Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओफ़्फ़ ओ ! भरत, यू आर राईट. मी
ओफ़्फ़ ओ ! भरत, यू आर राईट. मी ’रो’ मुळे रोहनच्या मागेच धावलो. तो प्रतिसाद काढून टाकतो.
सॉरी अदिती....!
हा श्रीने केलेला डाव आहे
हा श्रीने केलेला डाव आहे जानव्हीला 'घरच्यानी' आपलेसे करावे म्हणून, असे एका ट्रेलर मधे दाखवले.
हे एकता कपूर स्टाईल वाटते का?
मामा, आता बघतेय मी रिपीट
मामा, आता बघतेय मी रिपीट टेलिकास्ट. पिंट्या जे आत्ता सांगायला आला ते आधीच सांगितले असते तर सोनाराकडे न जाता, असे वाटले. आजी मस्त म्हणाल्या की तुझ्या मामाने हार चोरला, श्रीला खोटे बोलायला सांगितले नव्हते आणि नंदनचे नाव घेऊन खोटे बोलला, हे मला पटले, मलापण श्री दुसऱ्याचे नाव घेऊन खोटे बोलायचा ते अजिबात आवडले नव्हते.
आज पिंट्याने चांगला अभिनय केला, नेहेमीच करतो.
ती आत्या एवढी हुशार, शिकलेली दाखवली आहे तर बिझनेसमध्ये मदत का नाही करत, घरी बसून इतरांना बोलत असते.
अन्जु पॉईन्ट आहे..
अन्जु पॉईन्ट आहे..
अस वाटत होत कि, श्री ला उगाच
अस वाटत होत कि, श्री ला उगाच आजीकडून हे वदवून घ्यायचं होत, कि तिन त्याला माफ केल. म्हणून त्याने एकदम टोकच गाठलं बोलताना.
आत्या हुशार कशी काय वाटली
आत्या हुशार कशी काय वाटली बुवा? फ्रस्ट्रेटेड आहे ती. साध्या साध्या सिचुएशन कळत नाहीत. उदा. पिंट्या घरी येतो तेव्हा, श्री-जान्हवी उशीरा येतात तेव्हा.
सस्मित
आत्या हुशार वाटली त्यापेक्षा
आत्या हुशार वाटली त्यापेक्षा ती स्वतःला हुशार समजते असे म्हणायचे होते मला, म्हणून जरा बिझनेसमध्ये लुडबुड करून घरात कमी ज्ञान पाजळावे.
अंजू, सस्मित.... कसली आगाऊ
अंजू, सस्मित....:हाहा:
कसली आगाऊ आहे ती....वर नाव 'बेबी'..बाकी महिलामंडळ स्वैपाक, केरवारे असलं ' काहीतरी' करताना दिसतात तरी..ही तर ठमी नुसतीच तोंडाचा पट्टा चालवत असते.
बेबी घरातली कामे करत
बेबी घरातली कामे करत नाही...ती हिशोब ठेवणे, बिले भरणे, निरोप घेणे-देणे , रुल-बुक फॉलो करणे, बाकिच्यांकडून करून घेणे अशी कामे करते. तसं ठरलंय त्यांचं.
ते मधे मधे एक माणूस
ते मधे मधे एक माणूस बॅकग्राऊंड्ला "आआआआ" गातो/रडतो ते कित्ती बोर वाटतं.
बुधवार दि. १ जानेवारी २०१४ :
बुधवार दि. १ जानेवारी २०१४ : अपडेट
~ जेव्हा जेव्हा शरयू आणि जान्हवी समोरासमोर येतात त्यावेळी नक्की समजावे की मैत्रीच्या दृष्टीने यांचे काहीतरी छानछान बोलणे सुरू होणार. बाकीच्या कुणी आजुबाजूल्या नसल्या की मग जान्हवीही मनमोकळेपणे वावरते. आज स्वयंपाकघरात नाष्ट्यासाठी कसलीही हालचाल नसल्याचे जान्हवीच्या लक्षात येते. ती शरयूला विचारते पण ती सांगते, "श्री च्या कारणामुळे कुणालाच कसलीही भूक लागलेली नाहीच. तो तरी काय खात असेल देव जाणे !" या नैराश्यपूर्ण उदगारावर जान्हवी शरयूला समजावून सांगते की 'असे समजा, जर नोकरीनिमित्ताने त्याने बाहेरगावी राहणे पसंद केले असते, तर तुम्ही इथे जेवला असता की नाही ? नक्कीच. तेव्हा तुम्ही असले विचार मनी आणून त्याच्या इथे येण्याच्या प्रक्रियेला उलट उशीरच लावत आहात. सारे काही तुमच्या मनासारखेच होणार आहे...." यावर शरयूचा चेहराही खुलतो व ती नाष्ट्याची तयारी करू या असे म्हणते. आईआजी कदाचित नाष्टा घेणार नाहीत असे म्हणताच जान्हवी ती जबाबदारी स्वत:वर घेते...."मी तयार करते उपमा आजीसाठी आणि आग्रह करून तुम्हा सर्वांना खायाला लावते....".
