जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ही मेघना हसत हसत स्वयंपाक घरात जाऊन काहीतरी शोधत होती. वर माईंना सांगतेय की मला स्वयंपाक शिकायचाय. इथे ज्या नवर्‍याबरोबर रहायचं नाहिये, त्या घरातल्या लोकांना आपलंसं का करायचा प्रयत्न? स्वयंपाकात लक्ष घालणं म्हणजे आपल्याला या घरात राहण्यात रस आहे हेच इनडायरेक्टली व्यक्त होतं ना? मग त्या लोकांना आशेला लावण्यात काय पॉईंट आहे? Uhoh मग लग्न स्विकारायचंच असेल तर संपूर्ण स्विकारावं... बिचारा तो चांगला आदित्य देसाई त्याला कशाला धारेवर धरायचं सतत? Uhoh
प्रोमो मध्ये फायनली तो डायलॉग ऐकायला मिळालाच Proud 'प्लिज देव होण्याचा प्रयत्न करू नकोस. फुल्ल हम दिल दे चुके सनम. कठिणे, कॉपी तरी जरा नीट करायची.

काल त्या मेघनाचा पुतण्या टाकीवरून पडला. नेमका तिच्या आई बाबांचा फोन . किती ती पडझड आणि नवरा आदित्य सांभाळून घेणार. कथानक कधी पुढे सरकणार ?

ए मला एक सांगा!
ती फॅमेली चाळीत रहाणारी दाखवलीये. म्हणजे मध्यमवर्गिय!
कोणत्या मध्यमवर्गीय घरात संक्रांतीचं वाण म्हणून पेनड्राईव्ह लुटायचा विचार केला जातो? Uhoh
त्यात आत्ताच घरात मुलाचं लग्न झालय, खर्च निम्मा निम्मा केलाय म्हणजे खुप खर्च झाला असणार ना?
एक पेनड्राईव्ह नाही म्हणलं तरी किमान २५०रुपयांचा असतोच. ४ जणींना वाटायचं म्हणलं तरी शक्य आहे का हे वाण? Uhoh
काहीही!

अ‍ॅ ऐकावं ते नवलंच खरंच ते पेन ड्राईव्ह वगैरे लुटायचा विचार करत होते.. वाण म्हणून Uhoh
किती ती पडझड >> +१११
आता तो नवा बाबाजी म्हणे वर्षात पाळणा हलवा... जरा कुठे सुस्कारे नी आंबट तोंड उजळायला लागलेलं तर नवा टॉपीक नवीन आंबट चेहरा आणि सुस्कार्‍यांसाठी!!!

रिया., चाळीत राहणारी सगळीच कुटुंब केशरी किंवा पांढरं रेशनकार्डधारक नसतात Wink

विनोद बाजूला, पण चाळीत राहतात म्हणजे मध्यमवर्गीय आणि त्यांना ह.कु.ला महाग वाण देणं परवडणारच नाही हे लॉजिक बरोबर नाही. आपण राहतो ती वस्ती (एरीया) सोडायचा नाही, पण जागा तर मोठी हवी आहे या तिढ्यात चाळीतच २-३-४ युनिट घेऊन राहणारी अनेक कुटुंब मुंबईत सुखाने राहत आहेत.

तो भविष्य सांगणारा नविन बाबाजी एकतर लहानपणी पुस्तकात वाचलेला (आणि कधीही न पाहिलेला) वासुदेव वाटतो किंवा सर्कशीतला विदुषक वाटतो. Happy
काय ते कपडे, काय ते बोलणे! सदैव यमक जुळवत पद्यात बोलणे कसे जमते याला?
दक्षिणा, फुल्ल हम दिल दे चुके सनम. कठिणे, कॉपी तरी जरा नीट करायची. Happy
सध्यातरी हि मालिका गिरीश ओक आणि सुकन्या मोने यांच्या अभिनयासाठी पहात आहे. दोघांचाही अप्रतिम अभिनय!
त्या आदित्य देसाईला अजय देवगण बनणे जमेल असे सध्यातरी वाटत नाही. मेघना पद्धल तर न बोललेलेच बरे.
मालिकेचे नाव बदलुन बाबाजी वैगरे केले तरी चालेल, नाही का? किती तो बाबाजी चा अतिरेक?

