बुद्ध

Submitted by संजय क्षीरसागर on 13 September, 2013 - 14:20

परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.

मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं

Sitting Buddha.jpg

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.

बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:

एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________

तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?

बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.

त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’

सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.

बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.

बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.

तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________

दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?

बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.

त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

____________________________

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?

बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.

सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?

जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.

आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.

श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

_________________________________

एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना).

>>>>>>>

माझ्या माहितीप्रमाणे ''ऑब्झर्व्ह युअर ब्रेथ'' हे बुद्धाने सांगितले नाही.

विपश्यनेचा एक मार्ग श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याचा आहे. हा आर्ट ऑफ लव्हिंग मधे शिकवला जातो. हा मार्ग बुद्धाने सांगितला आहे किंवा कसे याबद्दल लिहावं ही विनंती. संजय क्षीरसागर हे नाव अनेकदा वाचनात आलेलं आहे. कुणीतरी करून दिलेला त्यांचा परिचयही वाचनात आला. तेच तुम्ही असाल तर तुमच्या व्यासंगाबद्दल प्रश्नच नाही. तुमचं या विषयावर संशोधन सुरू आहे का ? ( लेखातल्या घटनांसाठी संदर्भ द्यावेत ही विनंती).

@ विस्मया
>फक्त अशा एखाद्या घटनेतूनच ज्ञान झालं असेल कि त्याआधी ट्रायल अँड एरर म्हणून केलेल्या अनेक क्रिया, अनेक वर्षे केलेला पण हाती काही न लागलेला हठयोग यातूनही काही विचारप्रक्रिया सुरू झाली असेल ?

= स्वास्थ्य हा आपला सततचा शोध आहे. कारण ते हे आपलं स्वरुप आहे. वी वाँट टू कनेक्ट टू अवरसेल्वज. ही कनेक्टीविटी आनंद आहे.

मन आपल्याला सांगतं की आनंद उपभोगात आहे आणि त्या दिशेनं गेलं की मार्ग चुकतो कारण उपभोग कालबद्ध आहे. अंतयात्रा पाहून बुद्धाला ही गोष्ट लक्षात आली.

ज्या कुणाला ही गोष्ट लक्षात येते त्याचा जे कालबद्ध नाही त्याचा शोध सुरु होतो. त्यामुळे बुद्धाच्या शोधाची प्रक्रिया त्या घटनेपासनं झाली. त्यानं साधना अनेक वर्ष केली असा इतिहास आहे पण वन नीड नॉट गो इंटू दॅट. कारण ज्याला उत्तरं सापडलं तो सरळ मार्गच दाखवतोयं म्हंटल्यावर त्याला तो शोधायला किती सायास झाला याची चर्चा उपयोगी नाही.

>अतः दीप भव , मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, सत्याच्या कसोटीवर घासून पटल्यास विश्वास ठेवा ही शिकवण कुठून आली असेल ?

येस! कारण ती उघड गोष्ट आहे. तुम्हाला सत्य गवसलं की नाही हे फक्त तुम्हीच सांगू शकता. मग सारी दुनिया काहीही म्हणो. आणि जर गवसलं नसेल तर जगनमान्यता मिळाली तरी आतून अस्वास्थ्य कायम राहतं. सो यू आर द फ्रूफ.

@ कैलासजी

>माझ्या माहितीप्रमाणे ''ऑब्झर्व्ह युअर ब्रेथ'' हे बुद्धाने सांगितले नाही.

= जगातल्या कोणत्याही ध्यान प्रक्रियेचा एकच फंडा आहे : जाणीवेच रोख बदलणं.... तो जगाकडून स्वतःकडे आणणं. ओशो याला `जस्ट अ हंड्रेड-अँड-एटी डिग्री टर्न' म्हणतात.

श्वास ही अत्यंत संथ आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मनाची अस्वस्थता श्वासाची लय बिघडवते. आपण श्वासाची दखल घेतली की वर्तमानात येतो, शांत होतो.

