जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती जावेची काम करणारी अभिनेत्री >> ती मधुगंधा कुलकर्णी. हो सू मी या घ ची लेखिका.

अबोलीजाह्नवी डिट्टो Lol
आईग्गं कसले गोड साबा साबू आहेत!! नणंद पण तिच्या जागी मला बरी वाटतेय... दुसरं तिसरं घर असतं तर मेघनाच्या वेंप वर कोट्या करून तिला सतत टोचत राहीलं असतं... त्यामानानी बरंच सावरून समजून घेतेय ना सासर.. आल्या आल्या एवढ्या घोड चूका करून...

मोठा दिर पण खूप समंजस आहे... नणंद त्या मेघनाच्या आरड्याओरड्याने विचारत असते पण झालं तरी काय असं तेव्हा किती पटकन लक्षात येणार नाही असं सावरून घेतो... चला चहा कर, तुझ्या हातचा चहा प्यावासा वाटतोय... येवढ्या सांभाळून घेण्यार्‍या लोकांत नणंदेने थोडंसं खोचक असलं तर फार काही वाटत नाही...आणि तीपण छोटी लाडावलेली नणंद दाखवलेय. आणि काही जाच करत नाही. नाहीतर सगळंच किती गोड मिट्ट होऊन जाईल... रच्याकने संवाद, पटकथा कोण लिहीतंय या मालिकेची?

dreamgirl ,

कथा पटकथा - विवेक आपटे
दिग्दर्शक - हेमंत देवधर
संवाद - अरुणा जोगळेकर

मेघनाचं पात्र लेखकाचं लाडकं दिसतंय. सतत तिच्या मनाचा कल्लोळ दाखवत असतात.
अरे कधीतरी आदित्यच्या मनाचा कल्लोळही दाखवाल की नाही ?
अजून किती त्याने समजून घायचंय ? Angry
सुकन्या मोने आणि ओकांचं सहजीवन अत्यंत समंजस , समाधानी , तॄप्त दाखवल्याने बघताना अगदी छान वाटतं.

मोनेबाई आणि डॉ.ओकांबद्दलच्या सगळ्या पोस्टींना जोरदार अनुमोदन... तसच लोकेश गुप्तेही खूप सुंदर अभिनय करतोय...

सासर कस असाव याच उत्तम उदाहरण आहे हे घर Happy मेघनाची नणंद मुळात वाईट नाही स्वभावाने, अमितच(मोठ्या भावाच) लव्हमॅरेज असल्याने मोठ्या वहिनीशी हिची वेव्हलेंथ आधीच जुळलेली होती, पण मेघना तशी अगदीच अनोळखी, त्यात घरातले सगळेजण तिला समजुन घेतात, तिच्यासमोर आपली टिंगल टवाळी करतात ही गोष्ट तिला खटकते त्यात चुक काहीच नाही.

ते "किरण" च पात्र फक्त मेघनाला "आदित्य नगरकर" ची खबरबात द्यायलाच कथानकात आहे . मेघनाची रुळावर येत असलेली गाडी डिस्टर्ब करायला.दुसर काहीच त्याला काम नाही.
देसाई वाडीत मस्त लगोरीचा खेळ चालला होता. लहानपणची खूप आठवण झाली. Happy

मी बघते हल्ली ही मालिका ! विषय क्लिशे असला तरी कथा रंगवली चांगली आहे ( अजूनपर्यंत तरी ) !
बाबाजीमय वडील, त्यांच्या धाकात असणारी आई, देसायांकडची सगळी माणसं ... सगळे आपापल्या जागी परफेक्ट वाटतात. मुख्य म्हणजे सगळेच गोड गोड नाही दाखवलेय. नणंदेचे, जावेचे, नणंदेच्या नवर्‍याचे, मुलांचे राग-लोभ, प्रतिक्रिया, हेवेदावे नॅचरल वाटतात.
मधुगंधा कुलकर्णीचा अभिनय पहिल्या दिवसापासून आवडतो. तिची स्वतःची अशी खास वेगळीच स्टाईल आहे. मी तिचे काम पहिल्यांदाच बघतेय त्यामुळे ती नेहेमी अशीच काम करते का ते मात्र माहीत नाही !

मधुगंधा कुलकर्णी अभिनयात सुधारणा आहेच Happy काल मेघनाचे बाबा देसायांकडे आले. आणि नंतर नाना देसाई आणि माई कसे बोलत बसले होते. मधुराच्या बाबांच काही खर नाही. खरच आहे. Happy

मला एक सांगा, कोणाकडे जायचं असेल तर (स्पेशली लेकीच्या सासरी) फोन करुनच जातात ना?
हे बाबाजी का असेच येतात?

आदित्य नगरकरचे सारखे कुठेतरी गायब असणे, त्याने आणि मेघनाने कधीच एकमेकांना फोन न करणे हे मात्र कैच्याकै आहे ह्या सिरियलमध्ये !

