तो नाहीच आवडला कधी मग फारसा …. प्रयत्न करूनही.
ते दिवस फार स्वप्नील होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि जुही चावलाच्या निस्सीम प्रेमात होते मी. त्याकाळात थेटर मध्ये वगैरे जाउन फारसे पिक्चर पहिले जात नव्हते पण ते टीव्ही वर आले कि मग मात्र नाहीच सोडायचे. अश्यात श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच ….
असे एक एक पिक्चर्स पाहत गेले आणि यांच्या निरागस सौंदर्यात, गोड गुलाबी हसण्यात आणि अस्सल वाटावे अश्या अभिनयात गुंतत गेले. असेच एकदा माधुरीचा सिनेमा आहे म्हणून बघायला बसले…. पण सिनेमा संपता संपता 'त्याचा' अतिशय राग येऊ लागला. माधुरीला सहनशक्तीच्या पलीकडे त्रास देणारा 'हा' मग डोळ्यात खुपू लागला. 'अंजाम' बघतांना माझ्या मनाचा अंजाम काहीसा त्याचा राग येण्यातच झाला.
http://www.youtube.com/watch?v=tfDfH7pZoyE
योगायोगाने काहीच दिवसात बघण्यात आला तो 'डर' …. आकर्षक हास्याची खोडकर जुही …. अहाहा, तिचं खळाळतं हसणं, चेहेर्यावर सोडलेल्या कर्ल बटा, बोलके डोळे अन ते लावण्य. जीव ओवाळून टाकावा अशीच. पण जीव ओवाळून टाकावा ना …वेडं व्हावं प्रेमात पण आवडतो म्हणून जसा उस मुळासकट खाउन टाकू नये असेच काहीसे 'त्याचे' झाले हो त्यावेळी…. 'तू है मेरी कि… कि… किरण' म्हणत केवढं ते त्रास देणं. इथे जाइल तिथे जाईल कुठे कुठे तिचा पिच्छा. बर मागे फिरणं तर फिरणं पण घाबरवायचं कशाला न अश्या सुंदर मुलींना?? घाबरलेल्या, रडवेल्या बर्या दिसत नाहीत न त्या.
http://www.youtube.com/watch?v=ZiFiuYB8YuA
असाच होता हा त्यावेळी…. याच्या ह्या अश्याच वागण्याने जरा उतरलाच होता मनातून पण पुढे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'दिवाना' पाहिला आणि जरा जरा छबी धुतल्या जाऊ लागली. मळवट जर कमी होऊ लागली. समज आल्यापासून राग-बिग येत नाही त्याचा पण फार असा कधी आवडला नाहीच. आज कधी कधी विचार करतांना वाटतं आपल्या मनात पूर्वीही आणि आजही इतकेंदा स्वतःबद्दल उत्सुकता, राग, आवड आणि काय काय जागृत करवून घेणाऱ्या या 'शाहरुख खान' च्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे कि मग नाहीच आवडत फारसा आपल्याला तर कसलं आलंय डोम्ब्लाचं अभिनय कौशल्य हे ठामपणे ठरवून टाकावं …. या माणसाबद्दल मी अजूनही द्विधा मनःस्थितीतच आहे …. खरच.
नक्कीच...
नक्कीच...:)
अमिर मराठी शिकलाय. त्याला
अमिर मराठी शिकलाय. त्याला मराठी थोडेफार बोलता, वाचता येते.
अरे त्याला मायबोलीची मेन्बरशिप द्या रे कुणीतरी. त्याला लय म्हन्जी लयच धमाल येईल वाचुन. मग तो सारुक आणी सल्लुला मराठी वाचण्यापुरती शिकवेल. मग ती खानावळ मायबोली जॉइन करतील, अन हिथ हाणामारी करतील.:फिदी:
रश्मी
रश्मी
मग तो सारुक आणी सल्लुला मराठी
मग तो सारुक आणी सल्लुला मराठी वाचण्यापुरती शिकवेलं << श्रीयुत सलमान सलिम खान उत्तम मराठी बोलतात. लिहिण्यावाचण्याचे मात्र माहित नाही पण एस एस सी पास असल्याने मराठी वाचू शकत असावेत. त्यांच्या मातोश्री महाराष्ट्रीयन आहेत. श्री. सलिम खानदेखील उत्तम मराठी बोलतात. ते मध्यंतरी एका मराठी वर्तमानपत्रासाठी कॉलम लिहित असत.
