Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41
गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गरिबांच्या आदित्य पांचोलीने
गरिबांच्या आदित्य पांचोलीने >>> अंगद म्हैसकर की काय?
हो. त्या झिपर्या प्रियाला
हो.:हाहा: त्या झिपर्या प्रियाला काय झाले? तिची नाटके बघुन वैतागल्याने पुढचे पाहिलेच नाही. या बाईला कुणीतरी हेअर स्टाईल आणी बर्यापैकी साडी कशी नेसावी याचे ट्रेनिंग दिलेले बरे.
चिमा संशयावरून मंजीरीला सोडून
चिमा संशयावरून मंजीरीला सोडून देण्याच्या गोष्टी करत होता. आणि इथे तिला संशय आला म्हणून ती अनघा राजेकडे गेली तर लगेच फुगुन बसला शहाणा आणि हि मूर्ख बाई कान बिन पकडून त्याची माफी मागत बसलीय. काही स्वाभिमान वगैरे शिकवत नाही वाटत कोणी यांना
>>आणि इथे तिला संशय आला
>>आणि इथे तिला संशय आला म्हणून ती अनघा राजेकडे गेली तर लगेच फुगुन बसला शहाणा आणि हि मूर्ख बाई कान बिन पकडून त्याची माफी मागत बसलीय
त्यापेक्षा त्याला कानपटायला हवं होतं. मला वाटतं गरिबांचा आदित्य पांचोली (सत्याचा मित्र) आणि गरीबांची उर्मिला मातोंडकर (होळकरची बायको) ह्यांचं सूत जमणार आता.
अरे काल पूज्य तांबडे बाबांचा
अरे काल पूज्य तांबडे बाबांचा परमभक्त श्री दादा होळकर सत्यजित मुधोळकरच्या घरी आले होते, बाप्पाच्या दर्शनाला............. कसे काय सुटले जेलातुन??? गरिबांच्या उर्मिला मातोंडकरने साक्ष नाही का दिली????
सत्यजित गरीबांचा कोण असेल
सत्यजित गरीबांचा कोण असेल याचा विचार करतेय. मला वाटतं सत्या गरीबांचा अभिषेक बच्चन आणि मंजिरी गरीबांची राणी मुखर्जी असावी बहुधा
असली भिकमंगी मालिका चुकून 5
असली भिकमंगी मालिका चुकून 5 मिनीट बघितली पायतान तुटेस्तवर या सिरीअल वाल्यांना मारले पाहीजे
पायताण का तुटले म्हणुन अजून मारा,,,, येडछाप पणा नुसता,,,
एक येडीने डायलाँग मारला तर तिथे असलेनसले सगळ्या भिकार्यांचा क्लोजप घ्यायलाच हवा का? एक्सप्रेशन पण असे देतात जसे आत्ताच "इसबगोल" च्या 4 बाटल्या पिऊन आले आहेत आणि तिथे जबरदस्तीने पकडून त्यांना कँमेरासमोर उभे केले आहे
मेंटल टाँर्चर केले म्हणून खटला दाखल करण्याचा विचार चालू आहे,,,
गरीबांची उर्मिला मातोंडकर
गरीबांची उर्मिला मातोंडकर (होळकरची बायको) पेक्शा मला ती गरीबांची विद्या बालन वाटते....
गरीबांचा आदित्य पांचोली >>
गरीबांचा आदित्य पांचोली >>

आणि ती आत्या गरीबांची अरूणा ईराणी.
मंजिरी मात्र श्रीमंतांची अलका कुबल हां.
दादा होळकर आणि त्याची भजने हेच काय ते मनोरंजक असेल या मालिकेत.
आशुडि>>>> दादा होळकर आणि
आशुडि>>>>


दादा होळकर आणि त्याची भजने हेच काय ते मनोरंजक असेल या मालिकेत.>>>>> आणि दादा होळकरचे भिंतीवरचे तांबडे बाबा. तुम्हारी शरणमें तांबडे बाबा......
कसलं काम केलय त्याने लईच भारी
आणि बेष्ट म्हणजे दादा होळकरचा
आणि बेष्ट म्हणजे दादा होळकरचा आनंदी झाल्यावरचा नाच....
बिचारा बाप्पा! त्याला काय काय
बिचारा बाप्पा! त्याला काय काय बघायला लागतंय. सोंडेत धरून चिमांचा कान पिरगाळ म्हणावं चांगला म्हणजे असल्या 'चाय कम पानी ज्यादा' सिरियली लिहिणार नाही.
