तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादाची बायको जी सध्या सत्यजितच्या घरात पडून आहे, तिचं एका भल्या घरात लग्न होत.>>>> मधुरा एक भल घर कशाला? अंगद म्हैसकर आहेच की तिच्याशी लग्न करायला.

अंगद म्हसकर म्हणायच होत मला. त्याच नामकरण गरीबांचा आदित्य पांचोली अस झाल आहे... बहुदा आपल्या स्वप्नामैयांकडुन. मंजिरीचे विहंग भाउजी......

झी मराठीचे खालील २ पुरस्कार जात आहेत ........'तू तिथ मी' ला!!!
-मठ्ठ लोक परिवार प्रदर्शन
-व्हिलन संख्या उच्चांकन

टाळ्या!!!!

स्वतः आदित्य पांचोली काय मोठा भारी होता की अंगद म्हैसकरला गरिबांचा आदित्य पांचोली म्हणताय? Uhoh केवळ घारा आहे म्हणून? अंगद पांचोलीपेक्षा नक्कीच चांगलं काम करतो. नावं ठेवा, पण एक मिनिट थांबून Happy

दक्षिणा.....हाथ मिलाओ...... हा धागा वाचून मी ही मालिका पाहणे सुरू केलं....... आमच्या घरात आता सगळेच हा धागा वाचून मालिका पाहतात आणि धमाल करतात.......... ही आणि बावरी राधा दिवसाआड आलटून पालटून पाहतो आम्ही..... निराळा हास्यक्लब हवा कशाला?

अरे, ती नेत्रा घरात कोणालाच प्रियाबद्दल का सांगत नाहिये? ती प्रिया करुन सवरून मोकळी आणि ही फुकटच सगळीकडून लाथा खातेय. काल तिला दादा धमकावत होता.

कालच्या एपिसोदमध्ये मोतीवाल्या बाई दादाला फोनवर म्हणत होत्या की माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे वगैरे.>>>>>>>>ऑ? ही त्या सत्यवानाचं लग्न होण्याआधी पासुनच त्याच्या घरी पडुन होत्ती ना? तेव्हा हेच वाक्य त्या सत्यवानाला बोलायला काय तोंड नव्हतं का? तेव्हाच बोलली असती बयो तर ......

बोलली होती की!! पण सत्यवान "आई म्हणेल तीच मुलगी" हेच आळवत बसला आणि सगळं रामायण घडलं. तेव्हा या बाईने आत्महत्या करायचा पण प्रयत्न केला होता सत्याने नकार दिला म्हणून.

हायला. तेव्हाच ढगात गेली असती तर बरे झाले असते की, उगाच एवढा फाफटपसारा पहायची वेळ नसती आली.:राग::फिदी:

हं ! अंगद म्हैसकर पांचोलीपेक्षा शंभरपट चांगला. ती मृणाल देव आणी संदीप कुलकर्णीचीच सिरीयल ना? गुंतता हृदय हे? त्यात अंगदच होता. मस्त काम केलयं त्यात त्याने.:स्मित: यात पण काम चांगलेच करतोय.

थोडक्यात काय? तर 'आता आवरा' असा चॅनेलकडूनच दम मिळेल तेव्हा ४-५ एपिसोड्स मधे हे सगळं गुंडाळण्यात येईल. तोवर ते दळण लावणार आणि प्रेक्षक पहाणार Sad कोणीतरी धाड्स करून एखादं नवं चॅनेल काढा रे. आणि त्यावर मराठी साहित्यावर दर्जेदार मालिका सुरु करा. ७ ते ९:३० ह्याच वेळेत. प्रेक्षक तिथे वळले आणि ह्यांचे प्रोग्राम्स ओस पडले की अकला येतील. अर्थात काही प्रेक्ष्कांना ह्या असल्याच मालिका आवडत असतील हा मुद्दा आहेच. ह्यावर एक सर्व्हे व्हायला हवा.

