शाहरुख खान - नाहीच आवडला कधी मग फारसा !!

Submitted by मी मी on 12 January, 2014 - 03:03

तो नाहीच आवडला कधी मग फारसा …. प्रयत्न करूनही.

ते दिवस फार स्वप्नील होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि जुही चावलाच्या निस्सीम प्रेमात होते मी. त्याकाळात थेटर मध्ये वगैरे जाउन फारसे पिक्चर पहिले जात नव्हते पण ते टीव्ही वर आले कि मग मात्र नाहीच सोडायचे. अश्यात श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच ….

असे एक एक पिक्चर्स पाहत गेले आणि यांच्या निरागस सौंदर्यात, गोड गुलाबी हसण्यात आणि अस्सल वाटावे अश्या अभिनयात गुंतत गेले. असेच एकदा माधुरीचा सिनेमा आहे म्हणून बघायला बसले…. पण सिनेमा संपता संपता 'त्याचा' अतिशय राग येऊ लागला. माधुरीला सहनशक्तीच्या पलीकडे त्रास देणारा 'हा' मग डोळ्यात खुपू लागला. 'अंजाम' बघतांना माझ्या मनाचा अंजाम काहीसा त्याचा राग येण्यातच झाला.

http://www.youtube.com/watch?v=tfDfH7pZoyE

योगायोगाने काहीच दिवसात बघण्यात आला तो 'डर' …. आकर्षक हास्याची खोडकर जुही …. अहाहा, तिचं खळाळतं हसणं, चेहेर्यावर सोडलेल्या कर्ल बटा, बोलके डोळे अन ते लावण्य. जीव ओवाळून टाकावा अशीच. पण जीव ओवाळून टाकावा ना …वेडं व्हावं प्रेमात पण आवडतो म्हणून जसा उस मुळासकट खाउन टाकू नये असेच काहीसे 'त्याचे' झाले हो त्यावेळी…. 'तू है मेरी कि… कि… किरण' म्हणत केवढं ते त्रास देणं. इथे जाइल तिथे जाईल कुठे कुठे तिचा पिच्छा. बर मागे फिरणं तर फिरणं पण घाबरवायचं कशाला न अश्या सुंदर मुलींना?? घाबरलेल्या, रडवेल्या बर्या दिसत नाहीत न त्या.

http://www.youtube.com/watch?v=ZiFiuYB8YuA

असाच होता हा त्यावेळी…. याच्या ह्या अश्याच वागण्याने जरा उतरलाच होता मनातून पण पुढे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'दिवाना' पाहिला आणि जरा जरा छबी धुतल्या जाऊ लागली. मळवट जर कमी होऊ लागली. समज आल्यापासून राग-बिग येत नाही त्याचा पण फार असा कधी आवडला नाहीच. आज कधी कधी विचार करतांना वाटतं आपल्या मनात पूर्वीही आणि आजही इतकेंदा स्वतःबद्दल उत्सुकता, राग, आवड आणि काय काय जागृत करवून घेणाऱ्या या 'शाहरुख खान' च्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे कि मग नाहीच आवडत फारसा आपल्याला तर कसलं आलंय डोम्ब्लाचं अभिनय कौशल्य हे ठामपणे ठरवून टाकावं …. या माणसाबद्दल मी अजूनही द्विधा मनःस्थितीतच आहे …. खरच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, यू सेड इट!>> येस्स!! +१११११ Happy
मलापण शाहरूखची काही अ‍ॅलर्जी वै. नाही. फक्त त्याने आणखी चॅलेंजींग रोल्स केले (आणि त्याच्यात तेवढं पोटेंशिअल आहे हे त्याने पूर्वीच्या सिरीयल्स आणि स्वदेस, चक दे वरून सिद्ध केलंय) तर पाहायला आवडेलच Happy

मी लिहिलेल्या शेवटच्या वाक्यात खरतर सगळच आलंय …

माझ्या आवडत्या पहिल्या दहा सिनेमांची नाव काढायचं ठरवलं तर त्यात शाहरुखचे दोन-चार सिनेमे तरी असतील.