अशी मनःपूर्वक साधना काही काळ केली तर एखाद्या निवांत क्षणी उलगडा होतो : श्वास चालू आहे आणि आपल्याला कळतंय. मग जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतात. एक, श्वासाची संथ प्रक्रिया आणि दुसरी, जाणीव. त्या क्षणी आपल्याला कळतं की सगळं आपोआप आणि मस्त चालू आहे. मनाच्या अविरत बडबडीमुळे आपल्याला व्यक्तीत्वाचा भास होत होता. आपण शरीर आणि मनापेक्षा वेगळे आहोत. निराकार जाणीव आहोत. व्यक्ती नसून स्थिती आहोत.

@ मुद्दाम हसेन,

>संजय क्षीरसागर हे नाव अनेकदा वाचनात आलेलं आहे. कुणीतरी करून दिलेला त्यांचा परिचयही वाचनात आला. तेच तुम्ही असाल तर तुमच्या व्यासंगाबद्दल प्रश्नच नाही.

= नाही. मी अजून एकही पुस्तक लिहीलेलं नाही. सारं लेखन आंतर्जालावर आहे.

>तुमचं या विषयावर संशोधन सुरू आहे का ?

= संशोधन संपलेलं आहे!

>( लेखातल्या घटनांसाठी संदर्भ द्यावेत ही विनंती).

= जे आहे ते माझ्याकडे सरळ आहे. ते आणि मी यात अंतर नाही. त्यामुळे संदर्भ देण्याचा प्रयास मला जमत नाही. पण एक गोष्ट नक्की, जे लिहीलंय तो अनुभव आहे. तुम्ही त्या अनुषंगानं कोणताही प्रश्न विचारु शकता.

(बाय द वे, तुमचा आयडी मस्त आहे!)

जगातल्या कोणत्याही ध्यान प्रक्रियेचा एकच फंडा आहे : जाणीवेच रोख बदलणं.... तो जगाकडून स्वतःकडे आणणं. ओशो याला `जस्ट अ हंड्रेड-अँड-एटी डिग्री टर्न' म्हणतात.

श्वास ही अत्यंत संथ आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मनाची अस्वस्थता श्वासाची लय बिघडवते. आपण श्वासाची दखल घेतली की वर्तमानात येतो, शांत होतो.

अशी मनःपूर्वक साधना काही काळ केली तर एखाद्या निवांत क्षणी उलगडा होतो : श्वास चालू आहे आणि आपल्याला कळतंय. मग जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतात. एक, श्वासाची संथ प्रक्रिया आणि दुसरी, जाणीव. त्या क्षणी आपल्याला कळतं की सगळं आपोआप आणि मस्त चालू आहे. मनाच्या अविरत बडबडीमुळे आपल्याला व्यक्तीत्वाचा भास होत होता. आपण शरीर आणि मनापेक्षा वेगळे आहोत. निराकार जाणीव आहोत. व्यक्ती नसून स्थिती आहोत.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे सगळं ठीक आहे. पण हे बुद्धाने सांगितले नाही.

बुद्धाने सान्गीतलेल्या विपश्यनेत आधी तीन दिवस श्वासावर मन केन्द्रीत करुन एकाग्र करायचे आणी नन्तर चवथ्या दिवसापासून शरीराच्या संवेद्ना बघ्यायच्यात (निर्वीकार पणे)...अस विपश्यनेत शिकवीतात..फक्त श्वासावर मन केन्द्रीत करुन वरवरच्या विकारानपासून सुट्का होते म्हनुन...

@ कैलासजी आणि वृषाली

>हे सगळं ठीक आहे. पण हे बुद्धाने सांगितले नाही.
>बुद्धाने सान्गीतलेल्या विपश्यनेत आधी तीन दिवस श्वासावर मन केन्द्रीत करुन एकाग्र करायचे आणी नन्तर चवथ्या दिवसापासून शरीराच्या संवेद्ना बघ्यायच्यात (निर्वीकार पणे)...अस विपश्यनेत शिकवीतात..फक्त श्वासावर मन केन्द्रीत करुन वरवरच्या विकारानपासून सुट्का होते म्हनुन...

बुद्धानं नक्की काय सांगितलंय ते फक्त दोनच लोक सांगू शकतात. एक बुद्ध स्वतः ... पण ते आता शक्य नाही. आणि दुसरा म्हणजे जो बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न झालायं तो.

