Submitted by चना@12 on 23 July, 2013 - 12:45
नमस्कार माबोकर्स!
मला अर्जंट मदत हवी आहे.. माझ्या काकांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, गेल्या ३ महिन्यात ट्युमर काढण्यासाठी २ ऑपरेशन्स केली आहेत .. पण ३रा ट्युमरची छोटी सुरुवात झाली आहे .. मिरजेच्या डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही असेच सांगितले आहे
घरी येणारे प्रत्येकजण वेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेवुन आयुर्वेदिक, होमीओपॅथी ओषधे घ्यायला सांगत आहेत.. मेडीकल कॉउन्सेलिंग कोणाला (आत्या नि घरचे लोक) यांना पटलेले नाहीये
काकांना आधीच माईल्ड हार्ट अॅटक नि शुगर आहे.. सध्या सगळाच गोंधळ आहे कोणते उपचार सुरु ठेवावेत जेणेकरुन साईड इफेक्ट्स होणार नाहीत..
प्लीज कोणाला तज्ञ डॉक्टर्स, उपचार माहिती असल्यास सुचवा .. माबो डॉक्टर्स प्लीज..
सर्वांचे आभार!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉ. अनिल हेरूर, आँकोसर्जन
डॉ. अनिल हेरूर, आँकोसर्जन आहेत, डोंबिवली,
Where do you stay ? which
Where do you stay ? which city ? If you can go to Pune, go to Deenanath. If you can go to Mumbai, go to Tata.
Thanks,
Anand
काका कसे आहेत ? डॉ. एस एच
काका कसे आहेत ?
डॉ. एस एच अडवाणी.
सुश्रूत हॉस्पिटल , स्वस्तिक पार्क , चेंबूर .
धन्यवाद आनंद, मोगा.. काकांना
धन्यवाद आनंद, मोगा..
काकांना जाऊन १.५ वर्ष झालं
सॉरी टु हिअर चनस.
सॉरी टु हिअर चनस.
२३ डिसेंबरला २०१५ ला ब्रेस्ट
२३ डिसेंबरला २०१५ ला ब्रेस्ट कॅन्सर मुळे माझी बहिण गेली. २३ वर्ष तिने ह्या आजाराला लढा दिला. मुले जेंव्हा अगदी लहान होती तेंव्हा तिला कळले की तिच्या उजव्या स्तनामधे गाठ झाली आहे. ९२ सालात पैसा आणि तंत्रज्ञान दोन्ही कमी होते. २००८ मधे हा आजार परत उफाळून वर आला. आम्ही तिला रुबीमधे दाखल केले. २००८ नंतर ताईने दोन्ही मुलांचे आणि एका मुलीचे लग्न करुन दिले. तिन्ही अपत्यांची मुले पाहिलीत. वयाच्या ५३ वर्षापर्यंतचा तिचा प्रवास खूप खडतर तरी फार प्रेरक होता. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यातून ताईसाठी अश्रू वाहिले असतील. तिला सगळ्या गावकर्यांनी एक खंबीर स्त्रि म्हणून अग्नि देताना आणि अस्ति गोळा करताना पहिल्या आणि तिसर्या दिवशी श्रद्धांजली वाहीली.
ती कॅन्सर पेक्षा केमोथेरपीमुळे आपल्या शरिरामधे जे विपरित परिणाम होतात त्यामुळे गेली. तिच्या शरिरातील प्लेटलेट्सचे प्रमाण काही हजारावर आले होते. अकोल्यात बी + चे प्लेटलेट्स मिळणे खूप कठिण गेले. तिच्या किडनी फेल झाल्या होत्या. अॅनेमिया झाला होता. मी जेंव्हा अकोल्याला पोचले तेंव्हा ती वेन्टीलेटरवर होती. बोलू शकत नव्हती पण वेदनादायक अशा नजरेने एका डोळ्यानी तिने माझ्याकडे पाहिले. त्याच दिवशी संध्याकाळी ९ वाजता ती गेली.
फार वाईट असत आपल कुणि निघून जाण. आपल्या डोळ्यासमोर कुणी दम तोडत आहे आणि आपण परिस्तितीपुढे हतबल होऊन फक्त बघत आहोत ह्यासारखे दुसरे कुठले दु़:ख नसेल.
सॉरी टु हिअर बी.
सॉरी टु हिअर बी. श्रद्धांजली.
माझ्या ओळखीत अशा तीन स्त्रिया आहे ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर चे निदान मुल २-३ वर्षाचे वगैरे असतानाच झाले.
२ पूर्ण बर्या आणि एक या जगात नाही
बी, वाचून फार वाइट वाटले.
बी, वाचून फार वाइट वाटले. आपल्या ताईना श्रद्धांजली ..
वाचून वाइट वाटले. श्रद्धांजली
वाचून वाइट वाटले. श्रद्धांजली
बी, तुमच्या ताईंना
बी, तुमच्या ताईंना श्रद्धांजली.
मला याविषयी अजून माहिती मिळू
मला याविषयी अजून माहिती मिळू शकेल का? माझ्या वडिलांना ऑगस्ट २०२२ मध्ये चौथ्या स्टेजच्या फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान झाले. मुंबई ऑन्को केअरच्या बोरिवली सेंटरमध्ये डॉ. आशिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ट्रीटमेंट सुरु केली. किमोथेरपीच्या ९ सायकल्स झाल्या. त्यात त्यांना प्रचंड त्रास झाला.
मग फेब्रुवारीपासून त्यांची मेंटेनन्स थेरपी चालू केली. ज्यात दर २१ दिवसांनी एक इंजेक्शन (Bevacizumab) दिले जाते. यानंतर वडिलांच्या तब्येतीत छान सुधारणा झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वडील असेपर्यंत हि ट्रीटमेंट चालू ठेवावी लागेल. या एका सेशनचा खर्च २५-३०००० होतो. गेल्या १० महिन्यांची ट्रीटमेंट (केमोथेरपी सायकल्स, त्यातून उद्भवणारे इतर आजार आणि त्यावेळी झालेली वेगवेगळी हॉस्पिटलायझेशन्स, आणि आता मेंटेनन्स थेरपी) करून आम्ही फायनान्शिअली पूर्ण exhaust झालो आहोत. तर ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करावी का किंवा याला काही पर्याय आहेत का तसेच मध्येच हि ट्रीटमेंट स्टॉप केली तर काय होते हे मला जाणून घ्यायचे आहे. किंवा या संदर्भात अजून कुठे काही माहिती मिळू शकेल का तेही जाणकारांनी सांगावे.
Pages