कॉम्पुटरशी विवाहास कायदेशीर मान्यता द्या अशी मागणी झालेली नाही. टेन्शन घेऊ नये.

>>समरती व्यक्तींच्या मनात ताण उत्पन्न होतो. निसर्गदत्त रचनेच्या विरुद्ध वर्तन केल्याने तणाव येणारंच. त्यास उर्वरित समाज जबाबदार नाही.

या तणावाचे कारण निसर्गदत्त रचनेच्या विरुद्ध वर्तन हे नसून निसर्ग दत्त म्हणजे काय याच्या सामाजिक व्याख्येत अहे. तसे तर कपडे घालणे, दाढी करणे ई निसर्गदत्त रचनेच्या विरुद्धच आहे पण म्हणून कुणाला तणाव येत नाही. नकटेपणा अनैसर्गिक आहे असा एखाद्या समाजात प्रचलित समज असेल, त्या समाजात नकट्या लोकांना हीन लेखले जात असेल, त्यांना विवाह करायला बंदी असेल, तर त्या समाजातील नकट्या व्यक्तींना मानसिक तणाव येइलच, त्याचे खापर नकट्यांवर फोडून कसे चालेल ? ( इथे नकटे ऐवजी डावखुरे, घारे डोळेवाले काहीही घेता येइल.)

vijaykulkarni,

१.
>> याला Fear Mongering म्हणतात. महाराष्ट्रातील स्त्रिया विकच्छ नेसू लागल्या तेव्हा काही चिंतातुरांना
>> हे असेच सुरु राहिले तर पुढची पायरी बायका विवस्त्र फिरतील काय अशी शंका येत असे.

पाश्चात्य देशांत सकच्छ वा विकच्छ नेसले जात नाही. पण बालरतींना कायदेशीर करण्याच्या हालचाली चालू आहेत. मी दिलेला हा दुवा तुम्ही वाचलेला दिसत नाही : http://www.parl.gc.ca/HousePublications/Publication.aspx?DocId=4959361&L...

२.
>> निसर्ग दत्त म्हणजे काय याच्या सामाजिक व्याख्येत अहे.

समाजाला व्याख्या करीत बसण्याची गरज नाही.

३.
>> त्या समाजात नकट्या लोकांना हीन लेखले जात असेल, त्यांना विवाह करायला बंदी असेल, तर त्या
>> समाजातील नकट्या व्यक्तींना मानसिक तणाव येइलच,

नकटेपणाने असा काय तोटा होतो समाजाचा? समरतींच्या वावरण्याने होतो. आनंदीवनात काय चालतं ते माहीतीये ना? त्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास होतो. नकटेपणाची गे गिरीशी तुलना सर्वथैव अयोग्य आहे.

संधीसाधू गे लोकांमुळे खर्‍याखुर्‍या गे लोकांना त्रास होत असेल तर उर्वरित समाजाचा दोष काय? अगोदर खरे गे आणि खोटे गे यांच्यात फरक कसा करायचा ते सांगा.

आ.न.,
-गा.पै.

रमा,

>> सामान्यपणे समलैंगिक व्यक्तिंबरोबरच ह्यांचा उल्लेख केला जातो.

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. Happy

गे लोकांचं वर्तन कायदेशीर करतांना बरेच प्रयास पडणार आहेत. मी गामा_पैलवान दिसायला पुरूष असलो तरी आतून स्त्री आहे. आणि मी लेस्बो आहे. म्हणून मला स्त्रियांच्या प्रसाधनगृहात जायचा हक्क आहे. माझा फोटो पहा इथे :

आ.न.,
-गा.पै.

.

>>
नकटेपणाने असा काय तोटा होतो समाजाचा? समरतींच्या वावरण्याने होतो. आनंदीवनात काय चालतं ते माहीतीये ना? त्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास होतो.
<<

आनंदीवनात असं काय चालतं की जे भिन्नलैंगिकांच्या जगात होत नाही? ड्रग्ज? प्रॉस्टीट्यूशन? स्टॉकिंग? रेप्स?

