युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mansvinine lihilelaa banana bread madhye chuckun jvaaric pith ghatala hota..tar changala jhala hota..try karu shakata

पीठ साध्या पाण्यात कालव, त्यात थोडे ताक व मीठ घाल . कढईत तेलात हिरवी मिर्ची, मोहरी, हिंग, जीरे व हळदीची फोडणी कर. मग त्यात हे पीठ ओतुन भराभर हलव, वाटल्यास पाणी घाल. नंतर झाकुन वाफ काढुन वर कोथिंबीर घाल.

हो...
रश्मी म्हणाली तसे... त्या ज्वारी च्या पीठात थोडं तांद्ळाचं पीठ घाल... गरम पाणी वापरुन पीठ मळ.. छान भाकरी होते.. तांदळामुळे.. मऊसर होते...:)

माझ्याकडे कॉटनच्या पिशव्या आहेत. म्हणजे जुन्या कापडाच्या असतात त्या.
फ्रीजमध्ये भाजी ठेवताना या पिशव्यांत ठेवून फ्रीजच्या व्हेजी ट्रे मध्ये ठेवल्यास चालेल का?
त्या पिशव्या अजून कशासाठी वापरता येतील? >>> मी पालेभाज्या अश्या कापडी बॅगेत ठेवून मग फ्रिजमध्ये ठेवते नेहेमी. मेथी शेपु इ. भाज्या निवडून अश्या पिशवीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यावर किमान २-३ दिवसतरी छान रहातात.
१. भाज्या फ्रीज मध्ये छान राहाव्यात या साठी अजून काही टिप्स असतील तर सांगा
२. झिप लॉक च्या जाळीच्या चांगल्या पिशव्या कुठे मिळतील? मी पुण्यातील तुलसी मधून घेत असते पण ४-६ महिन्यात झिप खराब होते

दक्षिणा,
औरंगाबादच्या एका उत्पादकाची हिरवी मिरची पावडर बाजारात आहे. बर्‍यापैकी तिखट आहे. चवही छान आहे.
बघ मिळाली तर.
नाहीतर आमच्याकडच्या जहाल तिखट मिरच्या घेऊन येऊ काय ? वर्षूने मागितल्याच होत्या.

दक्षे.. विठ्ठल मंदिराच्या तिथल्या काही भाजीवाल्यांकडे दोन प्रकारच्या मिरच्या मिळतात.. झणझणीत आणि कमी तिखट.. तिथून घेऊन ये झणझणीत मिरच्या.. अर्थात तुला कोल्हापूर स्टाईल झणझणीत मिरची कदाचित मिळणार नाही... पण बर्‍यापैकी तिखट असते.. मुद्दाम खारातली मिरची घालण्यासाठी मी तिथून मिरची खरेदी करतो.. रंग जरा जास्त हिरवा असतो..

आणि घाल की पालेभाज्यात लाल तिखट उत्तम लागतात भाज्या.. प्रत्येक वेळेस मिरचीच घालायला पाहिजे असं थोडंच आहे..

झंपे Angry

हिम्स मला कोल्हापूरी तिखट मिर्च्या नाही लागत, पण निदान थोड्या तरी तिखट असाव्यात. पाव किलो भेंडीत साधारण दोन मिरच्या घातल्या तर जरा तरी तिखट व्हायला हवी भाजी., पण ४ घालूनही तीच कथा.

दिनेश नक्की आणा मिरच्या मला. आणि ते औरंगाबादचं काय हिरवं तिखट? Uhoh कुठे मिळेल पुण्यात?

मिरचीचा ठेचा करून ठेवायचा आणि गरजेनुसार तो भाजीत ढकलायचा हा एक उपाय आहे. लाल तिखट घालूनही पालेभाज्या / भेंडी इ. भाज्या फर्मास होतात. हिरवी मिरची कमी तिखट वाटत असेल तर लाल मिरचीची फोडणी घालायची वरून! Proud

ज्वारीचे पीठ >> ज्वारीच्या पिठाची उकड, थालिपीठे वर सांगितली आहेतच. याशिवाय ज्वारीचे पीठ लावून 'पीठ पेरून करायच्या भाज्या', उदा. दुधी, काकडी, ढब्बू मिरची इ. छान होतात. भाजीला बेसन लावतो त्या ऐवजी ज्वारीचे पीठ लावायचे. खमंग चव येते.
तसेच ज्वारीचे पीठ + तांदूळ पीठ + कणीक + बेसन अशा मिश्र पिठांची धिरडीही छान होतात.

