बुद्ध

Submitted by संजय क्षीरसागर on 13 September, 2013 - 14:20

परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.

मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं

Sitting Buddha.jpg

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.

बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:

एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________

तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?

बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.

त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’

सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.

बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.

बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.

तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________

दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?

बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.

त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

____________________________

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?

बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.

सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?

जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.

आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.

श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

_________________________________

एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो बुद्ध जगतो तो बुद्ध झाला कि..

बुद्धाच्या मत्सराने वेडापिसा झालेला एक पंडीत होता. बुद्धाविषयी निगेटीव्ह प्रचार करूनही लोक प्रवचनाला जात असत, त्याला मानत असत हे पाहून त्याने एकदा बुद्धाच्या प्रवचनाच्या ठिकाणी जाउन त्याला शिवीगाळ केली. बुद्धाने लक्ष दिलं नाही. त्याने काहीच केलं नाही म्हणून त्याची भीड चेपली. त्याने पुन्हा पुन्हा हा प्रकार केला. एकदा त्याने मारहाण केली तेव्हां एक भिक्खू तावातावाने उठला. त्याचं अनुकरण करत आणखी भिक्खू उठले. बुद्धाने त्यांना थांबवले. तो माणूस थांबल्यावर नाराज झालेल्या त्या शिष्यांनी आम्हाला का थांबवलेत, चांगला धडा शिकवला असता असं सुनावलं. तुम्ही इतकं ऐकून का घेतलं , लोकांसमोर अपमान होत असताना गप्प राहण्याचं कारण काय ? त्यांनी रागाने विचारलं..

तेव्हां बुद्धाने उत्तर दिलं,

क्षमा करणारा किंवा शिक्षा करणारा मी कोण ? खर तर मी कोण आहे? काल मी जो होतो तो आज नाही, थोड्या वेळापूर्वी जो मी होतो तो मी आत्ता नाही. क्षणापूर्वीच्या मी मध्ये आणि आताच्या मी मध्ये फरक आहे. त्याने काल मला शिवीगाळ केली तो मी वेगळा आहे म्हणून आताच्या मी ने त्याचा राग का धरावा ? तसंच कालचा तो आज वेगळा होऊ शकतो यावर माझा विश्वास आहे. कुठल्याही काळात तसंच राहणं हे स्थितीवादाचं लक्षण आहे. तर विकास पावणं हे उत्तम मनुष्याचं. मला त्याच्या वर्तणुकीचं वाईट वाटत नाही. वाईट याचं वाटतं कि ज्यांना ही शिकवण दिली त्यांची वर्तणूक मी बदलू शकलो नाही हा माझा पराभव आहे. यावर खजील झालेल्या शिष्यांनी माफी मागितलीच, पण तिथेच उभा राहून बुद्धाच्या चिडण्याची वाट पाहणा-या त्या मनुष्यालाही पश्चात्ताप झाला आणि त्याने बुद्धाचे पाय धरले.

बुद्ध झाल्यावर या अपेक्षा ठेवतात माणसं. आम्हाला नाही जमत अजून. तुमच्या साथीने फरक पडला तर बरंच आहे....

आपल्या अत्यंत निर्बुद्ध आणि व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल प्रशासकीय धोरण काय आहे याची कल्पना नसल्यानं सध्या दुर्लक्षित केले आहेत.
<<<

हे बन्या की कोण सदस्य फारच बिथरलेले दिसतात. एकतर त्यांना विषयातलं गम्य नाही पण निष्कारण बाष्कळपणा चालू आहे.<<<

हे इब्लिस की कोण आहेत ते त्या साती-बन्या सारखेच असंबद्ध बरळायला लागलेत. अर्थात तो प्रश्न इथल्या प्रशासनाचा आहे. सो नो कमेंटस.<<<

तुम्ही वर मलाच शिकवून तो लपवतायं! आणि बन्या-टन्या-साती-इब्लिस हा निष्कारण बिथरलेला कंपू सोडा, (त्यांना काही समजण्याची शक्यताच नाही) पण जे शांतपणे विषय समजावून घेतायंत त्यांची तुम्ही दिशाभूल करतायं. यू आर ब्लॉकिंग देअर पॉसिबिलीटी<<<

मीही पुण्यात असतो , तुला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे दाखवून आणुयात
खर्चाचा काही प्रॉब्लेम आहे का?<<<

Rofl

"येळेकर श्रीयुत नाहीत. बाकी चालु द्या" <<< Lol

खरंच प्रोफेसर साहेबांनंतर अनेक दिवसांनी हसायची संधी आली.

बुद्धाचा फोटो आवडला. चर्चाही आवडली.

धन्यवाद!

हल्ली प्रतिसाद ५० च्या वर वाढलेल्या धाग्यावर राडाच झालेला असतो ह्याचा पुनःप्रत्यय आला.

असं काही नाही. प्राध्यापकांच्या गझलांच्या धाग्यावर पन्नासच्या आतच अघोरी खेळ रंगायचा.. इथं किमान चर्चा तरी झालीय. राड्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकेल.

१) बुद्ध ही स्थिती आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलंय.

त्यामुळे लेखाला बुद्धाच्या शिकवणीचे भारंभार तपशील दिलेत त्यांना लेखनाचा अर्थ उमगला नाही.

