अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बातम्यांनुसार आता नविन हुद्द्याप्रमाणे खोब्रागडे यांना संपुर्ण इम्युनिटी मिळणार असली तरी अमेरीकन अधिकार्‍यांप्रमाणे हे मागील केस करीता लागु नाही. ज्यावेळी तिच्याकडुन हा गुन्हा घडला त्यावेळी ती एक केवळ अधिकारी होती , राजदुत नाही.
.... immunity would start at that point. .....It is not retroactive.....Khobragade was consular staff when she was arrested, and not an ambassador, she only had consular immunity, which covers acts directly connected to her business and not unrelated
(संदर्भः एनबीसी न्युज)

व्हिसा फ्रॉड प्लस पगार नीट न देणे = कॅव्हिटी सर्च? काय अंतर्वस्त्रांत पगार लपवला होता का तिने?
>>> इब्लिस, एकूणात तुम्ही डोळे बंद करून स्ट्रिप सर्च स्ट्रिप सर्च म्हणून ओरडत उगीच भुई धोपटत आहात केव्हाची Lol सिरियसली तुम्ही ज्या प्रकारे त्रागा करताय त्यावरून असे वाटतेय की तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी भलतेच काहीतरी चित्र असावे द्रौपदी वस्त्रहरण टाइप!!
स्ट्रिप सर्च केला असेल तर त्यात काय हिडीस दिसलं तुम्हाला ? बेसिक नियम जर तुरुंगात शिरताना स्ट्रिप सर्च व्हावा असा असेल तर तो ब्लाइंडली फॉलो करायला नको का? आणि तेच योग्य नाही का? (हो भारतातही असा सर्च करतात) की प्रत्येक आरोपी तुरुंगात घेऊन जाताना प्रत्येक जेलर (किंवा जो कुणी ऑफिसर असेल तो) ने आपापले लॉजिक लावून आपापले जजमेन्ट वापरून ठरवायचं स्ट्रिप सर्च योग्य की नाही ? तसे करायचे तर कुठलेही कायदे/नियम हवेच कशाला ? प्रत्येकाने आपापले जजमेन्ट वापरावे!!
हेच लॉजिक कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर ला, पायाभूत नियमांना लावून पहा . केवढी अंदाधुंदी माजेल असे प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल ते केले तर !!

बाकी ते कॅव्हिटी सर्च झाला किंवा काय ते खरं खोटं व्हायचंच आहे अजून. असो,.

ही एक कठीण परिक्षा असते, आयएएस सारखी.
हुशार लोक लागतात.
अनेकदा इतर सोप्या पैसे कमावून देणार्‍या इतर लोकल लाचखाऊ पोस्ट्स पेक्षा/ किंवा कित्येकदा अनेक लोक 'आयटी कुलीज' म्हणतात त्यापेक्षाही अधिक कव्हेटेड व मिळवायला कठिण अशा या जागा असतात. असोच.
शेव्टी ख्रिस्मस स्पिरिट आहे.
----- परिक्षा कठीण असते का नाही हे माहित नाही....

पण परिक्षा पास झाल्यावरही आणि गाठिशी १५ वर्षान्चा अनुभवाच्या आधारे तुम्ही एक अगदी छोटासा घरगुती मुद्दा सोडवू शकत नाही याचे आश्चर्य वाटले, मग काय डोम्बल्याची आन्तर-राष्ट्रिय डिप्लोमॅसी करत असणार ?
एका मेडचा अत्यन्त क्षुल्लक असा प्रश्न नाही सोडवता आला तर हे देशाचे मोठे मोठे आणि क्लिष्ट प्रश्न (भारत चिन, भारत अमेरिका, भारत पाक) कसे सोडवणार ?

याना अमेरिकत जायची खुप हौस असते (सुप्रसिद्ध माजी परराष्ट्र मन्त्री आणि कॉग्रेसी मुत्सद्दी नटवरसिन्गाच्या अमेरिकेत पोस्टिग्ज मिळवायला लॉबी लागते असे सागितल्याचे स्मरते - - खरे खोटे नटवर जाणो), पण IFS ना कामापुरते कायद्याचे ज्ञान नसल्याचे वैषम्य वाटते.

