Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफिकीर
बेफिकीर
बेफि..
बेफि..
(No subject)
सुमेधा आणि बेफि दोघांनी एकदम
सुमेधा आणि बेफि दोघांनी एकदम सही लिहिलेय.
मित्रमैत्रिणींनो, तो
मित्रमैत्रिणींनो,
तो लेट्टेस्ट विनोद माझा नसून मयेकरांनी आधीच केलेला आहे, ह्या सर्व हास्याच्या स्मायली मयेकरांना सुपूर्द करत आहे.
ओके, मयेकर यांनी मस्त
ओके, मयेकर यांनी मस्त लिहिलेय.( येस, भरतजीनी आधी लिहिले आहे, वाचले होते, लक्षात नाही राहिले).
ओके, मयेकर यांनी मस्त
ओके, मयेकर यांनी मस्त लिहिलेय.( येस, भरतजीनी आधी लिहिले आहे, वाचले होते, लक्षात नाही राहिले).<<<
हरकत नाही. जिथे मालिकेच्या पुढील भागात जे दाखवायचे ठरवले आहे ते प्रत्यक्ष भागात दाखवायला मालिकेचे निर्माते विसरतात तिथे मयेकर काय बोलले हे कसले लक्षात ठेवायचे?
नाही तसे नाही, हल्ली बरेच
नाही तसे नाही, हल्ली बरेच लक्षात रहात नाही (चाळीशी झाली आता त्यामुळे हळूहळू विस्मरण होते बहुतेक). sorry अवांतर लिहिल्याबद्दल.
होणार जावई घरघरचा - अशी एक
होणार जावई घरघरचा - अशी एक मालिका येत आहे म्हणे!
आजीबाईंनी शरयूला नियम का
आजीबाईंनी शरयूला नियम का लावला होता ? तर तिचा नवरा दारुड्या आणि जुगारी झाला होता, घरी सर्वांशी भांडत होता....थोडक्यात वाया गेलेला होता. म्हणून त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला; पण शरयूला त्याच्याविषयी आशा वाटते, पण सासूने भेटायची बंदी घातली आहे म्हणून ती चोरून का होईना त्याला मध्यरात्री भेटते.
तिचा नवरा दुर्गुणामुळे बाहेर गेला आहे....त्याच्याबाबतीत लावलेल्या नियमांना काहीतरी अर्थ आहे असे मानले तरी श्री ला देखील तेच नियम कसे लागू शकतात ? श्री काही व्यसनी झालेला नाही....उद्या ऑफिसला जाताना जान्हवीला त्याने वाटेत थांबविले तर ह्या सीतेने आपल्या रामाबरोबर बोलायचे नाही ?
आजी सुपरपॉवर झाल्या आहेत म्हणून कसल्याही नियमाची अंमलबजावणी करायला लावणे म्हणजे हद्दच झाली.
अपडेट्स मस्त ! पण मालिका
अपडेट्स मस्त ! पण मालिका मात्र कुठेतरी भेलकांडत चाललेय, लवकर सावरली नाही तर काय खरं नाही.
शनिवार दि २८ डिसेंबर २०१३ :
शनिवार दि २८ डिसेंबर २०१३ : अपडेट
~ मालिका सुरू झाल्यापासूनचा आईआजीचा गोखले उद्योग भवनातील पहिला दिवस. तिथे यायचे तर आपला करारी बाणा त्यानी दाखविणे गरजेचे होते, तो त्यानी दाखविला. सर्व स्टाफला केबिनमध्ये बोलावून शिस्तीची कल्पना दिली. अकांऊंटन्टना फाईल्स घेऊन बोलाविले. शिवदेमॅडमतर्फे सार्या स्टाफची येण्याची जाण्याची वेळ माहीत करून घेतली. अजूनही बराच स्टाफ का आलेला नाही ? या प्रश्नाला त्याना उत्तर मिळाले की, जो कर्मचारी लांब राहतात त्याना काहीसे उशीरा ड्युटीवर येण्यास श्री यानी परवानगी दिली आहे. ही बाब एक शिस्त म्हणून आजींना मान्य नाही. इतकेच नव्हे त्याना समजते की ह्या उशीरा येणार्या मंडळीना अन्याप्रमाणे जादा कामाचा ओव्हरटाईमही दिला जातो. हा संतापजनक प्रकार त्यानी ताबडतोब बंद करायला सांगितला. अजून श्री कामावर का आले नाहीत याची वर्दी कुणालाच नाही. त्यामुळे "मुख्य प्रवर्तकच जर वेळेच्यावेळी कामावर हजर नसेल तर अन्य स्टाफ त्याचा गैरफायदा घेत असेल तर त्यात नवल काय ?" हा विचार आजीच्या मनात येतो. अकांउंटन्ट हिशोबाच्या फाईल्स घेऊन येतात. ती एकच फाईल पाहून आजी विस्मयचकित होतात. बाकीच्या फाईल्सच्याबाबतीत 'सॉफ्ट कॉपी...हार्ड कॉपी' असल्या संगणकीय संज्ञा मला सांगू नका, मी काहीशी जुन्या जमान्यातील स्त्री आहे, असे आजी त्याना सांगतात. तेव्हा अकांऊंटन्ट 'व्यवहाराच्या सार्या फाईल्स श्री सरांच्या लॅपटॉपमध्ये असल्याने त्याची स्वतंत्र अशी फाईल नाही" असा खुलासा करतात. त्यामुळे श्री ऑफिसला केव्हा येतो याचीच वाट पाहात आजी ऑफिसमध्ये बसतात.