थोडक्यात जान्हवी हळुहळू घरातील कार्यपद्धतीवर आपला ठसा उमटविण्यासाठी श्री च्या बाहेर राहाण्याचा फायदा घेणार असे दिसते. आता जान्हवीने नाष्टा केला आहे. आईआजीच्या रुममध्ये बेबीआत्या आली आहे. ती व आजी व्यवसायासंदर्भात तसेच श्री बाबतीतही बोलत आहेत....पण आजी आपल्या मताशी ठाम आहेत. "मला उशीर होत आहे. मी जाते....मला नाष्टा नको, मी ऑफिसमध्येच खाते..." असे बेबीला सांगत असतानाच जान्हवी ट्रे मधून नाष्ट्याच्या डिशेस घेऊन येते व "आजी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आले आहे मी..." असे म्हणत दोघींनाही प्लेट्स देते व तिथेच थांबते. दोघी एकमेकीकडे पाहात नाष्टा सुरू करतात आणि एकदोन घासानंतर "वा...छान झाला आहे..." असे प्रशस्तीपत्रही देतात आजी. हा पहिलाच भाग असेल की जिथे बेबीआत्याही जान्हवीच्या पाककौशल्यावर खुष झाल्याचे दिसतात. त्याही आपुलकीने "ऑफिसला चालली आहेस ना ? तर गाडी घेऊन जा..." असे म्हणताच आजीही त्याला दुजोरा देतात....मग काय... जान्हवीबाई अगदी हवेतून तरंगतच खाली शरयूकडे येते. शरयू उत्सुकतेने सारा अहवाल विचारते. जान्हवी हसून सारा प्रकार सांगते. आता शरयूने खास श्री साठी शिरा केला आहे....तो डब्यातून ती जान्हवीकडे देते.
हा शिरा देणे आणि त्यामागील आपली भूमिका शरयूने जान्हवीला सांगणे हा भाग भावप्रधान झाला आहे. शरयूच्या डोळ्यात आलेले पाणी अगदी अस्सल वाटते.
सहस्त्रबुद्धे यांच्या घरात सदाशिवरावांना पिंट्याकडून समजते की त्याने तो चंद्रहार आता जान्हवीकडे दिला आहे. मात्र श्री ला घराबाहेर पडावे लागले. हा धक्काच असतो सदाशिवरावासाठी. ते जान्हवीला तातडीने फोन लावतात, माहितीसाठी. पण जान्हवी त्याना शांत करते आणि "तुम्ही म्हणता ते खरे आहे की चंद्रहारामुळे श्री ला बाहेर जावे लागले आहे; पण तितकेच कारण नसून अजूनही बरेच काही आहे, त्याबद्दल फोनवरून न बोलता मी प्रत्यक्ष येऊन सांगते. तुम्ही काळजी करू नका....औषधपाणी आणि पथ्य सांभाळा...." यावर वडील गप्प राहतात.
गोखले गृहउद्योगच्या ऑफिसमध्ये आईआजी कॉम्प्युटरसमोर आहेत तर बाजूला उभे राहून श्री त्याना मशिनवरील फाईल्स कशा पाहायच्या ते शिकवित आहे. शिकवितांना अचानक त्याच्या तोंडून "अगं आईआजी तुला जी फाईल पाहिजे त्यावर क्लिक कर...." असे सांगतानाच आपण 'मॅडम' न म्हणता आईआजी असे म्हटल्याचे त्याच्या लक्षात येते आणि तो ओशाळतो...हाच भाग पुढे चालू राहिल.
मामा मस्त लिहिलेत.
मामा मस्त लिहिलेत.
हा शिरा देणे आणि त्यामागील
हा शिरा देणे आणि त्यामागील आपली भूमिका शरयूने जान्हवीला सांगणे हा भाग भावप्रधान झाला आहे. शरयूच्या डोळ्यात आलेले पाणी अगदी अस्सल वाटते.>>> अनुमोदन मामा.