परराष्ट्रखाते आणि अनेकानी सागिन्तले होते तिला डिप्लोमॅटिक इम्युनिटी आहे. आता पुर्ण डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळावी म्हणुन तिची बदली करण्यात आली आहे यापेक्षा आपल्या अज्ञानाचे अजुन काय पुरावे हवेत ?

कठीण परिक्षा पास होऊन आलेल्यांचा स्ट्रिप सर्च करू नये अशी कायद्यात तरतूद करावी काय ?

मैत्रेयी Happy

(हो भारतातही असा सर्च करतात)>>> भारतात नुसती अटक झाल्यावर (खास मुंबई पोलिसांच्या भाषेत "रात्रभर आत बसवा यांना!)यामधे असा स्ट्रीप सर्च करत नाहीत- स्वानुभव. मॉलमधे वगैरे जसे पॅट डाऊन सर्च करतात तसा सर्च महिलांसाठी महिला पोलिसांकडून केला जातो. महिला पोलीस नसतील तर पुरूष पोलिस असादेखील सर्च करू शकत नाहीत. अटकेचे वॉरंट वगैरे काढून अटक केली असेल तर मात्र बर्‍याचदा स्ट्रीप सर्च केला जातो.

कॅव्हीटी सर्च खरच झाला का ह्याबद्दलल कुठे वाचल्याचे आठवत नाही. खोब्रागडे यांनी तसा दावा केला आहे.

तुरुंगात शिरताना प्रत्येकाचा स्ट्रीप सर्च होतोच. कॅव्हीटी सर्च बद्दल काही नॉर्मस् आहेत. त्या नॉर्मस् ना अनुसरुन त्यावेळी काय करावे याचे अधिकार तेथील अधिकार्‍यांना गुन्ह्याचे स्वरुप, कैद्याची वागणुन बघुन ठरविण्याचा अधिकार आहे.

इब्लिस, तुम्हाला माझ्या मुद्द्यांचा टोन अजिबात समजलेला नाही असे खेदाने म्हणतो. मी गेले अनेक दिवस भारतात होतो. तेथील राजकीय व्यक्ती व मीडिया मधल्या बातम्यांवरून जे दिसले ते लिहीले आहे. त्या कॉमेण्ट्स तुम्ही स्वतःवर का ओढवून घेतल्या कळत नाही.

अमेन्स्ट्रीम अमेरिकन मेडिया कशाला झक मारयला चर्चा करील? त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे का तो?>> पुन्हा एकदा - तुम्हाला अमेरिकन मीडियाला कशात इंटरेस्ट आहे याबद्दल माहिती नाही असेच दिसते.

systematic पातळीवर जे काय करायचे, ते करायला भारतीय परराष्ट्र मंत्रालय व डिप्लोमॅटिक कोर सक्षम आहे.>>> येथे त्यांना अपेक्षित परिणाम दिसलेला नाही असे जाणवले, हे मी म्हणतोय.

कसले घंट्याचे अंतर्गत धोरण बोलताहात तुम्ही?>>> चर्चेला एका विशिष्ट पातळीवर आणल्याबद्दल धन्यवाद.

पण जे बोलताहेत, ते सगळेच माठ अन अमेरिका काय हे ठाऊक नसलेलेच आहेत, हे कशावरून? >>> पुन्हा एकदा क्लासिक स्ट्रॉ मॅन आर्ग्युमेण्ट. माझ्या त्या पोस्ट मधे स्पष्टपणे तर लिहीलेले नाहीच, पण कशावरून ध्वनितही होते सांगा जरा जमल्यास.

कॅव्हीटी सर्च खरच झाला का ह्याबद्दलल कुठे वाचल्याचे आठवत नाही. खोब्रागडे यांनी तसा दावा केला आहे.
---- खोब्रागडे यान्नी अनेक दावे केले आहेत त्या मधे सन्गिता रिचर्डस या CIA एजन्ट आहेत असाही सनसनाटी आरोप त्यानी केला आहे. आता देवयानी यान्ना कागदावर एक आणि प्रत्यक्षात १/३ पगार देण्याची सक्ती CIA ने केली होती का अजुन कुणी हे माहित नाही.

