प्रसाद - केशर बदाम पेढे / मोदक

Submitted by लाजो on 7 August, 2013 - 09:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आजपासुन श्रावण सुरू... म्हणजे एकामागे एक सणासुदींचे दिवस....म्हणजेच गोडधोड-प्रसाद यांची रेलचेल....

श्रावणाची सुरूवात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पेढ्यांपासुन Happy

लागणारे जिन्नसः

२ कप मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली क्रिम *
१ टीन कंडेन्स्ड मिल्क (३९५ ग्रॅम च टीन मिळतो इथे),
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.

क्रमवार पाककृती: 

हे पेढे / मोदक करायला अगदी सोप्पे पण चवीला एकदम झक्कास Happy

१. एका मायक्रोवेव्ह सेफ बोल मधे मिल्क पावडर आणि बदाम पावडर मिक्स करा.
२. यात आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि मिश्रण सारखे करा.
३. या मिश्रणात थिकन्ड क्रिम आणि आवडीनुसार वेलची/केशर इ इ घालुन नीट ढवळा. अजिबात गुठळ्या रहाता कामा नयेत.
४. मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.
७. हाताला (आणि साचा वापरणार असाल तर साच्याला) तूप लावा आणि आपल्या आवडीनुसार पेढे वळा. वरती हवे असल्यास पिस्ता/बदाम काप इ इ ने सजवा.

प्लेन मोदकः

आंबा पेढे:

पिस्ता पेढे:

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात मध्यम आकाराचे ३० एक पेढे सहज होतात
अधिक टिपा: 

१. मावेमधे लागणारा वेळ हा घेतलेले प्रमाण/घटक आणि तुमच्या मावेची पॉवर यावर अवलंबुन आहे. माझ्या ११००W च्या मावेमधे वरील घटक आणि प्रमाणासाठी १०-११ मिनीटे लागतात.
२. मिश्रण जास्त वेळ मावे मधे गरम करु नये... कोरडे पडेल.
३. मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे तूप लावुन मळून घ्या.
४. यात बदामा ऐवजी काजू/पिस्ता पावडर घालु शकता. मी केलेल्या पिस्ता पेढ्यांमधे ५०-५० बदाम-पिस्ता पावडर आहे.
५. आंबा पेढा/मोदक बनवायचे असल्यास आंब्याचा रस न घालता आंब्याचा मावा/आटवलेला रस घाला.
६. डेकोरेशन करताना मोल्डच्या तळाला काप घालुन त्यावर पेढ्याचे मिश्रण दाबुन भरा आणि मग मोल्ड किंचित टॅप करुन पेढा बाहेर काढा.
*७. थिकन्ड क्रिम, साधे फ्रेश क्रिम किंवा साय फेटुन वापरता येइल पण प्रमाण अंदाजाने कमी/जास्त करावे लागेल.
८. मिल्क पावडर लो फॅट/ फुल्ल फॅट कुठलिही चालेल. मी फुल्ल फॅट वापरली आहे.
९. हे पेढे मावे नसल्यास गॅसवर पण करता येतिल.
१०. ट्रे ला तूपाचा हात लावुन त्यात थापुन याचे काप करून बर्फी पण बनवता येते.

हे पेढे फ्रिजमधे ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.

पुढच्यावेळेस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो>>>रोज दिवसात्नं एकदा तरी तुझ्या लाजवाब पेढ्यांचं मी दर्शन घेत अस्ते बघ!!!! Happy आह्हा!! आँखोकी ठंडक!!!!

आँखोकी ठंडक!!!!>>> नवीन लेखनात या बाफचं नाव प्रत्येक वेळेला 'प्रसाद - केशर बदाम पेढे / मादक' असंच वाचलंय Proud

सुरेख आहेत पेढे.

रोज दिवसात्नं एकदा तरी तुझ्या लाजवाब पेढ्यांचं मी दर्शन घेत अस्ते बघ!!!! >>

वर्षू, अगदी अगदी. ह्यालाच मी माझं डाएटिंग म्हणते. Happy

लाजो जियो जियो..... मी केले काल. मी डायेट नुसार केलेली व्हेरिएशन्स...
१. मिल्क पावडर लो फॅट घेतली.
२. पातळ क्रीम घेतले
३. कन्डेन्स्ड मिल्क आर्धेच घेतले. बाकी शुगर फ्री नचुरा घातले
४. बदाम पुड घरी केली. बदाम आधी पाण्यात घालुन ८ मि. मावे केले. साले निघुन आली. मग एका डिश मधे ते सोललेले बदाम ठेवुन ३ मिनिटे मावे केले. बदाम खडखडित वाळले. मस्त पूड झाली
५. माझ्या मावे मधे ४ मिनिटात झाले पण ( कदाचित प्रमाण बदलल्या मुळे असेल)
६. मग पिस्ता कापांनी सजवले.
अतिषय सुरेख झाले. मी जरा रवाळ ठेवले त्या मुळे मलई मोदकांसारखे दिसत आहेत. गणपती साठी नीदान ४-५ किलोची ऑर्डर मिळाली दोन्ही शेजारणींकडुन.... आर्थात फुकट.... हा घ्या फोटो

modak.JPG

मीपण हे आज करून पाहणार. मी घरी नेहमी ही पावडर आणून ठेवते. नेहमीचा रव्याचा शिरा न करता हे बदामाचं पीठ आणि रवा ५०% प्रमाण घेऊन शिरा करते. अप्रतिम होतो.

