अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

few points here..sry for typing in english..

1. devyani and her husband both r earning in NYC..USA.. as per record in papers Devyani's salary is $4500 per month..

2. Why did she hired Nanny from India and responsible for A3 Visa transfer when there r so many local options available.. there so many indians or asian nanny services available in NYC NJ area... people come to ur place on hourly basis... do cooking, cleaning, babysitting and get paid accordingly..

3. CNN says devyani paid less than $600 to Maid per month.. again not sure if this is true..
(i understand she arranged for her accomodation , food and local transport etc..)
But in area like Jersey City.(which is 10 mins away from NYC) . Gujarati nanny charges $500 per week.. for 9 hours a day.. in which babysitting..cleaning and cooking is done..

4. One of my friend who is working in IT and earn $4200 per month..kept Nanny with $500 per week.. (her husband is earning too) nobody need to hire anyone from India..was Devyani just tried to use A3 Visa service to get cheap services and rates from Indian worker? What was her motive to hire nanny when options are very easily available and especially in NYC, NJ type area...

5. If Devyani really paid less than $600 per month sorry but then its abuse and way less than what local Indian nanny's gets money...then it is obvious that Sangeeta Richard tried to get job outside..

6. About nature of arrest and further checking process.. she was searched by femal police officer in private police area and not publically.. every country have their own strict laws...so how come it was insult..

7. Why india let go of Richardson who was involved in Bhopal case or recently Hedley.. why we never took very strict actions against criminals.. latest is italian marines.. why did India allowed them to let go or reduce their sentence..last visit to India.. security guard sleeping at airport.. Immigration officer not paying attention to papers.. within few secs.. foreigners are allowed IN..why don't we have finger printing and more stringent checks..to these Outsiders.. to make sure about Our Security...

8. what about Maid.. was it not insulting to make her work in low wages..who will speak against such abuse..

9. Devyani's name is involved as illegal beneficiary in Aadarsh scam also...what is background check about her financial activities..

10. Why india never reacted when APJ Abdul Kalam was questioned long hours at Newark Airport.. he is our Ex President and Diplomat..

Sorry to say for Indian Consulate experience in NYC midtown is very horrible..
First of all...anyone can enter in our Indian Consulate without Security check.. WHY?
If USA can do strict checking in Delhi or Mumbai Consulate office.. why don't we apply these rules..don't you think our goverment should be Cautious about such BASIC rules..
Staff is late.. and very very rude.. Information are misleading.. frankly.. its as bad as any Indian goverment office,, instead of improving these issues...

when Devyani Types A3 VIsa details from her own Computer, how come she typed to pay that much amount to pay in Contract...???

instead of being emotional about LADY Diplomat's Arrest...lets try to understand facts behind it..

प्रीती बी
Why did she hired Nanny from >>>
why did India allowed them to >>>>

तुमचं इंग्लिश दातात खडा अडकल्यावर जसे वाटते तसे आहे. बाकी चालू द्या

च्यायला अमेरिकेच्या खुजल्या भारी. हे बघा काय केलं होतं याआधी!

वेळच्यावेळी ही प्रवृत्ती ठेचून काढली असती तर देवयानींचा प्रसंग उद्भवला नसता.

गा.पै.

बाकी अमेरीकेच्या नीतीमत्तेला मानलच पाहीजे, नाही का! किती ती शिस्त आणी कायदयाचे उच्च पालन. मग त्या भोपाळच्या वायु दुर्घटना प्रकरणात तो अ‍ॅन्डरसन भाव कसा पळाला? हजारो-लाखो लोकाना उध्वस्त करताना त्या वेळी अमेरीकेला कायद्याचे पालन आठवले नाही का? का त्या जीवान्ची किन्मत कवडीमोल? अरे घरात थोडासा गॅसचा वास सुटला तर जीला पाय लावुन पळणारे लोक, त्याना त्या निरपराध जीवान्बद्दल काहीच वाटत नाही?

आम्ही म्हणे कायद्याचे रक्षक! रक्षक कसले भक्षक आहेत हे.

ताज प्रकरणात यान्चे पण मारले गेले, तरी या निर्ल्लज लोकान्ची पाकड्याना मदत चालूच आहे. आणी फुकटचे तेल मिळावे म्हणून इराण, इराक यान्च्यावर गुरगुर चालुच. याला म्हणतात स्वतःचे ठेवायचे झाकुन आणी दुसर्‍याचे पहायचे वाकुन.

देवयानीबाई आहेत दोषी तर शिक्षा करा त्याना, पण आधी स्वतची जी प्रकरंणे अनादी कालापासुन अव्याहत चालू आहेत ती निस्तरा. वॉलमार्टसारख्याना इथे वाव हवा तो ही स्वतच्या मनमानी व्यापारासाठी. कशाला? आता मग भारतात का पाळायचे नाहीत भारताचे कायदे/ अटी/ नियम? त्याना धाब्यावर बसवणार का?

