आधुनिक सीता - २४

Submitted by वेल on 19 December, 2013 - 04:30

भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297
भाग २२ - http://www.maayboli.com/node/46425
भाग २३ - http://www.maayboli.com/node/46658

**********************************************

"मला पूजा वगैरे काही नाही करायची. मला फक्त उन्हात जायचय बाहेर. अगदी तुझ्या घराच्या बागेत सुद्धा घेऊन गेलास किंवा तुझ्या घराच्या टेरेस मध्ये तरी चालेल. हव तर प्रिझनर्स ना घालतात तसे हँड्कफ्स घालून बाहेर नेलस तरी चालेल पण मला जरा मोकळ्या हवेत, मोकळ्या उन्हात जायचय. नेशील? हव तर डोळे बांधून ने. पण प्लीज मला मोकळ्या हवेत ने."

हे ऐकल्यावर रफिक हसतच सुटला.
"तुला बाहेर जायची काय गरज आहे? तुला सगळं मिळतय इथे." अगदी टिपिकल पुरुषी विचार. पण मला त्याच्याशी वाद नव्हता घालायचा. हा प्रश्न येणार हे मी गृहितच धरलं होतं. माझं उत्तर तयार होतं.

"बाहेर जाणं हे काही मिळत नाही आहे म्हणून नाही रे पण मी पुण्यात जन्मलेली वाढलेली. सूर्यप्रकाशात खेळलेली, मोकळ्या हवेत फिरलेली. मी तुला हे नाही म्हणत की तू मला मोकळ्या हवेत सूर्य्प्रकाशात रोज फिरायला ने. पण मला गेले काही दिवस खूप थकायला होतं. सूर्य्प्रकाशाच्या कमतरतेने असू शकेल ना? सूर्यप्रकाशात नाही गेलं तर व्हिटॅमिन डी कमी होतं मग कॅल्शियम कमी होतं मग थकवा येतो. असं असू शकेल ना? म्हणून विनंती केली."

"तुला व्हिटॅमिन सप्लिमेंट्स मिळतील ह्याची व्यवस्था करतो." मला खरतर थकवा जाणवत नव्हता पण काहीतरी कारण सांगायचं म्हणून मी सांगितलं होतं. पण आता रफिकला अजून कसं कन्विन्स करायचं मला सुचेना. त्यामुळे ह्या विषयावर बोलणंच खुंटलं. रफिकने त्याच दिवशी संध्याकाळी व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणून दिल्या आणि मी त्या घेते आहे की नाही ह्यावर फातिमा लक्ष ठेवायला लागली. महिनाभरात परिणाम दिसू लागले. कितीही योगासनं केली तरी शरीराच चलन वलन होतं कमीच झालं होतं. त्यात व्हिटॅमिन्स सप्लिमेंट्स. वजन वाढत होतं. आणि एक दिवस मला माझे कपडे घट्ट होऊ लागले.

"रफिक, माझं वजन वाढलय. माझे कपडे मला घट्ट होत आहेत. हे कपडे ऑल्टर करण्याची काही व्यवस्था होऊ शकेल का?"

"फातिमाला सांग ती तुझे कपडे ऑल्टर करून आणेल आणि हवे तर तुला नवीन कपडे आणून देइल."

"तू मला असं तुरुंगात ठेवल्यासारखं का वागवतोस? "

"म्हणजे काय? मी तुला सांगितलं ना की मला फक्त तुझं प्रेम हवय. तुला बाकी कशातही काहीही करायची गरज नाही. "

"तुझ्यामते मला काही करायची गरज नाही, पण माझं काय मत आहे माहित आहे? मला सूर्य्प्रकाशात फिरायचं आहे. मोकली हवा खायची आहे. चालायचं आहे. कामं करायची आहेत. स्वतःसाठी तुझ्यासाठी जेवण बनवायचं आहे. बाकी काही काम नसल्याने हे कपडे ऑल्टर करायचं कामही माझं मला करायचं आहे. तू मला काहीच का करू देत नाहीस? काहीच नाही तर एम्ब्रॉयडरी करणं, निटिंग करणं हे तरी करायचं आहे. मला तुझ्या घरच्यांमध्ये मिसळायचं आहे. मला ते काय बोलतात ते नाही कळलं तरी चालेल पण कोणाशी तरी बोलायचं आहे. मी गेले सहा महिने इथेच आहे. फक्त तुला आणि फातिमाला भेटते. माझा व्यवसाय काय होता माहित आहे ना. मी कौन्सिलर होते. मला रोज खरंतर लहान मुलांमध्ये राहायची सवय. पण इथे लहान मुलं नसतील तरी चालेल पण मला माणसात राहायचं आहे रे. मला असं एकटं राहून वेड लागेल. तुला माझं प्रेम हवं आहे म्हणतोस. माझं वजन वाढायला लागलय. मी कोणासाठी काहीही करू शकत नाहीये. असं झाल्याने माझं स्वतवरचं प्रेम कमी होईल, मग मी तुझ्यावरच काय उद्या स्वतचं मूल जरी झालं ना तरी त्याच्यावर प्रेम नाही करू शकणार. माझा स्वत:च्या मनावरचा ताबा सुटू लागला तर तुला माझ्यासाठी सायकिअ‍ॅट्रिक मेडिसिन्स सुरू करावी लागतील. का माझा असा बळी देतो आहेस? त्यापेक्षा मला तुझ्याबरोबर जरा बाहेर घेऊन जा, सूर्य्प्रकाशात, मोकळ्या हवेत फिरू दे. तुझ्या घरच्या बाकीच्या बायकांमध्ये वावरू दे. थोडी कामं करू दे. तुझ्या घरात कोनी मुलं असतील तर त्यांना शिकवू दे. काही नाही तर एम्ब्रॉयडरी, निटिंग, स्टिचिंग मला करू दे. काही तरी करू दे रे मला." आणि असे बोलून मी रफिकच्या मिठीत शिरून रडू लागले. अगदी हुंदके देऊन.