हो सलमानची आई मराठी असल्याचे
हो सलमानची आई मराठी असल्याचे एका दिवाळी अन्कातच वाचले होते. सुशिला नाव, आडनाव आठवत नाही. सलिम खान मूळचे इन्दौरचे. त्यान्चे वडील आणी आजोबा पण पोलीस ऑफीसर होते. त्यान्च्या वडिलान्च्या की आजोबान्च्या आयुष्यात जन्जिर सारखा सेम प्रसन्ग घडला होता. त्यातुनच काही काळानन्तर सलिमना जन्जिर मधला तो प्राण- अमिताभचा पोलीस स्टेशन मधला प्रसन्ग सुचला होता.
आज अनु कपूर सलीम जावेदच्या
आज अनु कपूर सलीम जावेदच्या आठवणी रंगवत होता. जावेदच्या वाढदिवसानिमित्त.
शोलेतला जय बसंतीच्या मौसीकडे वीरूचे स्थळ घेऊन जातो तो प्रसंगही सलीम जावेदच्या आयुष्यात घडलाय म्हणे.
जय - सलीम खान. वीरू = जावेद अख्तर . मौसी - हनी इराणीची आई.
गब्बर सिंग सलिम खानच्या
गब्बर सिंग सलिम खानच्या आजोबांनी पकडलेल्या एका डाकूचे नाव होते. ते नाव सुचवल्यावर जावेद आणि रमेश सिप्पीला आवडलं नव्हतं म्हणे.
अवांतर : मराठीत गब्बर म्हणजे
अवांतर : मराठीत गब्बर म्हणजे मातब्बर ना?
-गा.पै.
हो पण जावेदला अर्थ कळला नसेल
हो पण जावेदला अर्थ कळला नसेल बहुतेक.:फिदी: आणी कळुन फायदा काय? गब्बर डाकु होता ना, तोच दुसर्याला लुटायचा मग तो गब्बर ( मातब्बर कसा) कसा असा प्रश्न त्याला पडला असेल.:अओ::फिदी:
१००
१००
'गब्बर' मराठीत
'गब्बर' मराठीत 'मातब्बर'पेक्षा 'श्रीमंत' या अर्थी वाचला आहे. पैसेवाला / मालदार.
गब्बर ' गबरु जवान' वरून आला
गब्बर ' गबरु जवान' वरून आला असावा
केवढे हे अवांतर विषयांतर
केवढे हे अवांतर विषयांतर
>>दिस गाय नोज व्हॉट इज
>>दिस गाय नोज व्हॉट इज रोमान्स ऑन स्क्रीन!!!
नंदिनी अगदी बरोब्बर. बाकी अभिनय वगैरे ...
(No subject)
हो स्वाती - "गबर" म्हणून. "एक
हो स्वाती - "गबर" म्हणून. "एक टिळक केसरी काढून अमर झाले, एक टिळक पोल्ट्री काढून गबर झाले" आठवते का?
आज कधी कधी विचार करतांना
आज कधी कधी विचार करतांना वाटतं आपल्या मनात पूर्वीही आणि आजही इतकेंदा स्वतःबद्दल उत्सुकता, राग, आवड आणि काय काय जागृत करवून घेणाऱ्या या 'शाहरुख खान' च्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे कि >>>>>>>>>>>>> एक्झॅक्टली !!!! साधे वर्तमानपत्र उघडा वा मासिक चाळा, शाहरुखचे नाव वा फोटो पाहिल्यावर तुम्ही बातमी काय आहे हे पाहिल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. तो मनात काहीतरी निर्माण करतो हे मात्र खरे
हल्ली मला रोमॅंटीक सिनेमे बघवतच नाहीत, बघावे तेव्हा जो तो उठसूठ त्यात शाहरुखची स्टाईल मारत असतो.
खास करून मालिकांमधले हिरो, ते तर सारेच जण स्वताला शहारुख समजतात. ते त्यांचे स्टार वा सोनी परीवाराचे अॅवार्ड चालू असतात ना, ज्यात त्या मालिकांमधील जोड्या स्टेजवर परफॉर्म करतात आणि खाली प्रेक्षकांमध्ये त्यांचाच उर्वरीत मालिका परीवार शिट्ट्या टाळ्या वाजवत असतो. त्या स्टेजवर तर एकापाठोपाठ एक शाहरुखचे डुप्लिकेट अवतरत आहेत असाच भास होत असतो..