बुद्ध जरी व्यक्ती म्हणून हयात नसला तरी ज्या चित्तदशेला तो पोहोचला ती कायम आहे. जन्म किंवा मृत्यूनं अनाबाधित आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेली साधना करुन पाहा. जर तुम्ही स्वस्थ झालात तर तुमच्या लक्षात येईल, येस! बुद्ध हेच म्हणत होता.

पुन्हा एकदा सुंदर... ओशोंचा संदर्भ आला म्हणुन - मुळातच तत्वज्ञान (किमान मला तरी) फारच क्लिष्ट विषय वाटतो, पण ओशोंमुळे तो बराच सोपा वाटला.

एकदा विपश्यना शिबिराला जायचं आहे. पण श्वासावरील एकाग्रता स्वतःला घरच्या घरी करता येईल का? की त्यासाठी (जसं प्राणायाम) गुरुची गरज आहे ?

मला वाटते, कोणी काय सांगीतलं ते इतकं महत्त्वाचं आहे का? कि ध्यान/ बुद्ध्त्व (किंवा तत्सम स्थिती) कशी मिळवल्या जाऊ शकते, याचं विवेचन?

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.>>>>>>>>> +१००

@विजय देशमुख

>एकदा विपश्यना शिबिराला जायचं आहे. पण श्वासावरील एकाग्रता स्वतःला घरच्या घरी करता येईल का? की त्यासाठी (जसं प्राणायाम) गुरुची गरज आहे ?

विपश्यना घरी देखील करता येते. मनावर वेळेचं दडपण नसलं आणि शांतता असली की झालं.

`चालू असलेल्य श्वासाची जाणीव होणं' (ज्याची क्वचितच दखल घेतली जाते) महत्त्वाचं. या जाणीवेवर फक्त काही क्षण स्थिर राहिलो तर इतक्या सहज बेदखल केलेल्या पण आपोआप चाललेल्या क्रियेविषयी विस्मय वाटतो.

रोजच्या जीवनात आपण इतके गुंतागुंतीचे विचार, धावपळ आणि प्लॅन्स करतो पण हा आपोआप चालणारा श्वास जणू गृहितच धरलेला असतो. बहुदा अगदि शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्षातच येत नसावं की या एका प्रक्रियेवर सगळं अवलंबून होतं.

विपश्यना म्हणजे जाणीवेचा रोख बदलणं. अत्यंत सोप्या शब्दात : इतक्या अगणित गोष्टींकडे केंद्रित झालेलं आपलं लक्ष श्वासाकडे वळवणं. काही कालासाठी त्याची दखल घेणं. दॅट इज ऑल!

जस्ट ट्राय, या चालू श्वासाच्या नुसत्या जाणीवेनं आपण शांत होतो. ती इतकी विलोभनीय गोष्ट आहे की आपोआप सार्‍या जगाचा विसर पडतो. त्यासाठी इतर काहीही करण्याची गरज नाही.

तुम्ही अस्तित्वाप्रती इतके कृतज्ञ होता की तुमची संवेदनाशीलता आपोआप वाढते. ती साधना रहात नाही, रिकाम्या वेळेचा छंद होतो.

एखाद्या निवांत क्षणी तुमची जाणीव श्वासावरून सरळ स्वत:प्रत येते आणि तुम्हाला निराकाराचा बोध होतो.

अर्थात, जाणीवेचा रोख श्वासाकडून स्वत:कडे येणं लगोलग घडलं नाही आणि त्यातला सर्व अध्यात्मिक भाग सोडला तरी एक साधा पासटाईम म्हणून विपश्यनेसारखा नजाकतदार छंद दुर्मिळ आहे

>मला वाटते, कोणी काय सांगीतलं ते इतकं महत्त्वाचं आहे का? कि ध्यान/ बुद्ध्त्व (किंवा तत्सम स्थिती) कशी मिळवल्या जाऊ शकते, याचं विवेचन?

= दॅट्स द पॉइंट!

विपश्यना करणं गरजेचं आहे हा मुद्दा असेल तर मग त्याला कुणाचीच हरकत नसेल. त्यासोबत आधी असलेलं निवेदन हा डिबेटचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.

>त्यासोबत आधी असलेलं निवेदन हा डिबेटचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.

= लेखात एकूण तीन मुद्दे मांडलेत.

