तो नाहीच आवडला कधी मग फारसा …. प्रयत्न करूनही.
ते दिवस फार स्वप्नील होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि जुही चावलाच्या निस्सीम प्रेमात होते मी. त्याकाळात थेटर मध्ये वगैरे जाउन फारसे पिक्चर पहिले जात नव्हते पण ते टीव्ही वर आले कि मग मात्र नाहीच सोडायचे. अश्यात श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच ….
असे एक एक पिक्चर्स पाहत गेले आणि यांच्या निरागस सौंदर्यात, गोड गुलाबी हसण्यात आणि अस्सल वाटावे अश्या अभिनयात गुंतत गेले. असेच एकदा माधुरीचा सिनेमा आहे म्हणून बघायला बसले…. पण सिनेमा संपता संपता 'त्याचा' अतिशय राग येऊ लागला. माधुरीला सहनशक्तीच्या पलीकडे त्रास देणारा 'हा' मग डोळ्यात खुपू लागला. 'अंजाम' बघतांना माझ्या मनाचा अंजाम काहीसा त्याचा राग येण्यातच झाला.
http://www.youtube.com/watch?v=tfDfH7pZoyE
योगायोगाने काहीच दिवसात बघण्यात आला तो 'डर' …. आकर्षक हास्याची खोडकर जुही …. अहाहा, तिचं खळाळतं हसणं, चेहेर्यावर सोडलेल्या कर्ल बटा, बोलके डोळे अन ते लावण्य. जीव ओवाळून टाकावा अशीच. पण जीव ओवाळून टाकावा ना …वेडं व्हावं प्रेमात पण आवडतो म्हणून जसा उस मुळासकट खाउन टाकू नये असेच काहीसे 'त्याचे' झाले हो त्यावेळी…. 'तू है मेरी कि… कि… किरण' म्हणत केवढं ते त्रास देणं. इथे जाइल तिथे जाईल कुठे कुठे तिचा पिच्छा. बर मागे फिरणं तर फिरणं पण घाबरवायचं कशाला न अश्या सुंदर मुलींना?? घाबरलेल्या, रडवेल्या बर्या दिसत नाहीत न त्या.
http://www.youtube.com/watch?v=ZiFiuYB8YuA
असाच होता हा त्यावेळी…. याच्या ह्या अश्याच वागण्याने जरा उतरलाच होता मनातून पण पुढे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'दिवाना' पाहिला आणि जरा जरा छबी धुतल्या जाऊ लागली. मळवट जर कमी होऊ लागली. समज आल्यापासून राग-बिग येत नाही त्याचा पण फार असा कधी आवडला नाहीच. आज कधी कधी विचार करतांना वाटतं आपल्या मनात पूर्वीही आणि आजही इतकेंदा स्वतःबद्दल उत्सुकता, राग, आवड आणि काय काय जागृत करवून घेणाऱ्या या 'शाहरुख खान' च्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे कि मग नाहीच आवडत फारसा आपल्याला तर कसलं आलंय डोम्ब्लाचं अभिनय कौशल्य हे ठामपणे ठरवून टाकावं …. या माणसाबद्दल मी अजूनही द्विधा मनःस्थितीतच आहे …. खरच.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/amitabh-bachchan-says-will-apol...>>>>> काही बायका एवढ्या महान मुर्ख असतात ?
हो
हो
आणि त्यात नाना पाटेकर म्हणजे ललिता पवार आहे
अमृता सिंग म्हणजे नादिरा
मेरा जुता है जपानी म्हणजे दिल है मेरा दिवाना
मूड मूड के ना देख म्हणजे तू मेरे साथ साथ आस्मा के आगे चल
पण मस्त आहे तो पिक्चर.
पण मस्त आहे तो पिक्चर.
राजू बन गया जंटलमन ही श्री
राजू बन गया जंटलमन ही श्री ४२० ची भ्रष्ट नक्कल आहे. शाहरुखने राज कपूर ची कॉपी मारलीये जशी कधीकाळी राजकपूरने चार्ली चॅप्लीनची कॉपी मारली होती.
>>
भ्रष्ट का?
बाकी शाहरूखचा तो लूक फार्र फार आवडायचा..
त्यात आणि त्या चमत्कार चित्रपटात तो जसा अडखळत बोलायचा क्लास होते ते. साक्षात नासीरुद्दीन शाहला खाल्ला त्याने. ते देखील नसरुद्दीन भूताच्या भावखाऊ भुमिकेत असूनही शाहरूख भाव खाऊन गेलेला. राजू बन गया जंटलमॅनमध्ये त्याने नानाला खाल्ला वगैरे बोलू शकत नाही. तसे काही बॅटल झाले नाही. पण नाना फुल्ल फॉर्मात असताना देखील शाहरूखने आपले स्वतंत्र नाणे खणखणीत वाजवले तेव्हाच समजले हा लंबी रेस का घोडाच नाही तर विनिंग हॉर्स सुद्धा आहे. आणि ते त्याने फारच अल्पावधीत सिद्ध केले….
Pages