वीर-जारा, दिल तो पागल है, स्वदेस, कभी हां कभी ना, दिल से, चक दे इंडिया आणि कित्तेक आवडते सिनेमे आहेत नाही अस नाही

… पण ह्यांच्याच बरोबरीने त्याच्या वयाला नाही शोभणार अश्या माकड उड्या (जसे चेन्नई एक्स्प्रेस), ओवर एक्टिंग (डुप्लीकेट), उगाच चेहेर्यावरचे ते ओवर एक्स्प्रेशन (बादशाह), दोन्ही गाल आत ओढून, ओढून ताणून खळी दाखवण्याचा प्रयत्न (कुछ कुछ होता है … ई )…आणि मोस्ट ऑफ ऑल अनेक सिनेमात दिसणारा शाहरुख हा शाहरुख खान किंग खान जास्त असतो इन्स्तीड ऑफ कॅरेक्टर. त्याच्या वागण्या बोलण्यात तो attitude स्पष्ट दिसतो ( डॉन २, रा-वन, जब तक है जान) आणि हे बघतांना तो डोक्यात जातो.

त्याच्या सुरुवातीच्या काळातील बरेच वर्ष शाहरुख च्या अभिनयात नैसर्गिक अभिनयाची जोड होतीच पण जसजसे लोकं त्याला पसंत करत गेले आणि हृदयात बसवत गेले हा डोक्यावर चढला आणि हवा डोक्यात शिरवून बसला. …. खरतर ह्याला दमदार कहाण्यांचे चित्रपट मिळत होते…. त्यात चांगली गाणी होती आणि बरोबरीला सहकलाकार पण त्या तोडीचे होते हे सर्व सुद्धा ह्याच्या वर येण्यात भागीदार आहेच निव्वळ 'शाहरुख' होता म्हणून सिनेमा गाजला असं नाहीये …पण डोक्यात हवा शिरल्यावर पुढचं काहीच दिसत नसतं

वरदा....अनुमोदन....स्वदेस, चकदे आणि काही सन्माननीय अपवाद वगळता शा. खा. चा अभिनय नेहमीच अचाट-अती-अंगावर येणारा 'आता आवरा' कॅटेगरीतला वाटला.... पण कुणाचं बॅकिंग नसताना त्याने जे मिळवलं ते कौतुकास्पद आहे.... त्याचा अभिनय न आवडूनही मुलाखतीतून ( पूर्वी) तो सरळ, पाय जमिनीवर असलेला माणूस वाटायचा....पण आताशा यश डोक्यात गेल्यासारखा वाटतो. त्यामुळे नाही आवडत त्याच्या मुलाखतीसुद्धा पाहायला आता.

मयी अनुमोदन.

ह्या माणसाला कायम दुसर्‍याच्या हिरॉईन का आवडतात? - अंजाम, डर, दिवाना, बाजीगर, कभी हां कभी ना, दिलवाले दुल्हनिया, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कल हो बाजीगर्,कभी अलविदा ना कहना, रब ने बनादी जोडी इ. ( हलकेच घ्या)

>>पण ह्यांच्याच बरोबरीने त्याच्या वयाला नाही शोभणार अश्या माकड उड्या (जसे चेन्नई एक्स्प्रेस), ओवर एक्टिंग (डुप्लीकेट), उगाच चेहेर्यावरचे ते ओवर एक्स्प्रेशन (बादशाह), दोन्ही गाल आत ओढून, ओढून ताणून खळी दाखवण्याचा प्रयत्न (कुछ कुछ होता है … ई )…आणि मोस्ट ऑफ ऑल अनेक सिनेमात दिसणारा शाहरुख हा शाहरुख खान किंग खान जास्त असतो इन्स्तीड ऑफ कॅरेक्टर. त्याच्या वागण्या बोलण्यात तो attitude स्पष्ट दिसतो ( डॉन २, रा-वन, जब तक है जान) आणि हे बघतांना तो डोक्यात जातो?>>

अगदी अगदी. त्याच्या प्रत्येक भुमिकेत तो शा. खा च वाटतो. तेच मान तिरकी करून आणि डोळ्यात पाणी आणून संवाद म्हणायचे. नाच ठिक ठाक पण अ‍ॅक्शन जमत नाही, हे माझं मत.

त्यातल्या त्यात चक दे इंडिया मधे चांगला वाटला. बाकि रा-वन, चेन्नई आणि माय नेम इज खान तर अजिबात आवडला नाही.

