होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सिरियलवाल्याना मारले पाहिजे..:राग:.....किति सहनशक्ति बघतात प्रेक्षकांची ...बघतात म्हनुन काय तेच तेच दाखवायचे.........:राग:

अग हो हो सृष्टे..... एथ्थो राग?>>> आधिच त्या जाहिराति बघुन आपले डायलॉग पाठ झालेले असतात.

सहा सासवांची एकटी सून अशीच त्या मालिकेची थीम आहे ना? सासवा आणि सून पुरेश्या आहेत की अजून हजारभर एपिसोडसाठी. श्रीची आता गरजच काये??

जान्हवीला काळजी घ्यायला सांगून श्री घर सोडतो......असं दाखवलं ह्याचा अर्थ जानू जात नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणणारी जान्हवी काय करेल?

लग्नाच्यावेळी रो. ह. काय म्हणालेली असते? जान्हवी श्रीची बायको होऊ शकेल, पण या घराची सून नाही.
मग आता श्रीच्या अनुपस्थितीत जान्हवी गोखले घराण्याची सून बनून दाखवेल. (म्हणजे काय कोणास ठाऊक!)

तर असो!
सध्या मी रेशीमगाठी बघतेय गेले दोन दिवस. Wink Proud

मग आता श्रीच्या अनुपस्थितीत जान्हवी गोखले घराण्याची सून बनून दाखवेल. (म्हणजे काय कोणास ठाऊक!) >>> श्री ऑफिसमध्येही जाणार नाही, मग कदाचित जान्हवी ऑफिस आणि घरातील सासवांनाही सांभाळून आपले कर्तुत्व सिद्ध करेल.

श्री ऑफिसमध्येही जाणार नाही, मग कदाचित जान्हवी ऑफिस आणि घरातील सासवांनाही सांभाळून आपले कर्तुत्व सिद्ध करेल.>>> पण मग बँकेत कोण जाईल? आणि तसेही मूगाचे डोसे करून कर्तुत्व सिद्ध केले आहेकी आधीच.

श्री एक महिन्याने ऑफिस सोडेल, मग आईआजी सगळं हापिस जान्हवी च्या डोक्यावर सोडेल आणि प्रूव्ह कर म्हणून सांगेल. एका दगडात दोन पक्षी बिझनेस सुरळित, सगळी सुत्र हातात शिवाय सुनेची परिक्षा की परिक्षा भी हो जायेगी. शेवटी असं ही म्हणेल गोखले घराण्याचा एकही कृष्ण या गोकुळात टिकला नाही. सगळ्या गोप्याच टिकल्या (पार थेरड्या होईतो) Proud

मग जान्हवी श्री ची जागा घेईल घरात सुद्धा तिला शिरा/पाणि/देणे तिची खोली आवरणे इ. आया भांडत बसणार., एकूण शेवटी बायकी खेळ होणार या शिरेलीचा.

मी सांगतो तसे व्हायला पाहिजे....

श्री घर सोडून निघून जाणार आणि घराची आणि ऑफीसची धुरा जान्हवीच्या खांद्यावर येणार...जान्हवी रडत खडत, श्रीच्या नावाने अश्रू ढाळत आईआजींना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणार (म्हणजे काय देव जाणे :))..
घरी यायचे असेल तर आईआजी श्री ला स्वताला सिद्ध करून दाखवण्याची अट घालणार (म्हणजे पण काय ते दे.जा. :))
तिकडे श्री आणि पिंट्या मिळून दुकान टाकणार पण ते दोघेही अतिशय कर्तबगार असल्याने ते गाळात जाणार किंवा काहीतरी घोळ होणार आणि त्यावर जप्ती येणार...
ते त्या दोघांना कळायच्या आत जान्हवीला कळणार आणि ती गुपचुप मदत करून श्रीच्या चांगुलपणाची परतफेड करणार...
ही मदत एवढी गुपचुप असेल की किमान १०-१२ भागापर्यंत कुणालाही कळणार नाही की नक्की कुणी मदत केलीये ती.

बाकीचे मला मारायच्या आतच ही पोस्ट टाकुन पळते. मला योक प्रश्न पडलाय की मलाच भास होतायत्?:अओ:

त्या श्रीचा चेहेरा मुन्गुसासारखा दिसतो ना! म्हणजे मुन्गुसतोन्ड्या. बीनकामाची दाढी वाढवुन हिन्डतो, कुणी बीनपाण्याने करा त्याची. म्हणजे छान दिसेल तो.:फिदी:

मलाही हेच कळत नाही....हा खोटं बोलला, आजीने बाहेर काढायच्या आधिच स्वतःच घर, ऑफिस सोडतोय....घरात रहण्याच्या योग्यतेचा झाल्यावर परत येणार म्हणे.....म्हणजे नक्की काय करणार?

मुन्गुसतोन्ड्या. बीनकामाची दाढी >> रश्मी मुग्नुसतोंड्या Lol Rofl
आणि कुणाची दाढी कामाची असते म्हणून श्रीची असणार? Proud

मुगनुसतोन्ड्या>>>:हाहा:

अग कबीर बेदी किती छान शोभतो दाढीत. या सुकडला दाढी अजीबात शोभत नाही.:फिदी:

एक भाबडा प्रश्नः

पिंट्याने मामाला हारासंबंधी फोन केल्यावर आपण तो हार चोरला होता अशी लगेच कबुली तो बेरकी मामा कशी काय देतो? त्याने तर सपशेल कानावर हात ठेवायला हवे होते.

