कॅन्सर तज्ञांबद्दल माहिती

Submitted by चना@12 on 23 July, 2013 - 12:45

नमस्कार माबोकर्स!

मला अर्जंट मदत हवी आहे.. माझ्या काकांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, गेल्या ३ महिन्यात ट्युमर काढण्यासाठी २ ऑपरेशन्स केली आहेत .. पण ३रा ट्युमरची छोटी सुरुवात झाली आहे .. मिरजेच्या डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही असेच सांगितले आहे Sad

घरी येणारे प्रत्येकजण वेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेवुन आयुर्वेदिक, होमीओपॅथी ओषधे घ्यायला सांगत आहेत.. मेडीकल कॉउन्सेलिंग कोणाला (आत्या नि घरचे लोक) यांना पटलेले नाहीये

काकांना आधीच माईल्ड हार्ट अ‍ॅटक नि शुगर आहे.. सध्या सगळाच गोंधळ आहे कोणते उपचार सुरु ठेवावेत जेणेकरुन साईड इफेक्ट्स होणार नाहीत..

प्लीज कोणाला तज्ञ डॉक्टर्स, उपचार माहिती असल्यास सुचवा .. माबो डॉक्टर्स प्लीज..

सर्वांचे आभार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाटा. मुंबई.
तोंडाचे क्यान्सर सहसा 'चांगले' असतात. लोकली इन्व्हेजिव्ह व स्लो प्रोग्रेस.
लवकर टाटाला जा,
तिथे पिंक स्लिप मिळाली तर मात्र कठीण आहे..

इब्लिस, कैलासजी.. धन्यवाद तुमच्या रेफरन्सने कोणाला लवकर भेट्ता येइल का?
डॉक्टर म्हणाले की जे बॅक्टेरीअल सेल्स आहेत त्यांची वाढ खुप आहे.. जे काही लिक्वीड जेवण चालु आहे ते पण सेल्स खात आहेत

डॉ. अडवाणी..

शुश्रुत हॉस्पिट्ल, चेंबूर मुंबई

फोनः ०२२ २५२६५५००

धन्वंतरी पुरस्कार मिळालेले डॉ. आहेत.

टाटा पहिला पर्याय.
नाहीतर डॉ. सुलतान प्रधान
प्रिंस अली खान हॉस्पिट्ल/ हिंदुजा हॉस्पिट्ल/ ब्रीच कॅन्डी हॉस्पिट्ल, मुंबई.

सध्याच डॉ. प्रधानां चे नाव "स्तनाच्या कर्करोगाचे चुकीचे निदान" अशा काही संदर्भात वाचले. चुकीची माहिती असल्यास क्षमस्व! Uhoh

हो काल डॉ. सुलतान प्रधान यांच्याबद्दल वाचले. त्यांना ग्राहक पंचायतीने दंड ठोठावलाय. एका स्रीला कॅन्सर नसतानाही तिचे कॅन्सरचे ऑपरेशन करून तिच्या शरिरातील काही भाग काढून टाकल्याबद्दल

इथल्या डॉक्टरांकडून जरा एक मदत हवी होती.
माझ्या काकींना cervical cancer डिटेक्ट झाला आहे. स्टेज २-ब आहे. काकी गावाकडून ट्रीटमेंटसाठी सध्या औरंगाबादला आल्या आहेत. औरंगाबादच्या सरकारी दवाखान्याचे कॅन्सर युनिट चांगले आहे असे ऐकले होते. प्रायव्हेटमध्ये सुद्धा २-३ चांगल्या डॉक्टरांची माहिती होती. एकदा सगळ्या टेस्ट्स झाल्या की ट्रिटमेंट सुरु करायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटलं होतं.
त्यात आईने गेली वीस वर्षं सरकारी दवाखान्यात पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला /ब्लडबँकेत काम केल्याने तिच्या सरकारी आणि खाजगी दोन्हीकडच्या डॉक्टरांशी बर्‍याच ओळखी आहेत.

पण ज्यावेळी डॉक्टरांना रिपोर्ट दाखवायला नेले त्यावेळी २-३ डॉक्टरांनी ट्रीटमेंट संदर्भात वेगवेगळे ओपिनियन दिलेत आणि त्यामूळे आता नक्की कुठे उपचार सुरु करावेत याबद्दल घरी सगळेच कन्फ्युज झालेत.
खाजगी मधल्या पहिल्या दोन्ही डॉक्टरांनी आधी केमोथेरपी घ्या आणि मग केमोमूळे कॅन्सर आटोक्यात आल्यावर / श्रिंक झाल्यावर ऑपरेट करून मग गरज पडल्यास रेडिओथेरपी घ्या असे सांगितले.

सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करण्याच्या पुढची स्टेज आहे कीम्वा करता येणार नाही. सरळ आधी रेडीएशन्स घ्यायचे आणि नंतर किंवा सायमलटेनियसली केमो घ्यायची असे सांगितले.

अजून एका खाजगी डॉक्टरने सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांसारखेच ओपिनियन दिले. त्याचबरोबर कदाचीत रेडिओथेरपीनंतर केमो घ्यायची गरजही पडणार नाही असे सांगितलेय. या डॉक्टरला तुमच्या दवाखान्यात उपचार कधी पासून सुरु करता येतिल असे विचारल्यावर त्याने आमच्याकडे रेडिओथेरपी होत नाही. ती तुम्ही सरकारी दवाखान्यातच घ्या. तिथले रेडिओथेरपीवाले डॉक्टर चांगले आहेत. आणि नंतरही फक्त केमोसाठी माझ्याकडे यायची गरज नाही. तिथेच उअपचार करायला हरकत नाही असे सांगितले.

सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टर्सबद्दल चांगलंच ऐकलं आहे. कॅन्सर युनीटबद्दल पण नेहेमी चांगलं ऐकण्यात आलं आहे. पण सुरवातीला ज्या खाजगी डॉक्टरांशी बोलणं झालं ते बहूतेक औरंगाबादमधले सध्याचे टॉपमोस्ट अँकिऑलॉजिस्ट आहेत.

नक्की काय करावं कळत नाहीये. का ट्रीटमेंटसाठी पुण्याला किंवा मुंबईला (टाटामध्ये) यावं?

मोबाइलवरुन डिटेल लिहिणे कठीण.
मी पेशंट पाहिला नाही, जनरल सल्ला देतो.
रेडिओ टार्गेटेड आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणून जास्त चांगली.
औरंगाबाद चे यूनिट चांगले आहे.
टाटा बेस्ट आहे, फाइनल ओपिनियन मिळेल. पण अपॉइंटमेंट कठीण.
२बी ला किमो रेडिएशन अशी कॉम्बो च देतात. आधी रेडिओ च पर्याय योग्य वाटतोय.
जास्त उशीर करू नका डिसिजन ला. आजार वाढत राहिल तिकडे..

ओके. थँक्स. आज सकाळीच बायॉप्सीचा रिपोर्ट मिळालाय. आजचा दिवस या सगळ्या डॉक्टरांच्या भेटीत गेला.

आता उद्याच रेडिओ युनिटच्या अपॉईंटमेंटसाठी जाता येईल. जर लगेचच्या अपॉईंटमेंट मिळाल्या (त्या मिळू शकतिल असं डॉक्टर म्हणाले होते) तर होपफुली सोमवारपासून सुरु होतिल उपचार.

माझे एक नातेवाईक तंबाखु खातात वय 50 पेक्षा जास्त आहे..कॅन्सर ची लक्षण दिसत आहेत..सारखे सारखे तोंड येणे आणि त्यामुळे जेवता न येणे.. अजुन तरी ते जवळ च्या डॉक्टर कडे जातात आणि औषधे घेतात्यात..पण कॅन्सर आहे की नाही ह्याचे निदान करण्यासाठी कुठे जावे??? पेण किंवा नवी मुंबई च्या आसपास कोणी चांगले कॅन्सर चे डॉक्टर सुचवा.. कुणाला काही अनुभव असेल तर सांगा..डॉक्टर चा नंबर मिळाला तर अजुन चांगले ..धन्यवाद.. pls help..

@ मी सुनिता
तोंडाच्या कर्करोगासाठी डॉक्टर सुलतान प्रधान ( ते टाटा रुग्णालयात तोड आणि मान कर्करोगाचे विभाग प्रमुख होते)अनुभव प्रचंड (४० वर्षाहून जास्त) आहे. ते सध्या या रोगासाठी सर्वोत्कृष्ट आहेत. प्रिन्स अली खान रुग्णालय भायखळा पूर्व. भायखळा स्टेशन पूर्व येथे उतरून टैक्सीने २० रुपयात जाता येते.
हजारो रुग्ण उत्तम तर्हेने पाहिल्यावर एखाद्या रुग्णाच्या बाबतीत चूक झाली तरी माफी नाही म्हणून त्यांना ग्राहक न्यायालयात दंड केला असला तरी माझ्या कोणत्याही नातेवाईकासाठी मी डोळे मिटून त्यांच्या कडे जाईन. माझ्या दोन तीन मित्रांच्या आजारात मी त्याचा वैयक्तिक अनुभव घेतलेला आहे प्रिन्स अली खान रुग्णालय येथे उत्तम सोय आहे. कमी दरापासून अलिशान खोलीपर्यंत सर्व श्रेणी उपलब्ध आहेत. पेण किंवा नवी मुंबई ऐवजी तेथेच जा. नाहीतर मग टाटाला जा अशी नम्र सूचना.