त्यातल्या त्यात चक दे इंडिया मधे चांगला वाटला. बाकि रा-वन, चेन्नई आणि माय नेम इज खान तर अजिबात आवडला नाही.>>>>>>>> +१

धाग्याचा उद्देश शाहरूख ची निंदा करणेच आहे का?

- असल्यास खुशाल करा....!!

मग सलमान आमिर ह्रितीक ई सुध्दा बर्याच जणांना आवडत नाही..
Wink

असो...

अति होऊन नये.. ही "धाग्याला शुभेच्छा..!!

वर जाम, डर, इ. निगेटीव्ह भुमिकांबद्दल जर राग येत असेल तर त्याचा अभिनय चांगला आहे, इ. जे लिहिले आहे, ते तसे म्हणले जाईल हे माहित होते, पण तसे जरी असले तरी इतर चांगल्या चित्रपटांमधे पण कधी हा माणूस अभिनयाच्या बाबतीत उजवा वाटलाच नाही.
अलिकडच्या जमान्यात (सद्ध्या याला अलिकडचा म्हणत नसावेत), आमिरखानच काय तो चांगला अभिनेता वाटलेला.

अलिकडच्या जमान्यात (सद्ध्या याला अलिकडचा म्हणत नसावेत), आमिरखानच काय तो चांगला अभिनेता वाटलेला.>>>>>>>>>>>>>>लैच अनुमोदन Happy Happy

मग सलमान आमिर ह्रितीक ई सुध्दा बर्याच जणांना आवडत नाही..>>>>>>>>>हिकडं बर्याच जणांचा काय प्रश्न ?? तुमचा आमचा प्रश्न … आम्ही आमच्या वाट्याचं बोललो . आत्ता तुम्ही बोला

मला अजाब्बात आवडत नाही. एकतर ओव्हरअ‍ॅक्टिंग करतो, दुसरं कॅरेक्टर ढीला है. दारू पिउन नाटकं करणारी लोकं आवडत नाहीत.

दिलवाले..च्या आधी आणि नंतर असे त्याच्या कामाचे सरळ दोन भाग होतात. आधीचा शाहरुख खरेच जास्त सहज जास्त लवेबल होता.<<<<<<+१

माझा शारुख्चा सर्वात आवडता चित्रपट बादशाह !!!! केवळ शाहरुख्साठी त्याचा एखादा चित्रपट पहायचा झाल्यास मी बादशाह पाहीन बाकी त्याच्यात अभिनयकौशल्य आहेच आणि अत्यंत शैलीदारपणाही पण फुकटचा भाव खाणारी माणसे मला अजिबातच आवडत नाहीत ..मग तो स्क्रीनवरही का असेना

त्याच्या अभिनयात मला अगदीच न आवडणारी बाब म्हणजे एखाद दुसरा सीन सोडला तर त्याच्या सर्वच सीन्स मध्ये त्याचा देह खालीपिली बकबक करतो आत्मा कधीच बोलत नाही

मला शाहरुखचा सळसळता वावर आवडतो. सिनेमा, सीन काहिही असो, त्यात शाहरुख आहे हे जाणवलेच पाहिजे एव्ह्ढ्या energy ने तो त्यात असतो. हे सगळ्यांनाच आवडेल असे नाही हे साहजिक आहे. वानगीदाखल त्रिमूर्ती सारखा टुकार सिनेमा पाहा, त्यात शाहरुखचे character येइतो सिनेमा रटाळ पणे डुगडुगत असतो. पण शाहरुख आल्यापासून तो प्रत्येक सीन ढकलत नेतो. निव्वळ त्याच्या जोरावर असा सिनेमा बघायचे धाडस करता येते.

वर बाद्शाह बद्दल कोणी तरी लिहिले आहे, मला आठवतय त्याप्रमाणे तो slapstick comedy होता. अर्थात हिंदी सिनेमाच्या चाकोरीत जेव्हढा बसू शकेल तेव्हढाच ठेवल्यामुळे त्याची न घर का ना घाटका अशी अवस्था झाली असेल.

फारसे चांगले (अर्थात हे relative आहे हे मान्य) नाचता येत नसूनही नुसत्या energy च्या जोरावर तो गाण्यांमधे जे काही करतो ते बघायला खरच मजा येते. पहा दिल से रे, इश्क कमिना, घुमटे मे चंदा है, डुप्लिकेट.

