होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी भिंतीकडे तोंड करून नुसतीच ऐकली मालिका. रडे संपले कि बघू म्हणून तो क्षण काही आला नाही. जानवीने पराकाष्ठेच्या गोड स्वरात कसा आहेस? असे बाळास विचारले. किती तो हळवा क्षण. तो आपण टूरला आल्यावर हॉटेलातून घरी फोन करून सर्व ठीक आहे ना विचारतो तितपतच
बोलत होता. काहेतरी प्राब्लेम नक्की आहे.

श्री जायला निघतो तेंव्हा आईआजी जान्हवीला अडवतात असे दृष्य दाखवत होते मध्यंतरी. पण तसे काहीच घडलेले नाही. उगाच काही तरी वेगळाच टीझर दाखवून प्रत्यक्ष मालिकेत मात्र वेगळेच दाखवायचे असा फालतू प्रकार सुरू केला आहे या मालिकेने. आता तो पायंडाच पडेल.

मालिका आमच्या ठाण्यातून बाहेर पडली आणि अगदीच रटाळ झाली Wink

आमचे ठाणे सुंदर ठाणे! टिंग टाँग!

<श्री जायला निघतो तेंव्हा आईआजी जान्हवीला अडवतात असे दृष्य दाखवत होते मध्यंतरी.> हे मला पाहायला मिळाले नव्हते. पण इथेच वाचले होते. तसेच दाखवायला हवे होते, तरच जान्हवीच्या मागे राहण्याला अर्थ उरतो. एडिटरने घोळ घातला की काय?

मालिका आमच्या ठाण्यातून बाहेर पडली आणि अगदीच रटाळ झाली >> १००% अनुमोदन.
एकदा विघ्नेश्वर (उपवन) ला येउन चित्रिकरण करा.

BTW, उपवन महोत्सव आहे जानेवारी १० ते १२. उस्ताद झाकीर हुस्सेन आणी बरेच celebrity येणार आहेत. http://www.upvanartsfestival.com

श्री जायला निघतो तेंव्हा आईआजी जान्हवीला अडवतात असे दृष्य दाखवत होते मध्यंतरी. पण तसे काहीच घडलेले नाही. >> +१

मीपण पाहिले होते हे दाखवले तेव्हा..

श्री जायला निघतो तेंव्हा आईआजी जान्हवीला अडवतात असे दृष्य दाखवत होते मध्यंतरी. पण तसे काहीच घडलेले नाही. >> +++१ हो जाहिरात वेगळिच दाखवतात...त्या महाएपिसोड मध्ये पण आया/जान्हवि उभि आहे आणी श्री माफी मागतो असे दाखवले आहे......पन त्या दिवशी असे काहि दाखवलेच नाहि....तिचा ड्रेस पण वेगळा होता.........

मला वाटते शशांक केतकरला काहीतरी डेट्स चा प्रॉब्लेम असेल किंवा दुसरीकडे चांगला रोल मे बी! म्हणून हे पाणी! बाकी झी मराठी वर २० मिनिटे सलग पाहू शकू अशी एकही चांगली मालिका चालू नाहीये सध्या Sad सारेगम पुन्हा सुरु होणारे ते छान असू दे!

आता जान्हवीही शरयूसारखी रात्रीची चोरून बाहेर जाईल आणि गजरा माळून परत येईल.>> मयेकर Lol Rofl
पण तरिही आईआज्जीचे डोळे उघडणार नाहीतच. घरच्या तरण्याताठ्या बाया रात्री बेरात्री घराबाहेर पडू लागल्या तरी हिची हाकला हाकली सुरूच राहणर. Proud

FB वर होणार सुन.. च्या page वर आईआजि श्री च्या जागी office मधे बसलेल्या आहेत आणी बहुतेक दारु प्यालेला, विचीत्र अवतारातला श्री तिथे आलाय अशी image टाकली आहे.
आवरा......! मालिकेची घसरगुंडी झालिये,मं दे आणी म.कु.काहिपण दा़खवत सुटलेत.

FB वर होणार सुन.. च्या page वर आईआजि श्री च्या जागी office मधे बसलेल्या आहेत आणी बहुतेक दारु प्यालेला, विचीत्र अवतारातला श्री तिथे आलाय अशी image टाकली आहे.

