शाहरुख खान - नाहीच आवडला कधी मग फारसा !!

Submitted by मी मी on 12 January, 2014 - 03:03

तो नाहीच आवडला कधी मग फारसा …. प्रयत्न करूनही.

ते दिवस फार स्वप्नील होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि जुही चावलाच्या निस्सीम प्रेमात होते मी. त्याकाळात थेटर मध्ये वगैरे जाउन फारसे पिक्चर पहिले जात नव्हते पण ते टीव्ही वर आले कि मग मात्र नाहीच सोडायचे. अश्यात श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच ….

असे एक एक पिक्चर्स पाहत गेले आणि यांच्या निरागस सौंदर्यात, गोड गुलाबी हसण्यात आणि अस्सल वाटावे अश्या अभिनयात गुंतत गेले. असेच एकदा माधुरीचा सिनेमा आहे म्हणून बघायला बसले…. पण सिनेमा संपता संपता 'त्याचा' अतिशय राग येऊ लागला. माधुरीला सहनशक्तीच्या पलीकडे त्रास देणारा 'हा' मग डोळ्यात खुपू लागला. 'अंजाम' बघतांना माझ्या मनाचा अंजाम काहीसा त्याचा राग येण्यातच झाला.

http://www.youtube.com/watch?v=tfDfH7pZoyE

योगायोगाने काहीच दिवसात बघण्यात आला तो 'डर' …. आकर्षक हास्याची खोडकर जुही …. अहाहा, तिचं खळाळतं हसणं, चेहेर्यावर सोडलेल्या कर्ल बटा, बोलके डोळे अन ते लावण्य. जीव ओवाळून टाकावा अशीच. पण जीव ओवाळून टाकावा ना …वेडं व्हावं प्रेमात पण आवडतो म्हणून जसा उस मुळासकट खाउन टाकू नये असेच काहीसे 'त्याचे' झाले हो त्यावेळी…. 'तू है मेरी कि… कि… किरण' म्हणत केवढं ते त्रास देणं. इथे जाइल तिथे जाईल कुठे कुठे तिचा पिच्छा. बर मागे फिरणं तर फिरणं पण घाबरवायचं कशाला न अश्या सुंदर मुलींना?? घाबरलेल्या, रडवेल्या बर्या दिसत नाहीत न त्या.

http://www.youtube.com/watch?v=ZiFiuYB8YuA

असाच होता हा त्यावेळी…. याच्या ह्या अश्याच वागण्याने जरा उतरलाच होता मनातून पण पुढे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'दिवाना' पाहिला आणि जरा जरा छबी धुतल्या जाऊ लागली. मळवट जर कमी होऊ लागली. समज आल्यापासून राग-बिग येत नाही त्याचा पण फार असा कधी आवडला नाहीच. आज कधी कधी विचार करतांना वाटतं आपल्या मनात पूर्वीही आणि आजही इतकेंदा स्वतःबद्दल उत्सुकता, राग, आवड आणि काय काय जागृत करवून घेणाऱ्या या 'शाहरुख खान' च्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे कि मग नाहीच आवडत फारसा आपल्याला तर कसलं आलंय डोम्ब्लाचं अभिनय कौशल्य हे ठामपणे ठरवून टाकावं …. या माणसाबद्दल मी अजूनही द्विधा मनःस्थितीतच आहे …. खरच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डर , बाजीगर , कभी हां अन अंजाम चा शाहरूख हाच खरा शाहरूख . Happy
राज आणि राहुल शाहरूख नव्हेच .

मळवट जर कमी होऊ लागली. >>तुम्हाला मळभ म्हणायचे आहे का ? Uhoh
बाकी मलाही शा.खा .आज्जीबात आवडत नाही कारण अस नाही पण उगीचच. आमच्या प्यांटवाल्यांना खूप आवडतो...

>>बाकी मलाही शा.खा .आज्जीबात आवडत नाही कारण अस नाही पण उगीचच
मला पण मला पण अज्जीबात म्हणजे अज्जीबात आवडत नाही,
एकतर या माणसाला एवढे यश कसे काय मिळाले याचेच मला आश्चर्य आहे.
अभिनय वगैरे पासुन कोसो दूर आहे, दिसायला जरा बरा आहे इतकेच
वर मयी यांनी लिहिल्याप्रमाणेच मलाही अंजाम पाहिला तेव्हा फार म्हणजे फारच राग आला होता,
आता आठवले तर हसायला येते की ती चूक खरेतर निर्माता दिग्दर्शकाची आहे.
पण जे काय असेल ते असो, तो शा.खा. काही कधीच आवडला नाही नंतर देखील.

