स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला, मी अखेर एक जाड उभा डबा - ज्याचं झाकण वरच्यावर सहज उचलता येईल आणि पुन्हा डब्यावर ठेवता येईल आणि त्यात उभ्या दांड्याचा खोल चमचा राहिल (आणि तरीही डब्याचं झाकण लागेल) - चमच्याचा टोकाशी आकार उलट्या U चा आहे - अश्या व्यवस्थेशी जुळवून घेतलम आहे.

डब्यात दोन लिटर तेल मावू शकतं, पण मी एकावेळी एक लिटरची पिशवी फोडून ठेवते.

माझी स्टीलची कीटली आहे तशी मंजूडी. पण मला रोजच्या वापराला वाटी दोन वाटी तेल काढता येइल अशी सोय हवी आहे.

शर्मिला, लंकेत सोन्याच्या वीटा!!! मला इथे मिळत नाहिये म्हणून तर ऑनलाईन शोधाशोध.

मी सध्या प्रयोग करत करत टपरवेअरवर स्थिर आहे. गेले दोन महिने तरी त्रास नाही. फक्त आमच्याकडे खूप धूळ असते म्हणून दर दिवसाआड टिश्यूपेपरने एकदा बाहेरून स्वच्छ करते.
असल्या बहुगुणी बाटल्यांचे फोटो जमले तर इथे टाका - विशेषतः नंदिनी, तू - म्हणजे मी पण तसली बाटली कुठे मिळाली तर बघेन

टपरवेअरचं बुच साफ करायला लई किचकट आहे. किटलीची तोटी पुरेशी स्वच्छ झाली नाही तर विचित्र वास येतो. (मला संशय आला तर नाकाला लावून वास घ्यायची सवय आहे Proud )

सेट नाही, जमवलंय सगळं. तसा चमचा मिळेल सहज भांड्यांच्या दुकानात. त्यात बरोब्बर एक टेबलस्पून तेल मावतं.

http://www.ebay.in/itm/STAINLESS-STEEL-CRYSTAL-OIL-POURER-750ml-apprx-2-...

ही एक बरी असेल का? पण यात तिचं नॉझल नेमकं कसं असेल दिसत नाहीये.

मंजूडी तुपाचं तामलं असतं ज्यात चमचा त्या झाकणाच्या खाचेतच असतो तशा प्रकारचं उभं भांडही मिळू शकेल याकरता कदाचित. आज चक्कर मारते मुरुगनकडे.

हो बरोबर! पण मला ती खाच आवडत नाही Wink

माझ्याकडचा चमचा असा आहे, फक्त दांडी उभी आहे, पूर्ण ९० अंशात.

त्या ईबेच्या लिंकमधला फोटो दिसत नाही आहे मला.

रोजच्या वापरासाठी म्हणुन मी सॅलड ड्रेसिंगची काचेची बाटली आणली आहे. छोटी आहे आणि त्यातलं तेल सहज कढईत ओतता येतं. साधारण अशा तोंडाची. पण सरळसोट आहे. आणि तोंड स्टील ऐवजी सिलिकॉन आहे.

शर्मिलाच्या लिंकमधल्या बाटलीची किंमत मी ४९० डॉ अशी वाचली Happy

http://www.bedbathandbeyond.com/1/1/185-16-ounce-oil-bottle-pourer.html अशी बाटली माझ्या ओळखीत बर्‍याच जणांकडे आहे. डिशवॉशर सेफ पण मिळतात म्हणे.

माझ्याकडे असले आहे http://www.bedbathandbeyond.com/1/1/185-16-ounce-oil-bottle-pourer.html.
त्यात एक छोटा चमचा पण मावतो. डोसे, पराठे यासाठी चमच्याने थोडे थोडे तेल घालता येते. जास्ती घालायचे असेल तर स्पाउट आहे.
डिश वॉशर सेफ आहे. डिशवॉशर नसेल तर कोमट पाणी / साबण वापरुन धुता येईल .

