होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यापुढील तीन महिन्यांच्या कथानकाची पटकथा लिहिण्याचे कंत्राट मला देण्यात आलेले आहे. कथानक लांबलचक असून तरीही मी ते खाली देत आहे. ते येथे आधीच देण्याचे कारण म्हणजे एपिसोड होईपर्यंत जी चर्चाकारांना वाट पाहावी लागते ती पाहावी लागणार नाही.

२५ डिसेंबर २०१३ ते २५ जानेवारी २०१४ -

इंदू आणि शरू ह्यांच्या इंग्रजीच्या शिकवण्या लवकरच सुरू होणार असल्याची बातमी कळते. पिंट्या अचानक घरात आल्यामुळे सर्व लहान मोठ्या आया, आईआजी, श्री, जान्हवी असे आळीपाळीने धक्का बसून पिंट्याकडे पाहतात. ह्या पाहण्याचा प्रभाव वाढावा म्हणून एक आठवडाभर हे पाहणे ठेवण्यात आलेले आहे. फ्रस्ट्रेटेड बेबी सगळे वेळेवर घरी येत असल्याच्या आनंदात 'आधी त्यांना उशीर होण्यावरून ती जे बोलायची' त्याबाबत एक पंधरवडा माफी मागते.

माहे फेब्रुवारी २०१४ -

पिंट्याचा स्नॅक बार सुरू होणार असल्याने त्यावरील मसलतीत तीन आठवडे जातात. ह्यात इडली चटणी ठेवावी की ठेवू नये ह्यावरून जोरदार वाद होतात. ह्या वादात जान्हवी व चक्क फ्रस्ट्रेटेड बेबी ह्यांचे म्हणणे 'ठेवावी' असे असते तर श्री, आईआजी, पिंट्याची आई, पिंट्याचे बाबा आणि खुद्द पिंट्या ह्यांचे म्हणणे फक्त चटणी ठेवावी असे असते. नुसती चटणी कोण खाणार हा विचार ह्या सर्वांच्या गळी उतरवताना जान्हवी गोड व लाडीक बोलण्याचे आधीचे सर्व विक्रम मोडते. शेवटच्या आठवड्यात फक्त इडली ठेवावी ह्यावर एकमत होते व ह्या मतावर फ्रस्ट्रेटेड बेबीचा प्रभाव असल्याने व्याही म्हणजे पिंट्याचे वडील रुसून बसतात.

माहे मार्च २०१४ -

नंदन चोरी करतो व ती कबूलही करतो. कबूल केल्याबद्दल त्याला शिक्षेत सूट मिळते व श्रीच्या घरातील सर्व आदरणीय स्त्रियांच्या पायावर डोके ठेवून त्याला मुक्त केले जाते. पण ही चोरी कशाची होती? ह्यावर एक वस्तू नंदनच्या खिशातून पडते व ती वस्तू पाहून प्रचंड धक्का बसलेले सर्व चेहरे दाखवत एपिसोड संपतो. त्यानंतर असलेल्या महामहाएपिसोडच्या शेवटच्या क्षणी ओक्साबोक्शी रडत नंदन हातातील वस्तू दाखवून सर्वांना सांगतो की पुन्हा मी साहेबांच्या टेबलवरील टूथपिक चोरणार नाही.

धन्यवाद!

काल आजींचे एक वाक्य फार आवडले. * मी तुला संभाळले नाहीये. जपले आहे. " फारच प्रभावित होउन घरात इक्डे तिकडे बघितले तर जपायचा एक नग फेसबुक वर हरवलेला होता आणि उरलेले दोन नग पायाची नखे चाटत बसले होते निवांत. ही नात्याची छटा इंग्रजीत उतरवताच येणार नाही.
असे वाटून चूप पुढे पाहात बसले. फार जपले कि मोरू होतात मुले.

