रुमझुम

Submitted by नंदिनी on 6 August, 2013 - 02:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. रवा (थोडासा भाजून घ्या.) २ वाटी
२. साखर १ वाटी
३, दूध (रवा भिजेल इतके)
४. थोडेसे लोणी किंवा अमूल बटर
५. अर्धा चमचा सोडा (ऑप्शनल)

आवड्त असलेला फ्लेवर.

क्रमवार पाककृती: 

रवा, साखर, दूध, लोणी (घेतल्याच चिमूटभर मीठ घाला) अथवा बटर एकत्र करून मिक्स करावे.
फ्लेवरसाठी पुढीलपैकी काही एक घालावे, काही घातले नाही तरी चालेल.

व्हॅनिला एसेन्स
ऑरेन्ज पील आणि संत्रारस
कुस्करलेले केळे
मॅन्गो पावडर अथवा सिरप अथवा आंब्याचा मावा
केशर इलायची सिरप
कॅन्ड पायनापलमधला पाक

मिक्स केलेले मिश्रण तासदीड तास ठेवून द्यावे. रवा चांगला फुलून आल्यावर मग तव्यावर या मिश्रणाचे छोटे छॉटे उत्तप्पास्टाईल पॅनकेक घालावेत.
झाकण ठेवून एक बाजू शेकावी, नंतर मिनिटाबह्राने दुसरी बाजू शेकून घ्यावी. वाटल्यास भाजताना तूप घालावे, नॉन्स्टिक पॅन असल्यास तूप घालयची गरज नाही.

रव्याचे रूमझुम अर्थात पॅनकेक तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके.
अधिक टिपा: 

रव्याचे मिश्रण करून कसलाही फ्लेवर न घालता घट्ट एअर्टाईट डब्यात घालून फ्रीझमधे ठेवल्यास हवे तेव्हा झटपट रुमझुम बनवता येतात. मिश्रण फ्रीझमधे तीन चार दिवस चांगले रहाते.

या पदार्थाला रुमझुम नाव का आहे ते मला माहित नाही. रुचिरा वाचून मी शिकलेल्या आणि सध्या बर्‍यापैकी बनवत असलेल्या पदार्थांपैकी हे रूमझुम. गार झाल्यावर देखील चवीला चांगला लागत असल्याने प्रवासामधे अथवा टिफिनमधे देण्यासाठी बरा पडतो.

मिश्रण डावाने घालताना फार पातळ घालू नका, रुमझुम उलटताना त्याचे तुकडे पडतात.

माहितीचा स्रोत: 
रूचिरा भाग २ आणि थोडेसे स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतेय रुमझुम.

पाक किंवा रस घालायचा असेल तर किती प्रमाणात घालायचा?
डब्यात द्यायला चांगला पर्याय आहे.

अदिति, माहित नाही. ओगलेआज्जींनी याचं नाव रूमझुम असंच दिलंय. Happy

मंजुडी, चवीच्या हिशोबाने घाल. तितकीच साखर कमी घे. आमच्याकडे गोड थोडं जास्त झालं तरी चालतं.

छान लागतो हा प्रकार. रुचिरामधेच हे नाव वापरलेय.
साखर कमी घालूनही चांगला लागतो.

अय्यो, माझ्या जुन्या सुपरबॉसचं नाव होतं की हे. Proud

पोराला आवडेल नक्की. करुन बघेन. (पण माझी जीभ एक और रुमझुम काओ म्हणायला रेटणार नाही. )

अय्यो, माझ्या जुन्या सुपरबॉसचं नाव होतं की हे. <<< Lol

मला हा पदार्थ नावामुळेच फार वेगळा वाटला होता. सुनिधी याला चुमचुम म्हणते Happy

छान.

छान.

मस्त वाट्तो आहे. आईला पण आवडेल. तिला दात नाहीत. नाव खरेच सुरेख आहे. चॉकोलेट पावडर घातली तर नवीन जनरेशन पण खाईल बहुतेक.

आज रुमझुम बनवून खाण्यात आले... मस्त लागतो हा प्रकार... शिर्‍याची पोळी/धिरडं केल्यावर जसं लागेल तसं. ओगले आज्जींचं पाकृ प्रमाण सह्हीये... परफेक्ट चव! नाश्त्याच्या पदार्थांमध्ये आणखी एका पदार्थाची भर! थँक्स नंदिनी ही पाकृ दिल्याबद्दल.

अकु Happy

.

शिरा किंवा प्रसाद याला एक नविन आकार! तोही रवा न भाजता!!
पुर्व तयारी करुन ठेवली असेल तर फास्ट्फूडच म्हणता येइल याला.

नाव आणि क्रुतिहि छान वाटली.
धन्यवाद.