बुद्ध

Submitted by संजय क्षीरसागर on 13 September, 2013 - 14:20

परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.

मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं

Sitting Buddha.jpg

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.

बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:

एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________

तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?

बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.

त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’

सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.

बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.

बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.

तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________

दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?

बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.

त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

____________________________

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?

बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.

सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?

जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.

आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.

श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

_________________________________

एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.
**
ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

<<

शेंग आहे आत दाणा नाही.
अंड्यामधे बलक नाही...
कवटीच्या आत मेंदू नाही.
मेंदूच्या आत तर काहीच नाही..
फक्त एकसंध शांतता..
सर्वत्र!
अहह!

मला समजले! मला समजले!!!

युरेका फोर्ब्स! युरेका फोर्ब्स!!

त्या बिच्यार्‍याला जाणिवही नसेल की आपल्यावरुन पुढे एक - अनेक युद्ध होणार आहेत.... चालु द्या....

उदय :- दा मत कहो ना (आठवलं का काही) Lol

लोकहो,

डॉ. कैलास गायकवाड आणि संजय क्षीरसागर यांच्यातली वैचारिक जुगलबंदी वाचली. बुद्ध आणि त्याच्या तत्त्वज्ञानात मला फारशी गती नाही. पण एक गोष्ट जाणवली म्हणून लिहितोय.

भारतीय परंपरेनुसार तत्त्वज्ञान हे एक प्रकारचे दर्शन असते. तत्त्वज्ञान हे बुद्धीने जाणून घ्यायचे असते, तर दर्शन म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय. ज्या तात्त्विक विवेचनातून पुढे अनुभूती येते अशा तत्त्वज्ञानास दर्शन म्हणावं.

डॉ. कैलास बौद्धमत (=तत्त्वज्ञान) उधृत करीत आहेत तर संजय क्षीरसागर स्वत:चा अनुभव (=दर्शन) सांगू पाहताहेत. त्यामुळे दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत असं मला वाटतं.

त्यामुळे हा वादविवाद दोघांनी योग्य तर्‍हेने विकसित केल्यास बर्‍याच जिज्ञासूंची चंगळ होईल! असा आपला माझा अंदाज. Happy

आ.न.,
-गा.पै.

तत्त्वज्ञान हे बुद्धीने जाणून घ्यायचे असते, तर दर्शन म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय. ज्या तात्त्विक विवेचनातून पुढे अनुभूती येते अशा तत्त्वज्ञानास दर्शन म्हणावं.
<<
" अरे हूऽट! कैच्याकै अर्थ लावत जाऊ नका."
असे म्हणून नम्रपणे असहमत.

चार्वाक दर्शनाची "अनुभूती" घ्या जरा.

अन हो, तिकडे आसूमल वरच शोभता तुम्ही.

मला त्या बुद्धमुर्तीच्या फोटोसाठी संजय क्षीरसागरांचे आभार मानायचेत. त्याफोटोवरून एक सुंदर स्केच तयार झालं माझ्याकडे. Happy

या धाग्यावरची बघण्यसारखी एकमेव गोष्ट (बुद्धमुर्तीचा फोटो) पण आता दिसत नाहीये.

>डॉ. कैलास बौद्धमत (=तत्त्वज्ञान) उधृत करीत आहेत तर संजय क्षीरसागर स्वत:चा अनुभव (=दर्शन) सांगू पाहताहेत. त्यामुळे दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत असं मला वाटतं.

= यू आर अब्सल्यूटली राइट!

अध्यात्मिक लेखन समजायला दोन गोष्टी लागतात. एक, संपन्नता (ज्यामुळे स्वास्थ्य येतं) आणि दोन, किमान बुद्धिमत्ता (ज्यान्वये जे लिहीलंय ते वस्तुनिष्ठतेनं वाचता येतं)

संपन्नतेविषयी अंदाज बांधणं (सध्या) मुश्किल आहे पण ज्यांनी उपहासात्मक प्रतिसाद दिलेत किंवा देतायंत त्यांची आकलनक्षमता कळायला त्यांची लेखनिक कारकिर्दी पाहिली की झालं!... तर असो,

तुम्ही नुकतेच अँजिओप्लास्टीतून सुखरुप पार पडलात. तुमच्याकडे समज आहे. सांगितलेल्या प्रक्रियेचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल.