लग्नात जेव्हा जान्हवी कडुन चंद्रहार हरवतो,तेव्हा तो शोधायला पिंट्याच तीला मदत करत असतो,आणि सोनाराकडे तो हार विकायला आल्यावर त्याला एकदाही हे आठ्वु नये!या आधी पिंट्या या character बद्दल सहानभुती वाटायची.मुळात जेव्हा तो घरात मामाच्या ट्रंकेत सापड्ला तेव्हाच खर तर त्याला लग्नात ताईचा चंद्रहारही हरवला होता,हे मात्र आठवलं नाही.
मागेही एकदा मो.आ (मला असले संबोधन अजीबात आवड्लेलं नाहिये,मी तरि आजवर कोणाला मोठी/छोठी आई,आईआजि? असलं ऐकलेल नाहिये) रागाच्या भरात जान्हवीला सोन्याच्या जरीची साडी तिच्या आईला दिल्याचा उल्लेख करते मात्र एरवी अतिचाणाक्ष असलेल्या जानु बाईंची टुयब काही पेट्त नाही,त्यानंतर ती याचा जाबही आईला विचारत नाही.

अमा Lol

मोठी आई, छोटी आई, आईआजी ही बडी मां, छोटी मां, दादीमां ची मराठी रूपे आहेत. त्या सहाही बायका श्रीला आईसारख्याच हे दाखवण्यासाठी अशी नावे दिली असतील.
पिंट्याला (आणि एकंदरित पुरुषांना) दादिन्यांतलं किती कळत असणार? Wink त्यातून तो हरवलेला चंद्रहार परत मिळाला होता.
जान्हवीला आईने श्रीकडून पैसे उकळले हे कळल्यावर विचारला की जाब. आता दागिने, चंद्रहार, जरीची साडी इत्यादी दारुगोळ्याचा स्फोट होण्याची संधी श्रीच्या बेघर होण्याने हुकेल का ते पाहायचे आहे.

मस्त अपडेट्स! मालिका नक्कीच बोअर होत चाललेय पण एखाददिवशी चुकवावी अशी पण वाटत नाही, अशा विचित्र वळणावर येऊन ठेपलेय.

aaNi gokhalyaanna kunitari ek changla tailor shodun dya.. kai bakwas blouses ghaltat ekjaat saglya bayka...

हो मालिका बोअरच आहे. पण अपडेट्स आणि कमेंट्स मस्त असतात. म्हणजे कसं की कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी दोन्ही संघ ड्रॉसाठी टीपी करत असतात. बोलर्स सगळे बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकतात. बॅट्समन ते सगळे नीट सोडून देतात. पण त्याची कॉमेंट्री मात्र इतकी छान होत असते, की तेवढ्यासाठी सामना पहावा लागतो. Wink

आता पुढचा भाग पाहताना नको तिथे लक्ष जाणार लोकांचे! गोगो, तुम्ही जान्हवीला विपू करायला हवी होतीत.

LOL

जान्हवीला आईने श्रीकडून पैसे उकळले हे कळल्यावर विचारला की जाब.>>> तो ५०,०००बद्द्ल्,जरिच्या साडीचे काय? ते तिला कळल होतच की मो.आ. कडुन.

पिंट्याला माहित आहे की आणि हार मामाने चोरलाय ते. पण त्याच्या फायद्यासाठी तो काहीच बोलत नाहिये.

काल जान्हवीची मैत्रीण आणि बॉसचे बोलणे आवडले. जीजूवरून झालेले.

बॉस म्हणातो श्री काय म्हणतेस सरळ. गोखले साहेब. मोठा माणूस. मैत्रीण म्हणते आधी जीजूच म्हणाले, तुम्हालाच कळले नाही.

मैत्रीण सही आहे Happy

दक्षिणा....