कालच्या भागात भागिरथीबाईपण हळव्या झाल्या होत्या श्री कुठे रहातो? काय खातो? याची चौकशी करताना आणि हॉटेलमध्ये न रहाता त्याने फ्लॅट मध्ये रहाव, गृहउद्योगातल्या एक स्वयंपाकीणबाई त्याच्यासाठी स्वयंपाक करतील अश्या सुचना देताना त्यांच्यामधली जागी झालेली आजी त्यांच्या अभिनयातुन जाणवली...
त्या दोघींचा इंग्रजी
त्या दोघींचा इंग्रजी शिकण्याचा फालतूपणा आवरलेला दिसतोय....
त्या दोघींचा इंग्रजी
त्या दोघींचा इंग्रजी शिकण्याचा फालतूपणा आवरलेला दिसतोय....>>>घरात एव्ह्ढं काही घडत असताना कुठे इंग्रजी शिकणार...आता आजी पण बिझी झाली अन जानू विरहात आहे. ते एक बरच आहे नाहीतर भाषेवरुन केलेले फालतू जोक ऐकावे लागले असते...(फनींग, फोन वाजींग, उचलींग....)
ते एक बरच आहे नाहीतर भाषेवरुन
ते एक बरच आहे नाहीतर भाषेवरुन केलेले फालतू जोक ऐकावे लागले असते
>> अगदी अगदी सोनाली.. खुप अनुमोदन.
आत्ता चालू असलेल्या भागात
आत्ता चालू असलेल्या भागात प्रत्येकाने एकेक शब्दावर असह्य पॉज घेण्याची एक असह्य सवय असह्य पातळीला पोचवलेली आहे. जान्हवीचा लाडीकपणा चाळीतील भिंत गळावी तसा तिच्या ओठांमधून गळतोय. श्री आणि जान्हवीची बस स्टॉपवर झालेली भेट हा मागासलेल्या कल्पनाशक्तीचा सर्वोत्तम आविष्कार होता. रोहिणी हट्टंगडीला फाईल्स आणि सॉफ्ट कॉपीज ह्यापैकी काहीही कळत नाही आहे असे तीच म्हणत आहे. मग त्या ऑफीसच्या खुर्चीवर बसून ती करतीय काय हेच कळत नाही. आणि तिला काहीही कळत नसूनही स्टाफ तिच्यासमोर अश्या अजीजीने वागत आहे जणू दिल्लीच्या तख्तासमोर एखाद्या बुणग्याने वागावे. छोट्या आईने दिलेला शिर्याचा डबा जान्हवीच्या हातातून दोन फुटांवरील श्रीच्या हातात जायला लागलेल्या दिड मिनिटाच्या कालावधीमुळे बेस्टची एक बस लेट झाली व प्रवासी कुरकुरले नाहीत हे आजच्या भागाचे यश मानावे लागेल.
आत्ताच श्रीने लॅपटॉपवरील अनेक फोल्डर्स रोहिणी हट्टंगडीला दाखवले व तिने ते निसर्गचित्रे बघतात तसे बघितले व म्हणाली की हे मला झेपणार नाही. तसेच, मुळातच ऑफीसला उशीरा आलेल्या श्रीला एक नवीन युक्तीही समजली. ती म्हणजे आईआजीच्या समोर लॅपटॉप उघडून फोल्डर, कर्सर असे शब्द उच्चारले की ती म्हणते 'आज एवढेच पुरे'! नंदनला श्रीने चहा बाहेरच्या डेस्कवर ठेवायला सांगणे हे महानाट्य नुकतेच घडले.
मालिका अजुन व्हायचीच आहे. असो!
-'बेफिकीर'!
बेफीजी, लाइव्ह अपडेट्स
बेफीजी,

लाइव्ह अपडेट्स !!!
फारच आवडलेली दिसते मालिका
बाय द वे ..... तो आपट्या नजरेस पडला होता .....
हे दृश्य या भागातलेच की पुढच्या भागाच्या झलकेतील ?
आईआजीला जान्हवी रिसायकल बिनबद्दल सांगते, तेव्हा "निघून गेलेली माणसे परत मिळू शकतील तर .... "
अशा आशयाचा विचार आईआजी मनात करते हे दिसलं .
आणि नंतर थोड्याच वेळात आपटे दिसला ...... बाप रे ! रिसायकल बिनमधून आपटे आणि मामा रिकव्हर होणार की काय ?