माझ्याकडे हे असं टप्परवेअरमध्ये आहे. पुढच्या बाजूला तेल ओतण्यासाठी चोच आहे. मागचा अर्धगोल ओपन आहे. तिथून चमच्याने तेल काढता येतं. तेल अजिबात सांडत नाही.

ही बघा कशी वाटते, मला तर पटली / आवडली आहे.
१.
IMG_2104_0.JPG
२.
IMG_2105_0.JPG
३.
IMG_2107.JPG

समोर जे छोटे छिद्र आहे, त्यातुन ओघळलेले तेल परत आत जाते. त्यामुळे तो मधला जो खोलगट गोल भाग आहे तोच फक्त तेलकट रहातो. बाकी पुर्ण बाटली स्वच्छ Happy

तेल ओतताना एकच काळजी घ्यावी लागते, उलट्या बाजुने ओतुन चालत नाही. कारण मग छिद्रातुन पण तेल बाहेर येते आणि त्याचा बाटलीवर ओघळ जातो. [आमच्या घरातील इतर व्यक्तींकडुन जो नेहमी जातो Happy ]

तुळशी बागेत मिळते, 'गायत्री' मधे. १०० ते २०० च्य मधे काहीतरी किंमत आहे. नक्की आठवत नाही.

धुवायला पण सोप्पी आहे. डिशवॉशरला लावता येतेच, पण नुसती गरम पाण्यात साबणाचा फेस करुन भिजत घातली तरी लगेच स्वच्छ होते.

आप्पेपात्रात आप्पे लावण्यापूर्वी खुप तेल लावावे लागते का? की फक्त तेलाचा हात फिरवायचा? मी आज पहिल्यांदाच बीडाच्या आप्पेपात्रात केले. ते सगळेच चिकटले! Sad तेलाचा स्प्रे मारला होता.

ईथे एका फेस्टिवल मध्ये कटको (Cutco ) च्या सुर्‍या बघितल्या, खूप छान वाटल्या पण प्रचंड महागही होत्या.
तिथे डेमो मध्ये थोड्या भाज्या कापुन बघितल्या,एवढी छान धार असलेली सुरी मी आधी कधीच बघितली नसल्याने खूप आवडल्या.

कोणाला घ्यायला आवडत असेल तर म्हणून इथे लिहिल आहे.

अरे बाप रे! अर्धे भरावे लागतात>> हो. बीडाचे नवीन आप्पेपात्र असेल तर नक्कीच. नॉनस्टिक असेल तर तेल अजिबात लावले नाही तरी चालते.

छोट्या पुर्‍या करायच्या पराठ्याप्रमाणे बीडाच्या आप्पेपात्रात शेकून घायच्या आणि मग त्यात आप्पे केले तर अजिबात तेल न घालता आप्पे होतात थोड तेल टाकून आप्पे जास्त खमंग लागतात.

आप्पेपात्रात भरपूर तेल टाकून केलेले आप्पे एकदम मस्त खरपूस झाले आहेत.
धन्यवाद सगळ्यांना!
मंजू, तुमची पोस्ट आत्ता वाचली! पुढच्या वेळी तुम्ही सांगितलेला प्रयोग नक्की करते!

शर्मिला, मी एकदा ऑलिव्ह ऑईलची बाटली आणली होती. ती अशी बहुगुणी आहे. त्यामुळे सध्या त्यामधे तेल काढून वापरते. प्रोब्लेम हा आहे की ती बाटली काचेची आहे, कधीमधी तडकली की संपलंच काम. >> अनुमोदन. बर्जेस ऑलिव्ह ऑईलची बाटली चांगली आहे. तेल अजिबात बाहेर गळत नाही, जमल्यास फोटो टाकेन.

ते ख ळगे असतात ते अ र्धे तेला ने भरा असे असते. >>>>>> एवढे आप्प्याना तेल निश्चितच लागत नाही. माझे बीडाचे भांडे असून जेमतेम अर्धा चमचा तेल पुरे होते.

Pages