मळवट जर कमी होऊ लागली. >>तुम्हाला मळभ म्हणायचे आहे का ? >>>>>> . नाही मला मळवटच म्हणायचे आहे. जर चे तेवढे जरा करुया बस Happy

वर मयी यांनी लिहिल्याप्रमाणेच मलाही अंजाम पाहिला तेव्हा फार म्हणजे फारच राग आला होता, > >जर एखादा अभिनेता तुम्हाला त्याच्या खोत्या भूमिके चा राग आणू शकतो ह्यात त्याचे काहीच श्रेय नसेल असे वाटते तुम्हाला ? Happy

मला नेहमीच आवडत आला आहे तो..काही खूप मस्त सिनेमे केले आहेत त्याने...आणी बाकि कोणालाही हे जमले नसते..
उदा. स्वदेस, वीर-झारा, चक दे, देवदास, दिल से, असोका...

.

अभिनय वगैरे पासुन कोसो दूर आहे आणि
वर मयी यांनी लिहिल्याप्रमाणेच मलाही अंजाम पाहिला तेव्हा फार म्हणजे फारच राग आला होता, >>
दोन सलग ओळीतच विरोधाभास Happy

चित्रपट थीएटरमधे पाहिले असते तर वेगळा इम्पॅक्ट जाणवला असता. डर १९९३ साली रीलीज झाला, त्यानंतर १९९४ साली अंजाम.

दोन्ही सिनेमाच्या आधी १९९३ सालीच बाझीगर निर्माण झाला. त्यावेळेला या दीड दोन वर्षात शाहरूखने केलेले अ‍ॅन्टीहीरो सिनेमा वगळता नंतर पन्नासहून जास्त सिनेमाममधे टिपिकल रोमॅन्टिक हीरो म्हणूनच वावरलेला आहे. (१९९४ डीडीलेजेपासून तर नक्कीच.) डीडीलजे ने त्याची स्वतःचीच तयार केलेली राज ची व्यक्तीरेखा इ तके एमोठी झाली की त्या परीघापासून काही वेगळं करणं त्याला आजवर शक्य झालेले नाही आणि त्तिथून पुढे तो तेवढंच करत राहिलाय.

उलट अ‍ॅन्टीहीरो, सपोर्टिंग हीरो म्हणून काम केलेले चित्रपट त्याचा अस्सल अभिनयक्षमतेची उदाहरणे आहेत. शाहरूख खानकडे हिंदी सिनेमाच्या हीरोला असतात तसा "चिकणेपण" "गोडपणा" अजिबात नाही, पण त्याच्याकडे "सुपरस्टार" साठी आवश्यक असलेली स्टाईल आणि अ‍ॅटीट्युड आधीपासून आहे. (खोटं वाटलं तर फौजीबघा- ज्या फ्रेममधे शाहरूख आहे त्या फ्रेममधे फक्त शाहरूख आहे)

इन्टेन्स रोमॅन्टिक सीन करणारे फार कमी अभिनेते आपल्याकडे आहेत. शम्मी कपूर, देव आनंद, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि त्यानंतर शाहरूख खान. त्यातही शाहरूखने स्वतःची एक वेगळी स्टाईल शोधून काढली. दिवानामधला "जान बख्शने का शुक्रिया" म्हणणारा शाहरूख किंवा किंवा कभी हा कभिन मधला शाहरूख, अगदी कालच्या चेन्नई एक्स्प्रेसमधे दीपिका पदुकोणला मंदिरात उचलून नेतानाचा शाहरूख- दिस गाय नोज व्हॉट इज रोमान्स ऑन स्क्रीन!!!

दुर्दैव एवढंच की, अख्खी कारकीर्दभर तो सतत तेच आणी तेच करत राहिला आहे. त्याने वेगळे रोल आतातरी करायला हरकत नसावी.