फार कशाला, आपल्या स्वप्निल जोशीने देखील दुनियादारी मध्ये कित्येक प्रसंगात `मै हू ना' च्या शाहरुखची झलक दाखवली.
स्वजो च्या धाग्यावरुन हि इकड
स्वजो च्या धाग्यावरुन हि इकड आली तर इथ दुसर्याची चर्चा होय..
एन टू का फोर मधल खामोशियां गुनगुनाने लगी गाण माझ फेवरेट..चित्रपट कधी बघीतला नै.. इच्छा पन नै तेवढी..
तसा शाखा चे चित्रपट आवडलेच नै कधी कुठले..अपवाद चक दे.. त्यातही पोरी आवडल्या त्यातल्या म्हणुन जास्तच..
तर खामोशिया गाण पाहाव म्हणुन तूनळी वर गेली आणि बघवल नै मला..पण जे काही अर्धवट बघितल त्यावरुन सुरज हुआ मद्धम आठवल मला.. अँगल बिंगल बी सेमच दिसताय इथ तर..
हल्ली मला रोमॅंटीक सिनेमे
हल्ली मला रोमॅंटीक सिनेमे बघवतच नाहीत, बघावे तेव्हा जो तो उठसूठ त्यात शाहरुखची स्टाईल मारत असतो.>> हे मात्र खरय.
स्वजो आणि शाहरूख खान् यांना
स्वजो आणि शाहरूख खान् यांना एकाच पोस्टमध्ये आणल्याबद्दल तुमचा अभिषेक यांना ऋन्मेष धन्यवाद म्हनणार आहे का?
नंदिनी,यातून सई आणि अंड्याला
नंदिनी,यातून सई आणि अंड्याला बाहेर ठेवल्याबद्दल तुझा निषेध केला केला जावा का?
(No subject)
अजिंक्यराव नवीन धागा कढायचा
अजिंक्यराव नवीन धागा कढायचा होता. ईतका जुना धागा का वर काढलात. आणि काढायचा होता तर माझाच शाहरूखच्या मुलीसंदर्भात जो होता तो काढायचा होता.
का? Trp चे काही गणित आहे का
का? Trp चे काही गणित आहे का रुन्मेषचे बाबा?
लेडी ऋन्मेष -
लेडी ऋन्मेष -
https://www.loksatta.com/manoranjan-news/amitabh-bachchan-says-will-apol...
हा हा बिपीनचंद्र मस्त
हा हा बिपीनचंद्र मस्त किस्सा आहे.
अमिताभच्या चाहत्यांनी तसेच
शाहरूखच्या चाहत्यांनी आणि विरोधकांनी जरूर वाचावा...
श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी
श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच >> मला वाटतं माधुरी अभिनयापेक्षा डान्स नंबर्स मुळे लोकांना जास्त आवडत असावी.. माझ्या ॲाल टाईम फेवरेट ह्या जुही आणि श्रीदेवीच.. ज्यांच्या विनोदी भूमिकाही तितक्यात ताकदीच्या होत्या.
याच्या ह्या अश्याच वागण्याने जरा उतरलाच होता मनातून पण पुढे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'दिवाना' पाहिला आणि जरा जरा छबी धुतल्या जाऊ लागली. >> राजू बन गया जंटलमन आणि कभी हा कभी ना विसलात तुम्ही
यस बॉस हा खूप मस्त सिनेमा आहे
यस बॉस हा खूप मस्त सिनेमा आहे. फिर भी दिल है हिंदुस्तानी पण.
Submitted by ऋन्मेऽऽष on 4
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 November, 2020 - 22:20
मस्त काय आहे त्यात? सारं काही प्लॅन्ड आहे. रेखारानी नावाच्या महिलेला अमिताभने माफी मागणं...
Submitted by म्हाळसा on 5
Submitted by म्हाळसा on 5 November, 2020 - 00:55
राजू बन गया जंटलमन ही श्री ४२० ची भ्रष्ट नक्कल आहे. शाहरुखने राज कपूर ची कॉपी मारलीये जशी कधीकाळी राजकपूरने चार्ली चॅप्लीनची कॉपी मारली होती.
Pages