>> आणी तिथे मुलींनी "आता आम्हाला श्रीची अवस्था बघवत नाहिये. आता आईआज्जी तुम्ही कठोरपणा सोडा" अश्या कमेंट्स वाचुन हसावे कि रडावे तेच कळत नाहिये.

>> आणी तिथे मुलींनी "आता आम्हाला श्रीची अवस्था बघवत नाहिये. आता आईआज्जी तुम्ही कठोरपणा सोडा" अश्या कमेंट्स वाचुन हसावे कि रडावे तेच कळत नाहिये.>>>>>> Lol

आत्ता जो भाग चालू आहे त्यातील रोहिणी हट्टंगडीनामक व्यक्तीला खोट्या कागदपत्रांसहित व्हिसा देऊन अमेरिकेला पाठवावेसे वाटत आहे.

अरे किती रडाल, किती रडवाल? अंत बघाल का?

काहीतरी वेगळे घडूदेत आता.

आवरा या आई आज्जींना
मयेकरांचे भाकित खरं होतय Happy
>>बहुतेक दारु प्यालेला, विचीत्र अवतारातला श्री तिथे आलाय>> आजच्या एपिसोडवरुन उशीर झाल्यामुळे श्री आंघोळ दाढी काहीच न करता झोपेतून तसाच धावत ऑफिसमध्ये आला असावा त्यामुळे त्याचा असा वेश असावा असा अंदाज.

आता हट्टंगडीबाईनी नविन टूम काढली आहे. जान्हवी ने श्रीला भेटायचं नाही. सेम लाईक शरयू.
म्हणजे रात्री घराबाहेर पडण्यावाचून नो पर्याय.
बाळबोध आहे कथा.

शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजच्या भागात त्यातल्या त्यात बर्‍या वाटतील अशा दोनच घटना घडल्या असे म्हणता येईल. एक म्हणजे आईआजीनी स्वतःचे दु:ख बाजूला ठेवले, सार्‍या सूना आणि मुलींचे घडलेल्या प्रसंगाबद्दल सडेतोड बौद्धिक घेतले आणि पुन्हा श्री ने घर सोडल्याबाबत कसलीही चर्चा करायची नाही असे सांगणे आणि "उद्यापासून मी सकाळी ८ वाजता ऑफिसला जाणार....उद्योग नवा होता त्यावेळी मी सांभाळला आहेच, आता तो मोठा झाला म्हणून मी त्याकडे पाठ न फिरविता श्री च्या अनुपस्थितीतदेखील चालविते...." असे म्हणत ऑफिसमध्ये त्या हजर होतात. तिथे शिवदे मॅडम, नंदन तसेच अन्य कार्यालयीन स्टाफ भागीरथीबाईंना प्रत्यक्ष पाहून सर्दच होतात. बाई सार्‍यांना "गुड मॉर्निंग" म्हणतात...पण एकाच्याही तोंडातून शब्द फुटत नाही, म्हणून पुनःश्च एकदा गुड मॉर्निंग केले जाते तेव्हा सारे भानावर येतात. आल्याआल्या शिस्तीचे महत्व सार्‍यांना सांगितले जाते. उद्यापासून पाच मिनिटेदेखील कुणी उशीरा येता कामा नये अशी सक्त ताकीदही दिली जाते. श्री अजून ड्युटीवर आलेला नाही, त्याला उद्या खुलासा विचारावा असे ठरले जाते.

दुसरी चांगली गोष्ट म्हणजे जान्हवीला बॅन्केत नोकरीसाठी जाताना घरातील कार घेऊन जाण्यास सांगण्यात आले. ती बसचाच आग्रह धरते पण त्या वेळी टेबलवर आईआजी चहा घेत असतात तर बेबीआत्या "म्हणजे अजून तू बसनेच बॅन्केला जातेस ?' असा प्रश्न करते त्यावेळी शरयू 'मी कारचे सांगायला विसरले..." असे खोटे सांगून वेळ मारुन नेते. "ठीक आहे, पण आजपासून तू कारनेच बॅन्केला जा..." असा जणू हुकूमच बेबीआत्याकडून मिळतो आणि जान्हवी जास्त काही न बोलता तो प्रस्ताव स्वीकारते. ड्रायव्हरला बोलाविले जाते आणि मग जान्हवी गोखले सासरच्या घराकडील कारमधून ऑफिसला जाते....ते दृष्य पाहून शरयू आणि नर्मदाआईला आनंद होतो.