मंजूडी + १
पण त्यांची चाळ नाहीये. वाडी आहे. घर मोठं दाखवलंय. शिवाय आदित्य-मेघनासाठी तिथेच दोन खोल्या ठेवल्यात असाही उल्लेख येऊन गेलाय ( ते वाडीचे मालक आहेत असाही बहुतेक ! )

मला एक कळत नाही मेघनाचा पुतण्या पडल्यावर कोण होत त्याच्या बरोबर म्हणून सारख विचारलं जात. तेव्हा ही मेधना धिटाईने सांगत का नाही हो मी होते त्याच्या जवळ . सगळे त्यांच्या खोलीत आले असताना पण कोण त्याच्या बरोबर होत हाच विषय निघाल्यावर ती आदित्यकडे का बघते?. भेदरलेल्या सशासारखी .नंतर मारे आदित्यला सांगतेय . कृपा कर पण देव नको होउस . नकोय ना तुला तो सांभाळून घ्यायला . मग सांग ना पटकन खर काय ते. काहीच कळत नाही

काल नातु (मेघनाचा पुतण्या) मेघना काकुबरोबर पतंग ऊडवायला जात असताना त्याचे आजोबा आणि मेघनाचा सासरा तिथे होता ना! मग, तरीही हा गोंधळ का?

अगो +१
ती चाळ नव्हे, देसाईवाडी आहे. आणि त्यांनीच ते राणे आणि गुजराथी असं कुटूंब भाडेकरू ठेवलंय असं एकूण दिसतंय.

सुजा अगदी अगदी मी सुद्धा हे च म्हटालं... आधी मूग गिळून गप्प राहीली तो बिचारा स्वतःवर घेतोय सगळ्यंचा रोष हिला वाचवायला तर तोंड वर करून बोल्तेय काय.. एवढी हिम्मत आहे तर जाऊन जावेची माफी मगून यावी. कबूल करावं ना आदित्य नाही माझं दुर्लक्ष झालं, माझी चूक आहे. गट्स नाहीत नी भरभरून जगणारेत मॅडम.

बरं असू द्या Happy
मला वाटलेलंच हा विषय निघणार पण चाळ की वाडी की मध्यमवर्गिय कुटुंब वगैरे तितकंस महत्वाचं नाहीये.

माझा मुद्दा हा आहे की वाण म्हणून पेन ड्राईव्ह? Uhoh
काहीही नाही का होतेय हे? Uhoh
कोण असा विचार करत असेल की आपण वाण म्हणुन २५० रुपयांपर्यंतची वस्तू देऊयात आणि तीही पेन ड्राईव्ह!
मी तर सहज हा विचर केला असता की २५० रुपयांचं वाण द्यायचय तर (मुळातच मी असा काही विचार कधीच करणार नाही पण तरीही केलाच तर) इतर हजार मस्त ऑप्शन आहेत वाण द्यायला Uhoh
काही तरी लॉजिकल दाखवावं की

काहीही नाही का होतेय हे?>>> त्यात काय आहे काहीही वाटण्यासारखं हे मला समजत नाही. जितक्या सहज आपल्याला पावडर/ कंगवे लागतात, जितक्या सहज पर्फ्युम्स लागतात, जितक्या सहज मायक्रोवेव अ‍ॅक्सेसरीज लागतात तितक्या सहज पेन ड्राईव्ह लागत नाही काय?

रीया, त्यांना(सिरियलमधल्या बायकांना) परवडत असेल तर देवु दे ना..
बरं, आता कुठलीही फॅन्सी वस्तु( काजल पेन्सिल, टप्परवेअर डब्बे, ग्लास सेट वगैरे) आरामात २०० च्या आसपास
जातीलच.

माझ्या मैत्रीणीणी गेल्या वेळी काजल पेन्सिल्स दिल्या(लॅक्मी च्या), खूप बायकाला न्हवत्या बोलवल्य पण तरी २० एक होत्याच. एक पेन्सिल्स वाटतं ९० वगैरे आहे ना...(मला लक्षात नाही किंमत).

ज्याला जे परवडतं ते देतात त्यात काय.. आजकाल खूप ट्रेंड आलाय काहीतरी वेगळं द्यायचं... एकदम ट्रेडेशनल नको म्हणून.

