घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसता अपमान नाही तर किमान शब्दात करा...

जोक्स अपार्ट,
उंदीर भारतीय आहे का?( म्हणजे हे भारतात घडले का?)

रॅट किल कसे वपरतात? पाकिटावर लिहिले आहे की आत सूचना आहेत. पाकीटाच्या आत काहीच नाहीये. एका तलम कापडाच्या लहान पिशवीत रॅट कील ची वडी आहे. मी त्या पिशवीतून ते बाहेर काढून ठेवले आहे. तसे करतात की पिशवीसकटच ते ठेवतात? तसेच्...आई म्हणाली की पाण्याजवळ जाऊन उंदीर मरतो त्यामुळे पाण्याची बादली पण भरून ठेवली आहे जवळच, पण अजून काहीच हालचाल नाही.
असो. परंतु, वाट चुकून आलेल्या उंदराला डायरेक्ट मारून टाकणे जरा बरोबर नाही वाटत. बाहेर सोडता आले तर बरे असे सारखे वाटते आहे. पण सतत उंदराच्या भितीने घरात वावरण्यापेक्षा एकदाचे ते प्रकरण संपले तर बरे असेही आहेच. बादवे, काही लोकांना उंदराची भिती वाटतच नाही. ह्या खोलीतून त्या खोलीत जाताना अचानक उंदीर दिसला तर त्यांच्या ह्रुदयाची धडधड वाढत नाही. तर ह्या उंदीर, पाली, झुरळ, नाकतोडा वगैरे प्राण्यांची वाटणारी किळस कशी कमी करायची ? (हे सिरिअसलीच विचारले आहे.)

रॅट ग्लू मिळते...ते वापरा...कितीही ढोल्या उन्दिर असला तरी चिकटून जातो.मेडिकल स्टोअर मधे मिळेल. एम आर पी. ६० रु.मात्र.

>>>> तर ह्या उंदीर, पाली, झुरळ, नाकतोडा वगैरे प्राण्यांची वाटणारी किळस कशी कमी करायची ? <<<< ते देखिल आपल्यासारखेच जीव आहेत, त्यान्नाही जगण्याचा अधिकार आहे, त्यान्च्याच वस्तीच्या जागेत आपणच अतिक्रमण केले आहे वगैरे सर्वजीवसमानवादी बाबी Proud मनावर बिंबवायच्या, की पहिल्यान्दा त्यांची भिती कमी होईल, सवयीने किळस वाटणेही नाहीशी होते

आमच्याकडे दोन पिटुकले उंदीर आले आहेत....तुरुतुरु पळत आहेत,,म्हणून रॅट्कील आणून ठेवले होते....तर ते खाऊन सुद्धा ते दोघे टुणटुणीत आहेत....ईकडे तिकडे पळतच आहेत.....कसे पकडावेत????????.....

आमच्या इथे आवारात गलेलठ्ठ घुशींची बिळे आहेत, रात्रीच्या फिरत अस्तात, एकेक घुस एकेका मान्जरा येवढीच अस्ते, सबब मान्जरान्चा उपयोग होत नाही. त्यान्च्या बिळात बल्ब/ट्युब फोडून भरणे येवढाच एक उपाय रहातो. रॅटकील वगैरेला त्या दाद देत नाहित. शेवटी त्यान्चे अस्तित्व मान्य करुन आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो.
आमच्या इथे गेली कित्येक वर्षे म्हणजे घर बांधत असल्यापासून बेडकांचा वावर आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? पावसाळ्यात बेडूक जमीनी खालुन शीतनिद्रेतून वर येतात वगैरे माहिते, हव्वी तितकी पिल्ले दिसतात वगैरे. पण हे तसे नाही, तर एक भला थोरला बेडूक रोज संध्याकाळी जिन्याने गच्चीवर जातो, ठराविक ठिकाणी अस्तोच अस्तो. तर दुसरी एक छोटा बेडूक देवघराच्या फरशीखाली येऊन बसतो. आम्ही त्यान्चे अस्तित्वही मान्य केले आहे.
डोन्गळा बहुतेकांना माहित असेल, त्यात काय विशेष? सगळीकडेच अस्तात! पण गेली बारा/पंधरा वर्षे, आमच्या घरात "एका वेळेस केवळ एकच डोन्गळा" आख्खे घरभर फिरत असतो. त्याला चूकूनही मारायचे/चिरडायचे नाही अशी सक्त ताकीद सगळ्यान्ना आहे. हा डोन्गळा चूकुन अन्गावरुन फिरला तरी काहीही करीत (चावत वगैरे) नाही. एकदा एका पाहूण्या पोराने डोन्गळा दिसताच वीरश्रीनेयुक्त होऊन चपलेने त्याला मारला, तेव्हा घरातले सगळे हळहळले होते. त्या पोराला तत्काळ समज देण्यात आली की अशा पद्धतीने निरुपद्रवी जीव मारू नयेत.
गोम माहिते? तीच ती दोन्ही बाजुन्नी भरपुर पाय असलेली. त्या तर आमच्या इथे खच्चून आहेत. फरशान्च्या फटी मोकळ्या झाल्यात त्यातुन डोकावतात कधीमधी! एकदा देवपुजेला बसलेला अस्ताना मान्डीला चावलेली देखिल. वीजेचा बसावा+निखार्‍याचा चटका यान्चे कॉम्बिनेशन सारखा झटका बसतो Proud तरी बर, तिने हलकेच चावा घेतला होता Wink फक्त त्यान्चे असण्याने झुरळे एकदम कमी झालीत.
मुंग्यान्च्या विविध जातीं आवारात बघायला मिळतात, शिवाय वाळवी देखिल भरपुर प्रमाणात आहे.
सिझन प्रमाणे निरनिराळे पक्षी येत असतात.
कित्येकदा वेगवेगळ्या जातीचे सापही दिसतात्/कात वगैरे सापडते.
आम्ही या सगळ्यान्चे अस्तित्व मान्य केले आहे Happy