मालिकेतील सर्वात संतापजनक आणि अतिशय कच्चेपणाने हाताळला जात असलेला भाग म्हणजे पिंट्याला चंद्रहार सापडणे आणि त्याने तो लहान मुले खिशात गोटी घालून हिंडत फिरत असतात तसे मध्यरात्रीपर्यंत फिरणे. अंधार्‍या रात्री निर्जन जागी झाडाखाली थांबून एका खरेदीदाराची वाट पाहाणे, अधूनमधून तो हार खिशाबाहेर काढून पाहणे.... आणि तो खरेदीदार येत नाही हे पाहून घरी येणे. घरीही गादीखाली तो हार ठेवणे. जी बहीण त्याला जीवापलिकडे जपते, विश्वास ठेवते....त्याच बहिणीसाठी सासरकडील लोकांनी तो हार केला होता आणि लग्नाच्या आधल्या रात्रीच तो चोरीला गेला आहे....मामा निर्लज्जपणे इकडेतिकडे पाहतोय, तर पिंट्या मनिष सदाशिवराव गंभीरपणे शोधत आहेत....जान्हवी गीता धक्क्याने रडत आहेत.... एखाद्या २४ वर्षाच्या भावाच्या स्मृतीतून कसे पुसून जाईल हे सारे चित्र ? हारामुळे आपल्या बहिणीचा संसार उध्वस्त होऊ शकतो ही कल्पना त्याला असलीच पाहिजे, विकून पैशेच मिळवायचे होते त्याला तर त्याने एका आडबाजूच्या दलालाकडे तो हार देणे ही गोष्ट योग्य ठरली असती....पण नाही, थेट तो त्या शहरातील नामवंत अशा सराफाकडेच जातो.

सारे काही अतर्क्य आणि अत्यंत अशक्य कोटीतील ही बाब मानली पाहिजे....त्यामुळे कथानकाचा सार डोलाराच कोसळून पडतो आहे.

आणि एक गोष्ट सांगायला यांना इत्ताक्का वेळ का लागावा?
एक वाक्य बोललं की पुढची साडेसात मिनिटं रडणारे आणि विस्फारलेले डोळे टिपत बसणार. Angry

आणि हट्टंगडी बै म्हणतात की तुला माझी भिती वाटली म्हणजे मी हारलेच.... मग सगळ्यांनी तिच्याबद्दलची भिती व्यक्त करा म्हणावं म्हणजे हारून हारून किती रसातळाला गेलेय ते तरी कळेल आणि आमचा जीव सुटेल Proud

ती कदाचीत घरातून बाहेर काढायचीच वाट पहात असेल. तेवढच नवर्याबरोबर रहायला मिळेल Proud

आणि हट्टंगडी बै म्हणतात की तुला माझी भिती वाटली म्हणजे मी हारलेच.... मग सगळ्यांनी तिच्याबद्दलची भिती व्यक्त करा म्हणावं म्हणजे हारून हारून किती रसातळाला गेलेय ते तरी कळेल आणि आमचा जीव सुटेल>>>> दक्षे Lol

आणि हट्टंगडी बै म्हणतात की तुला माझी भिती वाटली म्हणजे मी हारलेच.... मग सगळ्यांनी तिच्याबद्दलची भिती व्यक्त करा म्हणावं म्हणजे हारून हारून किती रसातळाला गेलेय ते तरी कळेल आणि आमचा जीव सुटेल<<< Lol

मलापण चंद्रहाराबद्दल पिंट्या जसे वागला त्याची प्रचंड चीड आलीय.

बेफिकीर, खूप सुंदर लिहिले आहेत, चला आता पुढचे भाग न बघण्याचा निर्धार कायम ठेवते आणि मामांचे अपडेट्स वाचायला येते, नेहेमीप्रमाणे.

आजच्या भागात पिंट्याच्या वडिलांचा अभिनय उत्तम झाला व त्या तिघांचे संवादही उत्तम झाले. प्रथमच या मालिकेत काहीतरी बघणेबल वाटले.

श्रीने आज आईआजीची चांगलीच खरडपट्टी काढली (आश्चर्यकारकरीत्या). आणि ते बघायला चक्क बरे वाटले. उद्धटपणा आवडला असे नाही, पण तत्वांचा अतिरेक व तत्वांचा जाच होत आहे व आधीही होतच होता फक्त बोलत नव्हतो हे मुद्दे आवश्यक वाटले.

(खरंच वाटत आहे की ह्या धाग्यावर कोणाचे तरी चक्कपैकी लक्षबिक्ष असावे).

बाकी आजही जान्हवीने ओठातून काकवीच पाझरली आणि वैताग आलाच.

या मालिकेतल अपडेट्स प्रकरण भारी आहे. सगळेच छान अपडेट्स देताहेत Happy बेफि Lol
<< मैत्रीण सही आहे >> +१
मला तर जानू पेक्षा आता तीच आवडायला लागली आहे. दिसायला पण आणि अभिनयात पण Happy

Pages