अमेरीकेत बन्दी घातलेली औषधे इथे एशियात कशाला झक मारायला पाठवता? यान्चे भन्गार भारतीय उपसागरात कशाला तडफडते?

द्या द्या या प्रश्नान्ची उत्तरे, मग नाचा अमेरीकेच्या नावाने झिम्मा फुगड्या घालत.

नन्दिनी धन्यवाद. मस्त लिन्क.

दोन्ही बाजू समोरासामोर ठेवून पाहिल्या, तर गॅप्स दिसतात.
खोटी कागदपत्रे बनविणे, ठरल्यापेक्षा कमी पगार देणे याबद्दल खोब्रागडेंच्या बाजूने कोणी काही बोलताना दिसत नाही. त्यांचे वडील मात्र हे दोन्ही आरोप खोटे असल्याचे सांगतात. संगीताच्या डायरीतली पाने दाखवतात.
संगीता गायब झाल्याची तक्रार नोंदवून घेण्यास (अशी तक्रार फक्त कुटुंबीयच करू शकतात असे सांगून) नकार देणार्‍या अमेरिकन यंत्रणेचे (जून २०१३) तिच्या गायब होण्यावर काय म्हणणे आहे ते कळत नाही.
http://www.firstpost.com/world/timeline-the-case-of-devyani-khobragade-a...
त्यानंतर अ‍ॅक्सेस इमिग्रेशन (एन्जीओ?) ने संगीता रिचर्ड्स आणि देवयानी खोब्रागडे यांची भेट घालून दिली. ही भेट संगीतासाठी निष्फळ आणि वादळी ठरल्यावर संगीता ह्युमन ट्रॅफिकिंगवाल्यांकडे गेली असे दिसते. |Access Immigration has declined comment other than to say the group is no longer working on Richard's case"

----
कालच्या एन्डीटीव्हीवरच्या वुई द पीपल या कार्यक्रमात एका अमेरिकन पत्रकाराला, पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांचे शिरकाण करतात, चीनी सैन्य तुमच्या हद्दीत ठाण मांडून बसते तेव्हा तुमचे भारतीयांचे रक्त खवळत नाही, ते आताच का खवळते असा प्रश्न पडला होता.
त्याच पत्रकाराला अमेरिकन अधिकारी वेगवेगळ्या देशांत असताना तिथले नियम पाळण्याबाबत किती काटेकोर असतात? की खून करून ब्लड मनी देऊन सुटका करून घेतात (पाकिस्तान), कारने स्थानिक नागरिकाला उडवून मारल्यावर देश सोडून पळून जातात? (केनयातला अमेरिकन डिप्लोमॅट) असे प्रश्न विचारले गेले. तेव्हा तो भारतातील मोलकरणींच्या प्रश्नांवर काम करणार्‍या एन्जीओवाल्या बाईंना, "ताई मला यातून सोडवा" असे म्हणाला.
-----
अमेरिकेत कायद्यांचे, नियमांचे पालन काटेकोरपणे होते हे मान्य केले तरी ते नियम बिनडोक (जसे इथले कलम ३७७) आहेत असे म्हणायला जागा आहे. शारीरिक/सशस्त्र प्रतिकार करण्याची शक्यता नसलेल्या व्यक्तीची कपडे उतरवून आणि खोलात जाऊन तपासणी करण्याची गरज आहे का हे तरतम्य त्या नियमात दिसत नाही. कोणाचे शोषण होऊ नये म्हणून केल्या गेलेल्या कायद्यांचा अशातलेच काही लोक गैरफायदा घेत असतील हे लक्षात घेतले जाते का?

नंदिनी,

दुव्याबद्दल धन्यवाद. लेखावरून दिसतं की अगोदर घरगुती नोकरास पगारातून वजावट मिळत असे. पण २०११ सालापासून ती रद्द केल्यानंतर पूर्वीची पद्धत 'बेकायदेशीर' ठरली. या गैरसोयीबद्दल आवाज का उठवला गेला नाही, ते जाणून घ्यायला आवडेल. प्रकरण गळ्याशी आल्यावर आपले अधिकारी लोक जागे झाले.

आ.न.,
-गा.पै.

प्रभुदयाल यांच्या केसमध्ये भारत सरकारने ७५००० डॉलर्स भरले होते.

प्रभु दयाल यांच्या प्रकरणानंतरही भारतीय अधिकारी आणि सरकार धडा घेत नाही असाच खोब्रागडे प्रकरणाचा अर्थ होतो.