शाहरुख बर्याचदा डोक्यात जातो पण पण मूळात त्याच्याकडे एक्स्ट्रॉ ऑर्डीनरी स्क्रीन प्रेझेन्स, टॅलेंट आहे यात दुमत नाही!
त्यानी त्याची सर्वात मोठी स्ट्रेंथ 'आफलातून कॉमेडी सेन्स' फार कमी वापरली , आजकालच्या तमाम लिड अ‍ॅक्टर्स मधे ही क्वालिटी त्याच्याकडे नक्कीच सर्वात स्ट्रॉग आहे!
केजो-चोप्रांचा ओव्हरअ‍ॅक्टींग करणारा रोमँटीक हिरो म्हणून पहायला मला तरी आवडत नाही, दिलवाले दुल्हनिया.कल हो ना हो, कभी अल्विदा- वीर झारा मधला शहारुख असह्य होतो.. रावन, K3g,माय नेम इज खान आणि जब तक है जान मधला शारुख सहनच होत नाही !
रोमँटीक मधे दिल तो पागल है आणी (त्या वेळी) कुछ कुछ मधे आव्डला होता .
मला उलट त्याचा कधी तरी दिसणारा सट्ल अभिनय, कॉमेडी आणि कधी कधी बॅड बॉय म्हणून पहायला जास्तं आव्डतो.
फौजी मधे आव्डलाच.. राजु बन गया, यस बॉस ,कभी हां कभी ना, बादशाह, स्वदेस, बाजिगर, चक दे, रब ने बनादी मधला सुरी, डॉन २, अगदी देवदास आणि ओम शान्ति ओम मधेही आव्डला :).
चेन्नाई एक्स्प्रेस जरा बरी स्क्रिप्ट, स्टोरी असती तर चांगला होउ शकला असता.
त्याची लँग्वेज वर कमांड , काहीसा अ‍ॅरोगन्ट अ‍ॅटीट्युड ,लाइव्ह इंटरव्ह्युज-टॉक शोज मधे उस्फुर्त बोलायची क्वालिटी पण आवडते पण बहुतेक वेळा डोक्यात जाणारे स्टेज परफॉर्मन्सेस वगैरे करतानाच जास्तं दिसतो दुर्दैवानी शाहरुख.
त्याला अता तरी चांगले कॉमेडी रोल्स करायची सुबुध्दी मिळो :).

डर, कभी हां..., बाजीगर, राजु बन गया..., यस बॉस बघवतात. अगदी ढकलला त दिल तो पागल... नंतर तो फक्त "शाहरुख" म्हणुन काम करायला लागला. तसेच ह्या आधीच्या सिनेमात केलेले experiments ( कधी व्हिलन, कधी कॉमेडी, simple Loverboy) हेही त्याने थांबवले. बादशाह, चक दे आणि स्वदेश हे नंतरचे त्यातल्या त्यात बरे चित्रपट. मी तर बरेच वर्ष त्याचे सिनेमे बसुन असे पाहिले नाहीत. सिनेमा TVवर लागला/ लावला असेल तर येताजाता जे दिसते ते पाहतो.

इथे बर्‍याचजणांनी त्याने कॉमेडी रोल करावेत असे सुचवले आहे. मी चेन्नाई एक्स्प्रेस First day Last Show बघितला. आमच्याकडेही अर्धे अंग फॅनक्लबमध्ये असल्याने आणि रोहित शेट्टीसाठी गेलो. दुसर्‍यादिवशी मायबोलीवरचे रिव्ह्यु वाचले आणि पुढे काही लिहायला धजलो नाही. गचाळ सिनेमा. मीच सर्व काही करणार हाच मोट्टो असल्याने कॉमेडीची वाट लागली आहे. कॉमेडीला प्रतिसादासाठी सोबत लागते, हे आधी शाहरुखला समजावले पाहिजे. अगदी बबन प्रभुलाही आत्मराम भेंडे सोबत होते. एकट्याने ३तास कॉमेडी त्यांनाही शक्य नव्हती. शाहरुखकडे विविध भुमिका करण्याकरीता Talent नक्कीच आहे. त्यामुळे शाहरुखला विनोदी सिनेमे करायचे असतील तर दुसरा ताकदीचा माणुस लागेल. अवॉर्डस् मध्ये असतो तसा (सैफ अली) नव्हे. तशी तयारी असेल तरच त्या वाटेस जावे नाही तर चोप्रा, जोहर आणि कं सोबत अहो रुपम् अहो ध्वनी चालू ठेवावे.