ज्यांनी उपहासात्मक प्रतिसाद दिलेत किंवा देतायंत त्यांची आकलनक्षमता कळायला त्यांची लेखनिक कारकिर्दी पाहिली की झालं!... तर असो,
>> पाहिलीत का "लेखनिक" कारकीर्द??? कुणा-कुणाची पाहिलीत सांगा बघू फटाफट. फक्त मायबोलीवरची की अख्ख्या आंतरजालावरची की एकूणच कारकीर्द???

तुमची कारकीर्द देखील इथल्या बर्याच जणांनी पाहिली आहे बरं का!!!!!

>तुमची कारकीर्द देखील इथल्या बर्याच जणांनी पाहिली आहे बरं का!!!!!

= माझी लेखनिक कारकिर्द पाहणारे माझ्या संपर्कात आहेत. ज्या अर्थानं तुम्ही म्हणतायं तो पूर्वग्रह आहे. तस्मात, असा कोणताही पूर्वग्रह किंवा (इतरांची मतं) बेदखल करून फक्त लेखनापुरती चर्चा मर्यादित ठेवा...आणि वाचा. मजा येईल.

मजा तर येतेच आहे. इतके विनोदी प्रतीसाद वाचून. आमचे पूर्वग्रह जोरदार, म्हणून तुम्ही माबोवर आलात!!!

लेखनिक या शब्दाचा नक्की अर्थ काय????

>आमचे पूर्वग्रह जोरदार, म्हणून तुम्ही माबोवर आलात!!

= गैरसमज आहे. वेळ लागेल पण नक्की दूर होईल.

आणि मजेचं म्हणाल तर ती दोन प्रकारची आहे. गापै सारख्या एखाद्याला अर्थ उलगडण्यामुळे येणारी मजा वेगळी आणि लेखनविषयाला सोडून जी भंकस चाललीये त्याची मजा वेगळी. अर्थात तो ज्याचा त्याचा वकूब आहे.

>लेखनिक या शब्दाचा नक्की अर्थ काय????

`लेखन, पत्रकारिता' हा व्यावसाय असणार्‍या व्यक्तीनं असा प्रश्न विचारवा हे नवल आहे.

शिवाय मी लेखनिक कारकिर्द असा शब्द वापरला आहे (आणि तुमचा प्रोफाईल पाहता ती उदंड दिसते). तरी तुमचा नक्की प्रश्न काय आहे? (खरं तर लेखनविषय सोडून तुम्ही हे नवंच काय काढलंय?)

लेखनिक कारकीर्द या शब्दसमूहामधील लेखनिक या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे?

''जो करू शकतो युद्ध त्यानेच व्हावे बुद्ध ' ही माझ्या एका कवितेची ओळ संदर्भ सोडून इथे प्रकट झाली आहे असे वाटतेय !

संजय क्षिरसागर,

१). अत्यंत उत्कृष्ट !

बुद्ध ही स्थिती आहे, हे १००% सत्य आहे. माबो वर तुमच्या सारखे मतितार्थ समजलेले सदस्य आहेत हे पाहुन आनंद झाला.

बुद्धाच्या अष्टांग योगा बद्दल च्या जगाला दिलेल्या ज्ञानाबद्दल ही लिहावे.

२).एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

तुम्ही सुद्धा ह्या साध्या वाहात्या पाण्यात वाहु नका, जे सांगायचं आहे त्यावरच लक्ष राहु द्या, तोल जाऊ देऊ नका.

नमस्ते.

>''जो करू शकतो युद्ध त्यानेच व्हावे बुद्ध '

खरं आहे! या लेखात मी कुणाविरुद्ध काहीही लिहेलेलं नाही पण पब्लिकनं काय उच्छाद मांडलाय पाहा. अश्या वेळी उत्तरं देता यायला हवी. शांतता कामाची नाही.

>१). अत्यंत उत्कृष्ट !

धन्यवाद!

तोल वगैरे जाणं शक्य नाही कारण समोर फक्त कंप्युटर स्क्रीन आहे याचं पूर्ण भान आहे!

