युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू केळ्याची भाजी मी लिहीली होती परत लिहीते. कच्च्या केळ्याचे साल सोलुन बटाट्यासारख्या फोडी कर. कढईत तेलात मोहरी, उडीद डाळ, हिंग हळदीची फोडणी कर. फोडी त्यात परत, लगेच मीठ व सांबार मसाला टाकुन एक वाफ दे. चटकन होते भाजी. पण भाताबरोबरच चांगली लागेल, पोळी बरोबर नको.

वेफर्स बाबत नेटवर किंवा इथे माबोवर शोधावे लागेल. नाहीतर दिनेशजींना माहीत असेल तर ते सांगतील.

केळी वेफर्स-
एका कढईत तेल तापवत ठेवावे. तेल चांगले गरम झाले की केळ्याची साल काढून लगेच किसणी कढईवर अधांतरी ठेवून वेफर्स करायचे(डायरेक्ट जमत नसेल तर बाजूला किसून लगेच तेलात टाकायचे.) वेफर्स होत असतानाच त्या तेलात मीठ+थोडी हळद टाकलेले पाणी थोडे शिंपड्याचे. (पाणी शिंपडताना लांब उभे राहायचे)

मंजु... Happy

रश्मी अशी भाजी मी करते तुझीच रेसिपी आहे का ही?@ हीकू ही केळी पिकत नाही म्हणे@पिन्की नक्की करीन.

कच्च्या केळ्याची कापं : सालं काढा , लांबट काप करा , तव्यावर तुपात तळा आणि मीठ आणि मीरपूड भुरभुरवा .

आशू, Lol

अवियल करता येईल कच्च्या केळ्याचे, कोफ्ते करता येतील; इथे बहुतेक अंजलीने दिलेली रेसिपी आहे .

आंध्रा मधे मोहरीची पूड घालून सुकी भाजी करतात कच्च्या केळ्याची - इथे आहे एक रेसिपी

http://gayathrismyhomekitchen.blogspot.com/2012/11/aratikaya-ava-petti-k...

ही अजून एक कॉमन आंध्रा स्टाइल रेसिपी
http://www.gayatrivantillu.com/recipes-2/curries-1/aratikayanimmakayakoora

कोणी मल्याळी, तेलुगु, कोकणी कलीग्ज / शेजारी असतील तर त्यांना वाटा थोडी केळी

अनिश्का मस्तच. केळ्याची साल जर पातळ असेल तर कच्च्या केळ्याची सालासकट उपासाची भाजी करतात, बटाट्याची उपासाची करतो तशी.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद! एकेक पाकृ करण सुरु आहे. 'केळी थाळी' त केळी पुलावाची कमतरता आहे. ती कोणी ट्राय करुन सांगा Happy आम्ही घरात इनमीन दोन माणसं! टीकाऊ केळ्याचे पीठ कसे करावे ?

केळ्याचे टीकाऊ पीठ- कच्ची केळी सोलुन साधारण एक इंच जाडीचे काप करायचे. कडक उन्हात सात-आठ दिवस वाळवा. नन्तर मिक्सरवर किंवा गिरणीत दळूण आणा.
आमच्या गावाला वाडीत केळी खूप आहेत त्यामुळे माझ्या सासूबाई दरवर्षी असेच पीठ करुन ठेवतात, वर्षभर छान टिकते. लापशी, लाडू, थालिपीठ, उपासाला बरं पडत.

या सगळ्यात केळ्याची भजी राहिली कि!!!! बटाट्याच्या भज्यांसारखी करायची!!!! :तोंडाला पाणी सुटलेली बाहुली:

कच्ची केळी कूकर ला वाफवून घ्यावी, सरळ दोन शिट्या करव्यात. साल काढून बटाटावड्याच्या भाजी सारखी भाजी करावी.

हा बाफने २००० पोस्टी ओलांडल्याने, युक्त्यांचा चौथा बाफ सुरू केला आहे. आता या पुढे नवीन बाफ वापरा.

नवीन बाफचा पत्ता: http://www.maayboli.com/node/46521

माझे रेनी शूज ह्यावेळी चांगले टिकलेत. तुटले नाहीत फक्त मातीने खराब झालेत.
कशाने साफ करता येतील?

खरंतर हा प्रश्न स्वयंपाकघरातील युक्तीसाठी नाहीये. पण कुठे विचारु कळलं नाही म्हणून इथेच विचारते.

Shoes could be washed like clothes with soap, water etc. I think. Handwash; Not machine wash.

Pages