इथेच तर आपले मुत्सद्दी नेते मार खातात. जर अमेरीकेने भारताला आधी हे कळवले होते तर नुसतेच केन्द्र सरकार नाही तर विरोधी पक्षानी सुद्धा याबाबत केन्द्राकडे शहानिशा करायला हवी होती. आणी जर केली असेल तर तर मग आपले सरकार तेव्हापासुन काय करत होते हाच प्रश्न आहे. अगदी इलेवन्थ अवरला जागे होण्यात काय पॉईन्ट आहे देव जाणे.

मग डिप्लोमॅट्स या शब्दाचा खरा अर्थ काय होतो? डिप्लोमसीचा खरा अर्थ काय? कॉमन सेन्स कशाशी खातात?

आपल्या सारख्या सर्वसामान्याना जे प्रश्न पडतात, ते या इन्टरनॅशनल लेवलवर काम करणार्‍याना पडु नयेत?

प्रभू दयाल यांचा लेख संपूर्ण खरा मानला, तर उलट भारत सरकारने व्हिसा कागदपत्रे 'एअरटाईट' करण्याबद्दल जास्त काळजी घेणे आवश्यक होते असेच दिसते.

भारत सरकारला यातून नक्की काय साध्य करायचे आहे कळत नाही:
१. देवयानी या मुळात निर्दोष आहेत हे अमेरिकन सरकारला पटवून देणे. हा उद्देश दिसत नाही. किंबहुना त्या या प्रकरणात निर्दोष आहेत असा क्लेम भारतातही फारसा कोणी केलेला नाही.
२. डिप्लोमॅटिक इम्युनिटी. राजनैतिक अधिकार्‍याला अशी वागणूक देणे भारताला पसंत नाही असे अमेरिकेला ठणकावून सांगणे, व त्याकरिता राजनैतिक पातळीवर हे गंभीरपणे घेणे. अमेरिका व भारत यांत काहीतरी गंभीर वाद चालू आहे असे आंतरराष्ट्रीय पातळीवर व अमेरिकन प्रसारमाध्यमांतही जाणवून देणे. भारतासह इतर असंख्य देशांनाही अडचणीत आणणारा हा प्रश्न systemic पातळीवर सोडवणे.
३. आपण काहीतरी करत आहोत असे भारतीय जनतेला दाखवणे, ही बातमी थंड होईपर्यंत. यात भारतातील "प्रखर राष्ट्रवादी" प्रतिमा असणारे पक्ष (भाजप, सेना ई) व "दलितांचे तारणहार" प्रतिमा असणारे पक्ष (मायावती, रिपाईं ई) यांना गप्प करणे. हे अंतर्गत धोरण.

यात "१" वर फारसा जोर दिसलेला नाही. त्यामुळे "२" किंवा "३" यातील काहीतरी गृहीत धरले, तर सुरूवातीला "२" प्रमाणे वाटणारी सरकारची प्रतिक्रिया आता "३" सारखी वाटू लागली आहे.

खुद्द मेन्स्ट्रीम अमेरिकन मीडियामधे जेवढी व्हायला हवी तेवढी चर्चा झालेली दिसत नाही. न्यू यॉर्क टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, वॉशिंग्टन पोस्ट इ मधे येणार्‍या बातम्या प्रामुख्याने व्हिसा फ्रॉड बद्दल, किंवा भारतातील उच्चपदस्थ लोकांना असलेल्या नियम वाकवण्याच्या सवयीबद्दल दिसल्या (क्वचित एखाद दुसरी "राजदुतांशी अश्या वागण्याबद्दल" किंवा "महिलांच्या बाबतीत भारतातील कल्चर वेगळे असण्याबद्दल" होती, पण त्या ठळकपणे सर्वत्र दिसत नाहीत). दुसरे म्हणजे अमेरिकन रिपब्लिकन पार्टी लिबिया, सीरिया नंतर ओबामा सरकारच्या परराष्ट्रीय धोरणातील 'फेल्युअर' म्हणून (current and future ally) भारताला दुखावण्याबद्दल मुद्दा काढेल असे वाटले होते तसेही काही दिसत नाही (फॉक्स न्यूज वगैरे पाहता).

भारतातील बर्‍याच जणांना यातील खाचाखोचा माहीत नसतील, त्यामुळे सगळी अमेरिका एकच अशा थाटात भारतात वक्तव्ये केली जातात (राजकीय, मीडिया कडून). पण गेल्या अनेक वर्षांत येथील जनमत भारताला बरेच अनुकूल झालेले आहे. हा प्रश्न नीट पद्धतीने अमेरिकन जनतेसमोर मांडला गेला असता तर अपेक्षित परिणाम होऊ शकला असता. सिरीयाच्या वेळी पुटिन सरकारने न्यू यॉर्क मधलीच एक पी आर फर्म पकडून बरेच उद्योग केले होते (उदा: न्यू यॉर्क टाइम्स या 'लिबरल' पेपर मधे ओबामावर टीका करणारा लेख. सध्या लिबरल म्हणजे प्रामुख्याने ओबामाधार्जिणा पेपर असे समजावे. त्यामुळे याचे महत्त्व होते) तसे भारताने काही केलेले दिसत नाही.