एक, बुद्ध ही व्यक्ती नसून ती स्थिती आहे.
दोन, विपश्यना ही त्या स्थितीशी संलग्न होण्याची (एक) प्रक्रिया आहे.
आणि तीन, आपण मूळात ती स्थिती असल्यानं द पॉसिबिलीटी इज ओपन ऑल द टाईम. वन ओन्ली नीड्स टू ट्राय.

Are you touting the Vipassana thingy, sir?

As Dr. Kailas has pointed out earlier, it was NEVER preached by Buddha himself.

btw. u must b familiar with the "friendship" between mr. goenka and mr. ravisankar. are u?

बुद्धाने नवीन असे काही सांगीतले काय ?
मला तर सगळे ज्ञान आधीपासूनच अनेक ऋषीमुनींनी ....इतर साधकांनीही सांगीतलेलेच त्यानेही सांगीतले आहे असे वाटते
बुद्धास जे झाले त्यासच आत्मज्ञान म्हणतात काय ??

बुद्ध ही व्यक्ती नसून ती स्थिती आहे.<<<< एक प्रभावी वाक्य !!!

कुणाच्याही आत कुणीही नाही<<<< कुणी नाही चा अर्थ काही नाही असा घ्यायचा काय ??

.

श्वासाव्यतिरिक्त चालणे, पळणे, अशा अनेक लयीत होणा-या क्रियांमधूनही ध्यान लागू शकते. कामात असतानाही मन एकाग्र झाल्यास ध्यान लागू शकते असं ओशोंचं म्हणणं आहे. जे पटतं. अर्थात श्वासासाठी कमीत कमी उर्जा लागत असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करणे सोपे आहे . >>>>>>>>>>>>>>>>>>

हेच म्हणायचं होतं. हे कधीकधी होतं माझ्यासोबतही. विशेषतः वाचन करतांना किंवा एखादा प्रयोग किंवा प्रोग्रामिंग करताना. पण बहुदा ती स्थिती पुन्हा येणे थोडसं कठीण वाटतं, कदाचित त्यामुळे श्वासावर ध्यान करणे सोपे असावे.

एक प्रश्न :- बहुदा ओशोंच्या पुस्तकात वाचलं होतं की जगप्रसिद्ध कलाकारांना अशी स्थिती कधीतरी प्राप्त झाली होती, त्या अनुभती चा पुन्हा अनुहव घेण्यासाठी ते अक्षरशः वेडे झाले तर कित्येकांनी आत्महता केल्या. असं झालं असावं का? दुर्दैवाने त्यांना ही ध्यान पद्धती कळली नसावी का?

आणि म्हणुनच ओशोंचे बरेचसे शिष्य प्रसिद्ध व्यक्ती असतील का?

.

नाही. मी अजून एकही पुस्तक लिहीलेलं नाही. सारं लेखन आंतर्जालावर आहे. >> माफ करा. कदाचित, नामसाधर्म्यामुळे गैस झाला. संजय क्षीरसागर यांच्या एका पुस्तक प्रकाशनासंबंधाने त्यांच्या संशोधनासंबंधीची माहिती इथे वाचनात आली होती.

संजय क्षीरसागरजी,
आपण बुद्ध ही एक व्यक्ती नसून अवस्था आहे असे प्रतिपादन करता आणि बुद्धत्वाचा संबंध विपश्यनेशी जोडता हे ''गैर'' आहे..हे कृपया ध्यानात घ्या.

शिवाय ओशो आणि बुद्ध यांची तुलना होवूच शकत नाही....

( जगातल्या कोणत्याही ध्यान प्रक्रियेचा एकच फंडा आहे : जाणीवेच रोख बदलणं.... तो जगाकडून स्वतःकडे आणणं. ओशो याला `जस्ट अ हंड्रेड-अँड-एटी डिग्री टर्न' म्हणतात. )

बुद्धाने ध्यानधारणा कशी?का?कुठे? करावी हे काहीच सांगितले नाही.

जरासे सविस्तरच विवेचन करतो...

