बुद्ध

Submitted by संजय क्षीरसागर on 13 September, 2013 - 14:20

परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.

मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं

Sitting Buddha.jpg

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.

बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:

एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________

तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?

बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.

त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’

सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.

बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.

बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.

तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________

दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?

बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.

त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

____________________________

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?

बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.

सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?

जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.

आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.

श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

_________________________________

एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा इंग्रजीत विचारलं, ते तुम्हाला समजलं नसावं.

क्षीरसागर साहेब, तुम्ही विपश्यनेचे मार्केटिंग करत आहात का?

संजय क्षीरसागर
मोफत वाटत आहेत ते. चला घेवून टाका पटापट.

पाव किलो मला पण देवून टाका. चांगली वाटली तर आणखी घेईन.

कळकळीची विनंती, सोडा हो बुद्धाला.

आपली (यात मी सुद्धा) लायकी आहे का.

>आपली (यात मी सुद्धा) लायकी आहे का.

= तुम्ही स्वतःला (ना) लायक समजत असाल तर तो तुमचा निर्णय आहे. जगात अनेक लोक स्वतःला लायक समजतात आणि सत्य शोधतात.

तुम्ही स्वतःला (ना) लायक समजत असाल तर तो तुमचा निर्णय आहे. जगात अनेक लोक स्वतःला लायक समजतात आणि सत्य शोधतात.

>>>>

___/\____

देवपुरकर पार्ट टू!
असो!

@रिया,

प्रतिसादात उपहास असला आणि उल्लेखित सदस्य कोण याची कल्पना नसली तरी माझ्याबाजूनं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो.

बुद्ध स्वतःला नालायक समजत नव्हता हे नक्की. कारण तसं असतं तर त्यानं सत्य शोधलंच नसतं.

जो दुसर्‍याला (सत्य शोधनाला) नालायक समजतो तो खरं तर स्वतःला तसं समज असतो आणि मखलाशी म्हणून जनमान्य व्यक्तीला थोर दर्शवून मोकळा होतो. जेणे करुन त्याच्या विधानाला पुष्टी मिळते. मजा म्हणजे अश्या लॉजिकला टाळ्या देणारे आतून स्वतःला हीन समजत असतात. कारण त्यांच्या टाळ्यांचा अर्थच सांगतो `चला कुणी तरी आपल्या मनातलं बोललं'!

खरी परिस्थिती अशीये की मूळात प्रत्येक जण सत्य आहे.

स्वतःला नालायक समजणारा ते जाणू शकत नाही आणि तसं न समजणारा ते जाणू शकतो, इतकाच काय तो फरक आहे.

क्षीरसागर लोक इतक्या सहजा सहजी ऐकत नसतात
तुम्ही प्रयत्न चालू ठेवा ......
पण एक सांगू का तुम्ही जे सांगताय ना त्यात तुम्हाला ज्ञान मिरवायचे आहे हा भाव अगदी क्लीअरली ओसंडून वाहतो आहे म्हणून मी मधे बोलत आहे

बुद्ध स्वतःला नालायक समजत नव्हता हे नक्की. कारण तसं असतं तर त्यानं सत्य शोधलंच नसतं.
<<
कैबी.
बुद्ध सोताला नालायक समजत हुता का न्हवता, हे फकस्त तुमचं डेरिवेटिव्ह हाये..
तेनी लायक समज्लं आस्तं तं राज्य सोडूनशान ग्येलाच नस्ता. आसं बी डेरिवेटिव, आन सत्य शोदायासाटी कैतरी बेसिक लायकी लाग्ती, ह्ये बी तुम्चंच डेरिवेटिव.
सोता किती नालायक हाओ, ह्ये समजनं मंजी पैली पायरी जाली द्येवा.
पन तुमी डायरेट विपस्सनापटू!
आन आमी पल्डो नास्तिक. तुमास्नी कस्काय अध्यात्म सांगावं द्येवा?
येक सांगा,
सत्य म्हणजे काय?
पण ते असोच.
तुमचा जालिय इतिहास अन भूगोल आमास्नी डिट्टेलवार ठाऊक आहे.
ते पण हितं नगंच. कारन त्ये सत्य हाये.
हितं इत्कंच बोलू ---------->

"= नाही. साधना घरच्याघरी आणि मोफत करण्यासारखी आहे."
म्हंजे कशी कर्तात?
ते केंद्रात जाऊन केल्यावर सांगतात ते अल्लग र्‍हातं का?
म्हंजी त्ये ८ - पंध्रा दिस तोंड हुगाडायचं नै, कुनासंगतीच बोलाय्चं नै, अमुकच मुझिक आईकायचं, आन काय अन काय..
तुमी आसं सग्ळं पब्लिकमंदी सांगाया लाग्लात तं गोयंका गुर्जी रागे भर्नार न्हाईत का?