एकूण सुरूवातीला बराच जोर होता, पण हळुहळू विरत चाललेला दिसतो.

फारेण्डा,
जगात प्रत्येक गोष्टीचा जोर हळू हळू विरतोच. अगदी बाप मेल्याचे दु:खही १२-१४वा घातल्यानंतर विरत जाते..

तुम्ही माबो सोडून इतरत्रही सक्रिय आहात. चौरस विचार ऐकत आहात.

धंदेवाईकपणे लिटिगेशन, अँबुलन्स चेसिंग लॉयर्स, इ. अमेरिकन नॅशनल पास्टटाईम आहे, किंबहुना कोण कुणाला कशावरून स्यू करेल ते सांगणे कठिण. अन त्या स्युइंग पायी अनाकलनीय रकमा/शिक्षा देणे ही देखिल अमेरिकन खासियत आहे असे म्हणतात.

इतर साईट्स/सोर्सेस वर ऐकलेल्या चर्चेतून पुढे आलेले मुद्दे देखिल लिहा की! अमेन्स्ट्रीम अमेरिकन मेडिया कशाला झक मारयला चर्चा करील? त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे का तो?
*
आता चीरफाड स्टाईल उत्तरः

>>
१. देवयानी या मुळात निर्दोष आहेत हे अमेरिकन सरकारला पटवून देणे. हा उद्देश दिसत नाही. किंबहुना त्या या प्रकरणात निर्दोष आहेत असा क्लेम भारतातही फारसा कोणी केलेला नाही.
<<
कुणीही करणार नाही, कारण भारताला न्यायाची चाड आहे. आमचा आक्षेप हिडिस वागण्याला आहे. कायदेपालनाला नाही. इतपत क्रेडिट भारताला दिलेत तरी पुरे.

>>२. डिप्लोमॅटिक इम्युनिटी. राजनैतिक अधिकार्‍याला अशी वागणूक देणे भारताला पसंत नाही असे अमेरिकेला ठणकावून सांगणे, व त्याकरिता राजनैतिक पातळीवर हे गंभीरपणे घेणे. अमेरिका व भारत यांत काहीतरी गंभीर वाद चालू आहे असे आंतरराष्ट्रीय पातळीवर व अमेरिकन प्रसारमाध्यमांतही जाणवून देणे. भारतासह इतर असंख्य देशांनाही अडचणीत आणणारा हा प्रश्न systemic पातळीवर सोडवणे.
<<
भारताचे पंतप्रधान व परराष्ट्र मंत्री जाहीरपणे प्रसारमाध्यमांना काही सांगतात, त्याची किंमत xष्प असते काय? काय अमेरिक प्रसारमाध्यमांच्या डोक्यात दगड घातल्यावर अक्कल येईल का त्यांना? ऑफ कोर्स भारताने ठणकावून सांगितले आहे. व गंभीरपणे घेतलेच आहे.

systematic पातळीवर जे काय करायचे, ते करायला भारतीय परराष्ट्र मंत्रालय व डिप्लोमॅटिक कोर सक्षम आहे. त्यांना अधिक गाईडलाईन्स देता येण्यासारख्या असतील तर कृपया इथे लिहा.

>>३. आपण काहीतरी करत आहोत असे भारतीय जनतेला दाखवणे, ही बातमी थंड होईपर्यंत. यात भारतातील "प्रखर राष्ट्रवादी" प्रतिमा असणारे पक्ष (भाजप, सेना ई) व "दलितांचे तारणहार" प्रतिमा असणारे पक्ष (मायावती, रिपाईं ई) यांना गप्प करणे. हे अंतर्गत धोरण.<<
भाऊ, भाजपा इ. विरोधकांनीही एकमुखाने विरोध नोंदविला आहे. माझी १०५ पोस्ट वाचा.
भारतात यांनी एकमेकांच्या गच्च्या धराव्यात, जगासमोर एकजूट दाखवावी ही अपेक्षा फॉर अ चेंज खरी ठरलिये. कसले घंट्याचे अंतर्गत धोरण बोलताहात तुम्ही? अंतर्गत धोरणाबद्दलचे वाक्य सरळ सरळ दिशाभूल करणारे आहे असे म्हणतो.