परत मेडचा राहण्या खाण्याचा खर्च नि देशात जमा केलेली रक्कम धरता नक्की पगार किती दिला गेलाय हे अजून्ही कुठेही मी वाचलेले नाही त्यामूळे ह्या सर्व प्रकरणाची सुरुवात तिच्या अमेरिकेत स्थायिक व्हायचा इच्छेने जे काही केले गेले तिथून सुरू झाली.
----- माझ्या वाचनात ३०,००० रुपये आला आहे. रहाण्या-खाण्याचा खर्च केला असेलही पण त्याने मुळ मुद्दा (कमी पगार देण्याचा आहे) बदलत नाही. विसा कागदपत्र तयार करतानाचे लेखी अश्वासन फार महत्वाचे आहे... दिलेले benefits (रहाण्यासाठी गॅरेजमधे जागा इ. किवा चहा, नाष्टा, जेवण) हे कमी पगार देण्याचे समर्थन होत नाही.
अमेरिकेत जाण्याची हौस जशी खोब्रगडेन्ना आहे तशीच मेडला असणे यात मला काही वावगे नाही...

स्वाती, तिथे काय झालं अथवा झालं असावं त्याबद्दल मी लिहिलेले नाही. भारतात असा सर्च करतात असं वाक्य आलं त्यावर लिहिलेल आहे. भारतात स्ट्रीप सर्च कॉमन नाही, व्हाईट कॉलर गुन्ह्यास्साठी तर क्वचित.

देवयानीचा दावा आहे की, तिचा कॅव्हीटी सर्च केला गेला. कॅव्हीटी सर्च ही जर प्रत्येक अटकेला स्टॅन्डर्ड प्रोसीजर असेल तर मला त्या मार्शल्सची दया येईल.

खोब्रागडे यान्नी अनेक दावे केले आहेत त्या मधे सन्गिता रिचर्डस या CIA एजन्ट आहेत असाही सनसनाटी आरोप त्यानी केला आहे

खरेही असेल त्यांचे. ते तर अती कठिण परिक्षा पास झालेले आहेत.

नंदिनी, यू एस मार्शल्स आणि पोलीस यांची कार्यक्षेत्रं निराळी आहेत. दया वाटायच्या आत गूगल करून बघ.

बाकी ते कॅव्हिटी सर्च झाला किंवा काय ते खरं खोटं व्हायचंच आहे अजून. असो,.
>>
अहो,
अमक्याने अमुक एम्प्लॉयीकडून लिहून घेतले अन फाडून टाकले असे मायबोलीवर लिहिले तिथून इंटरनॅशनल कायदे, सेक्षुअल हॅरॅसमेंटचे फाडून खाणारी लोकं इथं आहेत.
अन हितं मी कॅव्हीटी सर्चवरून भुइ धोपटतो आहे??
कुणाला येडी घालून र्‍हायले बा?
सोताले?

स्वाती, तिथे काय झालं अथवा झालं असावं त्याबद्दल मी लिहिलेले नाही. भारतात असा सर्च करतात असं वाक्य आलं त्यावर लिहिलेल आहे. भारतात स्ट्रीप सर्च कॉमन नाही, व्हाईट कॉलर गुन्ह्यास्साठी तर क्वचित.

देवयानीचा दावा आहे की, तिचा कॅव्हीटी सर्च केला गेला. कॅव्हीटी सर्च ही जर प्रत्येक अटकेला स्टॅन्डर्ड प्रोसीजर असेल तर मला त्या मार्शल्सची दया येईल. >> कायद्यानुसार व्हाईट कॉलर किंवा तत्सम स्वरुपाचा असा वेगळा section असतो का ? शिक्षांच्या स्वरुपानुसार वेगळे तुरुंग असतात हे माहित होते पण त्यासाठी गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. त्याधी विभागणी कशी करतात ? genuine प्रश्न आहे.