काल काय झाल? आमच्याकडे
काल काय झाल? आमच्याकडे आलेल्या गौराइच्या स्वयंपाकात मी मिसला कालचा भाग..... काहितरी जागरणाच्या वगैरे गोष्टी चालु होत्या वाट्टं
आज मंजिरी मोठ्या प्रेमाने
आज मंजिरी मोठ्या प्रेमाने प्रियाला म्हणत होती की तू आणि सुहास आता मधुचन्द्राचं प्लानिंग करा. ह्याला म्हणतात 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना'! आधी आपल्या पायाखाली काय जळतंय बघ म्हणावं.
(No subject)
अग स्वप्ना पायाखालच काय घेउन
अग स्वप्ना पायाखालच काय घेउन बसलीस ती अख्खी जळुन खाक झाली तरी तिला कळणार नाहि. वर गेल्यावर देवाला पण म्हणेल "अहो पण........................... माझ काय चुकलं?'' आणि देवाने सगळ सांगुन पण ही म्हणणार "देवा माझ्या लक्षात नाहि आलं तुम्ही काय म्हणताय ते / तुम्हाला काय म्हणायच आहे ते"
देवांच्या प्रतिक्रिया पुढिलप्रमाणे:
विष्णु - रागाने शंखनाद करुन गदा हाणतील, तरीपण समाधान न होउन चक्र सोडतील.
शंकर - डमडमडमडमडमडमडमडम डमरु नाद करुन त्रिशुळ सोडतील.
गणपती - सोंडेत उचलुन गरागरा फिरवुन टाकतील.
आणि समस्त देवी वर्ग एकत्र येउन हातात असतील नसतील तेव्हढी शस्त्र घेउन तिच्यावर धावतील (नवरात्रात सगळे दिवस या देवी बरेच अवतार धारण करतात आणि युध्दासाठी मदत म्हणुन सगळे देव त्यांना अनेक शस्त्र देतात अस सप्तशतिच्या पोथित वर्णन आहे. त्यामुळे अस लिहिल आहे देवी वर्गाबद्दल)
मुग्धा स्वप्नाच्या वरताण
कुंकुमधली जानकी आणी पिंजरातली ती (सिरीयलमधले नाव आठवत नाही, खरे नाव संस्कृती बालगुडे, आताच्या विबं मधली मुक्ता) तरी थोड्या कणखर दाखवल्यात. ही येडचाप मंजिरी उगाच खरी तुळस असल्याचे भासवतेय. त्या आशिशला मारतांना तेवढयपुरती रणचंडिका झाली होती, आता परत अलका कुबल झाली.
चिमा स्वतःला अभिषेक नाई अमिताभ समजतो.:खोखो: उसकी चाल ढाल वाईच देखो जरा.
चिमाची आई निरुपा रॉय नाहीतर वहिदा रहेमान ( नमक हलालमधली). नाहीतर गेला बाजार स्मिता जयकर किंवा रीमा लागु.
रश्मी. धन्स. अग तिच्याकडुन
रश्मी. धन्स. अग तिच्याकडुन प्रेरणा घेउनच लिहिल आहे.
चिमाची आई निरुपा रॉय नाहीतर वहिदा रहेमान ( नमक हलालमधली).>>>>> अजाबात न्हाय. बरिच टणक आहे वागायला..... मुळुमुळु नाहिये........
नाहीतर गेला बाजार स्मिता जयकर किंवा रीमा लागु. एकदम परफेक्ट.... वेळ आली तर एक खण्णकन लगावुन देतील या दोघीपैकी कुणीही....... आणि कुणालाही
चिमाची आई आता त्याच्यावर आणि
चिमाची आई आता त्याच्यावर आणि प्रियावर एवढी का चिडते आहे....तिने ते पेन ड्राईव्ह पाहिले का?
ते पेन ड्राईव्ह बघून मंजिरी म्हणेन 'हे खोटं आहे सगळं....माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे...कॉम्प्युटर वापरून केलेले हे कोणाचे तरी कारस्थान आहे.....' त्यावर प्रिया वेडीच होईल...या माठ मंजिरीला एवढे फूटेज दाखवूनही काही उपयोग नाही झाला.
आता दादा त्या सुहासला मारणार आहे वाटते......मग रडारड आणि प्रिया परत माहेरी - सत्याकडे रहायला येणार...त्याच्या आईच्या डोक्याचा ताप वाढेल...ईकडे प्रिया 'माझे नशिबच फुटके...वगैरे असे मंजिरी पुढे ईतकी रडणार कि मंजिरीला तिची खूपच दया येणार आणि ती प्रियाला बोलणार कि तू आता कोठेही जायचे नाही.....तुझा नवरा गेला(मेला) म्हणून काय झाले...माझा आहे ना....सवत माझी लाडकी!!! संपवली एकदाची शिरियल!!!!!!!!!!