>>
भारतातील बर्‍याच जणांना यातील खाचाखोचा माहीत नसतील, त्यामुळे सगळी अमेरिका एकच अशा थाटात भारतात वक्तव्ये केली जातात (राजकीय, मीडिया कडून).
<<
हाय्ला!
देवयानीताईंची माझी व्यक्तिगत ओळख सांगू, अमेरिकेतील नागरिकत्व पत्करलेल्या, तिथल्या माझ्या जवळच्या नातेवाईकांची यादी सांगू, की माझ्या पासपोर्टात तिकडं किति दिवस र्‍हायलो ते सांगू? अजून काय सांगू राजे? की दॅट विल व्हॅलिडेट माय ओन लिटल अंडर्स्टँडिंग ऑफ द युनाईटेड स्टेट्स?
भारतात बरेच जण रहातात. उदा. १३० कोटी वगैरे. त्यातल्या सुमारे १००-१२५ कोटी लोकांना या प्रकरणाची गंधवार्ताही नाहिये. त्यामुळे 'बर्‍याच जणांना खाचाखोचा ठाऊक नसतील' हे ओके, पण,
पण जे बोलताहेत, ते सगळेच माठ अन अमेरिका काय हे ठाऊक नसलेलेच आहेत, हे कशावरून? हा विदा तुम्हास कसा प्राप्त झाला? राजकिय = पंतप्रधान व परराष्ट्र मंत्रालय मूर्ख आहेत काय? भारत म्हणजे काय सगळीच सडक्या आंब्यांची पेटी आहे का? की कुणालाच काय बोलावे त्याचा पाचपोच नाही?? सगळेच सडके???

*

पीआर फर्म कशाला हवी?

माझ्यासारखे भारतीय लोक फुकट पीआर करू शकत नाहीत का? की देशप्रेमासकट सगळेच धंदेवाईक आहे अमेरिकेत?

उग्गं कैपण लिहित आहात तुम्ही इथे तरी.

रच्याकने:
'सगळी अमेरिका एकच'
एक गम्मतः सगळी माबो एकच नाही. माबोवर दोन ग्रूप आहेत. एका ग्रूपमधे इब्लिस आहे, दुसर्‍यात बाकी सगळे. Wink
अशीही विभागणी करता येते.

*

च्या*ला! भारतातून त्या मेडच्या फ्यामिलीला 'इव्हॅक्युएट' करतात! फारच माज आहे हा. जणू हितं युद्ध पेटलंय. एकदम भिक्कारचोट अ‍ॅटिट्यूड! जौद्या. लैच भडकलंय माझं.

प्रभू दयाल यांचा लेख संपूर्ण खरा मानला, तर उलट भारत सरकारने व्हिसा कागदपत्रे 'एअरटाईट' करण्याबद्दल जास्त काळजी घेणे आवश्यक होते असेच दिसते.
<<
तुम्हाला जे "दिसते", ते तुमच्या 'चष्म्याच्या' ताकती/ऐपतीनुसारच दिसते असे म्हणतो. अदरवाईज दिसण्यासारखे तिथे बरेच काही आहे..

देवयानी या मुळात निर्दोष आहेत हे अमेरिकन सरकारला पटवून देणे. हा उद्देश दिसत नाही. किंबहुना त्या या प्रकरणात निर्दोष आहेत असा क्लेम भारतातही फारसा कोणी केलेला नाही>> +१

आमचा आक्षेप हिडिस वागण्याला आहे. >>+१ असली वागणुक तेही राजनैतिक अधिकार्‍याला निषेधार्हच आहे.
पण अमेरीकेने अश्याप्रकारची वागणुक भारतातील अनेक राजकीय मान्यवरांना विमानतळावर दिली आहे. वेळोवेळी भारत सरकारने असेच प्रत्युत्तर दिले असते तर कदाचित ही वेळ आलीच नसती असे वाटते.

कधीनव्हे ते भारत सरकार देवयानी खोब्रागडे केस संदर्भात थोडे आक्रमक झाले ते हे प्रकरण फक्त अजुन काही असल्याची जास्त शंका येत आहे.

परवा आझमखान यांनी पत्रकारांना सांगितले की त्यांना विमानतळावर अशीच वाईट वागणुक मिळाली म्हणुन त्यांनी याच देवयानी कडे तक्रार केली आणि त्यावेळी दे.खो. यांनी अमेरीकेतील कायद्याबद्दल आझमखान यांना ज्ञान पाजळले (संदर्भः मटा वृत्त)

जे काही वाचलय त्यानुसार नि माझ्या 'चष्म्याच्या' ताकती/ऐपतीनुसार
१. मेडला अमेरिकेत स्थायिक व्हायचे होते त्यामूळे हा प्रकार सुरू झाला.
२. देवयानी ने तत्कालीन प्रघातानुसार चुकीचे नि दिशाभूल करणारे visa application दिले त्यामूळे तिची american legal system प्रमाणे पंचाईत झालेली आहे. Contrary to the popular belief, norms for A3 visa state that
"he contract must state that the employer agrees to abide by all Federal, State, and local laws in the United States". तशात state government च्या म्हणण्याप्रमाणे विसा हा प्रिविलेज आहे, त्यामूळे वरचे वाक्य हवे तसे वाकवण्याची मुभा visa issue करणार्याला मिळते.
३. ह्याव्यतिरिक्त, ह्या प्रकरणाचा उपयोग करून बाकीचे आपापले मागचे हिशेब वगैरे चुकते करून घेत आहेत. त्यामूळे मेड नि देवयानी दोन्ही आपापल्या परीने इथे victims म्हणायला लागतील.