वैभवश्री,
>तुम्हाला ज्ञान मिरवायचे आहे?

ज्ञान एकतर आहे किंवा नाही. त्यात मिरवण्याचा प्रश्नच येत नाही. तुमच्या ही पहिल्या प्रश्नाला मनःपूर्वक उत्तर दिलं होतं. बोलायला काही उरलं नाही की लोक हा हुकमी मुद्दा काढतात. असो.
____________________

हे इब्लिस की कोण आहेत ते त्या साती-बन्या सारखेच असंबद्ध बरळायला लागलेत. अर्थात तो प्रश्न इथल्या प्रशासनाचा आहे. सो नो कमेंटस.

बुद्ध स्वतःला नालायक समजत नव्हता हे नक्की.>>>> तुमचं चालू दे. पण होऊन गेलेल्या व्यक्तीबाबत
नीट व्यक्तव्य करा.

>पण होऊन गेलेल्या व्यक्तीबाबत नीट व्यक्तव्य करा.

= वक्तव्य योग्य आहे आणि ते बुद्धाबद्दल आदरच व्यक्त करतं. आपण संदर्भासहित आणि इतर सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादाच्या काँटेक्स्टमधे वाचावं.

सर्व आधी वाचण्यात आले आहेच. पण हे छान झाले बुद्धाला प्रमाणपत्र मिळाले.आधी म्हटल्याप्रमाणे तुमचं चालू दे.

बोलायला काही उरलं नाही की लोक हा हुकमी मुद्दा काढतात<<<<<
तसेच नसते कै ....काही लोक समोरचा काय बोलतो आहे का बोलतो आहे हे पारखतात बरोब्बर म्हणून बोलतात

उलट मी आपले वर कोट केलेले वाक्यच तुम्हाला माझया प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे सुचवत आहेत !!!: Happy
आधी स्वता:ला ओळखा मग दुसर्‍याना ....अगदी बुद्धाला देखील !!!!

बुद्धाचा व आपण सांगीतलेल्या ज्ञानमार्गाचा आपण जितका आवर्जून (हेतूपुरस्सर???) संबंध लावत आहात तो लावाण्याची आवश्यकताच मला तरी समजली नाही

ज्ञानाबाबत बोलताय तर निव्वळ ज्ञानाबाबत बोला बूद्धाचं की पैगंबराचं ह्याचा प्रश्नच कुठे येतो???????

बुद्धाचे नाव तुम्ही सारखे सारखे मध्ये आणताय आणि लोकाना कसले सल्ली देताय >>>>>>मखलाशी म्हणून जनमान्य व्यक्तीला थोर दर्शवून मोकळा होतो. जेणे करुन त्याच्या विधानाला पुष्टी मिळते.<<<<< कहीही बरका

क्षीरसागर साहेब .....अस्स्सं नस्स्तंहो !!! Happy

मीही विठ्ठलाचे शेर करतो तेव्हा मला काय भावना /जाणीव /संवेदना /आकलन इत्यादी झालय तेच मांडतो.... तुकोबाने काय सांगीतले ज्ञानोबाने काय सांगगीतले की चोखोबाने ह्याच्या उठाठेवी करत नाही कधी .....:)

श्रीयुत वैभव वसंतराव कुलकर्णी

प्रथम आपला आरोप पाहा :
>तुम्ही जे सांगताय ना त्यात तुम्हाला ज्ञान मिरवायचे आहे हा भाव अगदी क्लीअरली ओसंडून वाहतो आहे

त्यावर माझं म्हणणं बघा :
=ज्ञान एकतर आहे किंवा नाही. त्यात मिरवण्याचा प्रश्नच येत नाही. तुमच्या ही पहिल्या प्रश्नाला मनःपूर्वक उत्तर दिलं होतं. बोलायला काही उरलं नाही की लोक हा हुकमी मुद्दा काढतात. असो.

आता तुम्ही काय म्हणतायं ते पाहा :

>उलट मी आपले वर कोट केलेले वाक्यच तुम्हाला माझया प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे सुचवत आहेत !!