घरी आता तीन सुना व बेबीआत्या चूप बसल्या आहेत. त्यातूनही शरयू बेबीआत्याला श्री ला फोन करण्याची सूचना करत राहते...पण बेबीआत्या आईला ते आवडणार नाही म्हणून सोडून देते.....नर्मदाबाईंचे डोळे वाहात आहेतच. त्या तिथून उठून निघून जातात. शरयू आणि सरू आपल्या खोलीत येऊन श्री ला फोन लावण्याचा प्रयत्न करतात पण तो हॉटेलमध्ये झोपूनच आहे. शेवटी त्या जान्हवीला फोन करून तिला श्री ला फोन लावण्याची विनंती करतात. बॅन्केतून जान्हवी आता थेट हॉटेल मॅनेजरला फोन लावते व तेथील कामगाराला श्री च्या रूममध्ये पाठवून त्याला उठविले जाते. तो फोनवर जान्हवीशी जादा काही बोलणार तोच जान्हवी त्याला ऑफिसची आठवण करून तर देतेच शिवाय 'लवकर जा....आजी आजपासून ऑफिसला जायला लागल्या, त्या पोचल्याही असतील..." असे सांगतात हा तीन ताड उडतो आणि ऑफिसकडे पळतो.
"मे आय कम इन...?" असे विचारत श्री आजींच्या केबिनमध्ये प्रवेश करतो....तेव्हा त्याच्या अवताराकडे आजी पाहातच राहतात.
मामा आले बघा वाचायला, रात्री
मामा आले बघा वाचायला, रात्री तुमचे अपडेट्स वाचायची सवयच झाली आहे. धन्यवाद. सर्वांची झोप उडवून श्री मात्र छान झोप काढतोय, धन्य आहे त्याची.
पण अन्जू.....झोप तर त्याने
पण अन्जू.....झोप तर त्याने छान काढली आहेच; पण जान्हवी जेव्हा त्याला सांगते की आईआजी ऑफिसला गेल्या आहेत त्यावेळी जणू काही अंथरुणातूनच थेट ऑफिसला गेला आहे असा त्याचा अवतार झाला आहे. तो उद्या तू बघशीलच.
कालच्या भागातले आईआज्जींचे
कालच्या भागातले आईआज्जींचे वेळ इ. बाबतचे काही मुद्दे पटले.
उदा. ऑफिसपासुन लांब राहात असल्याने जर एम्प्लॉयीला उशीरा येण्याची पगारी सवलत मिळत असेल तर स्वतःचेच (उशीरा येण्यामुळे) राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ काम केल्यास त्या एम्प्लॉयीने ओव्हर टाईम मागणे नैतिक नाही. किंवा एम्प्लॉयर स्वतः रोज उशीरा येत असेल तर इतरांना डिसिप्लीन शिकवु शकणार नाही.
बाकी भाग नेहमीप्रमाणे बंडल.
सर्वांच्या झोप उडवून श्री
सर्वांच्या झोप उडवून श्री मात्र छान झोप काढतोय, धन्य आहे त्याची.>>>पण त्याने जानुला फोनवर सांगितले ना कि तो पहाटे ४-४.३० ला झोपला.रात्रभर जागा होता.
बेफी आणि सुमेधा मी हळू हळू
बेफी आणि सुमेधा

मी हळू हळू ही रडकी सिरियल पहायचं सोडून देणार आहे.
पेपरचा कमी वापर म्हणुन हार्ड
पेपरचा कमी वापर म्हणुन हार्ड कॉपी नाहीत असं क्लार्क सांगतो, सगळ्या फाईल्स ची सॉफ्ट कॉपी श्रीकडे आहे,
येवढ्या मोठ्या उद्योगाच्या महत्त्वाच्या फाईल्सची १ च सॉफ्ट कॉपी असणे पटत नाही.. .
चुकुन त्याही डिलीट झाल्या तर निपांसारखे माबो वर रिकव्हरी कशी करायची याचा बीबी काढावा लागेल..