स्पेशली लेकीच्या सासरी>> का बुवा?? Uhoh नाही ब्वॉ रिया... माझ्या आई बाबांना मी सरप्राईज द्यायला सांगते Proud तसंही देसाई कुटुंब हे खूप मनमोकळे दाखवल्याने त्यांच्याकडे कोणाही आगंतुकाला कधीही जायला संकोच वाटत नसणार. तरीही घरी एवढा आकांडतांडव करणारे थोडे विक्षिप्त स्वभावाचे मेघनाचे बाबा मुलीचे वडील म्हणून बरंच भान राखून बोलताना दाखवले आहेत आताच्या काळातही...
मधुगंधा कुलकर्णी च्या दिसण्याबद्दल मला काहीच आक्षेप नाही... कारण कोण कसं दिसतंय त्यापेक्षा अभिनय कसा करतंय ते महत्वाचं... ती यापेक्षाही चांगला अभिनय करू शकते खरं तर. त्या दिवशी तिच्या ड्रेसेस च्या एग्झीबिशन दिवशीचा गोंधळ मस्त अभिनय केला.
पण ड्रेस सेन्स मात्र अगदीच बाद दाखवलाय. मग त्यामानाने नणंदेचे ड्रेस जरा बरे असतात. मेघनाचे ड्रेसेस तर बोलायलाच नको...

ती यापेक्षाही चांगला अभिनय करू शकते खरं तर. >>> सुरुवातीला एकदम नैसर्गिक अभिनय वाटायचा. आता उगाच तोंड वाकडे करत, डोळे मोठे करत, मान जोरजोरात हलवत बोलते असे वाटते.

माशा माहीती बद्दल धन्स. काही काही संवाद स्पेशली मोने साबांचे मोठ्या सूनेची, मुलीची कानौघाडणी करताना, ओक साबूंचे सर्वांशीच, आदित्य चे, मोठा दीर अमीत चे... तसंच काही काही अतिशय सहज प्रसंग... जसं एग्झीबिशनच्या घाईत आलेल्या चहाचा कप सावंत काकांनी पटकन टेम्पो ड्रायव्हरला देणे, लगोरीचा खेळ व्वा! सहज आणि छान वाटतं...

मेघनाचं पात्र लेखकाचं लाडकं दिसतंय. सतत तिच्या मनाचा कल्लोळ दाखवत असतात.>> +१
सुकन्या मोने आणि ओकांचं सहजीवन अत्यंत समंजस , समाधानी , तॄप्त दाखवल्याने बघताना अगदी छान वाटतं.>> +१०००
सगळे आपापल्या जागी परफेक्ट वाटतात. मुख्य म्हणजे सगळेच गोड गोड नाही दाखवलेय. नणंदेचे, जावेचे, नणंदेच्या नवर्‍याचे, मुलांचे राग-लोभ, प्रतिक्रिया, हेवेदावे नॅचरल वाटतात.>> +१
ते "किरण" च पात्र फक्त मेघनाला "आदित्य नगरकर" ची खबरबात द्यायलाच कथानकात आहे . मेघनाची रुळावर येत असलेली गाडी डिस्टर्ब करायला.दुसर काहीच त्याला काम नाही.>> +१

आदित्य नगरकरचे सारखे कुठेतरी गायब असणे, त्याने आणि मेघनाने कधीच एकमेकांना फोन न करणे हे मात्र कैच्याकै आहे ह्या सिरियलमध्ये !>> +१०००

ड्रिम्स, आय मीन की ते घरी असतील-नसतील तर म्हणून फोन करुन जावा.
पण आता एवढं मोठं कुटुंब म्हणल्यावर कोणीतरी सतत घरात असणारचं ना Happy
असू शकत Happy नंतर लक्षात आलं माझ्या Happy
पण लेकीच्या सासरी का कारण आई वडील मोस्टली लेकीला भेटायलाच येतात. तीच घरात नसेल तर?

आदित्य नगरकरचे सारखे कुठेतरी गायब असणे, त्याने आणि मेघनाने कधीच एकमेकांना फोन न करणे हे मात्र कैच्याकै आहे ह्या सिरियलमध्ये !>>>>> हो ना..आणि हा काय 'हम दिल दे चुके सनम' चा जमाना नाहीय्ये.... फोन शिवाय इतर साधनं पण असतात की कम्युनिकेशन ची... ई मेल, फेसबुक वगैरेवगैरे..... मालिका लिहिणारे विसरलेले दिसतायत...

आदित्य नगरकरचे सारखे कुठेतरी गायब असणे, त्याने आणि मेघनाने कधीच एकमेकांना फोन न करणे हे मात्र कैच्याकै आहे ह्या सिरियलमध्ये !>>>>> अरे अरे!!! एवढ्यात कसा येईल तो समोर?
आता मेघना देसायांच्या घरात रुळणार, मग एक दिवस तिला साक्षात्कार होणार की ती आदित्य देसाईवर प्रेम करते आहे आणि मग ढॅण्ट ढॅऽऽ हीच ती वेळ...हाच तो क्षण...आदित्य नगरकरचे आगमन होणार. Proud
यानंतर कथा दोन मार्गांनी जाऊ शकते.
१. मेघनाने प्रेमाची कबुली देण्याआधीच आ. न. चे आगमन. मग अनभिज्ञ आ. दे. चा त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न, मेघनाची कोंडी वगैरे वगैरे...
२. मेघनाने कबुली दिल्यानंनतर आ.न.चे आगमन,
अ. आ.दे.चे संशय घेणे. मेघनाचे रडणे.
ब. आ.न. ने मेघनाच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करणे, मेघनाने हे आ.दे.पासून लपवणे,मग संशयकल्लोळ, मग खरी गोष्ट कळल्यावर आ.दे.चे मेघनाला आ.न.पासून वाचवणे.

आदित्यची झुल्पं त्याच्या डोळ्यात जायची बाकी आहेत..<<< झुल्पंयत होय ती? मला वाटलं पापण्या आहेत.

छान घेतला होता कालचा भाग. सासू सासरे अगदी दृष्ट लागण्यासारखे दाखवलेत. देसायांच्या घरातलं खेळीमेळीच वातावरण मस्त दाखवतात Happy

Pages