सत्याची आई मस्त खमकी आहे.
सत्याची आई मस्त खमकी आहे. तिने प्रियाचं पाणी बरोबर जोखलंय. पण सून माठ असल्याने तिचा नाईलाज झालाय. होळकर सिरियल किलर आहे काय? जो दिसेल त्याला मारतोय आपला. मेंदूशिवाय माणूस जगू शकतो ह्याचं मंजिरी हे एक उत्तम उदाहरण आहे.
मी सिरियल पाहात नाही, पहिले
मी सिरियल पाहात नाही, पहिले दोन-चार भाग पाहिले होते. त्यामुळे थोडं कुतुहल आहे. आहे काय एवढं नक्की त्या पेनड्राईव्ह मध्ये?
मेंदूशिवाय माणूस जगू शकतो
मेंदूशिवाय माणूस जगू शकतो ह्याचं मंजिरी हे एक उत्तम >>>>>स्वप्ना भारी शालजोडीतले हाणलेस मंजिरीला.:हहगलो: कुणीतरी माबोची ही लिंक पाठवा त्या झी मराठीला किंवा चिमाला.:फिदी:
प्रिया बाय आणी सत्यजीत यांचा रोमान्स त्या पेनड्राईव्ह मध्ये चित्रीत आहे,( त्याचे चित्रण त्या डुचकी उर्फ नेत्राने केलेले असते) तेच प्रिया मंजिरीला दाखवुन सत्याला मिळवायला बघतीय. मला शंका आहे की त्यातले ते भाग नेत्राने उडवले/ डिलीट केले असणार. त्यामुळे प्रियाने कितीही भांगडा केला तरी हाती काही लागणार नाही.
किंवा मग ती क्लीप सत्याच्या आईच्याच हातात पडली असेल. गणपती, गौरीमुळे मी या आठवड्यात काहीच पाहीले नाही. तसेही पाहिले तरी काय, सिरीयल मुंगी, गोगलगाय यांच्या गतीने पुढे जातेय. ते येडं सुहास प्रियाला चांगलच सहन करतयं.
तो तांबडेबाबांचा भक्त,
तो तांबडेबाबांचा भक्त, सुहासच्या घरी घुसुन त्याला मस्तपैकी घाबरवतो. मोतीवाल्या बाई तिथे असायला हव्या होत्या. 'तुम्हारी शरण मे.....' या गाण्याला खरतर बेस्ट म्युझिक च पारितोशिक मिळाल पाहिजे. आणि दादाला नाचण्या बद्दल....!!!
मेंदूशिवाय माणूस जगू शकतो
मेंदूशिवाय माणूस जगू शकतो ह्याचं मंजिरी हे एक उत्तम उदाहरण आहे.>>>>>>>>> १००००% सहमत.
वर सारखं 'तू पुण्याची आहेस ना मंजिरी' हे एक इरिटेटिंग वाक्य असतं. श्रीयुत मांडलेकर, ही मंजिरी खरंच पुण्याची असती तर तिने पहिल्यांदाच संशय घेतल्यावर नवर्याला गेलास उडत असं ठणकावून दिलं असतं आणि वर त्याला सुतासारखा सरळ पण केला असता.....
असो. कोल्हापुरात अंबाबाई श्री महालक्ष्मी वैतागून ब्रेक घेणार आहेत असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. ह्याचं पॉसिबल रीझन असं सांगितलं जातंय की 'तूतिमी' तल्या मंजिरीला पाहून अंबाबाईनं देखील कपाळावर हात मारून घेतला.......हिचं आता काय करू मी असा खूssssप विचार केल्यानंतर शेवटी 'तूतिमी' संपेपर्यंत 'हरिप्रिया' एक्सप्रेस ने तिरुपतीला निघून जाण्याचे त्यांनी ठरवलंय असे कळलं...... मात्रं खर्या भक्तांसाठी त्या प्रत्यक्ष दर्शन, टेलिपथी, आंतरजाल,ई-मेल, इ. सर्व मार्गांद्वारे ओपन फॉर कम्युनिकेशन असतील असं आश्वासनही त्यांनी दिलंय कारण 'तूतिमी' कधी संपेल ह्या प्रश्नाचं उत्तर खुद्द ब्रह्मदेवाकडेही नाही........त्यामुळे इ.स. २२०० मधे जर कुणाला प्रश्न पडलाच की एकविसाव्या शतकाआधी कोल्हापूरला असणारं हे मंदिर तिरुपतीला का शिफ्ट झालं तर त्याचं कारण 'तूतिमी' मधली मंजिरी असेल.