>>कोणीतरी धाड्स करून एखादं नवं चॅनेल काढा रे.
आपण फार फार तर मायबोलीवर धागे काढणारी माणसं... चॅनेलच कुठनं जमायला Wink

तो दादा होळकर पडद्यावर असेल तेंव्हाच मी जरा हॉलमध्ये टीव्ही बघायला डोकावतो.... बाकी सगळी सिरीअल म्हणजे आनंदच आहे!

इथेही तेच...

बंद करा बंद करा, आचरट, फ्लॉप मालिका बंद करा!
बंद करा बंद करा, दळभद्री मालिका बंद करा!
प्रेक्षकांना गृहीत धरू नका...धरू नका

आव्वाज कुणाचा...डोकेदुखणार्‍या प्रेक्षकांचा...
अर्रे आव्वाज कुणाचा...डोकेदुखणार्‍या प्रेक्षकांचा...

sampli ka?

sampli ka?

>> ते माहीत नाही.. पण मंजिरी कधी नव्हे ते.. "अहो पण.." आणि तिच्या ठरलेल्या डायलॉग्जच्या पलीकडे काहीतरी बोलली.. Happy

हे हे ......चिन्मय मांडलेकर किंवा तु.ति.मी.चे इतर लेखक मा.बो. वाचतात नक्कीच.......आज मंजिरीने तिच्या सा.बां.ना डायलॉग मारला....मंजिरी म्हणजे मूर्ख....बावळट, असं समजता ना तुम्ही सगळे.........अगं बये.....समजायचं काय त्यात....ही दोन्ही आणि आणखीही काही विशेषणं उत्तम लागू पडतील तुला.......र.च्या.क.ने......मंजिरी आता पुढील काही आठवडे ढळाढळा बादल्या भरभरून अश्रू गाळेल.....त्यामुळे इतर सीरियलमधील 'पात्रां'ना रडायला ग्लिसरीन कमी पडेल...... बावर्या राधेचं कसं होईल आता......कोरडं रडावं लागेल तिला.....

हे हे ......चिन्मय मांडलेकर किंवा तु.ति.मी.चे इतर लेखक मा.बो. वाचतात नक्कीच.......आज मंजिरीने तिच्या सा.बां.ना डायलॉग मारला....मंजिरी म्हणजे मूर्ख....बावळट, असं समजता ना तुम्ही सगळे.........अगं बये.....समजायचं काय त्यात....ही दोन्ही आणि आणखीही काही विशेषणं उत्तम लागू पडतील >>> Maayboli Jindabad. Computer parat gone case jhala.

a AbolJanhavi vakyanchya madhye evadhi space aani Timb ka detes?

रश्मी Happy अगं ती टिम्बं म्हणजे डोक्यातले (टाईपताना विचार करण्यासाठी लागणारे) पॉझ आहेत.... माझ्या हातून जरा दोनाऐवजी दहाच पडतात.. सवय..हा हा..ह्या पोस्टीत कमी पाडलेत जरा..;)

सेम पिंच अबोलीजान्हवी.. मलापण असंच होतं.. त्यामुळे माझ्या वाक्यांच्या मध्ये स्पेस ऐवजी ९९% वेळा टिंब टिंब असतात. Happy

मला वाटल होत की आता मंजिरी खूप आरडा ओरडा करेल, पण कसल काय त्यदिवशि सासुला चिडुन बोलताना पण नेहमीच्याच पट्टीत बोलत होती. त्यात चिमाभौ हंटरने स्वतःलाच फोडुन काढताना दाखवले आहेत शिक्षा म्हणुन हे ऐकुन मंजिरीतै विरघळणार हे नक्की

पाषाणभेद आवडलय..

बंद करा बंद करा, आचरट, फ्लॉप मालिका बंद करा!
बंद करा बंद करा, दळभद्री मालिका बंद करा!
प्रेक्षकांना गृहीत धरू नका...धरू नका

आव्वाज कुणाचा...डोकेदुखणार्‍या प्रेक्षकांचा...
अर्रे आव्वाज कुणाचा...डोकेदुखणार्‍या प्रेक्षकांचा...+१+२+३>>> शेअर करतिये फेबू वर

Pages