उपहासात्मक प्रतिसाद देणार्‍या सदस्यांच्या आकलनाचा आवाका बघता एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. कुणीही बुद्ध होऊ शकत नाही. अस्तित्व एक व्यक्ती एकदाच निर्माण करते. तस्मात इतक्या उघड गोष्टीवर व्यर्थ चर्चा होऊ नये. बुद्ध किंवा सत्य अथवा आनंद ही कायम स्थिती आहे आणि तिच्याशी संलग्न होणं हा अध्यात्मिक लेखनाचा (किंवा ध्यानप्रणालींचा) उद्देश असतो.

त्या अनुषंगानं चर्चा झाली तर लिहीता येईल अन्यथा मला इथे लेखनात काहीही स्वारस्य नाही.

ज्यांना लेखन `विचित्र' वगैरे वाटते त्यांना पोस्ट न उघडण्याचा सोपा पर्याय आहे.

इथे जरी पहिला लेख असला तरी आत्तापर्यंतच्या लेखनाचा उपयोग झालेले असंख्य चाहते आहेत.

२) बरेच व्यक्तीगत प्रतिसाद आहेत त्यांना यथोचित उत्तर वेळ झाल्यावर देण्यात येईल. पण मानसोपचार तज्ञाच्या फीचा उल्लेख करणार्‍या सदस्याच्या लेखनिक कारकिर्दीचा आणि एकूण आकलनाचा आढावा घेता त्याला स्वतःलाच तशी गरज असून लिलावात सुद्धा त्याला कुणी घेणार नाही हे नमूद करू इच्छितो. माझ्या सांपत्तिक आणि मानसिक स्थितीची त्यानी काळजी करु नये.

३) इतर संकेतस्थळांच्या बाबतचे उल्लेख इथे चालतात असे दिसते आणि त्यात काही व्यक्तिगत नसावे असे प्रशासकीय धोरण असावे. वस्तुस्थिती कमालीची वेगळी आहे. संबधित सदस्येलाही योग्य उत्तर दिले जाईल.

सध्या व्यावसायिक कामात व्यग्र असल्यानं उत्तरं देण्यात वेळ घालवत नाही पण याचा अर्थ उत्तरं देता येत नाहीत असा कुणीही घेऊ नये.

हे इब्लिस की कोण आहेत ते त्या साती-बन्या सारखेच असंबद्ध बरळायला लागलेत. अर्थात तो प्रश्न इथल्या प्रशासनाचा आहे. सो नो कमेंटस.>>>>>>>>>>>>> सगळेच असंबद्ध बरळायला लागलेत हो....फक्त संजय क्षीरसागर च काय सांगत आहेत ते सीरियस आणि बरोब्बर आहे....बाकी तुमचं चालु द्या.....:हहगलो:

हाहाहाहा, इथेही सुरू का? सगळीकडेच कसे कंपू असतात ना, आणि ते ह्यांनाच बरोबर टारगेट करतात. Wink

या असंबद्धांमध्ये अनिश्का ही सामिल होणार...... >>>>>>> अनिश्का तुम्हाला ति मुर्ती इंटेरिअल डेकोरेशन मधे वापरायची आहे का ?

पूर्ण मायबोली हाच एक टवाळ कंपू आहे. इतक्या सुंदर ज्ञानकणाची अजिबात कदर नाही इथल्या लोकांना. कशाला वाटताय असे फुकट ज्ञान?

बुद्ध ही व्यक्ती, अवस्था, स्थिती आणि दशा समजून घेण्यासाठी केवळ विपश्यना पुरेशी नाही. त्यासाठी जगाची, त्यामधील दु:खांची, भोगाची, मायेची आणि तत्त्वज्ञानाची थोडीफार तरी समज असावी लागते, हे तुम्हाला कदाचित मान्य नसेलच. बरोबर ना?

नंदिनी माझा आक्षेप आहे ... Wink

मला टवाळ म्हणाल्या बद्दल माझ्या मनाच्या अंतरमनाच्या नाजुक भावना अत्यंत तीव्रगतीने दुखावल्या गेल्या आहेत. याबद्दल माझ्यामनात अत्याधिक करुणा, दु:ख मिश्रित भावना निर्माण झाली आहे. माझ्या दुखा:चा तुम्ही कडेलोट केला आहात.. सहनशक्ति चा अंत पाहिला आज या डोळ्याने मी माझ्या स्वतःच्या ...देव तुम्हाला क्षमा करो...
Biggrin

अनिश्का तुम्हाला ति मुर्ती इंटेरिअल डेकोरेशन मधे वापरायची आहे का ?>>>>>>>>.. हो नक्कीच वापरेन...पण भिती वाटतेय की विपश्यना किंग यास अक्षेप घेतील....

हो.....पण बुद्ध म्हटला की राग लोभ ईर्ष्या सर्व विसरुन जायचे असते....बुद्धांचे फॉलोअर मला फुकट देतील....अगदी आनंदाने.... काय म्हणता उदयन दा??

दा लाउ नका हो................त्या रिया चा भास होत असतो ..... सगळी कडे तिच.. ::)

दा .........हे वाचले ना......तर असे वाटते की रिया डुआयडी घेउन आली....... अचानक कुणाच्या शरिरात दुसर्याचा आत्मा येउन कसा बोलतो.......तसे वाटते Biggrin

ते तर समजल मला Happy
विषयातुन भरकटुन चालणार नाही....या धाग्याचे मालक विपश्यना संपवुन येतील खरड काढायला..... Wink

नाही त्यांना राग येत नाही.....

बुध्द म्हणजे शांतता........ लोभ मत्सर भय आनंद या पलिकडे,....

Pages