आता तुम्ही काय करतायं ते पाहा :

>तुम्हला एक विचार साण्गतो बघा पटतोय का. मुळात "मी आहे " ही जीवाला होणारी सर्वात सूक्ष्म जाणीव होय

= म्हणजे `स्वस्मरण' ही तुमची अध्यात्मिक साधना आहे. पण या साधनेचं तुम्हाला सम्यक ज्ञान नाही (थोडं थांबा, अजून पुढे सगळं येतंय, शांतपणे वाचा)

त्या प्रतिसादातच तुम्ही स्वतःचा संभ्रम नमूद केलायं

> आता ही जाणीव मरणानंतरही सुरूच राहते का ??श्वासा पेक्षाही अविरत व नित्य अशी ही मी आहे ही जाणिव संपली (जी श्वासासोबत संपते का हाही प्रश्न आहे )...

= याचा अर्थ तुम्हाला स्व नित्य आहे याची खात्री नाही. कारण खात्री व्ह्यायला तो गवसावा लागतो! आणि एकदा गवसला की दुनियेला प्रश्न करायची गरजच पडत नाही.

तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो ही गुर्जिएफनी पुरस्कृत केलेली साधना पद्धती आहे. आणि श्री निसर्गदत्त महाराज या सिद्धानं ती गुर्जिएफपेक्षाही प्रभावीपणे मांडलीये. त्यावर माझा हा लेख (महाराज)
http://www.misalpav.com/node/24608 तुम्हाला उपयोगी होईल. ...कारण या साधनेनं मला स्व गवसायला मोलाचं सहाय्य केलंय.

पण तुम्हालाच स्वतःच्या साधनाप्रणालीची खात्री नाही म्हणून शेवट तुम्ही असा केलायं:

>आता त्यानंतरचे टप्पे तुमचे तुम्ही शोधा !!! पुढे नाही मला सांगायचे. कशाला फारसे सांगू तुला

आणि मला साधनेचं फलित ज्ञात असल्यानं मी तुम्हाला उत्तर दिलंयः

=पुढचा टप्पा `मी आहे' ही केंद्रिभूत जाणीव आकाशरुप होणं आहे. त्याचं `एक्सप्लोजन ऑफ सायलेंस' असं अत्यंत सुरेख वर्णन आहे. बुद्ध त्याला शून्य म्हणतो. तो आनंद आहे.

त्यामुळे तुमच्याकडे मुद्दाच राहिला नाही!

असो,

>ज्ञानाबाबत बोलताय तर निव्वळ ज्ञानाबाबत बोला बूद्धाचं की पैगंबराचं ह्याचा प्रश्नच कुठे येतो

= तुमचं अज्ञान पुन्हा उघड करत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य एकच आहे ते बुद्ध सांगो, पैगंबर सांगो, की `स्वच्या जाणीवेचं `स्थितीत' रुपांतर' होवो. तुम्हाला ते लक्षात येत नाहीये म्हणून तुमचा गोंधळ आहे.

अर्थात तुमचा गोंधळ तुमच्यापाशी पण तुम्ही वर मलाच शिकवून तो लपवतायं! आणि बन्या-टन्या-साती-इब्लिस हा निष्कारण बिथरलेला कंपू सोडा, (त्यांना काही समजण्याची शक्यताच नाही) पण जे शांतपणे विषय समजावून घेतायंत त्यांची तुम्ही दिशाभूल करतायं. यू आर ब्लॉकिंग देअर पॉसिबिलीटी.

श्रीयुत येळेकर

बुद्धाबद्दल नितांत आदर आहे म्हणूनच हा लेख लिहीला आहे. तुमचं आपलं सारखं "तुमचं चालू दे...तुमचं चालू दे".चाललंय याचा अर्थ तुम्हाला फक्त उपहास करायचायं. त्यामुळे तुम्ही "सर्व आधी वाचण्यात आले आहेच" वगैरे म्हणत असलात तरी तुम्हाला वाचनात रस नाही हे स्पष्ट आहे.

तुम्ही वाचवं की नाही हा तुमचा प्रश्न आहे पण न वाचता मधलंच वाक्य उचलून गैरसमज निर्माण करणारे प्रतिसाद देणं योग्य नाही.

चला सलग तिसर्या संस्थलावर बाजार उठला

संजय ऐक माझे .. मीही पुण्यात असतो , तुला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे दाखवून आणुयात
खर्चाचा काही प्रॉब्लेम आहे का?