माझ्या कोणत्याही नातेवाईकासाठी मी डोळे मिटून त्यांच्या कडे जाईन. +१००

आजच हा धागा वर आलाय..शक्य तितक्या लवकर निदान करुन घ्या प्लीज..

कोणालाही नाउमेद करण्याचा हेतु नाही
आज माझ्या ह्याच काकांच वर्षश्राध्द आहे.. आता वाटतयं त्यांनी थोड्सं आधी सांगितल असतं की दाढेखाली फोड आली आहे,तिखट खाता येत नाही वगैरे तर बरं झालं असत Sad

ते माझे वडील आहेत..माझी झोप उडालेली आहे..त्याना 6 एक महिन्या पासून आधून मधून त्रास होतो आहे..दुर्लक्ष्य केल जात आहे..माझया म्हणण्याला आधी सुद्धा सीरियसली घेतले गेले नाहीए..ते स्वता जनरल डॉक्टर्स कडे जात आहेत...मला हे कळत नाही की जनरल डॉक्टर्स एखादा व्यक्ती तंबाखु खाणारा आहे आणि वय ही 50 वर आहे ..आणि सारखे सारखे तोंड येणे असे प्रकार होत असताना कॅन्सर साठी लागणारई टेस्ट करून घ्या असे का नाही सांगत...? कितीतरी लोक वाचतील..

सुनिता.. सेकंड ओपिनिअन घेवुन टेस्ट करा..
माझ्या काकांना डेंटिस्ट ने सांगितल होत की दाढेजवळ फोड दिसतेय पण त्यांनी दुर्लक्ष केले.. घरीही सांगितल नाही

नुकतेच आमच्या नात्यातील (वडिलांची मामी) एका व्यक्तिस तोंडाचा कॅन्सरचे दुखणे होवून गेले. त्यांचे वय बरेच होते (८६+) तसेच सिनाईल डिमेन्शिआ वगैरे इतरही व्याधी होत्या. मामी वारल्या पण मिरजेच्या डॉ. शरद देसाईंनी त्यांच्यावर अतिशय उत्तम उपचार केले होते. त्यांची शस्त्रक्रियाही यशस्वी झाली होती. सिनाईल डिमेन्शिआचा पेशंट असल्याने (पूर्ण बहिर्‍यापण झाल्या होत्या), कॅन्सर झालाय हे पण कळत नव्हते, ऑपरेशन का केलेय हे कळत नव्हते, रुग्णालयात खूप आरडा-ओरडा वगैरेही केला त्यामुळे त्यांनी. या सर्वातून डॉक्टरांनी शांतपणे आपले काम केले असे मला माझ्या आई-वडिलांनी सांगितले आहे. इतरही काही जणांचा अनुभव अतिशय चांगला आहे. डॉक्टर तसे तरुण (४०च्या आसपास) आहेत. कानडी आहेत, आता मिरजेत स्वतःचं हॉस्पिटल आहे (नाव बहुतेक महात्मा गांधी रुग्णालय).

त.टी.: मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही, ही जाहिरात नाहिये, घरच्यांचा अनुभव इथे शेअर केला इतकेच. ही त्यांची वेबसाइटः http://mahatmagandhicancer.com/desai.htm

टण्या .. ह्याच हॉस्पिटलमधे माझ्या काकांच ऑपरेशन झालं होत २ वेळा..
त्यांच्यासोबत बाकीचे जे पेशंट होते ते अगदी बरे आहेत..

नमस्कार
एका मैत्रिणीला breast cyst आढळून आलाय. तिला कॅन्सिरची history आहे . टाटा मध्ये तिला local oncologist शोधा फोलो अप साठी असे सांगितलं . ठाणे /डोंबिवली मध्ये कोणी oncologist माहितीचे आहेत का? सध्या ती खूप काळजीत आहे लवकर माहिती मिळाली तर बर होइल

Pages