जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरीश ओक मस्तच.. मोनेबाईंबरोबर केमिस्ट्री चांगली जमलीये त्यांची.

अंजली_१२....अखंड चहायज्ञ....+१००० प्रत्यक्षातही होत असं....माझ्या सासरीही सगळे कट्टर चहाप्रेमी आहेत....अनंत चहाफेर्या होतात दिवसातून....मी नोकरीची वेळ झाली की पळ काढत असे....विकांताला मात्र वाट लागायची....:)

Happy हो ना प्रत्येक वेळा ते कप धुवा, चहाचे भांडे घासा...किती भानगडी Happy
खव्वैये आहेत मात्र देसाई ... कोथिंबीर वडी, खरवस, थालिपिठं मज्जा असते.

अंजली खव्वैये कसले खादाड आहेत १ नं... खाण सोडुन दुसर काही असु शकत हेच माहित नाही.... सारख सारख तेच डायलॉग्ज ऐकुन कंटाळा येतो.... मस्तपैकी थालीपीठ, झक्कास चटणी हे नी ते.... कुणाला माझ बोलण खटकल असेल तर आधीच क्षमायाचना करते, पण नाही पटत हे सारख...

हो चैत्राली... तिला पण कळल पाहिजे की समोरच्यालाही मन आहे, त्यालाही मन दुखावल तर त्रास होतो, इमोशन्स नावाचा प्रकार इतरांच्याही आयुष्यात असतो....

झंपे कालचा भाग सुसाह्य होता
बघ बघ!
वाचुन सगळं तसच्या तस कळणार नाही Happy

मला आवडते ही सिरिअल!
आणि मेघना सोडुन सगळेच आवडतात त्यातले.

मुग्धटली..
हिने सारखी काहीतरी किरकिर करायची, त्याने सांभाळून घ्यायचं, मग हिनी सॉरी म्हणायचं..
कंटाळा आला होता त्याचा.

चैत्राली अगदी अगदी म्हणुन तर माझ्या पोस्टमध्ये म्हणाले ना "तिला पण कळल पाहिजे की समोरच्यालाही मन आहे, त्यालाही मन दुखावल तर त्रास होतो, इमोशन्स नावाचा प्रकार इतरांच्याही आयुष्यात असतो...."

>>>तिला पण कळल पाहिजे की समोरच्यालाही मन आहे, त्यालाही मन दुखावल तर त्रास होतो, इमोशन्स नावाचा प्रकार इतरांच्याही आयुष्यात असतो....<<
+१

अशी काही माणसं असतात ज्यांना फक्त स्वतःचं दुखः कळतं, व समोरच्या कडून लाड करून घ्यायची सवय असते. कारण समोरचा सोशीक असेल तर ज्यास्त करतात. दुसरं म्हणजे नुसतं सॉरी म्हणून झालां की संपलं असे वाटते.

अशी माणसं असतात ज्यांना फक्तं स्वतःचं दु:ख कळतं....झंपी....तुमच्या पोस्टीला इनफायनाईट अनुमोदने.... टिपिकली अशी माणसं मऊ सापडलं तर कोपराने खणणारीच असतात....

२००

काल आदित्य म्हणाला, पण मलाही वेळ हवा ना, तु फारच रूडली वागलीस माझ्याशी.

एकदम आवडल त्याच वागणं

मेघना वचवच ओरडली आदित्यवर तेव्हा त्याने गप्प ऐकून घेतलं. मी त्याच्या जागी असते तर एक थोबाडीत ठेवून आधी आवाज खाली.... असं सांगितलं असतं.

मेघनाने 'ह्यं' वगैरे एकाक्षरी उद्गार काढले की मला आमच्या चाळीतल्या छतावरच्या कबुतरांच्या ' घुटर् घुम' ची प्रकर्षाने आठवण होते....र.च्या.क.ने....तिच्या नणंदेनं का डूख धरलाय तिच्यावर, कळलं नाही.
मोनेबाई सासू म्हणून आणि डॉ. ओक सासरे म्हणून लईच छान, अगदी हेवा वाटावा असे. मेघनाने पूर्वजन्मी कायतरी मोठ्ठं पुण्य केलं असणारे, सासू-सासर्यांचं असलं घबाड लागायला. पुढील २०-२५ वर्षांत ' सासू' होऊ घातलेल्या मी आणि माझ्यासारख्या इतरांनी ह्या दोघांचा आदर्श ठेवायला हवा. Happy

आदित्य कसला गोड आहे..त्या पेटीचा जो काही घोषा लावला आहे तो अति वाटला. आदित्य ने मेघनाला सुनावलं ते बरं केलं...

.तिच्या नणंदेनं का डूख धरलाय तिच्यावर, कळलं नाही...+१
मोनेबाई सासू म्हणून आणि डॉ. ओक सासरे म्हणून लईच छान..+१ आदित्य पण..

तिच्या नणंदेचा सगळे तिच्या समोर टिंगल उर्फ अपमान करतात.
तिच्या मोठ्या चुकांनाही पाठीशी घालतात पण हिच्या छोट्या छोट्या चुकांबद्दल तिला ऐकवतात म्हणून तिला राग आलाय.
हे अतिच स्वाभाविक आहे.
माझ्या नातेवाईकांमध्ये मी हे असं उदाहरण पाहिलय. सुनांना पाठीशी घालायचं आणि मुलींना दांदरट वगैरे टाईप्स नावं ठेवायची.

मेघना वचवच ओरडली आदित्यवर तेव्हा त्याने गप्प ऐकून घेतलं. >>>> कारण ती व्यक्तीरेखा तशी आहे. तो ऐकून न घेता थोबाडीत मारणारा असता तर मुळातच मेघना त्याला आपल्या प्रेमप्रकरणाविषयी सांगते तेव्हाच त्रागा करून त्याने तिला घराबाहेर काढले असते.

मालिका छान वाटतेय बघायला. फक्त आता जाऊ आणि नणंद जास्त नाक खुपसताना नाही दाखवले तर बरे होईल. नाहीतर मालिका नेहमीच्याच वळणाने जाईल. Uhoh
ती जावेची काम करणारी अभिनेत्री फारच ओव्हरअ‍ॅक्टिंग करते.

नणंदेनी तो कुठला क्लास लावलाय तेव्हा तिला सगळे चिडवत असताना मेघना मात्र तिच्याबाजुने बोलते. तेव्हा तर अगदी गहिवरून तिच्या गळ्यात पडली होती..

Pages