स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या आप्पेपात्रात आप्पे करण्यापूर्वी त्याला सीझन कसे करायचे? कसे वापारायचे>>> त्यामध्ये कांदा भाजायचा थोडे तेल घालुन ..पन तो कांदा वापरायचा नाहि.

मातीचा तवा १ तास पाण्यात घालून ठेवावा. त्यानंतर बाहेर काढून वाळू द्यावा. असे २ दिवस करावे. नंतर वापरायला सुरुवात करतांना १ तास आधी ओला करुन ठेवावा, असे केल्याने तवा गरम झाल्यावर तडकत नाही.2012-06-17 09.52.36.jpg

मातीचा तवा १ तास पाण्यात घालून ठेवावा. त्यानंतर बाहेर काढून वाळू द्यावा. असे २ दिवस करावे. नंतर वापरायला सुरुवात करतांना १ तास आधी ओला करुन ठेवावा, असे केल्याने तवा गरम झाल्यावर तडकत नाही.2012-06-17 09.52.36.jpg

मातीचा तवा १ तास पाण्यात घालून ठेवावा. >> हो मी रात्रभर ठेवला होता. गुजराति बायका विकतात ना खाखरा असतो त्या साइझ मध्ये छोटुसा आहे तो मि दादरला घेतला होता .. परत पाण्यात घालुन बघते..

अरे कुणी सहाणेबद्दलही लिहा. आईकडे सहाण आहे पण ती तिला आजीने दिलेली आहे. त्यामुळे तिच्यावरही सहाण विकत घ्यायची वेळ आली नाही.

मी अमि, सहाण कशासाठी हवी आहे? चंदन अथवा गुटी वगैरे उगाळण्यासाठी की लग्नासाठी?

बाजारामधे छोट्या ताटलीएवढ्या साईझपासून थाळ्याएवढ्या मोठ्या सहाण मिळतात. तुम्हाला कुठल्या साईझची हवी आहे ते बघून घ्या. साधारण जिथे लग्न-पूजेच्या वस्तू वगैरे मिळतात अशा "विविध वस्तु भांडार" टाईप दुकानांमधे सहाण अवश्य मिळेल. लग्नासाठी हवी असेल तर गुरूजींना सांगा सामानात इन्क्लुड करायला.

रोटी मेकर आहे माझ्याकडे. पण त्याच्यावर रोटी/ फुलके काही चांगले होत नाहीत. मी त्याचा उपयोग पुर्‍यांसाठीच करते. कार्यक्रम वगैरे असल्यावर पटापट करता येतात. अगदी ३५०/ ४०० पुर्‍या दिड दोन तासात होतात.

वत्सला, छान आहे मिरचि कटर. (मी अ‍ॅक्चुली थोडा वेळ विचार करत बसले होते कि अंजली कोण म्हणुन Happy )

सायोला विचार. लोलाच्या मातीच्या भांड्यांच्या बाफवर तिने ह्या दोनाबे बद्दल लिहिलं होतं.

अदिती, मी पण वापरते तसले नाबे.
रसभाजीतला बटाटा वगैरे अगदी छान मुरवुन शिजतो. जेवण खुप वेळ गरम रहाते.
रच्याकने अदिती, ते नाबे कुठून घेतलेस? त्याच्या बॉक्सवर चित्र / लिहीलेले असेल. त्यावरुन गॅसवर चालते की नाही ते बघ. जपानमधे घेतले असशील तर बहुतांशी वेळा चालते. तरिही ते चित्र पाहुन घे.

मायक्रोवेव्ह घ्यायचा आहे, कुठला बरा राहिल?
साधारण १३-१५ हजारांच्या रेंज मध्ये हवा आहे.
केक, पास्ता इत्यादी करता जितका वापरला जातो तितपतच वापरेन असं वाटतंय (अजून तरी)

(नुकतंच लग्न झालंय, स्वैपाकघर अजून ट्रायल अण्ड एरर बेसिस वर सांभाळते आहे!)

मला नवीन आप्पेपात्र घ्यायचे आहे. बीडाचे घेऊ कि नॉनस्टीकचे घेऊ? वरती सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे बीडाचे घेतले तर आप्पेपात्र किती वेळा सीझन करावे आणि नॉनस्टीकचे घेतले तर इथे भारतात कोणत्या कंपनीचे चांगले मिळेल?