इब्लिस Lol महान!

शाहरूखबद्दल आमची नेहमीच टोकाची प्रतिक्रिया झालेली आहे. सुरूवातीला ते व्हिलन रोल करायचा तेव्हा प्रचंड तिरस्कार. आणि त्याचे कारण म्हणजे त्याने ते रोल चांगले केले म्हणून नाही, तर व्हिलनगिरी करताना तो भंकस वाटला म्हणून. सुरूवातीला तो हीरोच्या रोल्स मधेही भंकसच वाटला.

मात्र नंतर दिलवाले, कुछ कुछ होता है पासून थोडा आवडायला लागला. बादशाह, यस बॉस इ मधेही. त्याने बहुधा (त्या "साईन व्हेव्ह") भुवया व चेहर्‍याचा इतर मेक-अपही १९९५ पासून थोडा बदलला असावा. कारण तेव्हापासून तो वेगळा दिसायला लागला.

स्वदेस, चक दे, मै हूँ ना व ओम शांती ओम मधे तर तो प्रचंड आवडला. डॉन-१ मधे भंकस वाटला (कारण तेथे तुलना बच्चन च्या एका जबरी रोल शी होती) पण डॉन-२ मधे आवडला. मला चेन्नई एक्सप्रेसही धमाल वाटतो. त्यातील शाहरूख 'चालतो', पण त्याने त्यात काही विशेष केलेले नाही. संवाद व प्रसंगच धमाल आहेत आणि दीपिका नक्कीच त्यात सरस आहे. पण हे नक्की की शाहरूख त्यात चालून गेला.

अजूनही तो बर्‍याच चित्रपटात तुफान हॅमिंग करतो (मोहब्बते हे एक उदाहरण) पण आता तो पूर्वीसारखा डोक्यात जात नाही.

चित्रपटाबाहेर त्याला काहीही व्यक्तिमत्त्व नाही (म्हणजे इतर लोकांत तो उठूनही दिसणार नाही). त्यामानाने पदद्यावरचा वावर जबरदस्त आहे. रोमॅण्टिक रोल्स मधे जितका सूट होतो तितका अ‍ॅक्शन मधे होत नाही. मात्र विनोदी रोल तो खूप छान करतो (वरती 'बादशाह' चे उदाहरण अगदी बरोबर आहे).

वैयक्तिक जीवनात त्याची अनेक मुक्ताफळे व कधी कधी वागणेही डोक्यात गेलेले आहेत. पण येथे त्याच्या रोल्स बद्दल चर्चा करताना त्यात जायची गरज नाही.

मला असे वाटते की त्याच्या फॅन बेस मधे स्त्रिया जास्त आहेत. पुरूषही आहेत पण बहुसंख्य पुरूषांना तो आवडत नसावा.

चालू दे Happy
पण शाहरूख च वागण हे जर वाईट मानल तर बाकी जवळ जवळ सर्वच हिरोना काय म्हणायच हा प्रश्नच आहे .

केदार, तो मुळात स्वतंत्र विषय आहे. येथे शाहरूख बद्दल चालू आहे म्हणून ते लिहीले. सध्या त्या संदर्भाकडे दुर्लक्ष कर.

मला तर राम जाने, चमत्कार पण आवड्ला होता...! त्यात सही काम केलं होतं.
अती झालं आणि हसु आलं अस काहीसं वागणं असत हल्ली त्याच...!

अती झालं आणि हसु आलं >> हे काही अंशी मान्य . स्पेशली राहूल आणि राज बाबत .
पण मे बी त्या लेवल ला गेल्यावर स्वतःचा इगो इतका मोठा होत असेल की कुठे थांबायच हे कळत नसेल .
देव आनंद अन अमिताभ सारखे दिग्गजही जिथे स्वतःला रोखू शकले नाहीत तिथे शाहरूख खान काय आहे ?

जुही चावला बरोबर केमिस्ट्री चांगली जमायची त्याची. दोघांनी मिळून एक ड्रीम्झ का काहीतरी कंपनीही चालू केली होती चित्रपट निर्मितीची ("वन टू का फोर" त्यातलाच असावा). पण पुढे काय झाले कळाले नाही.

Pages