विविध देशांतल्या, प्रदेशातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा आणि गमतीजमती, किस्से

Submitted by गमभन on 23 August, 2013 - 03:28

सध्या मायबोलीवरील वातावरण श्रद्धा,अंधश्रद्धा यांच्या चर्चेने काहीसे गरम झालेय. एक नाही, दोन नाही तर चार चार धागे चर्चेने धो-धो वाहत आहेत.

या तंग वातावरणाला थोडे हलके करण्याचा हा प्रयत्न!

http://www.maayboli.com/node/44750 या धाग्यावर रैना यांनी कुठल्याशा देशात नवीन काम सुरु करण्याआधी डुकराचे पिल्लू कापणे, घरात छत्री उघडणे इ. अंधश्रद्धाबद्दल सांगितले, त्यावरुन एक कल्पना सुचली.

आपल्याला माहिती असलेल्या अंधश्रद्धा(भारतातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या/देशांतल्या, ), गैरसमजुती, त्यातील गमतीजमती या धाग्यावर टाकूया.

१. घरात छत्री उघडणे
हे लोक छत्री कुठे व कशी वाळवत असतील? Happy

२. शिळेवर गाणे वाजवणे हे रशियात अपशकूनी मानतात. (संदर्भः लोकसत्तातला एक लेख) यामुळे काम लांबणीवर पडते असे म्हणतात.
भारतात सरकारी कार्यालयात कोणी शिळ घालत असतो का?

३. इंग्लंडमध्ये काळे, पांढरे ठिपक्यांचे कुत्रे दिसले की शुभ मानतात.

४. लहानपणी आम्ही असे मानायचो की लाल रंगाची मारुती वॅन दिसली की काहीतरी खाऊ मिळणार. शाळेत येताना, जाताना, टाईमपास करतानादेखील खिडकीतून लाल मारुती वॅन दिसतेय का बघत बसायचो.

५. मातीत खेळताना अनेकदा नखांवर ओरखडे यायचे. असे ओरखडे म्हणजे शनीची पीडा समजायचो. जो पर्यंत ते जात नाहीत तो पर्यंत पीडा आहे. मग नखे वाढली की लगेच कापायचो. नखे वाढून आपसूकच ते ओरखडे निघून जायचे.

६. लहानपणी कोणी खाऊ खाताना आपल्याबरोबर असेल आणि आपण त्याला खाऊ न देता एकट्यानेच खाल्ला की पोटात दुखते.
यातील चांगली बाब म्हणजे सोबतच्या मित्रांबरोबर खाऊ शेयर करणे (अगदी मनात नसेल तरीही :))
मी तर कुत्रा, मांजर, मुंग्या यांसाठीसुद्धा कॅडबरीचा तुकडा काढून ठेवल्याचे आठवतेय (आणि आता हसू येतेय)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वादाला कारण लागत का इथे?
मी म्हणाले की शनिला तेल घालणं ही अंधश्रद्धा आहे तर अजुन दहा लोकं मला ती श्रद्धा असून अंधश्रद्धा कशी नाही ते सांगायला धावत पळत येतील Wink

Happy

केरळात रात्री डोक्यावरून अंघोळ करून झोपायची प्रथा आहे म्हणे
माझ्या रुमी ने सांगितलेलं की त्यामुळे दिवसभराचे डोक्यात असलेले विचार धुतले जातात.. आपलं डोकं स्वच्छ होतं मग आपण नव्या दिवसाला नव्याने सामोरे जायला मोकळे Proud

आम्ही लहानपणी, गाढव ओरड्लं की/ अग्निशामक दलाच्या गाडीची घंटा वाजली तर डोक्यावर हात ठेवायचो. खाऊ मिळतो म्हणे.
बगळ्यांची माळ (कि थवा ?) डोक्यावरुन उडत गेले कींवा बगळा दिसला तर नखांवर नखं घासत 'बगळ्या बगळ्या कवडी दे" असं म्हणायचो. मग नखांवर पांढरी रेघ दिसली की एकमेकींना 'बघ, बग्ळ्याने मला कवडी दिली' असं म्हणायचो. Happy

नखांवर पांढरी रेघ दिसली की एकमेकींना 'बघ, बग्ळ्याने मला कवडी दिली' असं म्हणायचो.
>>
अश्या रेघांना आम्ही शनीची पीडा म्हणायचो. Happy