सुरुवातीला जे मी बोलले होते ते ठरवून बोलले होते आणि त्यानंतर मी बोलण्याच्या भरात खरोखर इमोशनल झाले होते. मला रडताना पाहून रफिकसुद्धा थोडा हेलावला असावा. कारण तो मला बरच काही समजावत होता. तो काय बोलत होता ह्याकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. मी रडून रडून इतक्या महिन्याचा भावनांचा निचरा करण्यात गुंतले होते. रफिक मला जसा शाब्दिक समजावत होता तसा तो माझ्या अधिकाधिक जवळ येत होता. हे कधी तरी होणार ह्याचा मला अंदाज होताच. कितीही वाटले तरी मी हे थांबवू शकत नव्हते. आणि तो जवळ येत असताना माझ्या मनात दोन विचारांची ओढाताण सुरू होती. सरते शेवटी माझ्या मनात अजूनही जिवंत असलेल्या सागरवरच्या माझ्या प्रेमाने, आई आजीच्या संस्काराने माझ्या प्रॅक्टिकल विचारांकडून हार मानली. मला मरण येणार नसेल तर मला सुरक्षित जगायचं होतं आणि मी रफिकच्या शारिरीक आवेगापुढे हार मानली....

माझ्या शरीराशी मनसोक्त खेळून झाल्यावर रफिक बाजूला झाला. त्याने मला विचारलं, "आता मूड कसा आहे तुझा? निगेटिव्ह विचार गेले का तुझ्या डोक्यातले. आणि हे बघ तुला बाहेर न्यायचं आणि काय करू द्यायचं वगैरे ते मी योग्य वेळ येईल तेव्हा करेनच. तेव्हा तेच तेच सांगून माझ्या संयमाची परिक्षा बघू नकोस. चल आता तू फ्रेश होऊन घे, काही तरी मस्त खाऊया. आज मी तुझ्यासाठी खास ऑथेंटिक इटॅलियन पिझ्झा बनवायला सांगितला होता."

मेल्या मनाने आणि हसर्‍या चेहर्‍याने ज्यांना जगावं लागतं त्यांना कळलं असेल मला काय वाटत असेल त्या क्षणी. तो अख्खा दिवस माझा रडण्यातच गेला, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून उशीत डोकं खपसून रडायचं.

संध्याकाळी फातिमाने मला कपडे शिवायचं एक पोर्टेबल मशिन आणून दिलं. वेगवेगळ्या रंगाचे धागे आणि एक टोक नसलेली कातर, लहान मुलं क्राफ्टसाठी वापरतात तशी. ह्या कातरीने मशिनचे किंवा रिळाचे धागे तोडता येत होते, उसवता येत नव्हते. मी ही गोष्ट फातिमाच्या नजरेस आणून दिली.. तर तिने मला सांगितलं की कपड्यांची शिलाई उसवून द्यायचे काम ती स्वतः करेल. ती मला ह्याहून वेगळी कातर देऊ शकत नव्हती. माझे पुढचे चार दिवस माझ्या कपड्यांच्या ऑल्टरेशनमध्येच गेले. रफिक दिवसातून दोन वेळा भेटायला येत होता, बुद्धीबळ खेळत होता, गप्पा मारत होता. त्याचा मूड चांगला असेल तर रोमॅण्टीक होत होता. रोमॅण्टिक होता होता कधी माझ्या शरीराचा उपभोगही घेत होता. ह्या काळात माझं मनही निद्रीतावस्थेतच होतं आणि माझे विचारही. पण किती काळ अशी मी निश्क्रीय राहणार होते. पूर्वीच्याच सगळ्या प्रयत्नांनी मी पुन्हा सजग व्हायला लागले. विचार करायला लागले.