एका वैचारिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्धाचा उदय झाला तसेच त्याला असेही आढळून आले, की ह्या जगातील माणसे लोभाविष्ट होऊन एकमेकांविरूद्ध झगडत असून थोडक्या पाण्यात तडफडणाऱ्या मत्स्याप्रमाणे दुःखीकष्टी होत आहेत (सुत्तनिवास ९३५-३६), सर्व जगात अस्तित्वात असणारे हे दुःख पाहून त्याचे मन पिळवटू लागले व ते दुःख नाहीसे कसे होईल हे शोधून काढण्याचा त्याला ध्यासच लागला. घरदार सोडून, निरनिराळे ध्यान मार्ग, तपश्चर्येचे मार्ग ह्यांचा अनुभव घेतल्यानंतर एके रात्री (वैशाख शुद्ध पौर्णिमेला) त्याला ज्ञान (संबोधी) प्राप्त झाले व त्याला दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.

निर्वाण : राग, द्वेष, मोहांचा संपूर्ण नाश झाला म्हणजे निर्वाणप्राप्ती झाली असे म्हणतात (संयुक्त. ४.२५१) ; पण निर्वाण म्हणजे संपूर्ण सुख आहे व जोपर्यंत माणसाला शरीर आहे तोपर्यंत शारीरिक आधिव्याधीही असणारच आणि ही शारीरिक व्याधी असली म्हणजे संपूर्ण सुख प्राप्त झाले असे कसे म्हणता येईल ? तेव्हा ह्यात पर्याय निघाला. शरीर शिल्लक आहे म्हणजे उपाधी शिल्लक आहे, ह्या जिवंतपणाच्या निर्वाणाला ‘सोपधिशेषनिर्वाण’ असे नाव दिले गेले. ही अवस्था अद्वैत वेदान्त्यांच्या जीवनमुक्तीप्रमाणे आहे. मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले म्हणजे उपाधी नाहीशी झाली, म्हणजे ते निरूपधिशेष निर्वाण झाले व हेच संपूर्ण निर्वाण होय. ‘निब्बाणं परमं सुखं’ असे धम्मपदात (२०३-२०४) म्हटले आहे व ह्यालाच बुद्ध सर्वांत श्रेष्ठ (अवस्था) असे मानतात. ‘निब्बाणं परमं वदन्ति बुद्धा’ (धम्मपद १८४). निर्वाण हे केवळ निरोधात्मकच आहे की त्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे, ह्याबद्दल बराच काथ्याकूट झालेला आहे. एवढे मात्र खरे की पाली त्रिपिटकांतच ते अस्तिधर्मी असल्याचे पुरावे सापडतात. उदा., उदान (८०-८१) ह्या ग्रंथात म्हटले आहे - ‘अजात, अभूत, अकृत असे असंस्कृत अस्तित्वात आहे...... म्हणूनच जात, भूत संस्कृत अशांना त्या अवस्थेतून सुटका आहे.’ म्हणूनच ह्या अवस्थेला संस्काराच्या पलीकडील तीर, ‘पारिम तीर’ (संयुत्त. ४.१७५) असे म्हटले आहे. ह्यात कोणत्याही प्रकारचे भय नसून ते सुरक्षित (क्षेम) आहे. ‘ह्याचा उपयोग काय’ वगैरेसारखे प्रश्न अनाठायी आहेत. मिलिन्दपन्ह ह्या ग्रंथात (३१६) म्हटल्याप्रमाणे त्याचे रंग-रूप, ठाव-ठिकाणा, लांबी –रुंदी किंवा जाडी किंवा वय ह्यासंबंधी काही सांगणे शक्य नाही. ते अनिर्वचनीय आहे. पण ह्या निर्वाणाचा साक्षात्कार होण्याला हा आर्य अष्टांगिक मार्गच उपयोगी आहे. ह्या आठ अंगांपैकी सम्यक् वाक्, सम्यक् कर्मान्त व सम्यक् आजीव ह्यांच्या साहाय्याने शीलाची परिपूर्णता होते. सम्यक् व्यायाम (म्हणजे प्रयत्न), सम्यक् स्मृती व सम्यक् समाधी ह्यांच्या साहाय्याने समाधीची परिपूरि (पूर्ती) होते व सम्यक् दृष्टी व सम्यक् संकल्प ह्यांच्यामुळे प्रज्ञा संपादन करावयाला मदत होते. अशा रीतीने शील, समाधी व प्रज्ञा यांच्या भावनेने भिक्षू संसाररूपी जटेचे विजटन करून त्यातून मुक्त होतो. बुद्धाच्या ह्या मार्गाला ‘मध्यम मार्ग’ असे म्हटले आहे; ह्याचे कारण बुद्धाने शाश्वतवाद व उच्छेदवाद ही दोन्हीही आत्यंतिक मते टाळली आहेत. तसेच कामोपभोग व देहदंडन हीही दोन्ही टोके टाळून मधला मार्ग पतकरला आहे.

