तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगु, अग्निहोत्रमध्येही चिमा होता. नक्षलवादी चळवळीत असतो तो. त्याची बायको सुरेखा तळवलकर असते आणि मुलगी स्पृहा जोशी - जी वकिल असते.

कधी संपायची ही सिरीयल?:अओ: त्या प्रियाला धरुन गदागदा हलवावेसे वाटतेय. बाईगं! आता तरी सुधर आणी मंजिरीचा पिछा सोड. त्या दादटल्याने चांगली अद्दल घडवायला पाहीजे होती तिला.:राग:

मला आता नवीन प्रश्न पडला. दादाच्या बायकोचे काय होणार?:अओ: दादोबाने संख्येला ( एवढा मार खाऊन हे येडं त्या दादाची का चाकरी करतं तांबडे बाबा आणी चिमा जाणे) बायकोचा ( दादाच्या ) खून करायला सांगीतलाय. आता मध्येच ती नेत्रा किंवा प्रिया दादाकडे काही पचकल्या नाही म्हणजे झाले.:फिदी:

प्रिया काल सुटल्यावर सत्याच्या गळ्यात पडुन भोकाड पसरते, ते ही तिचा नवरा समोर असतांना. फार्र फार्र ऑकवर्ड पोझीशन झाली तेव्हा बाकीच्यांची.

अनघा राजे कुणाची बायको होती देव जाणे.:अओ: दाखवा रे तिचा पण भूतकाळ दाखवा.

दादाच्या बायकोने पोलिसांना दादाविरुद्ध जबानी दिली ना? आणि ती म्हणे त्याची लग्नाची बायको नाहिये.... अस दादा त्या संखेला सांगत होता तेही मोतिवाल्या बाई समोर... आता बोला

त्या अनघाचा नवरा तिला तिच्या प्रॉपर्टिसाठी मारायला टपलाय म्हणे....... ती आणि चिमाच्या पहिल्या एक दोन भेटीनंतर ती चिमाला सांगते. त्यावेळेस अगदी पहिल्यांदा चिमाला योग्य वेळी तिचा संशय आलेला दाखवला आहे. तो "बहुतेक" खोटा आहे
नाहितर हातातुन वेळ निघुन गेली कि यांना संशय येतात आणि आयुष्यातुन माणुस निघुन गेल की हे लोक सुड घेतात.

तो दादा मागे कोणाला तरी सांगत होता की त्याने एका कॉलेजच्या समोर कोणाचा तरी खून केलेला असतो आणि ते एक मुलींचा ग्रूप बघतो. त्यातल्या एका मुलीची पोलिसांत ओळख असते आणि ती दादाविरोधात साक्ष द्यायला तयार होते. तीच त्याची मिसेस म्हणे.

तो असही म्हणाला होता की, तयाने तिच्याशी (मिसेसशी) खर लग्न केलेलच नाहीये. नक्की काय... काय माहित? मूर्खपणा आहे.

चिन्मयि, प्रियाचे लग्न झाल नाही... ठरल आहे...... मंजिरीच्या काकुच्या बहिणीच्या मुलाशी...... साखरपुडा झाला.... कसाबसा......

अरे त्या चम्याला (चिमा उर्फ चिन्मय मांडलेकर) आपल्या कमेंटसची लिंक पाठवा रे.:फिदी:

प्रिया चम्याला आजन्म सोडणार नाही.:फिदी:

मोतीवाल्या बाई आणी देखण्या ताई.:खोखो:

मालिका संपणार बहुतेक ( एकदाची ) काल प्रियाबाई आशिषच्या दुधाच्या ग्लासात झोपेच्या गोळ्या मिसळून पसार झाल्या. ( ही बया पर्समध्ये त्या चपट्या सुहासने दिलेल्या झोपेच्या गोळ्या घेऊन का हिंडत होती?:अओ:)

सत्याभाव पोचला एकदा आशिषकडे, आशिष ( त्याला त्यच्या पापांची उपरती झाल्याने) त्याला मंजिरी निर्दोष असण्याचे पटवेल आणी मग लुडकेल बहुतेक.