श्रीयुत मांडलेकर, ही मंजिरी
श्रीयुत मांडलेकर, ही मंजिरी खरंच पुण्याची असती तर तिने पहिल्यांदाच संशय घेतल्यावर नवर्याला गेलास उडत असं ठणकावून दिलं असतं आणि वर त्याला सुतासारखा सरळ पण केला असता>>>>>> अबोलीजाह्नवी, अग पुण्याच्याच नाही तर २१व्या शतकातल्या कोणत्याही मुलीने हेच केल असत. ही काय स्वतःला सत्ययुगातली समजते कोण जाणे. आणि तिचा नवरा लग्नाची बायको ही फक्त संशय घेण्यासाठीच असल्यासारखा सारखा संशय घेत असतो, बर ते सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरुन. आलाय ना संशय विचार ना बायकोला स्पष्टपणे की बाई मी अस अस ऐकल आहे काय खर आहे ते मला सांग. स्पष्ट काही बोलायच नाही उगाच स्वतःला जेम्स बाँडचे तिर्थरूप समजत निघायच खर खोट करायला.....
च्यायला घरातली नाती धड सांभाळता येत नाहित आणि निघालेत कोटींचे बिझनेस सांभाळायला. कैच्याकैच दाखवतात राव...... 
>>अबोलीजाह्नवी, अग
>>अबोलीजाह्नवी, अग पुण्याच्याच नाही तर २१व्या शतकातल्या कोणत्याही मुलीने हेच केल असत.
+१०००००००
अबोलीजाह्नवी, अंबाबाईची पोस्ट
>>स्पष्ट काही बोलायच नाही उगाच स्वतःला जेम्स बाँडचे तिर्थरूप समजत निघायच खर खोट करायला
आणि काय ते कालच्या
आणि काय ते कालच्या महाएपिसोडमध्ये दोघं फिरायला निघाल्याचं कौतिक. परत एकदा काल चिमांला पायापासून सुरु करत डोक्यापर्यंत दाखवला. मंजिरी डोळे फाडफाडून कौतुकाने बघत होती त्याच्याकडे. म्हटलं प्लास्टिक सर्जरी करून चेहेरा बदलला का काय. पण नाही. तोच जुना सत्यजित. मला तरी त्याच्यात काही नवं दिसलं नाही बुवा. असो.
स्वप्ना,
स्वप्ना, मुग्धा....बरोबर......कोणाही मुलीने सत्यजीत मुधोळकरांना सरळ केलं असतं....;)
आता बाजी उलटली आहे.....पण ही पेद्री मंजिरी नवर्याला एकदा तरी म्हणेल......सेम टू यू वागवू का आता तुला, भोग लेका आपल्या कर्माची फळे.......कसचं काय........ऊतू जाईल इतका सोशिकपणा दाखवून म्हणेल " कसं आहे ना.... मी समजू शकते.......माझ्यावरचं तुमचं असीम प्रेम, त्यात गैरसमज...... त्यामुळेच रागावला होतात तुम्ही माझ्यावर आणि हे असं झालं....पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे....." वगैरे...... यक्स..... पण एक आशा आहे....असं झालं तर सीरियल संपेल एकदाची....
कालच्या एपिसोदमध्ये
कालच्या एपिसोदमध्ये मोतीवाल्या बाई दादाला फोनवर म्हणत होत्या की माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे वगैरे. हे असं म्हणताना सुहास चुकून वगैरे ऐकत नाही का? का फक्त नेत्रा आणि प्रियालाच चोरुन ऐकायचा हक्क आहे???
आपण लेखक असतो तर आत्ता या
आपण लेखक असतो तर आत्ता या मालिकेला कस सुरळीत केलं असतं?
मी लेखक असते तर.....
प्रिया हळू हळू त्या तिच्या (सो कॉल्ड) नवऱ्याच्या प्रेमात पडते खरोखर.....सत्यजितला विसरून जाते.
इकडे आशिष आणि मंजिरीची ती बहिण यांच्या खुनाच्या आरोपात त्या तांबडेबाबांच्या भक्ताला फाशीची/जन्मठेपेची शिक्षा होते...
दादाची बायको जी सध्या सत्यजितच्या घरात पडून आहे, तिचं एका भल्या घरात लग्न होत.
सत्यजित त्याची चूक मंजिरीसमोर कबुल करतो पण मंजिरी त्याला माफ करते....अर्थात थोडे आढेवेढे घेऊन.
आणि मग मालिका दि एंड!
Pages