गापै, तुम्हाला समजत नाहीये की तुम्ही न समजल्याचा आव आणता आहात?
परस्परसंमतीने निर्माण झालेलं नातं याचा अर्थ तुम्हाला खरंच समजत नाहीये का? लहान मुलं, प्राणी, खुर्च्या, आणखी काही - हे संमती द्यायलाच मुळात शारीरिक अथवा बौद्धिकदृष्ट्या पात्र नसतात त्यामुळे तसे संबंध गैर आहेत.
इन्सेस्टमुळे पुढच्या पिढ्यांत जनुकीय प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणून तो गैर आहे.
या सर्वांची समरतींशी तुलता कशी काय होऊ शकते?

पैल्वानशेठ काय योगायोग आहे बघा!
महर्षी पु. ना. ओक यांचे विनोदी लेखन एकाएकी आठवले आणि त्यातून तत्सम विनोदी लेखनाचा शोध घेताना मला साधारण महिन्याभरापूर्वी ज्युडी रेझमन या तितक्याच थोर विदुषीचे Kinsey, Sex and Fraud नामक भन्नाट विनोदी पुस्तक माझ्या हाती लागले होते. आता त्याच बाई इथे विशेषज्ञाच्या रूपात अवतलेल्या पाहून माझे डोळे भरून आले आहेत.

मला कधी कधी प्रश्न पडतो बुवा, म्येनष्ट्रीम मधल्या आपल्यासारख्या थोर अभ्यासकर्त्याना कधीही गरीब बापडे सो काल्ड म्येनष्ट्रीम मधले विचारवंत का सापडत नाहीत?

>>बालरतींना कायदेशीर करण्याच्या हालचाली चालू आहेत. मी दिलेला हा दुवा तुम्ही वाचलेला दिसत नाही >>

गा. पै. मला वाटते हा वस्तूस्थितीचा विपर्यास आहे. बालरतींना कायदेशीर करणे वगैरे काही होत नाहिये. पण सेक्स ऑफेंन्स बाबतचे कायदे , झालेला गुन्हा आणि शिक्षा यात मेळ असावा इतकीच अपेक्षा आहे. बरेचदा बाय बुक जाताना अनावधानाने झालेल्या चुकीची फार मोठी शिक्षा होते. हे टाळण्यासाठी प्रयत्न म्हणजे बालरतींना मोकळे रान नव्हे.
आमच्या गावातील केस इथे मांडत आहे. आमच्या स्टेट मधे कंसेंटचे वय १६. मात्र ऑथॉरीटी फिगर बरोबर रिलेशनशिप असेल तर हे वय १८ होते. एक २० वर्षाचा तरुण आणि एक १६ पूर्ण झालेली मुलगी डेटिंग करत होते. याला घरुनही संमती होती. काही काळाने तरुणाने सबस्टिट्युट टिचर म्हणून इथल्या स्कूल डिस्ट्रिक्टमधे नोकरी घेतली. झाले! आता तो तरुण सबस्टिट्युट टिचर आणि मुलगी त्याच स्कूल डिस्ट्रिक्ट मधे विद्यार्थिनी. लगेच कंसेटच्या वयाची अट १८ झाली. जी गोष्ट आदल्या दिवशी पूर्णपणे लिगल होती ती दुसर्‍या दिवशी गुन्हा ठरली. कुणी तरी रिपोर्ट केले. तरुणाला अटक झाली. खटला चालला. आता त्या तरुणाची सेक्स ऑफेंडर म्हणून नोंद झाली. शिक्षा, प्रोबेशन वगैरे झाले. या तरुणाला लोकल कारखान्यात नोकरी मिळाली असती तर ही रिलेशनशिप गुन्हा ठरली नसती पण नोकरी शाळेत म्हटल्यावर लगेच सेक्स ऑफेंडर. बरे रिलेशन आधी सुरु झाले. नोकरी नंतर आली. अशा प्रकारच्या केसेसमधे गुन्हा आणि शिक्षा याची संगती कशी लावायची. पुनर्विचार हवाय तो अशा केसेस साठी.
तेव्हा कृपया गैरसमज पसरवू नये ही विनंती.

