Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरं तर मी ही सिरियल अगदी
खरं तर मी ही सिरियल अगदी डोळ्यासमोर सुरू असते म्हणून पाहते. त्यातल्या त्यात मला गिरिश ओक आणि सुकन्या कुलकर्णीच प्रचंड आवडतात. बाकी शून्य आहेत सगळे. नायिका तर महामूर्ख. अजून तळ्यात मळ्यात करत बसली आहे. जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी असतं का?
जुन्या आदित्यला शोधत नाही,
जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते.
>> अगदी अगदी दक्षे
नायिका तर महामूर्ख. अजून
नायिका तर महामूर्ख. अजून तळ्यात मळ्यात करत बसली आहे. जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी असतं का?>> प्रचंड अनुमोदन...
जुन्या आदित्यला शोधत नाही,
जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते.>>>> तेच की... तो सुद्धा माठ हिच्याशी काहीच संपर्क साधत नाही.
ते दोघे व्हॅ.डे.डिनरसाठी जेवायला जातात तेव्हा तिने घातलेला ड्रेस पैठणीचा होता. पण अश्या सुंदर गोष्टींवर फोकस करतच नाहीत. नेहमीच तिचा आंबट रडा चेहरा दाखवत बसतात.
आणि वरून फक्त कबुतरासारखं
आणि वरून फक्त कबुतरासारखं गुटर्र गुटर्र गु करत घशातल्या घशात बोलत राहते.
आदित्यला मी छान पिना देणारे,
आदित्यला मी छान पिना देणारे, झुल्फं मागे सारायला, एवढा गुडबॉय आहे, मग तर अगदीच गोड दिसेल.
तो जुना आदित्य प्रत्यक्ष
तो जुना आदित्य प्रत्यक्ष काँटॅक्ट न करता त्या बद्धकोश्ठ झालेल्या बेडकाला पाठवत असतो सतत निरोप घेऊन..फोन-बिन तरी करायचा एखादा..
जुन्या आदित्यला शोधत नाही,
जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी असतं का?>>>> मी काल हेच म्हणत होते घरी.... "पण त्याचा फोन लागत नाही ना . तो कुठेतरी लांब आहे ..." असे उत्तर मिळाले ..डोक बाजुला ठेवुन बघाय्चे तर बघावे हेच खरे
फाईनली नाना-माईला,
फाईनली नाना-माईला, आदित्य-मेघनात काईतरी गडबड आहे हे जोरात जाणवलय ते बरं झालं..अगदी समर्पक शब्द वापरला, 'उसने अवसान आणल्यासार्खे फिरतात दोघेही घरात"
"पण त्याचा फोन लागत नाही ना .
"पण त्याचा फोन लागत नाही ना . तो कुठेतरी लांब आहे .
मग त्या मित्राला कसे मिळतात याचे निरोप..? हिचा फोन लागत नाही तर त्याचाही नाही लागला पाहिजे.
करेक्ट ... तेच तर ग ... पण
करेक्ट ... तेच तर ग ... पण घरी श्रध्दाळू पब्लिक आहे
... जास्त खोलात जात नाही ...
श्रध्दाळू पब्लिक>> बाबाजी
श्रध्दाळू पब्लिक>>

