घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहो हिं असेल तर त्याला कसे मारायचे ही आयडीयाची कल्पना सांगण्याचा इब्लिसपणा इतर बाहेरचे उंदीर करतीलच Wink त्याने तो सहज मारता येईल.

आहो हिं असेल तर त्याला कसे मारायचे ही आयडीयाची कल्पना सांगण्याचा इब्लिसपणा इतर बाहेरचे उंदीर करतीलच डोळा मारा त्याने तो सहज मारता येईल.>> बरे मग सारे मु उंदरावरच सोडुन ध्यावे

अँटीमॅटर >>> झाली का कॉन्फरन्स ? नेट अ‍ॅक्सेस मिळाला ? Wink नशीब, तुमच्या कुठल्या इनोदावरून प्रेरणा घेतलीये म्हणाला नाहीत. स्वतःवरून ...:फिदी:

एक जालिम आणि सोप्पा उपाय.
.

.

.

.

.आपणच घर सोडून निघून जावे Light 1
माझ्या एका मित्राने ढेकुण झाले म्हणून घर विकले Angry

उपाय.
१. घरात कुठेही उष्टे किंवा उरलेले अन्न उघडे पडु देवु नये. (एक कण सुद्धा नको).
२. रात्री त्याला सहजतेने मिळेल अश्या ठिकाणी पाणीही नसावे.
३.खायच्या किंवा तो कुरतडु शकेल अशा वस्तु शक्यतो सुरक्षित फडताळात ठेवणे.
४. त्याला लपायला मिळेल असे कोपरे उपलब्ध होवु नये याची काळजी घेणे.
५. तुम्ही अडवु शकत नाहीत अशा फटी असतील तर त्यात डांबरगोळ्या ठेवणे.(नॅप्थॅलिन)
६. कोल्ह्याचे मुत्र त्याच्या रहदारीच्या मार्गावर शिंपडणे. (कुठे मिळेल मला नाही माहित.)

अपाय.
१. त्याला "आपलं" म्हणा. तो त्रास देणार नाही मग.
२. रोज रोज त्याला चपाती आणी अळणी कोबीची भाजी खायला घाला, इचिभैना दोन दिसात नाय पलाला तर मंग नाव नाय सांगनार.
२. मॉर्टिनचं रॅट किल मिळतं त्याचे तुकडे ठेवा जिथुन तो जात येत असेल पण जेव्हा ठेवाल तिथे जवळ्पास पाणी ठेवु नका.
३. माबोवरच्या ५/६ आयड्यांची धमकी देवुन बघा तोच काय त्याच्या पुढच्या १० पिढ्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.
४. मोजके "बाफ" चे प्रिंट्स घेवुन त्याच्या मार्गावर फ्लेक्स म्हणुन लावा.

एक जालिम आणि सोप्पा उपाय.>>>
अँटीमॅटर पुण्यातले लोकं माणसाला घरं न विकता ढेकणाला विकायला लागलीत
ईकडे उनदिराचे दर्शनच नाही आहे गेली काही दिवस पाऊसदिरच येतो आहे

"सर्पा तुला अगस्ती मुनीची शप्पथ!" <<<
Rofl

पालींवर मॉर्टीन फवारायचे मग ती काही तास स्तब्ध असते. तेवढ्यात हिंमत झाली तर उचलून टाकून द्यायची.
माझी हिंमत मॉर्टीन फवारण्यापर्यंतच होती त्यामुळे पुढचा किस्सा ड्यांजर घडला. सहासात फुटांवर पाल दिसली म्हणून मी शूर सरदाराच्या आवेशात सहासात फुटांवरूनच हात लांब करून मॉर्टीन फवारू लागले तिच्यावर तर मेली माझ्याकडेच वळली आणि पालीच्या दृष्टीने अतिप्रचंड वेगाने नागमोडी चाल करत येऊ लागली. इकडे मी यो रॉक्स पेक्षा भारी उड्या मारल्या. एकेका पायावर. ती बया अशीच माझ्या बाजून निघून गॅलरीत गेली. मग मी त्या साईडला उगाचच थोडावेळ मॉर्टिन मारत बसले.
साधारण अ‍ॅक्सिडेंट होत होता वाचल्यावर जे काय होते आपले ते झाले होते माझे नंतर...

नीधप Rofl

सर्वात महा जालिम उपाय...........

१) उंदराच्या बिळा बाहेर बसुन ........देवपुरकरांच्या गझली म्हणा.............. तो स्वतः बाहेर येउन यमक जुळवुन देईल .....लगेच पकडा मग

२) त्याला सांगा तुझ्या नावाने धागा काढला आहे त्यावर १३५ च्या वर प्रतिसाद आले आहेत..परंतु एकही प्रतिसाद कामाच्यालायकीचा नाही आहे......हे ऐकल्यावर हर्षोत्काराने नाचत नाचत बाहेर येईल......

३) त्याला विशाल यांची क्रमशः कथा ऐकवा....................... पुढे काय झाले विचारायला कंटा़ळुन आपसुकच बाहेर येईल..

४) त्याला फक्त गांधी आणि सावरकर हे दोन शब्दच ऐकवा.....आणि सांगा मायबोलीकर घरात याबद्दल चर्चा करायला येत आहे......पुढच्याच मिनिटाला घर सोडतोय की नाही बघा......

५) झक्की साहेब अमेरिकेतला उंदीर आणि भारतातला उंदीर यावर व्याख्यान देत आहे असे सांगा .....

Pest Control का नाही करून घेत? Hi-care खर्चिक असतं पण घरांत प्राणीमात्र येत नाहीत.

उदयन Biggrin
आणखी एक उपाय

डॉ.इब्लिस यांचे' उंदरांचे निरोगी कामजीवन' याविषयावर व्याख्यान आहे असे सांगा Light 1

नी, उदय, चाफ्या Rofl
नी, मी सगळं इमॅजिन केलं Lol

पालींबद्दल ऐकलं होतं आणि अनुभवलंही आहे की त्या ज्या मार्गे घरात येतात त्याच मार्गाने बाहेर जातात....
म्हणजे दारातून आली आणि तुम्ही खिडकीतून बाहेर घालवली की ती खिडकीतून परत काही काळीने आत येते.... दारातून बाहेर गेली की मात्र येईलच असं काही नाही Happy

त्या उंदराला सांगी की त्या बेफीकीर यांनी तुमच्या 'जमीनीवर' गझल केलीए आणि वर गझलेची 'जमीन' माझीच आहे असे माबोवर सांगतायत, तर वैवकुही जमीन चांगली आहे म्हणतायत Light 1

Pages