जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आधी त्याच्याशी फटकुन वागेल...मग त्याची अच्छाईया बाहेर निघतील....मग ही त्याच्या प्रेमा बिमात पडेल..>>>ती कशाला फटकून वागेल. सुरुवातीपासून किती गोड वागतोय तो तिच्याशी. तसंही फटकून वागणे तिच्या स्वभावात आधीपासूनच नाही दाखवले.

>>पहिले १-२ भाग बघुन मला ती "हम दिल दे चुके सनम" च्या जवळ जाणारी वाटते आहे.
अगदी सहमत!! त्यामूळे मालिका बघण्याचा सगळा उत्साह निघून गेला आहे!! फक्त शिर्षक गीत तेवढं बाकी मस्त आहे!!!!

पहिले १-२ भाग बघुन मला ती "हम दिल दे चुके सनम" च्या जवळ जाणारी वाटते आहे. >>> १०० टक्के अनुमोदन.. काल का परवा तो आदित्य तिला म्हणतो की मी तुला तुझे खरे प्रेम मिळवून देईन. ह.दि.दे.चु.स मध्ये ते इटलीला गेले होते, इथे त्या मेघनाचा 'अदू'.. (ईईई अदू हे काय नाव आहे? 'आदि' तरी करायचा ना शॉर्टफॉर्म) मुंबईतच असल्याने आदित्यला (सध्याचा नवरा- जो खूपच क्युट दिसतो) जास्त शोधाशोध करावी लागणार नाही, असं दिसतयं.
फक्त शिर्षक गीत तेवढं बाकी मस्त आहे!!!>>> उत्तम आहे.. मला स्वप्नीला बांदोडकरचा आवाज फारच आवडलाय यात, त्यामुळे मी हे गाणं रिंगटोन म्हणून ठेवलय. Happy

फक्त शिर्षक गीत तेवढं बाकी मस्त आहे!!!>>> उत्तम आहे.. मला स्वप्नीला बांदोडकरचा आवाज फारच आवडलाय >>> मलापण्,खुपच छान आहे शिर्षक गीत,दोघांनीही सुरेख गायलं आहे.

मला ललित- प्राजक्ता या दोघाची जोडि आवड्ली.मालिका हळुहळु पकड घेत आहे.

सारिका.चितळे,
हो हो. फार पुर्वी दुपारी दुरदर्शन वरती प्रादेशिक सिनेमे लागायचे तेंव्हा हा बघितला होता.मणिरत्नम ने खूप चांगल्या पद्धतीने घेतला होता.संगीत ही अप्रतिम होते.
त्या हिरोचा पुढे पाय मोडतो.मग हिरॉइन सेवा करते.तिच्या माहेरच्या माणसांना सांगताना तो स्वतःलाच काहीतरी दोष देतो(तिची इमेज खराब होऊ नये म्हणून).हळूहळू ते दोघे जवळ येत जातात.
नंतर यावरच बहूतेक जुही व ऋषीकपूरला घेऊन १ सिनेमा आला होता.नाव लक्षात नाही.
मालिकेतही सगळ्यांची कामे छान झाली आहेत.सुकन्या एकदम गोड आणि हवीहवीशी सासू दिसते.

लग्नाच्यआ दुसर्‍यआ दिवशी काय तो अवतार.... कसा तो चुडीदार घातलेला? साधासा कॉटनचा चुडीदार. जरा बर्‍यापैकी तरी घालायचा.

मराठी सिरियलमध्ये कपडे हा इस्शु आहे. तर हिंदीत अति होइल असे कपडे.

३-४ वर्षापुरर्वी "यंदा कर्त्यव्य आहे" हा अंकुश चौध्ररी आणी स्मिता शेवाळे चा सिनेमा आला होता.
काल मेघनाच्या हरवलेल्या बॅगेचा प्रसंग पाहाताना या सिनेमाची आठवण आली. Happy

ही सिरियल म्हणजे जरा हे जरा ते घेऊन कॉकटेल टाईप करणार. तो नवरा माझा नवसाचा सिनेमा नाही का? बॉम्बे टू गोवा, साधु और शैतान चं मिश्रण होता.. तसंच... श्ये!

बोअर आहे ही मालिका... नायिका २४/७ चेहरा पाडुन बसलेली असते पण एकाला वाटत नाही की या मुलीच लग्न ठरत असताना ही अशी उदासवाणी का बसलीय, चुकुन एखाद्याने विचारलच तर आई इतकी कै च्या कै कारण देते आणि समोरच्याला पटतात ही कारण

या मालिकेचं शीर्षकगीत ऐकताना मला जुन्या 'रेशीमगाठी' मालिकेचंच शीर्षकगीत आठवत राहतं.. खूप मस्त होतं ते शीर्षकगीत, मालिकाही खूप सुंदर होती ती. तसा दर्जा आता नाहीच.