१. मेडला अमेरिकेत स्थायिक व्हायचे होते त्यामूळे हा प्रकार सुरू झाला.
<<
प्रश्नच मिटला.
माझ्या चष्म्यातून पाहिल्याबद्दल धन्यवाद!

प्लस तुमच्या सग्ळ्याच प्रतिसादाला +१

आमचा आक्षेप हिडिस वागण्याला आहे. कायदेपालनाला नाही. इतपत क्रेडिट भारताला दिलेत तरी पुरे

त्यात हिडिस काय आहे ? अशा प्रकारची तपसणी ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. ती हिडिस वाटणे हा cultural भाग वाटतो. अशा प्रकरचा व्हिसा फ्रॉड एखाद्या देसी कंसल्टंट ने केला असता तर त्याचीही अशीच तपासणी झाली असती. अशी तपासणी होणे यात मलातरी काहीही गैर वाटत नाही. किंबहुना माझ्यावर असा प्रसंग आलाच तर त्या कार्यालयात आलेल्या सर्वांची अशी तपासणी होणार असेल तर माझीही तशी तपासणी झालेलीच मला आवडेल. सतरा प्रकारचे आरोपी जिथे असतात तिथे सर्वांची तपासणी झाली असे कळले तर जरा सुरक्षित वाटेल.

IFS चा Indian Feudal Service हा मजेशीर लाँग फॉर्म वाचला Happy

त्यात हिडिस काय आहे ? अशा प्रकारची तपसणी ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. ती हिडिस वाटणे हा cultural भाग वाटतो. अशा प्रकरचा व्हिसा फ्रॉड एखाद्या देसी कंसल्टंट ने केला असता तर त्याचीही अशीच तपासणी झाली असती. अशी तपासणी होणे यात मलातरी काहीही गैर वाटत नाही. किंबहुना माझ्यावर असा प्रसंग आलाच तर त्या कार्यालयात आलेल्या सर्वांची अशी तपासणी होणार असेल तर माझीही तशी तपासणी झालेलीच मला आवडेल. सतरा प्रकारचे आरोपी जिथे असतात तिथे सर्वांची तपासणी झाली असे कळले तर जरा सुरक्षित वाटेल.
<<
पटले नाही.

व्हिसा फ्रॉड प्लस पगार नीट न देणे = कॅव्हिटी सर्च? काय अंतर्वस्त्रांत पगार लपवला होता का तिने?
ही स्टँडर्ड प्रोसिजर नाही, याची अनेक अमेरिकन उदाहरणे आहेत.
प्लीजच हं विकु.

अन हो,
अमेरिकन कॉन्सुलेट मधल्या या बाईंपेक्षा कमी दर्जाच्या माणसाने दक्षिण भारतीयांबद्दल केलेल्या 'रेशिअल डिस्क्रिमिनेशन असलेल्या' वाक्यांसाठी अमेरिकेने डिप्लोमॅटिक इम्युनिटी क्लेम केलेली आहे.
हे चुकीचे लिवलेय का मी??

>> कुणीही करणार नाही, कारण भारताला न्यायाची चाड आहे.
म्हणून का मेडच्या नवरा आणि मुलाबाळांना अटक केली होती भारतात? 'आदर्श' प्रकरणात काय कारवाई झाली देवयानी किंवा तिच्या वडिलांवर?

>> भारताचे पंतप्रधान व परराष्ट्र मंत्री जाहीरपणे प्रसारमाध्यमांना काही सांगतात, त्याची किंमत xष्प असते काय? काय अमेरिक प्रसारमाध्यमांच्या डोक्यात दगड घातल्यावर अक्कल येईल का त्यांना? ऑफ कोर्स भारताने ठणकावून सांगितले आहे. व गंभीरपणे घेतलेच आहे.
ठणकावून सांगितले आहे म्हणजे नक्की काय? त्याने काय फरक पडला? देवयानीवरचा खटलासुद्धा मागे घेतलेला नाही अमेरिकेने. शिवाय नंतरचे गुळमुळीत उद्गार (तुम्ही एलओएल केलेले) ऐकलेच की आम्ही!