नंदीनी +१. इमेजच्या बाहेर काम करणे, किमान आतातरी शक्य आहे, ते त्याने करुन बघावं एकदातरी. किमान त्याच्या टिकाकारांना (आणि मलाही) त्याला अभिनय येतो, हे म्हणायची एक संधी मिळायला हवी. Happy

मला खुप आवडला तो बाजीगर , फिर भी दिल है हिन्दुस्तानी आणि बादशाह मध्ये.
अगदी अलिकडच्या चैनै एक्सप्रेस मध्येही.

सर्वात वाइट्ट डॉन मध्ये. रयाच घालवली राव बच्चनच्या डॉनची.

बाकी लव्हस्टोरीज त्यातही केजो, चोप्राज नॉट माय कप ऑफ टी.

विनोदी भुमिका ट्राय केल्या पाहिजेत त्याने.
त्याचं कॉमिक टायमिन्ग मस्त आहे. बादशाह मध्ये चांगली झलक आहे.

नंदिनी +१.
शाहरुख फारसा आवडत नसला, तरी त्याची कारकीर्द दुर्लक्षण्यासारखी वाटत नाही. त्याचे 'स्वदेस' आणि 'चक द इंडिया' हे दोन इमेजच्या बाहेर जाऊन केलेले सिनेमे मला जास्त आवडतात. तसेच 'हे राम' मधला छोटासा रोलही.
तो चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली चांगले काम करू शकतो हे त्याने दाखवून दिलेले आहेच, फक्त त्याने आता चोप्रा-जोहर-फराह खान वगैरे कंपूला वगळून काहीतरी केले पाहिजे. Happy

डर, अंजाम बघून शहरुख आवडेनासा झाला असेल तर ते त्याच्या अभिनयाचे यश आहे.

जूही चावला, जॅकी श्रॉफसोबतचा(दोघे पोलिस) त्याचा एक सिनेमा आहे ज्यात जूहीच्या(अंडरकव्हर पोलिस) तोंडी क्रूड विनोद आहेत. तिच्या हाय पिच आवाजाला मस्त सूट होतात.(अगर मैं प्रेग्नंट हो जाती तो.....) तिथे शाहरुखने भिजली मांजर मस्त वठवलीय....कोणता तो सिनेमा?

वन टू का फोर. त्यामधे शाहरूख चं काम खरंच मस्त आहे. वैतागलेला माणूस, जुही चावलाला घाबरणारा (लीटरली घाबरतो तो तिला) नंतर ती अंडर कव्हर पोलिस बनून त्याला सप्सेन्ड करवते तो सीन त्याने मस्त केले आहेत. सिनेमा जास्त चालला नाही, पण गाणी खूप गाजली. त्यातलं https://www.youtube.com/watch?v=AizxpZonPnk हे गाणं माझ्या आवडीचं. पुन्हा एकदा शाहरूखचा रोमॅन्टिकपणा बघण्यासारखा.

नंदिनी ताई....Absolutely Right !!!!

शा.खा. हा त्याच्या बहुतांश चित्रपटात शा.खा. च वाटला आहे.
फक्त काही सन्माननिय अपवाद सोडता....जसे डर, स्वदेस, वीर-झारा, चक दे, देवदास, दिल से,
त्या पैकी ही डर चा Antagonist ही त्याच्या नंतर च्या कित्येक अ‍ॅन्टीहीरोज मधे झळकतच राहिला...

स्वदेस, वीर-झारा, चक दे त्या पैकी ही स्वदेस, आणि चक दे ह्या चित्रपटांमधे मात्र तो शा.खा.न वाटता खरोखर च अनुक्रमे मोहन भार्गव किवा कबीर खान वाटला.

दिलवाले..च्या आधी आणि नंतर असे त्याच्या कामाचे सरळ दोन भाग होतात. आधीचा शाहरुख खरेच जास्त सहज जास्त लवेबल होता. नंतरच्या भागातला माझा सगळ्यात आवडता रोल - 'कभी अलविदा ना कहना'; शरीराने अपूर्ण मनाने कडवट्,सतत दुसर्‍याला दुखावणारा- हा सेन्स ऑफ ह्यूमर सीन पहा- http://www.youtube.com/watch?v=utvBjMXPv9g

फौजी - एकदम नॉस्टॅल्जिकच केलं की नंदिनीतै!!! Wink समस्त पोरी आख्खा आठवडा त्या सोमवार संध्याकाळवर नजर ठेवून काढायच्या...
पण नंतर बाजीगर, डर, अंजाम वगैरे सिनेमे आणि तो फारच 'ओव्हर द टॉप' वाटले. एकामागून एक आल्याने तो डोस जरा जास्तच झाला (अर्थात मधे डर टीव्हीवर बघितला तेव्हा बरा वाटला).
माझे आवडते सिनेमे - डीडीएलजे (बर्‍यापैकी), कभी हां कभी ना, स्वदेस, चक दे इंडिया, वन टू का फोर, बादशाह. ओम शांती ओम.