हे खरंय की ट्रेंड आलाय नवीन आणि हटके वाण लुटायचा पण तरीही इतकी महाग गोष्ट वाण म्हणून लुटणे माझ्याही पचनी नाही पडलं. पटकन पहीली प्रतिक्रिया आली अओ...
असो अर्थात हल्ली दोघी तीघी किंवा जास्त जणी एकत्र साजरी करतात संक्रांत आणि घसघशीत वाण ठेवतात. बहुदा या घरातल्या चार बायका एकत्रीत साजरा करतील हळदीकुंकू समारंभ म्हणून मग प्रत्येकी ६० ६२ रुपये यावेत एका वाणामागे. ठीके तसं. आणि बहुदा फक्त वाडीतल्याच बायका असाव्यात येणार्‍या Happy

लेखकाला मालिकेत नक्की काय दाखवायचे आहे? त्या बाबाजीच्या नादात एकतर तो मेघनाचा बाप वेडा होईल नाहीतर तिला वेडी करेल! एखाद्या गोष्टीचा किती तो अतिरेक?

खरे तर हे असले बाबाजी वगैरेचे उघडपणे स्तोम माजवलेले आहे. सिरियल मध्ये असले काही दाखवून काही लोकं अश्या गोष्टींच्या मागे लागतात. नाहितर कुठेतरी एकूनम्मागे लागतात.
मग बुवाबाजी सूर होते.
मध्ये असेच एका मैत्रीणीला कोणीतरी बाबाजी भेटला व त्याने तिला तुझ्यावर संकट आलेय ते कोणाच्या तरी करणीमुळे वगैरे सांगितलेले व ती वेडी एकत होती.

आता तो उदय टीकेकरचे पात्र खूपच डोक्यात जातेय. उगाच त्याला ओअ‍ॅक्टीम्गं करयला सांगितलीय.
बघितले की बोर होतं.

तिकडे ती मेघना उसासेच सोडतेय... कन्फ्युज होवून.

असे पैसे खाणारे, बाबाजी-बाबजी करणारे विवेकहीन लोकं समाजात असतात. त्यांचे वागणे घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही फार त्रासाचे असते. त्या वृत्तीचे विडंबन दाखवण्यासाठी मेघनाचे बाबा. त्याच्या अगदी उलट आदित्यचे बाबा दाखवलेत.

लेखकाला या मालिकेतुन काय सांगायचे आहे तेच समजत नाही आहे. मेघनाचे वडिल सदैव 'बाबाजी बाबाजी' करत बायको आणि मुलीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. जर बायको आणि मुली पेक्षा बाबाजी जर जास्त प्रिय असतिल तर अश्या माणसाने मुळात लग्नच का केले? 'सरकारी नोकरीत पैसे खाऊन बाबाजींच्या नादाला लागुन मुलीच्या भविष्याचा विचार करायचा' हे लेखकाला दाखवायचे आहे का? त्यापेक्षा आदित्य देसाईच्या बाबांचे वागणे योग्य आहे. निदान ते सगळ्या बाजु ऐकुन घेऊन परिस्थितीचा विचार करून आपले मत मांडतात (समोरच्यावर लादत नाहीत). झी मराठीच्या मालिकेमधुन इतकी अंधश्रद्धा दाखवली जाईल अशी अपेक्षा नव्हती.

आणि मला पडलेला सर्वात मोठ्ठा प्रश्न म्हणजे या दोघांच्या बॉडी लँग्वेज मधून घरच्यांना जराही कळू नये की या दोघांच्यात काहीतरी बिनसलंय म्हणून? Uhoh

तिचं ते घुमं भाव बघून कंटाळा येतो.
सिरियल उगीच कुठेतरी वेळ खात जाते. किती वेळ तो गिरिश ओक आणि तो आगाउ नातुचे संभाषण दाखवलेले.

ती सर्व मुलं ( तीन मुलं सिरियलीत दाखवलेली) मला आगाऊ वाटतात....

चित्रपट-सिरियलीतली मुलं आगाऊच असतात.....का कोणास ठाऊक?
प्राजक्ता माळीला अभिनय जमत नाही. तिच्या काही काही अ‍ॅक्शन्सपण नाच केल्यासारख्या असतात.

गिरीश ओक एकदम मस्त अभिनय करतात. त्यांच्या मुलीबद्दलच्या कमेंटस तर अगदी जेन्यूईन वाटतायत ! Proud

Pages