>> systematic पातळीवर जे काय करायचे, ते करायला भारतीय परराष्ट्र मंत्रालय व डिप्लोमॅटिक कोर सक्षम आहे.

या प्रकरणात तरी ते इम्मॅच्युअर आहे असंच दिसलं आहे.

>> मेन्स्ट्रीम अमेरिकन मेडिया कशाला झक मारयला चर्चा करील? त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे का तो?
मेनस्ट्रीम अमेरिकन मीडिया फक्त जीवनमरणाच्याच प्रश्नांवर चर्चा करते असं तुमच्या कुठल्या जवळच्या नातेवाईकाने तुम्हाला सांगितलं?

>> पीआर फर्म कशाला हवी? माझ्यासारखे भारतीय लोक फुकट पीआर करू शकत नाहीत का? की देशप्रेमासकट सगळेच धंदेवाईक आहे अमेरिकेत?
आँ?!

>> च्या*ला! भारतातून त्या मेडच्या फ्यामिलीला 'इव्हॅक्युएट' करतात! फारच माज आहे हा.
मग तुमच्या सक्षम भारतीय सरकारने त्यांना अडवलं का नाही म्हणे? त्यांच्या नाकाखालून पळून गेली की मंडळी!

ही स्टँडर्ड प्रोसिजर नाही, याची अनेक अमेरिकन उदाहरणे आहेत. >> अहो नाही, fourth amendment लागू करणे जरुरी नाही असा निवाडा Supreme court ने १-२ वर्षांपूर्वीच दिला होता, कुठल्या तरी jersey मधल्या आफ्रो अमेरिकन व्यक्तीच्या खटल्याबाबत. ह्याबाबत बर्‍याच controversy इथेही आहेत पण शेवटी त्याचा निर्णय हा त्याची अमंल बजावणी करणार्‍या agency वर सोपवलेला आहे. strip search खटकणे विकु म्हणतात तसा cultural aspect चा भाग आहे.

जे काही वाचलय त्यानुसार नि माझ्या 'चष्म्याच्या' ताकती/ऐपतीनुसार
१. मेडला अमेरिकेत स्थायिक व्यायचे होते त्यामूळे हा प्रकार सुरू झाला.
---- असहमत... सर्व प्रकरणाला सुरवार झाली जेव्हा देवयानी यानी विसा अर्जाच्या वेळी कागदावर एक पगार मान्य केला आणि प्रत्यक्षात १/३ पेक्षाही कमी पगार दिला वर जादा तास काम करायला लावण्याचा हिडीस प्रकार केला.
मेडचा पासपोर्ट रद्द करुन भारताने तिचा मार्गच बन्द केला... आपल्याच नागरिकाना आपण अशी ट्रिट्मेन्ट कशी देतो ? भारताने पारपत्र रद्द कराण्याचे कारणच काय होते? तिने १.७५ $/ तास काम करायला नापसन्ती दाखवली म्हणुन?

३. ह्याव्यतिरिक्त, ह्या प्रकरणाचा उपयोग करून बाकीचे आपापले मागचे हिशेब वगैरे चुकते करून घेत आहेत. त्यामूळे मेड नि देवयानी दोन्ही आपापल्या परीने इथे victims म्हणायला लागतील.
---- सगिता रिचर्डस या जरुर victim असतील. आधी त्यान्नी देवयानी यान्ची मोठी फसवणुक केली, प्रचन्ड मानसिक छळ केला, चोरीचे खोटे आरोप लावण्याचा प्रयत्न झाला (घरातील काय काय वस्तु चोरल्या हे पण देवयानीच्या नवर्‍याला पोलिसान्ना सान्गता आल्या नाहीत आणि नन्तर तो फिरकला पण नाही - हा भाग वेगळा)

IFS चा Indian Feudal Service हा मजेशीर लाँग फॉर्म वाचला स्मित
<<
नाही.
असल्या पाचकळ बाबींकडे दुर्लक्ष करावयाचे अस्ते.

IFS = Indian Foreign Services.

ही एक कठीण परिक्षा असते, आयएएस सारखी.
हुशार लोक लागतात.
अनेकदा इतर सोप्या पैसे कमावून देणार्‍या इतर लोकल लाचखाऊ पोस्ट्स पेक्षा/ किंवा कित्येकदा अनेक लोक 'आयटी कुलीज' म्हणतात त्यापेक्षाही अधिक कव्हेटेड व मिळवायला कठिण अशा या जागा असतात. असोच.
शेव्टी ख्रिस्मस स्पिरिट आहे.