करीअरच्या अगदी सुरुवातीला त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की हिंदी सिनेमात (मेनस्ट्रीम मसाला) अ‍ॅक्टिंगसाठी बेसिकली 'एक्स्प्रेशन्सचे तीन सेट्स' लागतात, दिलीपकुमारकडे 'पाच सेट्स' आहेत म्हणून तो जास्त महान अ‍ॅक्टर गणला जातो, इ. (तपशीलातली थोडी चुभू देघे)... त्यावरून लई गदारोळ झालेला आठवतोय. पण मला तेव्हाही आणि आताही त्याचं म्हणणं पटतं.
मला तो खूप आवडत नाही पण अतिशय स्मार्ट आहे आणि नेमकं त्याला काय हवं होतं आणि करायचं होतं ते क्लीअर होतं आणि त्याने मिळवलं असं वाटतं. कुणीही गॉडफादर नसताना, टीव्ही मालिकांमधून हिंदी सिनेमे ही शिफ्ट करताना जेव्हा बहुतेक सगळे आपटायचे तिथे तो सुपरस्टार झाला आणि अजून ते पद टिकवलंय

कुणीही गॉडफादर नसताना, टीव्ही मालिकांमधून हिंदी सिनेमे ही शिफ्ट करताना जेव्हा बहुतेक सगळे आपटायचे तिथे तो सुपरस्टार झाला आणि अजून ते पद टिकवलंय
----- हे महत्वाचे....

शाहरुख खान कधीच एवढा आवडला नाही. पण ज्याप्रकारे त्याने एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देउन स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यातुन त्याचा कामाबद्दलचा प्युअर बिझेनसमन व प्रोफेश्नल अ‍ॅटिटयुड, प्रचंड मेहनत, लोकांना मुख्यतः तरुणाईला काय हवे याची नेमकी पकडलेली नस, सतत स्वतःला अपडेट ठेवणे. असे भरपुर उत्तम गुण त्याच्याकडे दिसतात. त्याचे वेगळेपण म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत बहुतेकजण स्वतःच्या आईवडिलांच्या पुण्याईवर पिक्चर मिळवतात, फ्लॉप होउनही टिकुन राहतात पण शाहरुख खानने आजपर्यंत जे काही मिळविले आहे ते फक्त आणि फक्त त्याच्या एकटयाच्याच कर्तबगारीवर मिळविले आहे.

छान लिहीलय.
फौजी मधे आवडला होता शा.खा. दिलवाले मधे पण. डान्स मस्तच करतो. पण किंग खान वगैरे जरा अतिच उदो-उदो झाला त्याचा. आता तर पाहवत नाही.
निरागस सौंदर्यात, गोड गुलाबी हसण्यात > माधुरी निरागस वाटली नाही कधीच मला.

माधुरी निरागस वाटली नाही कधीच मला.>>>>>>>>> आणि आता तर आवरा म्हणायची वेळ आलीये. कालचा कपिलच्या एपि मधे तर कैतरी वेगळच वागत होती. ओव्हर.

नंदिनी +१
कालच डॉन २ बघत होते. खरच राग येतो त्याचा पिक्चर मध्ये. सेम कभी अलविदा मध्ये पण.
He really knows how to capture the screen.

https://www.youtube.com/watch?v=opYXOeWH_OI

हिरोईन ला इतक सैरभैर तोच करू शकतो

शाहरुख आवाडतोच.

मळवट जर कमी होऊ लागली. >>तुम्हाला मळभ म्हणायचे आहे का ? >> +१११
बाकी मलाही शा.खा . आवडत नाही कारण अस नाही पण उगीचच. >> (कल हो ना हो वै. डोक्यात जातो पण चक दे आणि स्वदेस फक्त त्याच्यासाठीच कधी ही बघु शकते.
आमच्या प्यांटवाल्यांना खूप आवडतो... >> आमच्याही Proud

Pages