तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी.....;)
त्याच बरोबर विशेष उपस्थिती पुरस्कार (म्हंजे फुकट फुटेज खाणे उर्फ फालतू (स्क्रीन) टाईमपास करणे बद्दल)
डुचकी उर्फ देखण्याताई याना बहाल करण्यात येत आहे....अर्थातच श्री. मुधोळकर (सत्यजीत) यांच्या हस्ते

प्रिया मंजिरीला मी तुझ्या मित्राचा खून केला म्हणून सांगते वगैरे तो सीन होता तो खराच आहे असं प्रथम वाटलं. कारण तिने एव्हढं सांगूनही 'तू काय बोलते आहेस' वगैरे माठ कॉमेन्ट देणं मंजिरीला शक्य आहे. पण जेव्हा मंजिरीचा गळा दाबून तिने तिला मारलेलं दाखवलं तेव्हा मात्र हे स्वप्नरंजन आहे हे कळलं. मजा म्हणजे प्रिया तिची मान दाबताना दाखवली आहे, गळा नाही Proud

आणी मला दादा होळकरचा भजन डान्स लै आवडतो.:फिदी: नयन तुम्हारे दर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा.

शिरीयलची अखेर व्हायला लागली की काय? प्रियाबाई ज्या युएसबी मध्ये सगळ्या भानगडी उतरवतात, तीच गायब झालेली दाखवलीय. डुचकी उर्फ नेत्राने गायब केली की काय.:अओ: हुश्श! लवकर संपली तर बरयं रे चिमा.

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....
>>>>>>> पण मालिकाच संपत नाहीये.:अरेरे::राग::फिदी:

झालं गंगेत घोडं न्हाल एकदाच प्रियाबायचं. अक्षता आणी प्रियाबाय दोघी पडल्या एकदाच्या त्या मेषपात्राच्या गळ्यात.

जातांना प्रियाबाय जातांना आत्याच्या कानात कुजबुजतांना दाखवल्यात, की त्या कायमच्या परत येणार हायेत. काय तर म्हणे पहिल्या रात्री सुहासभावने तिच्या कानाखाली जाळ काढला( पुढच्या भागात दिसेल).

पुरे झाले आता.:राग:

ए तू सिरीयसली विचारतीयस का? मान दाबुन काय होणार? गळा पुढे असतो, मान मागे असते.म्हणून म्हणतात ना केसाने गळा कापला.( मान नाही) मान खाली जाते, गळा वर घेता येतो. गळा म्हणजे कंठ. आपण म्हणतो ना काय गळा काढलाय. मान काढता येत नाही ना. एकदा स्वतःची दाबुन बघ ( मान व गळा):फिदी::दिवा:

खरच मी आत्ता दाबुन पाहिले काय फरक पडतो ते.:फिदी: मान दुखायची थांबली.( टिपी खूप केला)

अरे शिरेली विषयी चर्चा सोडुन बॉडि पार्ट्सवर काय चर्चा करताय???
प्रियाच्या पहिल्या रात्रीचा फियास्को झाला रादर तिने केला आणि तिच्या "गिरा तो भी टांग उपर" या नेहमीच्या सवयीने त्याच खापर नवर्‍यावर फोडलं.
इथे कोणीतरी त्या सुहासला मेषपात्र म्हटल्याच आठवत आहे, ते अगदी १००% बरोबर आहे. काल प्रियाला त्याच पहिलं वाक्य होत "पहिल्या लग्नाची पहिली रात्र" Uhoh यापुढे तिने त्याची गोड शब्दात अक्कल काढली, त्यावर तो काहितरी म्हणाला, काय म्हणाला ते जाणुन घेण्याची इच्छाच उरली नाही.... Sad

या काय किंवा इतर कोणत्याही सिरियल मधे घरातील रूम्सचे दरवाजे साउंडप्रुफ असतात का? काल सत्याची आई त्याला तु लग्नाला का आला नाहिस वगैरे विचारताना इतका कंठशोष करत होती पण कोणाला तिचा आवाजच ऐकायला आला नाहि....

आणि काल पहिल्यांदाच सौ. डुचकी ऊर्फ देखण्याताई ऊर्फ नेत्रा मुधोळ्करने प्रियाला चांगला आणि योग्य सल्ला दिला.

आज प्रिया म्हणे माहेरी आली होती.....म्हणजे सत्यजितच्या घरी. Uhoh असो. तर मंजिरीने तिचं काय स्वागत केलं अगदी. कुठलीही बाई एव्हढी माठ कशी असू शकते? बायकांना पुरुषाची वाईट नजर आणि स्वतःच्या बॉफ्रे/नवर्‍यावर दुसर्‍या बाईची वाईट नजर (त्या लायक तो असल्यास!) बरोबर कळतात.