बन्या-टन्या-साती-इब्लिस हा निष्कारण बिथरलेला कंपू सोडा, (त्यांना काही समजण्याची शक्यताच नाही) पण जे शांतपणे विषय समजावून घेतायंत त्यांची तुम्ही दिशाभूल करतायं. यू आर ब्लॉकिंग देअर पॉसिबिलीटी.

=)) =))

प्रत्येक साईट वर कुठला ना कुठला कंपू तुम्हाला भेटतोच काहो

वरची सुरेख मुर्ती सोडली तर बाफचा आणि बुद्धाचा काहीच संबंध जाणवत नाहीये,
तुम्हाला विपश्यनेबद्दलच लिहायचं होतं तर सरळ विपश्यना नावाने बाफ सुरु करायचात की (उगाच त्या बुद्धाला मध्ये आणलं). ताकाला जावून भांडं का लपवावं?

बाकी बुद्धमुर्ती खरंच खूप सुरेख आहे. (लेखाबद्दल काहीही बोलायची इच्छा नाहीये. बर्‍याच जणांनी बोलून घेतलंय Proud )

खरच बुद्धमुर्ती अतीशय सुरेख आहे. बाकी काही न बोललेले बरे. कारण ज्या व्यक्तीशी आपले वैर देखील नसते, किंवा त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात कधी भेट पण नसते अशा व्यक्तीला विचीत्र म्हणणे सुद्धा मग अवघड असते.:फिदी:

साती आणी डॉ. गायकवाड यांच्याशी सहमत.

१)बुद्ध स्वतःला नालायक समजत नव्हता हे नक्की.
२)"सर्व आधी वाचण्यात आले आहेच" वगैरे म्हणत असलात तरी तुम्हाला वाचनात रस नाही हे स्पष्ट आहे.>>>>>>
सर्व शोध/निष्कर्ष आपण काढीत आहात हे प्रचंड थोर!
जगात अनेक लोक स्वतःला लायक समजतात आणि सत्य शोधतात. आम्हां नास्तिकांचे इथे काम नोहे।

@ अल्पना,

>बाफचा आणि बुद्धाचा काहीच संबंध जाणवत नाहीये,

= बुद्ध, विपश्यना आणि शून्यवाद हा लेखनाचा विषय तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.

@रश्मी
>....अशा व्यक्तीला विचीत्र म्हणणे सुद्धा मग अवघड असते.

= तुमचा प्रतिसाद वाचून तुमच्याविषयी नेमक्या याच भावना मनात उमटल्या!

बुद्ध, विपश्यना आणि शून्यवाद हा लेखनाचा विषय तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे. >>> अगदी ओढून ताणून आणल्यासारखा वाटतोय हा संबंध. त्यापेक्षा सरळ सरळ विपश्यना नावाने लिहा की तुम्हाला जे काय लिहायचंय ते.

मला तो फोटो खूप आवडला म्हणून नेट सर्च केला या पोझिशनमध्ये बसलेल्या बुद्धमुर्ती /चित्रांचा. बर्‍याच सुंदर मुर्ती दिसल्या. Happy

.

विस्मया त्यांना बुद्ध कळले असते तर त्यांनी (क्षीरसागर) असे निरथर्क वाद घातलेच नसते. भगवान श्रीकृष्ण, भ. बुद्ध, आणी भ.महावीर यांची योग्यता आणी पात्रता कळायला बहुतेक ८४ लक्ष योन्या फिराव्या लागतील. तरीही उजेड पडेल की नाही देव जाणे.:फिदी:

विपश्यने बद्दल लिहा संजय मायबोली वर मतभेद असु शकतात असणारच कारण ईथला प्रत्यक जण प्रतीभावान व्यक्ती आहे या मध्ये बन्या-टन्या-साती-इब्लिस हे पण येतात आणि त्यांना मत व्यक्त करण्याचा पुर्ण अधीकार आहे ते मत मग अनुकूल असो वा प्रतीकुल तुम्ही तुमच मत प्रभावीपणे मांडा म्हणजे झाल.

बाकी मि स्वतः विपश्यना केली आहे आणी माझ्या अनूभवा किंवा समझण्या नुसार तुम्हाला फक्त विपश्यना म्हणजे काय आहे हे सांगता आले म्हणजे मिळवले. बुध्द सांगायला तुमच्या कडे अजुन पुर्ण योग्यता आली नाही कारण विषयाचा अवाका फार गहन आणी मोठा आहे. तेंव्हा तुर्तास फक्त विपश्यने बद्दल जमेल तितकेच सांगा आणी ते ही ईतरांच्या मताला मान देऊन.

Pages