असाच विचार करता करता, काही दिवसांनी फातिमाचं एक बोलणं माझ्या लक्षात आलं आणि मी त्यावर विचार करू लागले.फातिमा म्हणाली होती "ह्याहून वेगळी कातर ती मला देऊ शकत नाही."असं का? मी टोकदार कातर घेऊन रफिक वर किंवा त्याच्या घरच्यांवर हल्ला करेन अशी भीती वाटते का त्याला? म्हणून तो मला इतका अडकवून ठेवतो आहे का? पण त्याच्या बोलण्यात कधी असा अविश्वास किंवा अशी भीती दिसत नव्हती. पण मग मी काय करावं म्हणजे मला थोडा मोकळा श्वास घेता येईल.

क्रमशः

http://www.maayboli.com/node/47055

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.................................!!!
मी जर या कथा नायिकेचा भाऊ असतो ना तर याला खरच शोधुन खल्लास केलो असतो..........!!!

विकास दादा - ही कथा भारतातली असती तर वेगळी रंगवली असती. भाऊ शोधून काढतो सूड घेतो वगैरे... बघू इथे तसं काही करता येतय का?

वल्लरीताई, पुढे कदाचित येईलच ना भारतात सरितावर विश्वास बसला तर..........
मग तसे करता येत का ते पहा.......................!!!

तसं झालं तर तुम्ही त्याला खल्लास कराल, मग मला तुमच्यासाठी वकिल बोलवायला लागेल. अरे पण वकिलाची एक गोश्ट तर अर्धवटच आहे. ती पूर्ण करून यायला वकिलाला पण वेळ लागेल. आणि तो रफिक भारतात आल्यावर पुपो खायच्या आधी मेला तर माझ्या डोक्यावर बसेल भूत होऊन. आणि मला काही चांगली पुपो येत नाही. अरे बापरे आली का पंचाईत. आणि समजा तो मेला नाही तर सागरलाच सर्जरी कराय्ला जायला लागेल. मग तो वाचवेल मित्राला का नाही.. ट्विस्ट पे ट्विस्ट मग संपनारच नाही कथा... मग त्या कथेची चादिसा ची कंडिशन होईल...

खुप दिवस लावलात हा भाग टाकायला, पण खुप मस्त झाला आहे.
पुढ्चा भाग लवकर येउ द्यात.

वल्लरीताई, मला वकील शोधताना तुमची वकीलाची अर्धवट गोष्ट पुर्ण होईल.............. त्यासाठीचा चार्ज मात्र मी देईन.....
माझ्या मैत्रिणीला पाठवुन देतो पुपो तयार करायला तसेच तुम्हाला शिकवायलापण................. अन वाचला तर रफिक अन सागरपण जाईल मग वकील शोधायला..........
इथली न्यायव्यवस्था मग दोघांना जन्मभर पुपो अन बिर्याणीच खाऊ घालणार .................

चांगला प्रतिसाद लिहिलाय......... वरची कथा वाचलो मुड गेला अन प्रतिसाद वाचलो तर परत आला म्हणजे मलाच भूत लागलेय वाटते..... त्यासाठी आता अळवणी ही कादंबरी मोबाईलवर डाऊलोड केलीय..... भुत कसे उतरवायचे ते उपाय आहेत याच्यात ते तुम्हाला अन मलापण उपयोगी पडतील.......
नाहीतर आपल्या "बेफिकीर" जीचा अन्या आहेच आता मोठा बाबा झालाय भूत उतरवुन टाकेल...............

वेल,

कित्ती भाग झालेत कथा तिथेच घुटमळत आहे.. "आधुनिक" सीते बरोबर वाचकांना का एकच खोलीत बंदिस्त ठेवताय??
रफिक-फातिमा-कुटुंब, सागर-कुटुंब, सीत-कुटुंब असे संवाद पण येउ द्यावेत...म्हणजे कथेचे ते कंगोरे पण समजतील... तुम्ही लिहिताय तेव्ह्ढच दिसतयं.. बाकी काही विचार करायला दिशा मिळत नाही.. आणि असे स्टॅटिक भुंगे सोडून काही साध्य होणार नाही !! (हे.मा.वै.म.)

बाकी,

रफिक ल एव्हढं समजत असावं की सौदी सरख्या देशात फक्तं उन्हात बाहेर पडून अन डोकं चलवून सीता काहिही साध्य करु शकणार नाही..

का सगळ्यांना (एअरपोर्ट ओथोरिटी, देशातील सरकार, अन खुद्द सीता-तिला बेशुद्ध करून) फसवून सीतेला भारतात आणलं आहे?? अर्थात ते ही सोप्पं नाही म्हणा...

असो...

-गीता.

hee kathaa fakt saritaane jevaDhee anubhavalee tevaDheech aahe. aaj kimvaa uDyaa yaa kathechaa puDhachaa bhaag Taakoo shaken.