निपा
मला वाट्ते सर्व सुखात नांदत
मला वाट्ते सर्व सुखात नांदत असलेल्या स्त्रियांची एक भरभरून रडण्याची गरज असते ती इथे पुरी होत असावी. राहायची जेवायची भ्रांत नाही. मनासारखे सर्व मिळून शिवाय मानसिक लाडही होत आहेत. कसलीच बिले भरावी लागत नाहीत. नवर्या ला भेटायला जायचे व गजरा लपवून यायचे हेच काय टेन्शन. घरी गाड्या धूळ खात पडल्या आहेत. फोन केला की सर्व हजर.
बिले भरायची, घर चालवायचे, नोकरी मेंटेन करायची, अब्यूज, मुलांचे प्रश्न असे काहीच नसलेल्या स्त्रियांचा एक वर्ग असतो त्याला फक्त आपल्याला काहीतरी दु:ख आहे असे वाट्त असते. त्या भरभरून रडू शकतील अशी कथा आहे.
एकच सॉफ्ट कोपी म्हणजे हा नक्की प्रोप्रायटरी उद्योग आहे. मोठी काही कंपनी नाही.
मला वाट्ते सर्व सुखात नांदत
मला वाट्ते सर्व सुखात नांदत असलेल्या स्त्रियांची एक भरभरून रडण्याची गरज असते ती इथे पुरी होत असावी. >>> परफेक्ट अॅनालिसिस
होणार सून मी ह्या घरची ही
होणार सून मी ह्या घरची ही मालिका पाहून विविध महान व्यक्तिमत्वांनी खालीलप्रमाणे मतप्रदर्शन केले.
====================
अमिताभ बच्चन - ऐं?? भैय्या जिस घरमे छे छे महिलाएं हो वहां ये श्री रहही क्यू रहा था हमारे समझमे नही आता? हमारे घरमे तिसरी औरत पैदा होगयी तबसे मै तो ज्यादातर समय लोगोंको करोडपती बनानेने के चक्करमे गुजाररहा हूं! कुछ नही तो कमसे कम किसी मोटी के घरके खिडकीकी कांच तोडकर एक अॅडव्हर्टाईजही कर लेता हूं! सोनेके वास्ते घरके दहलीजपे कदम रखता हूं बस्स!
अटलबिहारी वाजपेयी - यह जो सिरियल प्रक्षेपित की जा रही है...... पॉज..... उरलेले २०१५ साली बोलणार आहेत.
सचिन तेंडुलकर - माझे आवडते कथा व पटकथाकार अशोकमामा कोल्हापूरकर ह्यांच्या कल्पनाविस्तारावर बेतलेली असल्याने ही मालिका मला बेहद्द आवडते आणि अंजलीलाही आवडते. अंजलीही मला आवडते. थँक यू अंजली. तू नसतीस तर मी हे विश्वविक्रम करूच शकलो नसतो. आपले लग्न झाले त्यावेळी तूच म्हणालीस की मुलांची जबाबदारी मी घेईन आणि तू फक्त खेळत राहा. त्यामुळे आज ही मालिका मी बघू शकत आहे. मी माझ्या इन लॉजचे आभार मानतो की त्यांनी अंजलीचा हात माझ्या हाती दिला. आणि मला सर्वांनी सच्चीन सच्चीन असा जयघोष केलेला फार आवडतो.
सचिन पिळगावकर - ही मालिका........ ख्ख्खूप ... म्हणजे अशी.... छ्छान आहे... ख्खूप्पच!
नवज्योत सिद्धू - हा हा हा हा हा हा !! बनगयी मालिका!!! हा हा हा हा हा हा!!
उद्धव ठाकरे - होणार सून मी या घरची ह्या विधानात आशावाद आहे की ती त्या घरच्यांना दिलेली एक धमकी आहे हे ही मालिका पाहून मला समजलेले नाही,. आशावाद असला तर परभणीला रास्ता रोको करण्यात येईल आणि धमकी असली तर सिंधूदुर्गमध्ये तीव्र आंदोलन होईल.
राज ठाकरे - आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. दाखवाच सून होऊन त्या घरची!
मनमोहन सिंग - ये जो... किसीके घरकी बहू होनेका जो सपना देखनेकी बात है... ये कई सारे बातोंपर निर्भर है और इसके बारेमे अभी कुछ नही कहा जा सकता! लेकिन हम इतना कह सकते है के इंदिराजीके घरकी बहू होनेसे किसी और घरकी बहू होना आसान है!
राणे - सिंधूदुर्ग म्हणजे शिवसेनेला रुमालपाणी खेळायला दिलेले अंगण नाही. दादरला मिळणारी हवा बंद करून टाकू आम्ही!