समुद्री मीठ किंवा जाड मीठाचं काय एवढं महत्व आहे कुणास ठाऊक? दृष्ट लागलेली असेल तर ती काढतांना जाड मीठ घेतात. कधी कधी कुठे हवेचा भोवरा दिसतो. त्यात आम्ही जाड मीठ टाकायचो. कुणीतरी म्हणालं होतं असं केल्याने भुत दिसतं.
नविन वास्तुमधे रहाण्यास जातांना(सामान टाकतांना) आधी किचन ओट्यावर जाड मिठ ठेवतात.. नंतर कलशपुजा. जाड मीठ पाण्यात घालुन फरशी पुसली तर जंतु, मुंग्या वै. होत नाही म्हणे.
वास्तु आणि फेंगशुईमधे पण त्याला महत्व दिलय.
बाबांना टुरवरुन परतायला उशीर होत असेल ( तेव्हा मोबाईलच काय लँडलाईनही नव्हते घरी) तर आई मुठभर जाड मीठ मुख्य दरवाजाच्या कोपर्‍यात ठेवुन त्यावर भांडं झाकायला सांगायची. त्यामुळे बाहेरगावाहुन येणारं माणुस विनासायास घरी पोहोचतं असं आई म्हणते. (मी हे माबोवरच कुठेतरी लिहिलय)

मीठाविषयी खरंच खुप गैरसमज आहेत जसे
१. मीठ हातावर देऊ नये. का तर? मीठ हातावर देणारा माणूस दुरावतो. (खरंतर माणसं "हातावर तुरी देऊन" पळतात. Happy )
२. रात्रीचे मीठ विकत आणू नये. दारिद्र्य येते.
३. कोणी रात्री मीठ, पीठ, दूध उसने मागू लागला तर देऊ नये. लक्ष्मी त्याच्याबरोबर निघून जाते.

कधी कधी कुठे हवेचा भोवरा दिसतो. त्यात आम्ही जाड मीठ टाकायचो. कुणीतरी म्हणालं होतं असं केल्याने भुत दिसतं. >>>>>> आर्ये, सेम हिअर.

आपण उभे असु अन डोक्यावरून टिटवी उडत गेली तर आपण मरणार अशी समजुत होती लहानपणी. सो टिटवी उडत जाताना दिसली कि आम्ही खाली बसायचो.

आर्ये सेम हियर. ते उशिरा येणार्या मानसासाठी भांदं उपडं ठेवायची कल्पना तर अगदी अगदी.

मी लहान असताना. कोंबडीचं पिस हातात घेतलं होतं तर मला सांगण्यात आलं होतं की आता मी मरणार. Sad मग शेजरची मुलगी म्हणाली की शनीला तेल घातलं की नाही तू मरणार Rofl मी चक्क घालून आलेले.

तसंच रात्री केस विंचरू नयेत.. (जनरली 'तसल्या' बाया रात्री केस विंचरतात)
रात्री केर काढू नये... लक्ष्मी जाते... (याचं शास्त्रीय कारण म्हणजे पुर्वी दिवे नसायचे, चुकून एखादा दागिना वगैरे पडला असेल किंवा रूपया पडला असेल तर तो केराबरोबर बाहेर जाऊ नये म्हणून पुर्वी केर काढत नसत.

पाल मारू नये, माणूस मरतं... अ‍ॅक्चूली पाल स्वसंरक्षणासाठी आपली शेपटी शरिरापासून वेगळी करते आणि म्हणे ती विषारी असते, ति अन्न्नात पडू शकते म्हणून पाल मारू नये म्हणे.

शनिवारी मीठ, तेल, साबण, चप्पल विकत घेऊ नये (अमावस्या असेल तरीही), ह्या गोष्टींचा पगडा लहानपणापासून एवढा आहेकी मी अजुनही हे सांभाळते, अंधश्रद्धा आहे हे माहिती असून सवय झाली आहे.

विरजण संध्याकाळ झाल्यानंतर देऊ नये असे म्हणतात, पण अगदीच अडले असेल तर त्यात मीठ घालावे मग दयावे अशी पळवाट आहे.

आई माझी अजूनही कोणाला उशीर झाला तर लाटणे पाण्यात ठेवते, तसे केल्याने माणूस लवकर येतो असा समाज आहे.