या तणावाचे कारण निसर्गदत्त रचनेच्या विरुद्ध वर्तन हे नसून निसर्ग दत्त म्हणजे काय याच्या सामाजिक व्याख्येत अहे. तसे तर कपडे घालणे, दाढी करणे ई निसर्गदत्त रचनेच्या विरुद्धच आहे पण म्हणून कुणाला तणाव येत नाही.>>>> +१ विकु.
ह्या गामांना समजवून काही उपयोग नाही. मी १-२ वर्षांपुर्वी पार्ल्यामध्ये एक विनोदी किस्सा सांगितला होता. आमच्या ओळखींच्यामधले एक गृहस्थ त्यांच्या बायकोचे (त्यांची दोन मुलं पुष्कळ मोठी झाली त्यानंतर) काही आजारामुळे गर्भाशय काढून टाकल्यावर ढसाढसा रडले होते. का तर म्हणे आता त्यांची बायको "बाई" नाही राहिली!
हे गामा साहेब जरी पुष्कळ रिसर्च ओरियेंटेड वाटले तरी त्यांच्या रिसर्च करुन मत मांडायच्या इच्छेच्या बुडाखाली असलेच बाळबोध समज/कल्पना आहेत.
He doesn't have an open mind and is most certainly not looking for a new perspective. Finally, its very easy to talk about what is natural and unnatural in a vacuum. Its a totally different thing when a loved one (especially a child) is involved. Your perspective makes a world of difference in their lives and not to forget it has potential to turn your own world upside down.

गापै,
तुम्हांला कळकळीची विनंती.
कृपया मुद्द्याला धरून लिहा.
उगाच बालरतीत्व वगैरे मध्ये आणू नका. या मुद्द्याशी काहीच संबंध नाहीये पीडोफिलियाचा.

>>Its a totally different thing when a loved one (especially a child) is involved. Your perspective makes a world of difference in their lives and not to forget it has potential to turn your own world upside down.

साधारणतः याच संदर्भातली ही बातमी वाचा. पालकांचा दृष्टीकोन नेहमीच बदलतो असं नसलं तरी आयुष्यात उलटापालट नक्कीच होत असावी. इथे वडलांच्या हट्टीपणाची कमाल आहे.

ते प्रसाधनगृहाचं काय लॉजिक आहे कळत नाही. बहूतेक त्यांना वाटतंय कुणी दोघे/दोघी समलैंगिक आहे म्हणजे त्या जोडीतला एक जण नवरा आणि एक जण बायको असायलाच पाहिजे. मग गे जोडीतल्या एकाला नवर्‍याचा हुद्दा मिळाला की दुसर्‍याला आपोआप बायकोचा. मग अश्या पुरुषाला बायकोचा हुद्दा मिळाला की त्याला सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांचे प्रसाधनगृह वापरावी लागणार, तर हे काय चालणार नाही.

गे/लेस्बियन्/बायसेक्शुअल/ट्रान्सजेंडर//पेडोफिल्/सेक्स अब्युजर्/ड्रगिस्ट असे सगळ्यांना एकाच माळेत ओवून कायतरी ज्ञानवाटप चाललं आहे त्यांचं. मायबोलीवर आजवर कोणी वादावादीनंतर माझं मत बदललं आहे असं मान्य केलेलं नाहीये. हा बाफ त्यास कसा अपवाद असेल.. . समजेल कधी तरी त्यांना आपोआपच.

चमन Lol बरी आठवण करुन दिलीस त्या मुद्द्याबदल.

गे लोकांचं वर्तन कायदेशीर करतांना बरेच प्रयास पडणार आहेत. मी गामा_पैलवान दिसायला पुरूष असलो तरी आतून स्त्री आहे. आणि मी लेस्बो आहे. म्हणून मला स्त्रियांच्या प्रसाधनगृहात जायचा हक्क आहे. माझा फोटो पहा इथे :>>>>>>>> Rofl अहो गे असलं म्हणजे लगेच माणसाचा जेंडर बदलतं का? थोडक्यात पुरुष गे असला की लगेच तो आतून स्त्री होतो का?
पबलिक रेस्टरुम (टॉयलेट) मध्ये गे लोकं आल्यावर नेमकी तुमची प्रायवसी कशी काय इन्वेड होते?

पिडोफिलियाशी तुलना म्हणजे तर निव्वळ बिनडोकपणा आहे. कोणी काय लिहिलं त्यापेक्षा एकदा पिडोफिलियाचा अर्थ समजून घेऊन स्वत:चं डोकं लावा की जरा. जाऊ द्या. ह्या एकट्या बिनडोक माणसाला समजवून असा काय बदल होणार आहे समाजात?