सिब्बल - जहांजहांभी मोदीराज नही है वहांवहां आप देखोगे के ऐसी एकसे एक बेहतरीन सिरियल्स दिखायी जाती है!
आबा पाटील - या मालिकेचे दिग्दर्शक व लेखक ह्यांना अटक करायचे आदेश पोलिस खात्याला देण्यात आलेले आहेत, नागरिकांनी कृपया सहकार्य करावे.
शक्ती कपूर - आऊं!
केजरीवाल - ये तो जनताकी सिरियल है! जनता जहाँभी चाहेगी बहू बनेगी, जमाई बनेगी या ससुर बनेगी! नेताओंको इससे मतलबही क्या है? एक ऑनलाईन पॉल लेलो? किसीने उस घरकी बहू बनना चाहिये या नही चाहिये, लोगोंसे पूछलो! भाई लोकशासन है, जो लोग कहेंगे वही होना है यहाँ तो!
दिलीप कुमार - ये.... ये किस किस्मके बेहुदा सपने देख रही है ये लडकी? मै समझसकता हूं अगर किसीको पूलिस अफसर बनना है, डॉक्टर बनना है! बहू? देखो बेटी सपने जितने छोटे देखोगी ना, उतनीही उंचाई हासिल कर पाओगी जिंदगीमे! हमेशा सपने ऊंचे देखो बेटी!
नरेंद्र मोदी - आजतक उस घरमे जितनीभी बहुएं बनी है, सारी की सारी अपने पतीसे अलग रहरही है! हम पूछते है ऐसा क्यों? क्या पीछले साठ सालोंमे आप एक महिलाको अपने पतीके साथ रहने देनेकी काबिलीयत और हिम्मत नही जुटा पायें? तो आप लोगोंने किया क्या? जो देखो वो औरत रो रही है! किसीका पती गुजरचुका है तो किसीका नही गुजरा इसलिये रोरही है! किसीका पती जुवाँ खेलता है तो किसीका नही खेलता इसलिये रो रही है! हम पूछते है के इस सबके बावजूद किसीको उस घरकी बहूं बनना है, क्या इससे ये सच्चाई सामने नही आती के हमारे प्रशासनमे कमीयोंकी इतनी बढौतरी हो गयी है के अच्छीखासी लडकीयाभी आजकल ऐसे परेशान खानदानोंकी बहू कहलानेमे फक्र महसूस कररही है? अरे कबतक आतंकवादियोंको जिंदा रख्खोगे तुम? जबतक हिंदूस्तानका एक एक आदमी बमकी लपेटमे नही आजाता तबतक?
शरद पवार - मालिकेच्या प्रक्षेपणाची वेळ चुकीची आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी त्यावेळी आपल्या पिकावर नजर ठेवून बसतो आणि त्यामुळे चोर्या कमी होतात. पण मालिकेमुळे शेतकरी टीव्हीला चिकटून बसू लागले आहेत व त्यामुळे पिकांचे जे नुकसान होत आहे ते भरून देण्याइतका राज्याचा खजिना सामर्थ्यवान नाही. ही मालिका मध्यरात्री दोन ते दोन दहा ह्या वेळात दाखवावी अशी याचिका आम्ही मिझोराम कोर्टात दाखल केलेली आहे.
सोनिया गांधी - मै इस देशकी बहू हूं! आप सब मेरे अपने है! मनमोहन जो कहते है वो उनकी खुदकी सोच है!
राहुल गांधी - मेरे दादीको पी एम बनाया, मेरे डॅडी को पी एम बनाया, कल मुझेभी बना देंगे! लेकिन मै ये हरगीज नही होने दूंगा!
(No subject)
नेमा,अच्छा ओ.के., श्री पहाटे
नेमा,अच्छा ओ.के., श्री पहाटे झोपला होता कां? मी बघत नाही इथे अपडेटस आणि कमेंटस वाचायला येते.
@बेफिकीर .. सॉलीड लिहीलयतं
@बेफिकीर ..
सॉलीड लिहीलयतं तुम्ही...
(No subject)
बेफि, सही.
बेफि, सही.
बेफिकीर.... आमच्या लाडक्या
बेफिकीर....
आमच्या लाडक्या सचिन तेंडुलकरने मुलाखतीदरम्यान माझे नाव घेतल्याने मी भरून पावलो आहे. किंबहुना आता किमान सचिनसाठी का होईना, पण मालिका बघत राहणे अत्यावश्यक बनले आहे.
कपिल ; ष्री भाइसाब को क्या
कपिल ; ष्री भाइसाब को क्या मिला? बाबाजीका ठुल्लू.
बेफिकीर
बेफिकीर
बाबाजीका ठुल्लू> हिट है बेफी
बाबाजीका ठुल्लू> हिट है
बेफी मस्तच
Pages