हो, टिटवी ओरडली की काहीतरी अशुभाची आशंका, पाल चुकचुकणे वै. प्रकारांबद्दल लहानपणी फार ऐकीवात होतं. आता समजतं, असं काही नस्तं. उंबरठ्यावर बसु नये. मुलींनी माहेरहुन सासरी बुधवारी, शनीवारी जाउ नये ('जाशिल बुधी, येणार कधी' अशी म्हण होती आमच्याकडे) , माहेरी आलेल्या मुलीने सासरी जायला निघतांना जाड मीठाच्या बरणीत हात घालुन ते मीठ हलवुन मग जायचं, इ.इ. आई अजुनही सांगते.
मागे 'सकाळ'ला फ्रंट पेजवर एकाने एक्स्प्रेस हायवेवर केलेल्या अपघातविषयक संशोधनाची माहिती दिली होती. त्याने हायवेवरील आतापर्यंत जिथे जिथे अ‍ॅक्सीडेंट झालेले आहेत अशा ठिकाणांचा आणि तिथल्या विद्युतचुंबकीयक्षेत्रातल्या घडामोडींचा अभ्यास केला होता म्हणे. त्याने शेवटी त्यावर उपाय सुचवला होता, की गाडीमधे नेहमी जाड मिठाची पुरचुंडी ठेवावी. खखोदेजा. आता याचा संबंध काय मला कळला नाही.

<<रात्री केर काढू नये... लक्ष्मी जाते... (याचं शास्त्रीय कारण म्हणजे पुर्वी दिवे नसायचे, चुकून एखादा दागिना वगैरे पडला असेल किंवा रूपया पडला असेल तर तो केराबरोबर बाहेर जाऊ नये म्हणून पुर्वी केर काढत नसत.<< मागच्या महिन्यात मी अगदी हेच आईला मी समजावुन सांगितलं. Proud

आपल्या देशात काही हायवेंवर मारुतीच्या (हनुमान) मोठ्या मूर्ती स्थापन केल्यात अपघात होऊ नयेत म्हणून, एकदा टिव्हीवर दाखवत होते, युपी, राजस्थान ह्या ठिकाणाचे होते वाटते. मारुती अपघात टाळतो असे मत आहे.

<<लहान मुल जर पहिल्यांदाच घरी आले तर टाळूवर थोडे तेल घालावे नाहीतर घरात उंदीर होतात.<<
हो हो ... हे मी ही ऐकलं होतं. Happy
सोमवारी गहु दळायला देउ नये. दिवेलागणीला कुणी दाराशी पैसे मागाय्ला आला तर पैसे देउ नये.

काही गोष्टी अंधश्रद्धा आहे माहिती असूनही बदलताना धाकधूक होते असे माझ्या बाबतीत होते, बिनधास्तपणे मी मात करू शकत नाही, तरी बऱ्याच गोष्टीवर मात केलीय जसे रात्री केर काढू नये, झाला असेल केर तर काढते मी, पण शनिवारी अजूनही मीठ,तेल, साबण आणत नाही.

माझा भाऊ मात्र बिनधास्त आहे तो आईचे न ऐकता ह्या गोष्टींवर मात करू शकतो.

दिवेलागणीला कुणी दाराशी पैसे मागाय्ला आला तर पैसे देउ नये. >>
हा नियम आम्ही आजही पाळतो. कोणी रात्री वर्गणी वगैरे मागायला आला की त्याला हे कारण देऊन फुटवतो. Happy

लहान मुल जर पहिल्यांदाच घरी आले तर टाळूवर थोडे तेल घालावे नाहीतर घरात उंदीर होतात.
>>>>>>>

अय्या सुमेधाला सांगा Proud

माझी इथली एक मैत्रीण सांगत होती की तिच्या इटालियन सासरी म्हणे टीपॉयवर /टेबलवर पाय ठेवून बसु नये असं म्हणतात. म्हणजे आपण खुर्चीत बसलो की पाय लांब करुन टीपॉयवर ठेवतो तसे.

सुमेधाला सांगा.:हहगलो:

सुमेधा जिथे कुठे असशील तिथुन वाच गं बाई हे. हा पण एक तोडगा असु शकतो.:स्मित:

खुर्चीत बसवुन पाय हलवु नये, पाय आपटत/घासत चालु नये असेही ऐकलेय. उंबर्‍यावर बसुन शिंकु नये, केस विंचरु नये आणी सायंकाळी पण उंबर्‍यावर बसु नये, त्याने लक्ष्मीला येण्यास अडथळा होतो असे ऐकलेय.

मुंबईत गोरेगावमध्ये दिंडोशीत ३ इमारती झपाटलेल्या म्हणून प्रसिद्ध होत्या.

त्यावेळी दिंडोशी भाग नव्यानेच विकसित होत होता आणि ३ इमारतीत बांधकाम चालू होते. सारखे अपघात घडून मजूर मरायचे.

बांधकाम पूर्ण होऊनदेखील त्या इमारती ओसाड पडल्या होत्या. काहीच्या काही बातम्या असायच्या कोणी म्हणे त्या इमारतीच्या जागी स्मशान होते, कोणी म्हणे शंकराचे देऊळ पाडून या इमारती बांधल्याचा हा परिणाम. Happy

Pages