अमेरिकेत जाण्याची हौस जशी खोब्रगडेन्ना आहे तशीच मेडला असणे यात मला काही वावगे नाही... >> उदय, तुम्ही माझे पोस्ट विशेषतः त्यातला इंग्रजीमधला भाग परत एकदा वाचावा हि विनंती.

हे प्रकरण फक्त, विसा पेपरमध्ये लिहिल्यापेक्षा कमी पगार दिला म्हणून आणि म्हणूनच झाले आहे, आणि ही ओपन&शट केस आहे असे अजूनही तुम्हाला वाटतेय का?

समजा ईमोशनल डिसट्रेसमध्ये कस्टडीमधील व्यक्तीने स्वतःचे काही बरेवाईट करून घेतले तर (नशीबाने कुठल्याही साधनांचा वापर न करता हे करता येत नाही) आणि अशी व्यक्ती जर डिप्लोमॅट वगैरे दर्जाची असेल तर दर्जा म्हणजे हुद्दा नाही तर कामाचे सीक्रेटीव आणि कॉवर्ट स्वरूप (ईम्युनिटी वगैरे वादाचा मुद्दा आहे हे मान्य) तर होणार्‍या परिणामांचे पडसाद काय असतील असे तुम्हाला वाटते? तुम्ही अश्यावेळी डिसीजन मेकर असाल तर काय कराल?

ते स्ट्रीप सर्च म्हणजे मानहानी आणि अगदी रेप केल्यासारखं समजता आहात का तुम्ही.?

देवयानीचा नवरा अमेरिकन नागरिक आहे (बहूतेक) आणि देवयानी भारतीय दुतावासात, ह्यात कुणाला काही चुकीचं वाटतंय का?

अरे हो! उदय ना प्रतिसाद द्यायचा राहिला.
>>
याना अमेरिकत जायची खुप हौस असते
<<
तुमची फिटलिये का?
हो असे उत्तर असेल तर माझा प्रतिसाद सुफळ संपूर्ण.

@ अ‍ॅडमिन,
वैयक्तिक प्रतिसाद. उडवा.
धन्यवआद.

ते स्ट्रीप सर्च म्हणजे मानहानी आणि अगदी रेप केल्यासारखं समजता आहात का तुम्ही.?
<<
चमन,
तुमचा अमेरिकेत कॅव्हिटी सर्च होवो, व तुम्ही निरपराध साबीत होवोत, अशी शुबेच्छा!

ता.क.
पुर्षांनाबी कॅव्हिट्या अस्त्यात आन त्यांचा बी सर्च कर्त्यात अशी फर्स्ठयांड डाक्तरी इन्फर्मेशन माह्यापाशी हाये. Wink

कायद्यानुसार व्हाईट कॉलर किंवा तत्सम स्वरुपाचा असा वेगळा section असतो का ?<< असं एखादं वाक्य माझ्या अख्ख्या पोस्टमधे कुठे आलंय का? मैत्रेयीने जे लिहिले आहे की भारतात असा स्ट्रीप सर्च कॉमन आहे त्यावरून मी लिहिलेलं आहे. आणि विश्वास ठेवा, रात्रभर पोलिस स्टेशनात बसण्याचा अनुभव घेऊन ते लिहिलेले आहे.

इथे या धाग्यावर कायम कॅव्हीटी सर्च ही स्टॅण्डर्ड प्रोसीजर आहे हे वाचलंय. जर खरंच असं असेल तर प्रत्येक अटकेसाठी कॅव्हीटी सर्च केली जात असेल तर त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, इतर यंत्रणा आणि सामुग्री यांची किती तयारी लागत असेल आणि जे कोण मार्शल, पोलिस अथवा जे कुणी असेल ज्याच्याकडे हे काम असेल त्याची अवस्था इमॅजिन्करून मला त्यांची खरंच दया येत आहे. अटक झाली की लगेच कॅव्हीटी सर्च!! याला म्हणतात कायदा!

देवयानीचा नवरा अमेरिकन नागरिक आहे (बहूतेक) >>आहेच. प्रोफेसर आहे नि भारतीय वाईनवर काही तरी करतो. कदाचित naturalised असु शकेल.