डॉ. गायकवाड, तुम्ही सुचवलेला उपाय करून पाहीन. त्यातही उंदराची सेमी- हत्या होणारच आहे पण नाईलाज झाला तर करावेच लागेल.

लिंबुटींबु, तुम्ही खरंच निसर्गाच्या जवळ आहात म्हणून भाग्यवान आहात.. आमची व निसर्गाची नाळ तुटली आहे आता त्यामुळे वेगळे प्रयत्न करावे लागतात.

चिकटवही मिळते उंदीर पकडायची. ती उघडी करून ठेव त्याच्या येण्याजाण्याच्या वाटेत. चिकटेल. मग चिकटलेला उंदीर त्या वहीसकट उचलून बाहेर वगैरे नेऊन टाकण्याची हिंमत अंगात हवी घरात कुणाच्यातरी.

एकदा हे निपटलं की जिथून येऊ शकतो तिथे जाळी लावून घेणे.

सुमेधा,
रॅट स्कीकपॅडला तो उंदीर पार चिकटतो. पण घरात राहिला तर पुस्तकं , कपडे, उघडे सामान यांची वाट लागणार त्यामुळे स्टीक पॅड उपाय बरा आहे. फक्त त्यावर चिकटल्यावर उंदरासकटचे ते स्टीक पॅड बाहेर टाकणे हे काम कोणालातरी करावे लागते. त्या स्टीकपॅड वर छोटा टोमॅटो अर्धा कापुन ठेवलात तर तो खायला कदाचित उंदीर येईल.

स्टीकपॅडला चिकटलेला उंदीर मेलेला नसतो, हळुवारपणे तो पॅडपासुन सोडवुन बाहेर जिवंत सोडुन देता येतो व स्टीकपॅड परत वापरता येतं असं कुणाकडुन तरी ऐकलेलं आहे.. कोणाला हे खरच करायला जमलं तर अनुभव ऐकायला आवडतील Wink

ते चिडलेला, घाबरलेला उंदीर चिकटलेलं स्टीकपॅड हळुवार पकडून सोडवणार कसं? Lol
त्यात त्या उंदराला थोडीच कळणार आहे की बाबा हे आपल्याला सोडवायला आलेत!

उंदीर सुटला तरी तो चिकटलेले स्ट्किपॅड घरात सांभाळुन ठेवू नका. त्यावर बरेच जीवजंतू असणार.

ते चिडलेला, घाबरलेला उंदीर >>>>>> थोडं क्लोरोफॉर्म द्यावं लागेल मग त्याला Wink जोक्स अपार्ट, माझ्या ओळखीतलं कोणीतरी खरच असं करतं, नेमकं कोण ते आठवत नाहिये म्हणुन जास्त डिटेल्स मागता येत नाहियेत..

माझ्या घरी नवीन शीफ्ट झाले होते तेव्हा ईतकया वरच्या मजल्यावरही उंदीर यायचा आणी फळं फस्त करून जायचा. फळं बंद करून ठेवली तर बाथरूममध्ये शीरून साबण खाल्लान मेल्यानं तीन्-चार वेळा. मग ते वीषारी चॉकलेट वगईरे ठेवलं. पण एक गेला तर दुसरा यायचा.

एकदा एक उंदीर फ्रीजच्या मागे जाऊन बसला आणी कआँप्रेसरच्या मागे जाऊन मेला. वईताग नुसता!

घर बदला.......नविन घर घ्या......उगाच कुणाला बेघर करु नये ..मानवतावादी दृष्टीकोण ठेवा Wink

उंदीर घरात मेला तर वाट लागते. एकतर त्याचा वास सुटेपर्यंत कळत नाही आणि कळल्यानंतर ती सगळी घाण काढणे हा मानसिक ट्रॉमा निर्माण करणारा प्रसंग होऊ शकतो.
एखाददुसरी उलटी, वास नाकात बसल्याने आणि हाताचा वास तसाच आहे असं वाटून जेवण न जाणे वगैरे... नक्की..

Pages