त्याअगोदर सकाळी देवघरात ती देवाची प्रार्थना करीत उभी आहे तर बाजूला आईआजी येतात आणि तिथे शांतपणे डोळे मिटून उभी असलेल्या नातसुनेला पाहून त्याना बरे वाटते. तिला तिथेच सोडून त्या स्वयंपाकघरात येतात. शरयू आणि नर्मदाला त्या विचारतात, "देवघरात जान्हवीला पाहिले मी. ती श्री सोबत गेली नाही ?" शरयू उत्तर देते..."तीच म्हणाली मी हे घर सोडणार नाही....मी आयांच्यासोबत राहते...श्री ने तो प्रस्ताव स्वीकारला....". आजीला ते बरे वाटते पण "ती स्वत:हून तसे म्हणत असेल तर राहू दे तिला इथे. पण एका अटीवर आणि ती म्हणजे शरयूला जे नियम तेच नियम जान्हवीलादेखील लागू होतील....".

या भागात प्रथमच आईआजीच्या तोंडातून जान्हवीविषयी चांगले उद्गगार आले आहेत. म्हणजे त्या बेबीला आणि अन्य सुनांना म्हणतात, "या सगळ्या उलाढाळीत जान्हवी निरपराध आहे हे मात्र सिद्ध झाले. तिने काही लपविण्याच्या गोष्टी केल्या, पण त्या सार्‍या नवर्‍यासाठी असल्याने तिची भूमिका पटवून घेता येते..."

इकडे जान्हवी श्री ला हॉटेलवर फोन करीत आहे....पण श्रीरंगराव दमून गाढ झोपी गेले आहेत. फोन घेत नाहीत.

मामा वाचले. जान्हवी आता हळूहळू प्रत्येकीचा संसार सुरळीत करून देईल असे कथानक होईल असे वाटले होते तर उलट तिलाच ह्या सर्वांच्या जोडीला उभे केले, very bad.

घरात एवढे रामायण झाले, घर सोडावे लागले आणि ह्या श्रीरंगाला एवढी गाढ झोप कशी लागते Uhoh
ती जानू सारखी फोन करतेय आणि निवांत झोपलाय.

का आता ४ रडक्या आया, एक चिडकी आणि खडूस आई आणि एक आई आजी नाहीत म्हणून "श्रीबाळ" सुखात झोपलय Wink

त्याअगोदर सकाळी देवघरात ती देवाची प्रार्थना करीत उभी आहे तर बाजूला आईआजी येतात आणि तिथे शांतपणे डोळे मिटून उभी असलेल्या नातसुनेला पाहून त्याना बरे वाटते. तिला तिथेच सोडून त्या स्वयंपाकघरात येतात. शरयू आणि नर्मदाला त्या विचारतात, "देवघरात जान्हवीला पाहिले मी. ती श्री सोबत गेली नाही ?" शरयू उत्तर देते..."तीच म्हणाली मी हे घर सोडणार नाही....मी आयांच्यासोबत राहते...श्री ने तो प्रस्ताव स्वीकारला....". आजीला ते बरे वाटते पण "ती स्वत:हून तसे म्हणत असेल तर राहू दे तिला इथे. पण एका अटीवर आणि ती म्हणजे शरयूला जे नियम तेच नियम जान्हवीलादेखील लागू होतील....".>>>>>>>>>>> हे मालिकावाले जाहिरातीत एक आणि प्रत्यक्षात भलतच अस का दाखवतात? जाहिरातीत दाखवल होत की आईआजी जान्हवीला घर सोडण्यापासुन परावृत्त करतात आणि काल तिला घरात बघितल्यावर "ही इथे काय करतेय? मला वाटल ती श्री बरोबर गेली असेल असा प्रश्न विचारतात.

In short ........aaajjjeemulech gokhalyanchye sansar tikat nahit...

udyapasun shri balache kase honar? tyala anghol kon ghalnar? dat kon ghasun denar? kapade kon badalanar? pavadar kunku kon Karun denar ? ghas kon bharavanar?

म्हणजे कोणते नियम?<<<

मध्यरात्री कंपल्सरी बाहेर पडणे

येताना गजरा माळून येणे

वगैरे

Pages