निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना,जो_एस,पुरंदरे शशांक,अश्विनी के,जागू--

तुमच्या सर्वांच्या अभिप्रायामुळे अजुन हुरुप वाढेल.बागेला आता जवळपास अडीच वर्ष झाली आहेत. आपल्या गप्पांमधुन खुप सारी माहीती मिळत आहे,ज्याचा खुप उपयोग होतो.मी जरी लिहीत नसलो तरी गप्पांचा एकही भाग चुकवलेला नाही.(ते काय म्हणतात ना गानसेन नसलो तरी कानसेन आहे,त्या टाईप).

आतापर्यंत आपण सध्या उमललेली आणि पिवळी फुले असलेली बरीच झाडे, झुडुपे पाहिली - त्यातलाच आपल्या सर्वांच्या परिचयाचा - पेल्टोफोरम

Common name: Copperpod, Rusty shield-bearer, Peela gulmohar पीला गुलमोहर (Hindi)
Botanical name: Peltophorum pterocarpum Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)

p11.jpgp22.jpgp33.jpgpelto.jpgpeltopho.jpgpeltophorum_afr148.jpgpeltophorum4.JPG

सध्या बहरात असलेल्या पिवळ्या फुलांमधे "सोनकी"चा नंबर खूपच वर असेल. पावसाळा संपता संपता पुण्याच्या आसपास, माळरानावर कुठेही या सोनकीचे साम्राज्यच दिसून येते. (सर्व फोटो आंतरजालावरुन साभार)

Common name: Sonki, Graham's groundsel • Marathi: सोनकी Sonki
Botanical name: Senecio grahamii Family: Asteraceae (Sunflower family)
Synonyms: Senecio bombayensis, Senecio reticulatus

Sonki.jpgs1.jpgs5.jpgs44.jpg

अगदी आत्ता कात्रज घाट, चांदणी चौकातून पिरंगुट-पौडकडे जाणारा रस्ता अशा अनेक रस्त्यांच्या कडेने कॉसमॉस फुलांनी दिलखेचक पखरण करुन टाकली आहे. (सर्व फोटो आंतरजालावरुन साभार)

Common name: Orange cosmos, Yellow cosmos
Botanical name: Cosmos sulphureus Family: Asteraceae (Sunflower family)

Cosmos_sulphureus.jpgc1.jpgc2.jpg

व्वाह्...सुंदर! शशांकजी, ही कॉसमॉसची फुलं आमच्या कॉलेजच्याही आजुबाजुला फुललीयेत.
सुप्र निगकर्स! Happy

श्रावण - भाद्रपदात जर "कवळा" किंवा स्मिथिया पहायचा असेल तर पार "कास" ला जाण्याची अजिबात गरज नाहीये, शहराबाहेरच्या माळरानात ही नक्कीच पहायला मिळतील - जरा शोध घ्यावा लागेल, थोडीशी पायपीटही करावी लागेल - पण फार सूक्ष्म फरक ओळखता आले नाहीत तरी हा कवळा हे नक्कीच लक्षात येईल (सर्व प्र चि http://flowersofindia.net/ येथून साभार......)

हा ब्रॅकिश स्मिथिआ -
Brackish Smithia.jpg

तर हा ब्रिस्ली स्मिथिआ -

Bristly Smithia.jpg

हा अजून एक - डबल पेअर्ड स्मिथिआ -

Double Paired Smithia.jpg

हा पण स्मिथिआच - सेन्सेटिव स्मिथिआ -

Sensitive Smithia.jpg

http://natureindiatour.blogspot.in/2013_08_01_archive.html

"कास" पठारावरील अनेक फुलांचे अप्रतिम फोटो या लिंकवर पहायला मिळतील. फारच अप्रतिम प्र चि आहेत यात...