हळूवार पावलांनी हलकेच कोणी येते
अन् तेच तेच जगणे नवरंग रूप घेते
जशी पालवीच फुटते, ओसाड वाळवंटी
जेव्हा जुळून येती नाजूक रेशीमगाठी

निशःब्द भावना ही...
अर्थास जन्म देती
जेव्हा जुळुन येती
नाजुक रेशिम गाठी.....

त्यात वेगवेगळ्या गोष्टी असायच्या नं???? मस्त होती ती....

१९९२ साली 'कसक' का काही तरी अश्याच नावाचा चित्रपट आला होता. ऋषी कपूर, नीलम आणि चंकी पांडे कलाकार होते. विकीवर ही माहिती मिळाली. खरेखोटे माहित नाही.

हो सारिका, कसक ची कथा काहीशी तशीच आहे. मला आवडला होता हा चित्रपट. नीलमने छान काम केले आहे आणि चंकी पांडे फक्त सुरवातीलाच दाखवल्यामुळे सुसह्य झाला होता Happy

नायिका एक्दमच बोरींग झालीय.सारखे ते सुस्कारे सोडत बोलणं; बिचारा तो नवरा कशाला इतका उप्दव्याप करतोय कळत नाही.

कालच्या एपिसोडमध्ये हनिमुनला आल्यावर ही बया आदित्यला सांगते की मला मावशी आणि रश्मीशिवाय कोणाबरोबरही रूम शेअर करायची सवय नाही आहे. अग बये, आदल्या दिवशी आदित्यच्या घरी तु हे त्याला सांगायला विसरलीस का? का आज एकदम आठवल्यावर सांगुन मोकळी झाली!

अग बये, आदल्या दिवशी आदित्यच्या घरी तु हे त्याला सांगायला विसरलीस का? का आज एकदम आठवल्यावर सांगुन मोकळी झाली!

>> लोल्झ्झ.. मस्त ऑब्झर्वेशन.

आणी काय फालतुगिरी दाखवली आहे. तो मॅनेजर का कोण ह्यांना ह्यांच्या हनिमुनच्या रात्री ह्यांच्या रूममध्ये येऊन उपदेशाचे डोस पाजतो. आणी आईसक्रीमवर पाणी प्यायले तर सर्दी खोकला होतो म्हणुन ती बावळट एक चमचा आईसक्रीम आणि एक घोट पाणी असं करते. कैच्याकै..

आणि असं आईस्क्रिम खाल्लं असं पाण्यात भिजलं की लग्गेच यांना सर्द्या होतात होय?
दारूचं पण तसंच असे घोट घेतले असे टुण्ण होतात.. कैच्याकैच.. सुपरफास्ट क्रिया होतात वाटतं यांच्यात.

रिया....;) मलाही हाच प्रश्न पडला....
हिरवीण किती दिवस/ महिने / वर्षं असा सुळावर चढवल्यासारखा भाव घेऊन वावरणार कोणास ठाऊ़क...:(

ऊस गोड लागला म्हणुन मुळापासुन खणु नये, हे बहुतेक तिला कोणी शिकवलेले दिसत नाही.

>> अगं चिऊ.. उलट तिला पक्कं कळलंय कि ह्या ऊसाला कितीही खणला तरी हा (बावळट ऊस) गोडच लागणार.

आतावर फक्त रश्मी आणि आई बरोबरच झोपलेय.... Proud

मग कधी पिकनिक गेली नाही का मैत्रीणीबरोबर?
कहिहि डायलॉग लिहितात हे लोकं?

खरच आहे . नायिका सतत चेहरा पाडून बसलेली असते. घरातल्या सगळ्यांना कळत नाही का? एकदा तिला समोर बसून विचारायचं . काय ग काय प्रोब्लेम आहे. आत्ता मात्र तिचा पडलेला चेहरा बघण्याचा कंटाळा आलाय.. बाकीच्या घरातल्या लोकांचा अभिनय मात्र दिलखुलास. सुकन्या एकदम गोड. .गिरीश ओक घरातला बाबा कुठे गायबलाय?

नायिका सतत चेहरा पाडून बसलेली असते. घरातल्या सगळ्यांना कळत नाही का? एकदा तिला समोर बसून विचारायचं . काय ग काय प्रोब्लेम आहे. आत्ता मात्र तिचा पडलेला चेहरा बघण्याचा कंटाळा आलाय.. ++११११
गिरीश ओक घरातला बाबा कुठे गायबलाय?>>>बाबा लेकीबरोबर गावी गेलाय.

सारखं सारखं ते उसासे सोडणं इतकम बोर वाटतं ना, तो नवरा पण कैच्यकै समजूतदार दाखवलाय.>>+१

त्याला बेड्वर झोपू दिलं नाही पण स्वतःपण झोपली नाही...फरशीवर पडून होती..बावळटपणा आणि काय!

ती त्याच्या मनातून उतरलेली दाखवायला हवी....तरच जरा बरे वाटेल.

Pages