बाबाजी आठवले आपसूक... ह्या सिरीयलचं टायटल चालू झालं की माझा मुलगा दोक्यावर हात मारून बाबाजी बाबाजी सुरू करतो
देसाई साबासाबू अगदी आदर्श सहजीवन जगताहेत... खरंच यांच्याकडून धडे घ्यायला हवेत २०-२५ वर्षांनंतरचं सहजीवन कसं जगावं तेही सगळ्यांना सांभाळून घेऊन!!
बाबाजीला वाटतय देसाईंकडे
बाबाजीला वाटतय देसाईंकडे त्याचा कोणीतरी शत्रू आहे...........ही काय भानगड आहे ?
बाबाजीला नाही? मेघनाच्या
बाबाजीला नाही? मेघनाच्या वडिलांना त्यांच्या बाबाजीनी संकेत दिले आहेत की मेघनाच्या घरात त्यांचा कोणी तरी शत्रू आहे. आणि त्यांना तो सतीश वाटतो आहे. मेघनाचे वडील मात्र डोक फिरवतात. उदय टिकेकर नी काम चांगल केल आहे
मला वाटतय ही शिरेल ९० च्या
मला वाटतय ही शिरेल ९० च्या दशकातील आहे..मोबाईल आहेत पण तेव्हासारख आउट गोईंग , इन कमिंग ला फार चार्ज पडतो...हे आउट गोईंग , इन कमिंग चार्जेस च इतके आहेत तर बाकी अॅप्स बद्दल बोलण्याचा संबधच येत नाही....म्हणुनच तो तिचा आदित्य शिमला की फिमल्याला आहे तिथुन तो एक साधा कॉल नाही करु शकत की मेसेज नाही पाठवु शकत........
मग बरोबरच आहे न....ते दोघ एकमेकांना संपर्क कशे करतील १९९७ मधला काळ आहे तर....तेव्हा ईतकं सोपं का होत ते??
मग बरोबरच आहे न....ते दोघ
मग बरोबरच आहे न....ते दोघ एकमेकांना संपर्क कशे करतील १९९७ मधला काळ आहे तर....तेव्हा ईतकं सोपं का होत ते??
>>>>> नाही वाटत १९९७चा काळ .... मेघनाकडे, आदीत्यकडे स्मार्टफोन दाखवले आहेत.
काल, बाबाजींनी मजा आणली , उदय टिकेकर छान काम करतात.
१९९७ मधला काळ आहे>>> आता हा
१९९७ मधला काळ आहे>>> आता हा जावईशोध कुणी लावला?
(No subject)
मला वाटते अनिश्का ने ते
मला वाटते अनिश्का ने ते उपरोधाने लिहीले आहे ....
उदय टिकेकर आहेत म्हणून ते
उदय टिकेकर आहेत म्हणून ते बाबाजी बाबाजी कॅरेक्टर अजून सहन करतायत प्रेक्षक. काल मेघना आणि कॉफी शॉपमध्ये का भेटले होते म्हणे? उगिचच? जोक ऐकायला? नटुरे आणि फटुरे?
काल मेघना आणि कॉफी शॉपमध्ये
काल मेघना आणि कॉफी शॉपमध्ये का भेटले होते म्हणे? >>> मी मिसला तो भाग... तिला काहीतरी सांगायच असत बहुदा, नक्की माहीत नाही.
उपहासानेच तर लिहिलय तीने ते
उपहासानेच तर लिहिलय तीने ते

काय तुम्ही लोकं
आबासाहेब, मुग्धटली,
आबासाहेब, मुग्धटली, ------^------
......मी मस्करी करत होते......अर्थातच मी उपरोधाने लिहिलय...कारण शिरेल वाले आपल्याला बावळट समजतात.....आणि काही दाखवतात......गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांशी कॉंन्टॅक्ट करत नाही ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे..... नॉन्सेन्स
मी पण
मी पण

(No subject)
सॉरी मी बदललं आहे ग रियु
सॉरी मी बदललं आहे ग रियु
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांशी कॉंन्टॅक्ट करत नाही ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे..... नॉन्सेन्स>>>> तिचे आता लग्न झाले आहे ना? आ न ने फक्त तिचे लग्न होताना पाहिले आहे, बाकी पुढचे नाटक त्याला माहिती नाहीये, तर तो कसा फोन करेल तिला?
राहता राहिला प्रश्न मेघनाचा. तर ती अगदीच कचखाऊ, आत्मविश्वास नसलेली दाखवली आहे. नुसतीच मुळूमुळू रडणारी. अशी मेघना स्वतःहून कसा फोन करेल आ न ला?
अनु, रिया.... दोघी द एडिटर
अनु, रिया.... दोघी द एडिटर
अग तो समंजस आदित्य करत असतो
अग तो समंजस आदित्य करत असतो ना त्या आ न ला फोन
लागत नाही पण!
बहुदा, हिने चुकिचा नंबर दिला
बहुदा, हिने चुकिचा नंबर दिला असेल..
Pages