विकु: - कोठडीत रवानगी करताना स्ट्रीप सर्च करतात. जेणेकरुन तुमच्याकडील एखादी वस्तुमुळे इतरांना इजा होउ शकेल (अगदी सेफ्टी पीन सुद्धा). पण कॅव्हीटी सर्च हे जरा अती झाले असे वाटते. कॅव्ह्टी सर्च हे ड्रग संदर्भात किंवा खुन वगैरे संदर्भात करतात. राजनैतिक अधिकार्‍याला का अशी वागणुक?

इबा,
जे केलं त्याला नंतर 'इव्हॅक्युएशन' म्हणणे,
मेडला जास्त महत्व देणे,
लै गमती आहेत हो.
माझ्याकडे रूटीनली सुमारे ४० फॅमिलीजची पिळवणूक करतो मी. वार्षिक पगार फारतर १.२० ते ३ लाख रुपये. दहा ते २५ हजार रुपये महिना. प्लीजच तुमच्या अमेरिकन सरकारला या सगळ्यांना इव्हॅक्युएट करायला लावा की. प्लीऽज?

*
सध्या जेवायला गोइंग. नंतर लिवतो जमल्यास.

१. मेडला अमेरिकेत स्थायिक व्यायचे होते त्यामूळे हा प्रकार सुरू झाला.
---- असहमत... सर्व प्रकरणाला सुरवार झाली जेव्हा देवयानी यानी विसा अर्जाच्या वेळी कागदावर एक पगार मान्य केला आणि प्रत्यक्षात १/३ पेक्षाही कमी पगार दिला वर जादा तास काम करायला लावण्याचा हिडीस प्रकार केला. >> उदय माझा दुसरा मुद्दा बघ. परत मेडचा राहण्या खाण्याचा खर्च नि देशात जमा केलेली रक्कम धरता नक्की पगार किती दिला गेलाय हे अजून्ही कुठेही मी वाचलेले नाही त्यामूळे ह्या सर्व प्रकरणाची सुरुवात तिच्या अमेरिकेत स्थायिक व्हायचा इच्छेने जे काही केले गेले तिथून सुरू झाली. Be it approaching NGO in NY or approacing for job in first place. Again I'm not pointing fingers at her or at anyone for that matter.

भारताने पारपत्र रद्द कराण्याचे कारणच काय होते? > It is purely procedural matter, Her A3 visa was granted for her being somestic worker for diplomatic employee. ती घरातून पळून गेली हे ज्या दिवशी उघड झाले त्यानुसार deplomatic पारपत्र रद्द करणे हे proceddural आहे असे मी वाचले होते.

कॅव्ह्टी सर्च झाला नाही असे सांगितलेले ना ?

कॅव्ह्टी सर्च हे ड्रग संदर्भात किंवा खुन वगैरे संदर्भात करतात. राजनैतिक अधिकार्‍याला का अशी वागणुक?
<<
अरे नै हो!
त्यांना त्यामुळे सेफ वाटतेय अम्रिकेत. सेफ्टीपिन तर नक्कीच लपवली असेलेय त्या दुष्ट बाई ने.
अरे हूट!

त्या प्रीत भराराने स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिल्या म्हणून या सर्च केल्या गेल्या असे अमेरिकन पोलिस म्हणताहेत.

हे मी चुकीचे लिहिले आहे का?

असेल तर सांगा, लिंका देतो, 'अमेरिकन' मेडिया च्या. इथं आमच्या सुहृह्दांना सीएनेन वर भरोसा आहे फक्त.

अमेरिकन कॉन्सुलेट मधल्या या बाईंपेक्षा कमी दर्जाच्या माणसाने दक्षिण भारतीयांबद्दल केलेल्या 'रेशिअल डिस्क्रिमिनेशन असलेल्या' वाक्यांसाठी अमेरिकेने डिप्लोमॅटिक इम्युनिटी क्लेम केलेली आहे.

याचा मूळ चर्चेशी असलेला संबंध ध्यानात आला नाही. अमेरिकेने लाख क्लेम केली असेल, पण ती द्यायची की नाही हे भारताने ठरवायचे ना ? शिवाय त्यांनी क्लेम केली म्हणून आम्हीही क्लेम करणार हे काय ? two wrongs do not make one right.

उदय +१, त्या मेड ने अमेरिकेचा व्हिसा मिळवायच्या आशेने तक्रार केली असेल्, पण मुळात कागदावर एक आणी प्रत्यक्षात एक असा पगार देणे गुन्हा आहे आणी रामायण तिथेच सुरु झाले हे मान्य असायला हरकत नसावी. बाकी आपण सर्वांनी आपला रक्तदाब कमीच ठेवणे हिताचे आहे. पूर्वी शरद पवार आणी बाळ ठाकरे एकत्र बीयर पीत असत आणी त्यांचे गावोगावचे समर्थक एकमेकांची डोकी फोडत तसे व्हयला नको. शुभ नाताळ !

Pages