इब्लीस, त्यांना देउ द्यात की उत्तर, हातभर लेख लिहिणं सोपं आहे, पण त्यामधल्या मजकुरावर कुणी प्रश्न विचारला की लगेच, लगेच "उच्छाद" काय? हाच तुम्हाला समजलेला बुद्ध म्हणावा की काय? विपशयाना वगैरे करून फायदा काय मग?

संजय क्षीरसागर, तुम्हीच वापरलेला शब्द आहे ना? मग द्या की उत्तर: लेखनिक या शब्दाचा नक्की अर्थ काय? चौथ्यांदा विचारते आहे प्रश्न. त्याचे उत्तर सोडून बाकी सर्व बोलता येतंय तुम्हाला.

अर्थ तर तुम्हाला कळला आहेच. आणि ज्यांना उद्देशून म्हटलंय त्यांनाही तो पोहोचलाय.
तुमच्या प्रतिसादातून (निष्कारणचा) उपहास ओतप्रोत वाहातोयं. म्हणजे तुम्हाला लेखनात काहीही स्वारस्य नाही. झालंच तर चर्चा भरकटवायची आहे. ही काय शाळाबिळा समजलात काय? तुम्हाला हवा तो अर्थ घ्या आणि पुन्हा असले प्रश्न विचारुन माझा वेळ घेऊ नका.

मला तुमच्या वरच्या लेखामध्ये असंख्य चुका दिसत आहेत, त्यापैकी बहुतेक चुका कैलास यांनी दाखवलेल्या आहेतच. ऐतिहासिक घोडचुका आहेत त्या. तरीदेखील तुमचं आपलं टूमनं चालूच आहे. चर्चा करण्यासाठी मुळात त्या लेखात काही जीव हवा की नको? दुसर्याचे मत ऐकून घेण्याची जरातरी तसदी घ्यायला हवी की नको? सतत माझंच कसं बरोबर आणि लिहिणारे इतर सर्वच लोक कसे टवाळ, उच्छाद मांडनारे वगैरे??? तुमच्या त्या विपश्यानेमुळे असला अहंकार येतो की काय? मग कशाला कुणी करावी असली साधना आणि असले अध्यात्म??? हातभार लेख लिहिला म्हणून कुणी शहाणे होत नाही.. त्या लेखामधल्या मुद्द्यांचा देखील व्यवथित अर्थ समजायला हवा ना? मोठेमोठे शब्द वापरले म्हणजे फार सुंदर अर्थपूर्ण लिहिले असे होत नाही.. देवपूरकर म्हणून एक प्रचंड मोठे कवी आहेत त्यांना विचारा.

निश्काराणचा उपहास कसला? तुम्ही एक शब्दप्रयोग वापरलात, गेल्या चार पोस्टीमध्ये मी त्यातल्या एका शब्दाचा अर्थ विचारत आहे- तेदेखील व्यवस्थित शब्दांत, तर तुम्ही अर्थ न सांगता भलतीकडे विषय का नेत आहात?

पुन्हा एकदा, लेखनिक कारकीर्द या शब्दसमूहातील लेखनिक या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे?

ओ नंदीनी,,,,, तुला कलत नाय,,,,
त्यांचा ना वेल फाल अमूलय हाय,,,
कलत कशे नाय?
Wink

बुद्ध धर्माचि महत्त्वाची प्रार्थना -

नमो तस्स अरहतो भगवतो... सम्मा सम्बुद्ध .....

......

ये च बुद्धा अतीता च ...ये च बुद्धा अनागता ....

याचा अर्थ असा आहे की आम्ही भूतकाळातील आअनि भविश्य़काळातील सर्व ज्ञानी /सन्त /सत्पुरुश/ बुद्ध याना नमन करतो

बुद्ध ही एक व्यक्ती नसून पद आहे.

बुद्धाचे-बोधिसत्त्वाचे अनेक अवतार असुन शाक्यमुनी म्हनजे सिद्धार्थ गौतम हे बुद्धाचे अवतार होते .अजुनही अरिमैत्रेय बुद्धजम्न्मास याय्चे आहेत .

असे मी काही ठिकाणी ऐकलेले आहे...

भगवान तथागत गौतम बुद्धास अनेकोत्तर प्रणाम !

Pages