बदामाच्या वड्या.

Submitted by आरती on 14 August, 2013 - 22:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी बदाम
पाऊण वाटी साखर
चार मोठे चमचे तुप
चार-पाच केशराच्या काड्या
दोन वेलदोडे
पाऊण वाटी पाणी.

क्रमवार पाककृती: 

१.बदाम किमान ६ तास भिजवुन घ्यावे. साले काढुन भरड वाटावे.
.
bhuga1.jpg
.
२.पॅनमधे तुप टाकुन, वाटलेल बदाम टाकावेत. थोडा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर परतावे.
३.एकीकडे जाड बुडाच्या पातेल्यात साखर, पाणी, केशर आणि वेलदोडा सगळे एकत्र करुन पाक करायला घ्यावा. पक्का पाक करायचा आहे.
४.तयार झालेला पाक बदामाच्या भुग्यावर ओतावा, निट एकत्र करुन लगेच वड्या थापाव्या.
.
wadya1.jpg

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकारच्या साधारण २० वड्या झाल्या.
अधिक टिपा: 

१.पाककृतीला लागणार्‍या वेळात, बदाम भिजवणे आणि सोलणे हा वेळ धरलेला नाही.
२.ज्यांच्या हातची खाल्ली, त्यांचे प्रमाण आठवत नव्हते, त्यामुळे मी हे अंदजानेच घेतले.
३.मी आज हे पहिल्यांदाच केले. पसरट पॅनमधे, बदामाचा भुगा परतुन घेतला, नंतर त्यातच पाक ओतला, आणि डावाने पटकन पसरवुन दिले. वेगळ्या थाळीला तुप लावुन, त्यात मिश्रण ओतुन मग वड्या थापण्याचे माझे कष्ट वाचले.
४.या पद्धातीनेच काकु काजुच्या पण वड्या करतात. फक्त परतताना त्यात थोडे दुध घलतात.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिणीच्या ओळखीच्या एक काकु, ज्यांच्याघरी ती मला घेउन गेली होती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया, भिजवलेले बदाम ओलसर असतातच. त्यामुळे नुसतेच वाटायचे.

लाजो, ती थेंबाची टेस्टींग मेथड वापरायची ... Happy

पक्का पाक म्हणजे गोळिबंद पाक करायचा की दोन तारी, तीन तारी असा करायचा?
वड्या मस्त दिसताहेत आणि वाचून तरी सोप्प्या वाटताहेत. Happy

आम्ही अश्याच करतो पण पाक बनवत नाही.
बदामाच्या पूडीत पूडीच्या निम्मी साखर टाकून हलवत रहायचे.
आपोआप साखर विरघळते. चव पाहून साखर अ‍ॅडजस्ट करायची. मिश्रण पॅनपासून सुटू लागल्यावर ताटाला तूप लावून वड्या थापायच्या.

बदामाच्या वड्या -- वा वा! फोटोतली वडी पटकन उचलून तोंडात घालावीशी वाटते आहे. Happy

पक्का पाक म्हणजे गोळिबंद पाक करायचा की दोन तारी, तीन तारी असा करायचा? >> शांकली, गोळिबंदच करायचा.

साखर टाकून हलवत रहायचे. >> हे थोडे वेळखाउ प्रकरण आहे, या अगदी झट्पट होतात.
बाकी मी पण बरेच वड्यांचे प्रकार, तु लिहिले आहेस त्या पद्धतीनेच करते. Happy

धन्स गं आरती!........

काय आहे हे 'पाक' प्रकरण जरा डी ग्रूप मधलं असल्याने Wink जरा भीत भीतच त्याच्या वाट्याला जावं लागतं. म्हणून खात्री करून घेतली.

फोटोतली वडी पटकन उचलुन तोंडात टाकावी असे वाटतय!

'पाक' करताना मला खरच 'पाकपुक' होतं!
कोणीतरी ती 'पाकाची' 'चाचणी' लिहा ना!

रिक्षामधे खवा आहे ....

ज्यांनाज्यांना तोंडात टाकावी असे वाटतय, त्यांनी लगेच टाकावी.

वत्सला,
अगदी थेंबभर पाक चमच्यात घेउन, ताटलीत टाकायचा. तो थेंब जागच्याजागी बसला की समजायचे पाक झाला.
ओघळ गेला तर नाही झाला. दोन बोटांमधे घेउन पण चेक करता येते पण ते सवयीचे झाले की.

सगळ्यांना धन्यवाद Happy

मस्त दिसतेय बर्फी.
आणि सोपी वाटतेय करायला, साहित्यही सहज मिळणारं आहे.
गणपतीच्या आधी एकदा सराव परीक्षा घेण्यात येईल.

मस्तच.

मस्त दिसतायेत वड्या. मला पण पाकाची फार भिती वाटते. मी बदाम पूड, साखर, दूध, तूप एवढं वापरून सोप्प्या वड्या करते.

घाबरु नका, करुन बघा Happy पाकाच तंत्र एकदा जमलं की झटपट होतात वड्याबिड्या.

मंजूडी, परिक्षेचा निकाल सांगा. Happy

घाबरु नका, करुन बघा स्मित पाकाच तंत्र एकदा जमलं की झटपट होतात वड्याबिड्या.>>> मस्तच होतात. अगदी झटपट.

badamBarfi.jpg