प्रियाबाई माहेरी आल्या ते मंजिरीला पेनड्राइव्हची आठवण करुन द्यायला. तरीही ह्या बावळट्ट मंजिरीला कसलाच संशय येत नाही.( किती किती तो सोशिकपणा आणी चांगुलपणा) आणी आता आजच्या भागात प्रियाबाई स्वतः मंजिरीला ती सीडी दाखवणार आहेत म्हणे.

चिमा आमटीत पाणी वाढवत चाल्लाय.

>> तरीही ह्या बावळट्ट मंजिरीला कसलाच संशय येत नाही.( किती किती तो सोशिकपणा आणी चांगुलपणा) >>> माणूस ईतकं म्हण़जे ईतकं मठ्ठ कसं बरं असतं !!

प्रियाबाई माहेरी आल्या ते मंजिरीला पेनड्राइव्हची आठवण करुन द्यायला. तरीही ह्या बावळट्ट मंजिरीला कसलाच संशय येत नाही.( किती किती तो सोशिकपणा आणी चांगुलपणा) >>>>> मंजिरीला विचार करण्याच स्वातंत्र्य दिल नाहिये चिमाने या शिरेलीत... नाहितर नवर्‍याचा आपल्यावरचा संशय जाण्याकरता ही बाई वाट बघत बसली नसती..... तिला अहो पण आणि अग पण याशिवाय जास्त काही बोलायच नाहि अस बजावल आहे.

rmd, त्या लायक तो असल्यास >>> इथेच मेख आहे. चिमा त्या लायक नाही असं त्या मंजिरीला वाटत असणार.>>>> तुस्सी ग्रेट हो :फिदि:

अहो पण , अगं पण आणि सॉरी, माझं चुकलं एव्हढंच बोलते मंजिरी...... बावळटपणा आणि मठ्ठपणा यांचा कळस आहे ती.....

मागले दोन एपिसोड पाहून ह. ह.पु.वा...... आता दोन महिन्यांनंतर एपिसोड पहायला मज्जा येईल......सुहास नावाच्या मेषपात्राची येरवड्यात झाली असेल रवानगी.....अँड ही वोन्ट इव्हन नो ( के एन ओ डब्ल्यू ) व्हॉट हिट हिम........हा हा हा हा....
तू ति मी आता ऑफिशिअली विनोदी कार्यक्रमात सॉरी मालिकांमधे गणली गेली पाहिजे.

>>अहो पण , अगं पण आणि सॉरी, माझं चुकलं एव्हढंच बोलते मंजिरी

"तू/तुम्ही काय म्हणतो/म्हणते/म्हणता आहेस्/आहात? मला काही कळत नाहीये" हे आणखी एक फेव्हरेट वाक्य

लग्नाच्या आधी चिमांच्या गाडीने चिखल उडवला म्हणून ह्याच मंजिरीने त्याच्या शर्टावर चिखलाचे हात लावले होते हे लेखकु विसरलेला दिसतो. आता तिची शेळी झाली आहे. तसंही ह्या सिरियलमध्ये कोणाचा पायपोस नाही म्हणा. लेखकाला शंखपुष्पी सिरप + बदाम द्या रे कोणीतरी.

अहो रमड, त्या प्रियानं काय माकड केलं आहे सुहासचं......लग्नाआधी लाँगडिस्टन्स माकड होता तो......पण आता शादीके बाद तिन्ही त्रिकाळ ती त्याला झुलवणार..... एका क्षणी गळ्यात पडणार आणि दुसर्याक्षणी त्याच्या कुठल्याही साध्या निर्हेतुक वाक्यावरून कांगावा करून परत खापर त्याच्याच डोक्यावर फोडणार...........थोड्याच दिवसात डोक्यावर परिणाम होईल त्याच्या......म्हणून मुक्कामपोस्ट येरवडा.

>>थोड्याच दिवसात डोक्यावर परिणाम होईल त्याच्या......म्हणून मुक्कामपोस्ट येरवडा.

किंवा मुक्कामपोस्ट "राधा ही बावरी"....तिथेही सगळे वेडेच आहेत Proud

सुहासने 'आ भैस मुझे मार' करून घेतलंय स्वतःचं...एव्हढं काय त्या प्रियाला सोनं लागलंय काय माहित. तरी बरंय त्या गरिबांच्या आदित्य पांचोलीने त्याला वॉर्न केलं होतं. पण आता खड्ड्यात पडायचंच असं एखाद्याने ठरवलं तर कोण काय करणार ना.....

Pages