प्रिया कसली फिरतीय? तिने आशिषच्या नकळत ( तो फोनवर घरमालकाशी बोलत असतांना) त्याच्या दुधात बाटलीतल्या अर्ध्या गोळ्या टाकल्या. नंतर बाहेर गेली, तेवढ्यात सत्या येतांना दिसल्याने ती बाजूला लपली. सत्या इकडे तिकडे पहातो पण मागे लपुन बसलेली प्रियाच त्याला दिसत नाही( काय बेकार दिग्दर्शन आहे).

तो आशिषच्या घरात जाऊन त्याला पिस्तुल वगैरे दाखवुन सांगतो की शेवटचे खरे खोटे बोल नाहीतर संपवेन. पण आशिष त्याला मंजिरीच्या निर्दोष असण्याची खात्री पटवुन स्वतच्या चुकांची कबुली देतो, सत्यजीतला प्रियाबद्दल सांगणार इतक्यात तो तोंडाला फेस येऊन जागीच जातो. सत्यजीत अँब्युलन्स बोलवुन ससुनमध्ये नेतो. इकडे विहंग आणी गौरांग पण ससुनला पोचतात, पण पोलीस जागी सापडलेल्या पिस्तुलावरुन सत्याचा संशय घेतात. तो कबुल करतो, पण पोस्ट्मार्टेम मध्ये विषाने मृत्यु कळतो.

प्रियाबाई घरी जाऊन भांगडा करतात, सुहासशी भांडतात, आणी लगेच दुसर्‍या दिवशी कोल्हापूरला जायचा निर्णय घेतात.

एवढा घोडा झाला तरी तो आशिष दुध पितो? काय येडछाप कार्ट आहे, आय मीन होतं!
>>> त्याचे स्पष्टीकरण असे दिलेय की चांगले खाल्ले प्यायले की विचार पण शुद्ध होतात!!
असं आशिष प्रियाला सांगतो!

>>त्याचे स्पष्टीकरण असे दिलेय की चांगले खाल्ले प्यायले की विचार पण शुद्ध होतात!!

खरं की काय? मांडलेकराला दुधाच्या पिंपात बुडवा रे कोणीतरी. म्हणजे असल्या सिरियली लिहून डोक्याला ताप देणार नाही.

झ्+ई+ई पुरस्कार २०१३- प्रेक्षकांची निवड ( viewers' choice)
२०१३ मधील अत्यंत टुकार बेकार सुमार मालिका......नामांकनं आहेत

~ तू. ति. मी.
~ रा. ही. बा.
~

आणि विजेते आहेत........वॉव.... दोन्ही मालिकांनी संयुक्तपणे हा मान मिळवला आहे......

यंदाचा अतीशय मानाचा सोशिक, सोज्वळ आणी सात्विक पुरस्कार माननीय अलकाताई कुबल यांच्या हस्ते मंजिरीवैनी उर्फ मंजिरी सत्यजीत मुधोळकर यांना प्रदान करण्यात येत आहे.

तसेच मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित मानाचा खलनायिका पुरस्कार मा. शशीकला ताई यांच्या हस्ते प्रिया उर्फ प्रिया मोहीते उर्फ मोतीवाल्या बाई यांना देण्यात येत आहे.

बाकी पुरस्कारांमध्ये अतीशय आचरट पण खलनायक पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत दादा होळकर. आँ ! नाही नाही सत्यजीत मुधोळकर यांनी हीरोचे काम केलेले असले तरी मालिकेचे खरे हीरो आहेत दादा होळकर.

पडलं पडलं आमटीत पाणी वाढलं/ पडलं. ती झिप्री प्रिया अजून किती दिवस वात आणणार सत्या जाणे.

रश्मी.....;)
त्याच बरोबर विशेष उपस्थिती पुरस्कार (म्हंजे फुकट फुटेज खाणे उर्फ फालतू (स्क्रीन) टाईमपास करणे बद्दल)
डुचकी उर्फ देखण्याताई याना बहाल करण्यात येत आहे....अर्थातच श्री. मुधोळकर (सत्यजीत) यांच्या हस्ते

Pages