आमच्याइथे नेहेमीच दोन प्रकारच्या मिरच्या ठेवतात भाजीवाले, लवंगी मिरची आणि कमी तिखट मिरची. ज्या हव्या त्या घ्यायच्या.

आता ज्वारीच्या पीठाचे जे काही प्रकार वर सांगितले आहेत, ते बाजरीच्या पीठाचेही करता येतात का? थालीपीठात ढकलते मी.. पण तरी उरेल असं वाटतंय. [ बरंच उरलंय... मलाच भाकरी करायचा कंटाळा आलाय म्हटलं तरी चालेल... Wink ]

दक्षिणा, मी इथून आसामातून पाठवते तुला मिरच्या... आमच्याकडे फक्त झणझणीत मिरच्याच मिळतात... आपल्याकडच्या पोपटी रंगाच्या मिरच्या आई इकडे येणार्‍यांसोबत खास पाठवते. Happy

धारा, बाजरीच्या पीठाचं 'पॉरीज' करून खा तुम्ही सगळ्यांनीच. लेकाला दे विशेषकरून.

धारा आधी बाजरीच्या भाकरी करा. तुटल्या तरी प्रॉब्लेम नाही. त्या रात्री किंवा सकाळी कुस्करुन त्यात गुळ तुप घालुन खा. पोळीच्या लाडुपेक्षा जबरी टेस्टी लागतात हे लाडु. बाजरीच्या पीठाचे दिवे पण करता येतात. फोडणीची भाकरी पण मस्त होते. नाहीतर दुधात कुस्करुन खा. हाकानाका.

मंजूडी, खास धन्यवाद. उद्या सकाळीच करते बाजरी पॉरीज. Happy
रश्मी, बाजरीची(विशेषतः शिळी) भाकरी+दूध माझा जीव की प्राण आहे. पण घरातील इतरांवर त्यामुळे अन्याय होतो. म्हणून भाकरीशिवाय काही वेगळे हवे होते. 'बाजरीच्या पीठाचे दिवे' काय प्रकरण आहे?
रच्याकने, आईकडे नवरात्रात घटासमोर ठेवायला (बहुधा)गव्हाचे दिवे करतात आणि दसर्‍यानंतर फक्त घरातल्यांनी ते दिवे दुधासोबत खायचे असतात. त्याची आठवण झाली. तेच/तसेच हे दिवे का?

पाणीपुरी बनवायच्या पीठाच्या पाणीपुर्‍या बनवेन असे वाटत नाही. त्याचा अजुन काही उपयोग करता येईल की टाकुनच द्यावे लागेल?

मसाला पूर्‍या बनवता येतिल.

इंग्रो मधे हल्दीराम च्या 'चायपूरी' म्हणुन प्रकार मिळतो.. चांगल्या लागतात. तसे काहितरी करता येइल.

१ चमचा उडीद डाळ, चणा डाळ भिजत घाला. वाटताना त्यात बडीशेप, धणे घाला. त्या मिश्रणात मावेल इतके बाजरीचे पीठ घालून वडे (जाड्सर पुर्‍या) करा.वाट्ल्यास त्यात तिखट्पण घालू शकता.

धारा गुळाचे पाणी करुन त्यात थोडे तेल आणी चवीपुरते मीठ घालुन बाजरीचे पीठ मावेल तेवढे घालुन ते मळुन त्याला पणती वा दिव्यासारखा आकार देऊन ते उकडावे. आपण दिव्याच्या अमावस्येला कणकेचे करतो तसे करायचे.

ज्वारीचे भाकरीसाठी भिजवलेलं पीठ जास्त झाले तर फ्रीज मध्ये ठेवून परत वापरता येते का गव्हाच्या कणकेसारखे ?

@गीता, पुण्यात तुळशीबागेत तुलसी नावाच्या दुकानात ह्या श्रीखंडासाठीच्या पिशव्या मिळतात. रु. ३० पासून पुढे.

एरवीही भाकरीचे पिठ एका भाकरीचेच मळतात. उकडीच्या तांदळाच्या केल्या तर थोडे जास्त.

गीता, येतं वापरता. पुन्हा भाकर्‍या करण्याआधी तासभर तरी बाहेर ठेवून रूम टेम्परेचरला येऊ द्या की झालं. भाकरी थापताना उंडा घट्ट/सैल अ‍ॅडजस्ट करून घ्यालच.
थालिपिठाची भाजणीसुद्धा भिजवलेली फ्रीजमधे राहते.

गीता यू आर द बेस्ट जज्ज.
प्रयोग करून पहा.. जमलं तर उत्तमच.

Pages