बुद्धाची सामाजिक प्रश्नावरील विचारसरणी अशी होती : तत्कालीन समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र ही चतुर्वर्णी समाजव्यवस्था व त्याच्याही खाली अनार्य वंशी समाजरचना होती. ब्राह्मणांमध्ये प्रचलित असलेली जन्मजात शुद्धीची कल्पना बुद्धाला मान्य नव्हती. त्याची भिस्त कर्मावर होती. मनुष्य जन्मामुळे उच्च-नीच ठरत नाही, तर तो आपल्या कर्माने उच्च-नीच ठरतो. ह्या प्रश्नावर त्याचे अनेक ब्राह्मणांशी वादविवाद होऊन त्या सर्व वेळी त्याने आपल्या मुद्याचेच सर्मथन केलेले आहे आणि ह्या त्याच्या मतानुसार त्याच्या भिक्षुसंघात समाजातील सर्व थरांवरचे लोक होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कुलांतून आलेल्या लोकांप्रमाणेच शुद्ध व अनार्य वंशीही होते. सुप्रसिद्ध विनयाचार्य उपाली हा न्हाव्याच्या कुलातून आलेला होता. सुनीत हा झाडूवाला व सोपाक (श्व-पच्) हा चांडाल कुलातून आलेला होता. हे सर्व लोक भिक्षुसंघात आल्यानंतर समान दर्जाचे मानले जात व त्यांत जन्मजात उच्च-नीचभाव मानला जात नसे.

बौद्ध धर्म हा पूर्णता विज्ञानवादी असून कर्मकांडे व पुनर्जन्म आदि गोष्टी अवैज्ञानिक असल्याचे मानणारा आहे. मात्र कर्मकांडे, पुनर्जन्म आदि बाबीच योग्य असून त्या बौद्ध धर्मीयांना पटवता याव्या म्हणून्,बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे आणि बुद्धाची शिकवण आणि गोएंका गुरुजींची विपश्यना आदि बाबींची सांगड आपल्या सारख्यांकडून घातली जाणे हे एका विशिष्ट योजने अंतर्गत केले जात आहे की काय??? अशी शंका मनात आणते.

असो... तूर्तास एवढेच की तुम्ही बुद्धाचा विपश्यनेशी संबंध न जोडता, आपल्या जाणिवांचा रोख नेणिवांवर वळवा आणि आपल्याला अभिप्रेत असलेली '' बुद्धत्वाची'' स्थिती प्राप्त करा.

मूर्ती छान आहे. भावना पोचल्या...

चर्चा वाचून एव्हाना तो निर्वीकार बुध्दही हसेल... Happy

'निर्वीकार' होणं ही बुध्ददशा असेल तर लग्न झाल्यावर बर्‍याच पुरूष मंडळींची आपसूक होत असावी...

डॉक्टर
मस्त पोस्ट.
@साती
रोज नियमित एखाद्या बाफवर पोष्टी टाकायच्याच असतील तर अशा बाफवर टाकल्या तर काय वाइट आहे ? यात चुकीचं काय आहे ? एखाद्याने दिलेली माहिती पटत नाही असं वाटणं याचा गुगळेंशी काहीच संबंध नाही असं माझ्यासारख्या अडाण्यास वाटतं. तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांनी लिहीलेलं वाचलं कि शाळेतून काढून टाकण्याचं दु:ख वाटत नाही. जराशी भरच पडते.

@ योग
हा विषय आरडी सारखा असेल एखाद्यासाठी... .तिथे आरडी देखील कपाळाला हात लावून बसला असेल असा प्रतिसाद आहे काय कुणाचा ?

बाहेर केलं तर लोक आपल्याला पागल समजतिल किवां पागलखान्यात भर्ती करतील.... मी एका कांदबरीत वाचलेलं आहे की रस्त्यावरच्या पागल लोकांना जेवायला नाही मिळालं तरी त्यांच्या शरीरातली उर्जा कमी होत नाही...

Pages