मायबोलीवर आजवर कोणी वादावादीनंतर माझं मत बदललं आहे असं मान्य केलेलं नाहीये.>> मला वाटतय मागे एकदा ह्याच विषयावर बरीच चर्चा होउन एका माणसाचं मत खरेच बदललं होतं... तो धागा शोधायला हवा.. की तो माझ्या कल्पनेचा खेळ फक्त कोण जाणे...

पिडोफिलियाशी तुलना म्हणजे तर निव्वळ बिनडोकपणा आहे. कोणी काय लिहिलं त्यापेक्षा एकदा पिडोफिलियाचा अर्थ समजून घेऊन स्वत:चं डोकं लावा की जरा. >> बुवांना अनुमोदन. गामा तुमचे मुद्दे म्हणजे नुसते fear mongering चा आदर्श नमुना आहेत. तुम्हाला मान्य नसेल इतपत मान्य पण पिडोफिलिया वगैरेशी त्याची वगैरे जोडणे अजिबात झेपत नाहित.

ज्याचं मत बदललं होतं तो मी! - मायबोलीवर कोण काय मुद्दा मांडतयं यावर लक्ष द्यायच्या ऐवजी तो मुद्दा मांडताना कोण काय बोलतयं, काय शब्द, उदाहरणं वापरतंय यावर लोकं जास्त लक्ष देत असल्यामुळे बरेच वेळा चांगल्या धाग्यांची वाट लागते असा माझा अनुभव आहे. एकमेकांवर वैयक्तिक टिप्पणी करण्यापेक्षा वाद नक्की कशावर आहे हे समजून त्यावर मत मांडायला हवे. समोरच्याचं ऐकायला हवे ते मुद्दा समजून घ्यायला, त्याना प्रत्युत्तर द्यायला नव्हे; एवढी एक गोष्ट जरी प्रामाणिकपणे सांभाळली तर नक्कीच उत्तमोत्तम चर्चा होवू शकेल.

समलैंगिक लोकाना समाजाने सामावून घ्यायला हवे, त्याना एक माणूस म्हणून सर्वांसारखेच समान हक्क मिळायला हवेत हे मला चर्चेनंतर पटले होते.

माझ्या मनात अजूनही 'लग्न' आणि 'कुटुंब' या संस्था यांबद्दल दोन भिन्न-लिंगी माणसानी एकत्र येवून नैसर्गिक आणि सामान्य पद्धतीने ( कृपया test tube babies, IVF उदाहरणे नकोत. मुद्दा समजून घेणे) उत्तम प्रजनन करून चांगला आणि सुदृढ समाज करणे ही संकल्पना आहे. बाकी समलैंगिक काय, भिन्न्-लैंगिक काय, खाजगीत काय करतात याचे समाजाला देणे-घेणे नसावे; नसतेच. पण तुमच्या-आमच्या दुर्दैवाने म्हणू, किंवा सुदैवाने म्हणू , लग्न आणि त्या अनुषंगाने येणारे कायदे खाजगी-जीवनासाठी नसून सामाजिक जीवना-साठी असतात. खाजगीत तुम्ही काय करता त्याच्या अनुषंगानेच समाजात उघड्यावर येणारे कायदे आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे, समाजासाठी कायदा आहे; कायद्यासाठी समाज नाही.

दुसरे माझे मत असे, की वैज्ञानिक दाखले देऊन नैतिकतेच्या चर्चा करू नयेत. आज विज्ञान छाती-ठोक पणे जे म्हनतेय ते उद्या म्हणेलच असे नाही. उद्या जर हे जीन्स चे structure कोणी नोबेल विजेत्याने अनैसर्गिक आणि असामान्य हे साबीत केले तर आपण लगेच समलैंगिकांचे civil unions रद्द करणारोत का?

मी त्या आणि या धाग्यात म्हटल्याप्रमाणे, मला अजून वाचनाची आणि मुद्दा समजून घेण्याची गरज आहे! ... कदाचित तुम्हा सर्वानाही!

एक महत्त्वाचा आणि उत्तम धागा काढल्याबद्दल आणि चांगला लेख आमच्याबरोबर share केल्याबद्दल चिनुक्स तुझे अभिनंदन!

-सुलु

Pages