गुरुवार दि. २६ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ दिग्दर्शक आणि लेखिका या द्वयीने चांगली सुरुवात झालेल्या मालिकेची वाट कशी लागेल हेच पाहिले पाहिजे असा अट्टाहास का धरला आहे ? हा प्रश्न प्रेक्षकांसमोर पडला आहे. श्री घर सोडून जाणार या निर्णयावर कालच शिक्कामोर्तब झाले होते तर आज सहाही बायकांनी धो धो रडणे हे एक प्रकारचे व्रत सांभाळल्यासारखे वर्तन केले. आईआजी म्हणणारी ती कर्तबगार बाई आपल्या खोलीत डोळे मिटून पडली आहे. नातू पाया पडायला आलेला आहे...आजी डोळे उघडत नाही. श्री वाकून नमस्कार करतो...पाठ दाखवितो, तर त्याच्या पाठीकडे पाहात आजी डोळे उघडतात आणि कमी झाले म्हणून मग त्याही डोळ्यात पाणी आणतात.

आज जान्हवीचा नवर्‍याबरोबर भविष्याविषयी मोठा संवाद. ती त्याच्याशिवाय घरात राहायला तयार नाही. पण श्रीरंगरावांचे दुसरेच म्हणणे...म्हणजे उलट तिने इथेच राहून घरातील सहा बायकांची सेवा करावी व त्याना जिंकून घ्यावे....काय हा आणि कसला हा सल्ला ? नव्याने लग्न झालेली एक मुलगी आपल्या पतीला घराबाहेर काढलेली पाहत आहे आणि त्याच्यासमवेत तीही बॅग घेऊन बाहेर पडली आहे दाखविण्याऐवजी उलट तिनेच तब्बल सहा सासवांची सेवा करायची असा सत्ययुगातील पती तिला सल्ला देत आहे आणि ती ऐकतेही.

निरोप घेऊन श्री जातो....परत दरवाज्यात रडारडी. रात्री जान्हवीला झोप येत नाही. ती श्री ला फोन करते. "तुझी आठवण येत आहे..." असेही सांगते पण श्री तिला समजावून सांगतो....आपली परीक्षा चालू आहे असेच समज...असा काहीसा सल्ला देतो.

नवीन दिवस सुरू झाला आहे आणि घरातील देवाचा आशीर्वाद आपल्या कामासाठी मागण्यासाठी जान्हवी देवघरात आली आहे....आणि तिच्या शेजारी दुसरीकडून आईआजी येतात....दोघीच आहेत. त्यांचा बहुतेक संवाद होईल असे वाटते.

जान्हवी तर संधी मिळेल तेव्हा खोटं बोललीच कि.....accountantला वाचवा बोलली खोटं, श्रीला वाचवा बोलली खोटं, मावशीला वाचवा बोलली खोटं, छोटी आईला वाचवा बोलली खोटं............खोटारडी नं. १

मामा वाचले अपडेट्स. खरंच ही मालिका आणि एकंदरीत अशा उगाचच पाणी घालून वाढवणाऱ्या मालिका बघायची सहनशक्तीच नाही राहिली माझ्यात त्यामुळे अपडेट्स आणि इथले कमेंट्स वाचणे कधीही मस्त, तेच एन्जॉय करते आणि काही वर्षांपूर्वी कशा छोट्या सुटसुटीत मालिका होत्या तशाच परत चालू कराव्यात असा आशावाद व्यक्त करते (आताच अनिल कपूरची 24 झाली, ती मस्त रंगली).

>>>श्री घर सोडून जाणार या निर्णयावर कालच शिक्कामोर्तब झाले होते तर आज सहाही बायकांनी धो धो रडणे हे एक प्रकारचे व्रत सांभाळल्यासारखे वर्तन केले. <<< Lol

Lol हायल्ला असंय होय? हे माहीतच नव्हते. शरयू म्हणजे विसराळू ना? मग ह्या सगळ्यांचे नवरे आहेत कुठे? ते ह्या मालिकेत एक टक्काही भागधारक का नसावेत? Uhoh

कै च्या कै कथा दिसतीय ही!

मला वाटते रोहिणी हट्टंगडीच्या करीअरला उजाळा आणण्याचा एक क्षीण प्रयत्न असावा ही मालिका!

नर्मदा (श्रीची जन्मदात्री)बाईंचा नवरा लग्नानंतर काही महिन्यांतच अमेरिकेला गेला. तिथे त्याने दुसरा घरोबा केला असावा.
इंद्रायणी (मोठी आई)चा नवरा आणि मुलगा एकाच अपघातात वारले.
शरयूचा नवरा दारुडा, जुगारी होता, बायकोला मारायचा म्हणून भागिरथीबाईंनी त्याला घराबाहेर काढले. आता तो सुधारलाय इति शरयू.
बेबीआत्याचे लव्ह मॅरेज. पण लग्नानंतर तिचा भ्रमनिरास झाला म्हणे.
मावशीचे लग्न व्हायचेय.
भागिरथीबाईंचाही नवराही मुले लहान असतानाच देवाघरी गेला.
या सगळ्यामुळे गोखल्यांच्या घरात संसार टिकत नाहीत. (पुरुषही टिकत नाहीत). श्रीच्या निमित्ताने तरी तो पायंडा मोडेल अशी आशा त्यांना असते. पण त्याचेही तसेच झाल्याने ती हायपर रडारड.

Pages