प्राचीच्या विपुतून साभारः

बीडाचा तवा शक्यतो राखेने (साबण न घालता) नारळाच्या चोथ्याने घासून घे शक्य असेल तर. मग त्याला तेल लाव नीट सगळीकडून. आता तापायला ठेव. साधारण तापले की त्यात १/२ -१/२ चमचा तांदूळ घाल पाणी भर वर पर्यंत आणि बारीक गॅसवर शिजू देत. शिजले की ते फेकुन दे आणि परत राखेने घासून घे. हे करेपर्यंत बरीच खर गेली असेल. त्यातुनही जर भिती वाटत असेल तर मग त्यात इडलीचे पीठ घालून एकदा आप्पे कर आणि ते टाकुन दे.

राख मिळत नसेल तर मातीने घास किंवा अगदीच शक्य नसेल तर ओडोपिक सारखी पावडर. पण त्या केक साबणाने खर निघणार नाही.

(वरील टीपा क्ष यांनी प्राचीच्या विपुत लिहील्या आहेत.)

धन्स प्राची आणि नंदिनी.
पहिल्यांदाच आप्पे ट्राय करणार आहे म्हणून इतका विचार.

भानुप्रिया,
एल जी चा घ्या. मुख्य म्हणजे अहोंबरोबर क्रोमा किंवा रिला. डिजिटल ला फेरी मारा सर्व मॉडेल दिसतील. नाहीतर रविवारी दोघे फ्लिप्कार्ट वर जरूर बघा. त्यांना कायकाय स्वयंपाक येतो त्याप्रमाणेच घ्या. मावे वापरताना सेकंदाच्या हिशेबात काम करावे लागते हे पक्के ध्यानात ठेवा. माझ्याक्डे एलजीचाच आहे. मस्त आहे. व फूल प्रूफ ऑटो बेक, ऑटो कुक इत्यादी ऑप्शन्स आहेत. केक ठीक आहे पिज्जा बाहेरूनच मागवा सोपे पडते. रविवारी स्वयंपाकाची तयारी करून ठेवल्यास वर्किंग डेज ला रीहीट, डिफ्रॉस्ट ला फार मदत होते. फ्लिप कार्ट होम डिलिवरी आहे. ते बरे पड्ते.

नॉन स्टिक कोटींग असणारी हार्ड अ‍ॅनोडाईज्ड भांडी कोणी वापरली आहेत का? माझ्याकडे एक कढई होती पण तिला नॉन स्टिक कोटींग नव्हते. मला वाटते हार्ड अ‍ॅनोडाईज्ड भांड्यांना कोटींग काय गरज? की सगळ्याच हार्ड अ‍ॅनोडाईज्ड भांड्यांना नॉन स्टिक कोटींग असते?

मला एक ऑइल बॉटल हवी आहे. एकही तेलाचा थेंब न सांडवणारी, स्वच्छ करायला सोपी, लिक न होणारी, तेल भरायला सोपी अशी. मी आजवर तेलाच्या किटल्या, टपरवेअर, काचेच्या चंबूसारख्या बाटल्या, कावळे तत्सम प्रकार वापरुन पाहीलेले आहेत. पण दुसर्‍या महिन्यातच माझं आणि त्यांचं एकमेकांशी जमेनासं होतं हा आजवरचा अनुभव. तर अशी एखादी बहुगुणी ऑइल बॉटल कुणाला सुचवता येईल का?

शर्मिला, मी एकदा ऑलिव्ह ऑईलची बाटली आणली होती. ती अशी बहुगुणी आहे. त्यामुळे सध्या त्यामधे तेल काढून वापरते. प्रोब्लेम हा आहे की ती बाटली काचेची आहे, कधीमधी तडकली की संपलंच काम.

मला ऑइल स्प्रे हवाय, ऑनलाईन कुठे मिळत असेल तर सांगा प्लीज...

ऑइल स्प्रे मॉलमधे मिळतात अगं. आमच्याइथे झी नॉव्हेल्टीजमधेही असतात बहुतेक. क्वालिटी माहित नाही.

मी खूप पूर्वी बान्द्र्याला हिलरोडवर एक मुसलमान काचवाला आहे त्याच्याकडुन अप्रतिम काचेची बाटली आणली होती तेलाची. दृष्ट लागावी अशी सुंदर, एकही तेलाचा थेंब न सांडवणारी. मी कामवाल्या बाईकडे चुकूनही टाकायचे नाही, पण एकदा माझ्याच हातून लिक्विडसोपमुळे सटकून फुटली. त्यानंतर आजतागायत खोज जारी है, आदर्श ऑइल बॉटलचा. एक चिनीमातीचा कावळाही चांगला मिळालेला मधे. पण तळातून लिक व्हायला लागला काही महिन्यांनी.

Pages