हेच पीठ वापरून आज पेढे करणार.
http://www.bobsredmill.com/almond-meal-flour.html?&cat=5

आभार्स मंडळी Happy

वर्षूताई, मंजुडी, झकासराव Lol

@मोकीमी, मस्त दिसतायत मोदक Happy तुझे वेरीएशन्स पण चांगली आहेत. अजुन ऑर्डर्स मिळू देत Happy

@शूम्पी, पहिल्या फोटोतले पेढे लेकीच्या भातुकलीच्या छोट्या ताटलीत केलेत Wink

@पेरू, ३९५ ग्रॅमचा टीन मिळतो आपल्याकडे तोच वापरलाय.

थॅन्क्स लाजो. काल करुन बघितले. छान झाले. पण मिश्रण एकत्र यायला खुप वेळ लागत होता. कंडेन्स मिल्क घाबरत घाबरत १ टिन घेतले. मी हार्वे फ्रेशचे थिकन्ड क्रिम आणले होते. त्याची कन्सिस्टन्सी तर अगदी चक्क्यासारखी होती.

पेरू, मी Bulla चे थिकन्ड, कुकिंग लाईट क्रिम वापरते.
कधी कधी हेल्थ फूड शॉप मधुन आणते.

Bulla_Thickened_Cooking_Cream__65012_zoom.jpg

माझे मन पहिल्या फोटोवरच अडकुन पडलेय. फोटो बघुन बघुन नुसते पाणी सुटतेय तोंडाला. पुढचे काही पाहिलेच नाही.... उगीच पुढे गेले तर अजुन गोत्यात यायचे....

सगळे फोटो भारी. पेढे किंवा मोदक करायच्या आधी मिश्रण चांगले मळून घ्यायचे का? इतके छान तुळतुळीत कसे काय झाले पेढे?

रैना, साधना, येळेकर - धन्स Happy

सिंडरेला <<< तुळतुळीत.... Lol

नाही, मिश्रण मळुन घ्यायची गरज नाही. मोदक्/पेढा साच्यात भरताना छोटे गोळे करुन भरायचे Happy

वरील प्रमाणानुसार करुन बघितले. बेताचे गोड आणि छान झाले आहेत. बदाम पावडरी ऐवजी एका मैत्रीणीने घरी केलेली बदामाची पावडर* वापरली. त्यामुळे जरा भगराळ झाले आहेत. त्यामुळे पेढ्यांऐवजी लाडुसारखे वळले आहेत. घरी पब्लिकला फार आवडले.
*ही मैत्रीण घरी आमंड मिल्क तयार करते. त्यातून उरणारा चोथा तिने दिला होता. तो मिक्सरमधुन काढुन वापरला. आमंड फ्लारसारखाच वाटला.
यापूर्वी ३०० मिली फुल क्रीम+१ कप मिल्क पावडर+१ कंडेन्स्ड मिल्क या प्रमाणात याच कृतीने पेढे करायचे. पण ते फार गोड वाटायचे. त्यामानाने हे खुप कमी गोड झालेत.

अरे व्वा वत्सला, बनवलेस पेढे/लाडु. धन्स गं Happy फोटु????

बदामाची पावडर जी तु म्हणत्येय्स ती ड्राय होती की ओलसर? मी विकतचीच वापरते त्यामुळे ती बर्‍यापैकी बारीक असते.

ड्राय आणि जरा भगराळ होती. फोटो डकवते.
बाप्पा येतील तेव्हा चांगले झाले पाहिजेत म्हणून आत्ता करुन बघितले.

ओक Happy

नेक्स्ट टाईम तिच पावडर वापरलिस तर मिल्क पा + ब पा + कं मिल्क असे एकत्र करुन मिक्सरवर बारीक वाटुन आणि मग त्यात क्रिम मिसळून मावे मधे गरम .... असे करुन बघ.

काल उरलेल्या साहित्यातुन काजु+बदाम्+चॉकलेट अशी बर्फी केली. ती चटकन फस्त झाल्या मुळे फोटो काढायचा राहिला....मस्त चव होती.

Pages