अजून एक "कास" पठारावरील ब्लॉग - अप्रतिम प्र चि
http://kiranstravel.blogspot.in/

सध्या पुण्याच्या आसपास ही "दीपमाळे"ची फुले देखील विपुल प्रमाणात दिसत आहेत -

Common name: Lion's Ear, Annual lion's ear, Christmas candlestick • Hindi: बड़ा गूमा Bara guma, लाल गूमा Lal guma • Marathi: दीपमाल Deepmal • Telugu: Hanumantabira, Mulagolimedi • Kannada: goa gadde, kaaduthumbe, ranabheri, deepa shoole • Oriya: Barcha • Sanskrit: Granthi, granthika, Granthiparna, Granthiparni
Botanical name: Leonotis nepetifolia Family: Lamiaceae (Mint family)
Synonyms: Phlomis nepetifolia (http://flowersofindia.net/ येथून साभार )

L ear.jpglion ear.jpglion's ear.jpgballbush1.JPG

शशांक यांनी वर कॉसमॉसचे फोटो दिले आहेत त्या संदर्भाने एक अत्यंत महत्वाची माहीती. हे मुळातले आपल्याकडचे झाड नसल्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकणारे कीटक ई साखळी आपल्याकडे नाहीये त्यामुळे याची अफाट आणि बेसुमार वाढ होते आहे जी इथल्या स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींकरता हानीकारक आहे. त्यामुळे त्याच्या निर्मूलनाचे कार्य वनखात्याच्या पुणे विभागाच्या पाठिंब्याने ऑयकॉस नावाच्या पुणेस्थित संस्थेने हाती घेतले आहे.

असा चेपुचा दुवा दिलेला चालतो की नाही माहित नाही पण ह्या दुव्यावर या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी व शंका निरसन करण्यासाठी संपर्क साधनांची माहीती आहे.
https://www.facebook.com/#!/photo.php?fbid=650765964941413&set=a.6507655...

कॉसमॉसच्या बिया, गाडीच्या टायरच्या मातीत मिसळून प्रसारीत होतात, असे वाचले होते.
शशांक, ती दीपमाळ आत्ताच दिसायला लागली का ? केनयात ते एक सामान्य जंगली झाड आहे.

श्रावण - भाद्रपदात रानमाळावर हा "शेवरा"ही खूप दिसून येतो - ही सगळी रानफुले आणि आकारानेही खूप छोटी असतात - नीट न्याहाळत गेलो तरच दिसणार आपल्याला...

( http://flowersofindia.net/ सर्व माहिती व प्र चि येथून साभार.....)

Common name: Long Leaved Alyce Clover • Hindi: जंगली गैलिया Jangali gailia, गुबल Gubal • Marathi: शेवरा Shevra, Motha dampta • Telugu: Peddakandikaraku
Botanical name: Alysicarpus longifolius Family: Fabaceae (Pea family)
Synonyms: Hedysarum longifolium

Long Leaved Alyce Clover.jpg

यातील अजून एक प्रकार - दुरंगी शेवरा
Common name: Bicolor Alyce Clover • Marathi: दुरंगी शेवरा Durangi shevra
Botanical name: Alysicarpus pubescens Family: Fabaceae (pea family)

Bicolor Alyce Clover.jpg

आणि हा अजून एक प्रकार - लाल शेवरा
Common name: Red Alyce Clover • Marathi: लाल शेवरा Lal shevra
Botanical name: Alysicarpus tetragonolobus Family: Fabaceae (Pea family)

Red Alyce Clover.jpg

शशांकजी ही रानफुले माझ्या मागच्या परीसरात सर्रास फुलली आहेत पण हल्ली फोटो काढायला नो टाईम. Happy

आमच्याकडे पण मळभ. त्यामूळे नेट कधी असते तर कधी नसते.
शशांक, आता पटू लागलेय कि अशा नाजूक फुलांचे फोटो या माध्यमातच नीट दिसतात. पुस्तकात नीट कल्पनाच येत नाही.

http://natscapes05.blogspot.in/ - ही एक भन्नाट साईट आहे - यावरील सर्व फोटो (फुलांचे, पक्ष्यांचे व प्राण्यांचेही ) व माहिती अप्रतिम आहे.

North section of Konkan-kada (Konkan cliff), north western ghats, India - हा कोकण कड्याचा फोटो तर केवळ पहात रहावा असा आहे - या कड्याचा इतका सुंदर फोटो माझ्या पहाण्यात अजून तरी नाहीये.... केवळ ग्रेट .....

एक मासला म्हणून या ब्लॉगवरील दोन फोटो देत आहे - (या ब्लॉगला मुद्दाम भेट देऊन मूळ साईझमधले सर्व फोटो जरुर पहा - सर्व फोटो तुम्हाला विशेष आनंद देतील याची मी खात्री देतो...)

ultramarine flycatcher.jpgphp7vmJLRPM.jpg

Pages