नंदिनी माझा प्रश्न genuine आहे, तुझ्या "स्वाती, तिथे काय झालं अथवा झालं असावं त्याबद्दल मी लिहिलेले नाही. भारतात असा सर्च करतात असं वाक्य आलं त्यावर लिहिलेल आहे. भारतात स्ट्रीप सर्च कॉमन नाही, व्हाईट कॉलर गुन्ह्यास्साठी तर क्वचित. " ह्यावरून मला पडलेला.

माझ्या माहितीप्रमाणे इथे कुणीही कॅव्हिटी सर्च ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे असं लिहिलेलं नाही. मुळात कॅ सर्च झालाय किंवा नाही ह्यावरही एकमत नाहीये. स्ट्रीप सर्च ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे हेच अमेरिकास्थित म्हणतायत. तुझा वाचण्यात, समजण्यात घोळ झालेला असू शकतो.

कायपण म्हणा बुवा, पण ती हमेरीकेची प्रवक्ता बै लैच झकास दिसते, काय तो चष्मा, सोनेरी केशसंभार... नायतर आमची गानूज्जी ,तिचा फक्त जीभसंभारच आहे..

असामी, भारतात- अटक करताना कुणाला कुठल्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे हे पोलिसांना माहित असतं. त्यानुसार त्यांची प्रोसीजर ठरलेली असते.. व्हाईट कॉलर गुन्ह्यासाठी (फ्रॉड, अथवा घोटाळे) पॅट डाऊन केला जातो, त्यात शंका आढळली तर स्ट्रीप सर्च. खुनासाठी अटक असेल तर प्रोसीजर वेगळी, दारू पिऊन गोंधळ घातला म्हणून अटक केली तर प्रोसीजर वेगळी. असं प्रत्येकाला अटक केली की लग्ग्च कॅव्हीटी सर्च होत नाही, म्हणून तर मला अमेरिकन पोलिसांचं विशेष कौतुक वाटलंय. केली अटक केला कॅव्हीटी सर्च!!

कॅव्हीटी सर्च हा मुख्यत्वे स्मगलिंग (एकेका़ळी) आणि सध्या जास्त करून ड्रग ट्राफिकिंगसाठी केला जातो. अगदी क्वचित टेररिस्ट ऑर्गनाय्झेशनशी संबंधित असेल तरीदेखील कॅव्हीटी सर्च केला जातो.

महिलांचा कॅव्हीटी सर्च करण्याआधी त्यांचा मेडीकल रीपोर्ट काढावा लागतो. (प्रेग्नंट अस्ल्यास) असे मला सांगितलंय एकाने. तरी एकदा खात्री करून घ्यायला हवी आहे.

मतदानाचा विषय आहे का तो? >> इब्लिस तुम्ही कुथे occicial statement ह्याबद्दल वाचले असेल तर लिंक देता का ? सुरूवातीच्या बातम्यांमधे देवयानीच्या कुटुंबियांना quote करून तसे झाले असे वाचले होते पण त्या नंतर तसे काही झाले नाही असे state department च्या प्रवक्त्याचे statement वाचले होते.

नंदिनी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस अजून, white collar गुन्हा अशी काही वेगळी category आहे का एव्हढाच साधा प्रश्न आहे. तू दिले नाहीस म्हणजे तुला माहित नसावे असे ग्रुहित धरतो.

शुभेच्छांसाठी धन्यवाद ईब्लिस.
तुमचा राग समजण्यासारखा आहे पण जर एखाद्या प्रकरणात संशयित म्हणून अटक झाल्यास असा स्ट्रीप सर्च होऊ शकतो हे माहित असणे एवढेच पुरेसे आहे. अगदी तुम्ही अमेरिकन सॉईलवर पहिल्यानेच पाऊल ठेवले तरी संशयापोटी हे होऊ शकते.
कॅविटी सर्च हे वेगळे आणि विवादास्पद प्रकरण आहे आणि कदाचित तुम्ही रागाच्या भरात दोन्हींमध्ये गोंधळ करत आहात.

आसामी, मला म्हणायचे होते की अश्याने काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत का? म्हणजे कुणाचे काही वेस्टेड ईंट्रेस्ट?

Pages