युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजमा, छोले शिजायला जास्त वेळ लागतोच. पण चवळी लवकर शिजते. मी मोठ्या आंचेवर २ शिट्ट्या झाल्या की कमी आंचेवर दोन शिट्ट्या होऊ देते.
राजमा, छोले यांना मोठ्या आंचेवर एक शिट्टी झाली की कमी आंचेवर ७-८ शिट्ट्या होऊ देते.

आशू२९ला अनुमोदन. कितीही भिजवली, शिजवली, तरी चवळी दडदडीतच रहाते माझ्याकडूनही Sad
करवंट्यांचा स्टॉक(ही) ठेवावा की काय आता! Proud

इथे मायबोली वर वाचल्यापासुन मी कुकर च्या शिट्या करण बन्द केल आहे.
चवळी आधि तेलात परतुन घेते, मग त्यात गरम पाणी घालुन, कुकर मध्ये त्याला उकळी आली कि मिडीअम आंचेवर १५ मि. ठेवते.
प्रत्येक कड्धन्याला वेगवेगळा वेळ लागतो.

चवळी मझ्यामते सगळ्यात चटकन शिजणारं कडधान्य आहे.
नीट भिजलेली चवळी किंचित पाणी घालून कुकरमधे डाळ, भाता बरोबर शिजायला हवी.

शिट्ट्या काढण्याची गरज नही. प्रेशर आल्यावर गॅस बारीक/मध्यम/मध्यम५-७ मिनिटे ठेवल्यास नीट भिजलेल्या डाळी, कडधान्यं छान शिजतात... शिजायला हवीत.
(माझ्याकडे चवळी बाहेरही मस्तं शिजतेय).

चवळी बदलून बघणार का?

कढधान्य शिजवताना मीठ आणि तेल घालायचं म्हनजे लवकर शिजतं आणि त्याची सालं निघत नाहीत. छोले- वाटाणे भिजवताना चिमूटभर सोडा टाकायचा म्हणजे छोले - वाटाणे लवकर शिजतात. मी कधीच कोणतही कढधान्य कुकरमध्ये शिजवत नाही.

दाद +१

चवळी, ब्लॅक आइड पीज, ही खूप लवकर शिजते. एक लाल रंगाची पण चवळी असते नं? ती शिजायला वेळ लागतो का?

धन्यवाद, आर्चने सांगितल्याप्रमाणे ट्राय करून बघेन, पण तरी कूकरातच शिजवावे लागेल मला Happy

चवळी मझ्यामते सगळ्यात चटकन शिजणारं कडधान्य आहे.>>>>>> +१
कडधान्य जुने झाले की शिजायला कठीण होतात.

फणसाच्या अतिकडक्क (दातमोडू) चिप्स खाऊ म्हणून मिळाल्या आहेत. त्या नुसत्या खाणे अवघड आहे. त्यांच्यावर काही संस्करण करून त्यांना खाणेबल करता येईल का? किंवा एखाद्या पदार्थात वापरता येतील का?

केरळी / मँगलोरी असतील तर काय करू शकत नाही.
तुमच्या मायक्रोवेवात डीह्यूमिडिफाय ऑप्शन असेल तर दोन तीन मिंटं फिरवा.
क्रिस्पी होतात.
मग जेवणात पापडासारख्या खा.
किंवा सरबताबरोबर चकणा म्हणून.

होय, मंगलोरी चिप्सच आहेत... बघते आता काही तरी शक्कल लढवून! टोमॅटो सुपात ब्रेड क्रूटॉन्स ऐवजी या चिप्स कशा लागतात याचा प्रयोग करून बघेन म्हणते! Proud
नाहीतर डिह्यूमिफाय ऑप्शन आहेच! थँक्स साती.

>> टोमॅटो सुपात ब्रेड क्रूटॉन्स ऐवजी या चिप्स ... नाहीतर डिह्यूमिफाय
दोन्ही नाही चालणार. त्या नैनं छिन्दन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः असतात. Proud

हो हो... म्या येकदाच खाल्लेल्या... पहिलं तर ते खोतेलातल्या होत्या. अन येकदम ४/६ खाल्ल्याने तोंड सोललं गेलेलं सगळं. पुन्हा नाय वाट्येला गेलो...

स्वाती Proud

शेवटचा उपाय म्हणजे मिक्सरमध्ये चिप्स बारीक करायच्या आणि कोणत्यातरी भाजीत ढकलायच्या!

एकदा त्या चिप्सचीच भाजी करावी का असा विचार आला डोक्यात, पण भाजीची चव, रंग, रूप आणि मुख्य म्हणजे मऊपणा याबद्दल शंका असल्यामुळे तो विचार तूर्तास रहित केलाय.

योगेश, भा.पो. Lol

मिलिंदा Proud

मिलिंदा Biggrin

Lol

पुरण वाटण्यासाठी पुरणयंत्र शिवाय अजून काही पर्याय आहे का??
काल २ किलो डाळीचे पुरण वाटताना हाताची वाट लागली

डाळ मऊ शिजवून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटायची. आणि मग गूळ घालून पुरण शिजवायचे.
गूळ घालून शिजवलेले पुरण मिक्सरमधून वाटू नये. मिक्सरच्या पात्याची धार जाते असे ऐकले आहे.

आईने मला एक पुरणाची जाळी गिफ्ट केली आहे. त्यावर पुरण घालून स्मॅशर फिरवायचा. मस्त पुरण वाटले जाते. पुरणयंत्रापेक्षा सुटसुटीत आणि लवकर काम होते.

डाळ मऊ शिजवून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटायची. आणि मग गूळ घालून पुरण शिजवायचे.

हे अस केल्यावर माझ पुरण फार पातळ होतं आणि पोळ्या फुटतात्..लाटताना पण जीव जातो

डाळीत पाणी राहते का वाटताना? सगळे पाणी निथळून घेऊन अगदी कोरडी करून घ्यायची.
पुरण पातळ झाले तर थोडेसे तांदूळ घालायचे पुरण शिजवताना. पुरण आळून येते.

Food processor works better than mixer for puran. Also it could do more quantity, use chopping attachment.

फणसाच्या अतिकडक्क (दातमोडू) चिप्स खाऊ म्हणून मिळाल्या आहेत. त्या नुसत्या खाणे अवघड आहे. त्यांच्यावर काही संस्करण करून त्यांना खाणेबल करता येईल का? किंवा एखाद्या पदार्थात वापरता येतील का?
>>>> अरुंधती, त्या पाण्यात भिजत घाल. मीठ आणि तेल निघून जाईल. मग उकळत्या पाण्यात सव्वादोन मिनिटं ठेऊन चाळणीत काढ. पुन्हा फणसाचे काप मिळतील. ते खा.

Pages