ओ बेफिकीर, श्री ऑफिसात आला
ओ बेफिकीर, श्री ऑफिसात आला तेव्हा पावणेनऊ वाजलेले दाखवले म्हणजे तो पंधरा मिनिटे लवकरच आला की. उद्योग चालवायला लॅपटॉप कशाला चालवता यायला हवा? तसंही त्या जान्हवीकडून बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग घेणार आहेत.
भरत मयेकर | 2 January, 2014 -
भरत मयेकर | 2 January, 2014 - 20:51 नवीन
ओ बेफिकीर, श्री ऑफिसात आला तेव्हा पावणेनऊ वाजलेले दाखवले म्हणजे तो पंधरा मिनिटे लवकरच आला की. उद्योग चालवायला लॅपटॉप कशाला चालवता यायला हवा? तसंही त्या जान्हवीकडून बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग घेणार आहेत.
<<<
तरीच मी म्हणायचो की मयेकर का ह्या मालिकेची एवढी बाजू घेतात. आज पाट्या बघत होतो त्यात एक नांव निलेश मयेकरही होते. काहीतरी नक्कीच गोम असणार!
तो आपट्या नजरेस पडला होता
तो आपट्या नजरेस पडला होता .....<<<
तो टकल्या म्हणजे आपट्या होय? हो हो, तो आजच होता उल्हासराव!
तसंही त्या जान्हवीकडून बेसिक
तसंही त्या जान्हवीकडून बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग घेणार आहेत.<<<
आम्ही खुळ्यागत एन आय आय टी मध्ये पैसे घेऊन संगणक शिकवत बसतो. सगळ्यांनी एक एक जान्हवी सून म्हणून आणली की झाले.
श्री ऑफिसात आला तेव्हा
श्री ऑफिसात आला तेव्हा पावणेनऊ वाजलेले दाखवले म्हणजे तो पंधरा मिनिटे लवकरच आला की<<<
मग घड्याळ बघून ती आई आजी भीषण दुर्घटना घडल्यासारखी की बघत होती?
श्रीला हापिसात जाण्यासाठी
श्रीला हापिसात जाण्यासाठी बसमधे चढताना जो शॉट आहे (जाह्नवी असताना) तोच शॉट परत वापरलाय .....
अनिल आपटे भेटतो तेंव्हा....
दोन शाळकरी मुलं डबलसीट सायकलवर दिसतात...दोन्ही वेळा...
(सकाळी ती शाळेत जात होती आणि संध्याकाळी घरी जात होती.....इतकं डिटेलिंग असेल तर.......मात्र....माझी माघार )
मीही बेसिक कॉम्प्युटर
मीही बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग ऑन द जॉबच घेतले आहे. फॉक्सप्रोमध्ये प्रोग्राम लिहिण्याइतके प्रावीण्य कोणत्याही ट्रेनिंगशिवाय मिळवलेले आहे. आईआजी तर फारच कर्तृत्ववान आहेत.
आईआजीला जान्हवी रिसायकल
आईआजीला जान्हवी रिसायकल बिनबद्दल सांगते, तेव्हा "निघून गेलेली माणसे परत मिळू शकतील तर .... "
अशा आशयाचा विचार आईआजी मनात करते हे दिसलं .
आणि नंतर थोड्याच वेळात आपटे दिसला ...... बाप रे ! रिसायकल बिनमधून आपटे आणि मामा रिकव्हर होणार की काय ?
दोन शाळकरी मुलं डबलसीट
दोन शाळकरी मुलं डबलसीट सायकलवर दिसतात...दोन्ही वेळा...
(सकाळी ती शाळेत जात होती आणि संध्याकाळी घरी जात होती.....इतकं डिटेलिंग असेल तर.......मात्र....माझी माघार )<<<
हे अक्षरशः मीही बघितले. आणि शाळेत जात होती आणि येत होती हे शक्य नाही.
रिसायकल बिनमधून आपटे आणि मामा
रिसायकल बिनमधून आपटे आणि मामा रिकव्हर होणार की काय <<<
आईआजी तर फारच कर्तृत्ववान आहेत.<<<
मयेकर, मी आई आजी असतो तर उल्हासरावांना माबोवरच राहायला सांगून तुम्हाला दुसरे संकेतस्थळ बघायला सांगितले असते.
आजचा भाग बघितला नाही बरेच
आजचा भाग बघितला नाही बरेच झाले वाटते...
बेफिकीर स्फोटक प्रतिक्रिया मस्त आहेत..
Pages