घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे तळमजला असल्याने सारखे उंदीर येत-जात असतात. त्यातला एखादा जर जायच्या ऐवजी घरातच मुक्काम टाकून बसला तर घरातला एक मोठा आणि एक छोटा मेंबर हातात येईल ती वस्तू (चप्पल, खेळणी, रिमोट..बहूतांशी वेळा रिमोटच. मला महिन्याला एक याप्रमाणे रिमोट बदलावे लागतात. ) नेम धरुन त्या उंदराच्या दिशेने भिरकावतात किंवा सामानाची हलवा-हलव करून त्याला कोंडीत पकडतात आणि जिंदा या मुर्दा अवस्थेत शेपटीने हातात धरुन घराच्या बाहेर भिरकवतात. (हे घराच्या बाहेर सोडायचं काम छोट्या मेंबराचं आवडतं काम आहे. शेपटीने उंदिर हातात धरुन तो जिवंत आहे की मेलाय याची चर्चा करताना बापलेकांना गम्मत वाटते.)

मी आपलं त्यांच हे करणं झालं की रिमोट फेकून देणे, धाकट्या मेंबराचे हात स्वच्छ धुणे, परत डेटॉल /सॅनिटायझर लावणे ये उपाय करत बसते.

मी घरातले कितीही मोठे उंदीर एका चांगल्या थैलीत सहज पकडतो.
ज्याखोलीत आहे त्या खोलीचे दारे बंद करुन एक कुठल्याही कोपर्यात थैली धरुन ठेवतो तिकडुन कोणी जिथे तो आहे तिथे ठोकठाक करते उंदीर धुम ठोकत सरळ थैलीत जाऊन बसतो मी तडक थैलीचे तोंड बंदकरुन बाहेर दुर नेऊन टाकतो त्यांना अकारण मारत नाही.
माराचेच असेल तर कणकिच्या गोळ्यात उंदीर मारायचे औषध घालुन त्यांना मारावे लागते.

बरेच दिवस होउनही उंदीर घरातच असल्याने आता त्याचा कायदेशीर हक्क निर्माण होउ शकतो. त्याला घरातून बाहेर घालवण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्यावा. नोटीस बजावावी. नाहीच ऐकले तर कोर्टात धाव घ्यावी.

ह्म्म! आमच्या घरी माळ्यावर उंदीरमामांच्या फुल्ल टु मॅचेस चालु असतात रात्री .. धावाधाव एन्जॉय!!
कितीही रॅट किल गोळ्या ठेवल्या तरी उपयोग नाही.. अगदी आरामात येवुन खाउ खावुन जातात Happy
आम्ही उंदीर, घुस नि मांजर.. साप सुद्धा यांना आश्रय दिलाय.. निवांत चालु असतं

रॅट स्कीकपॅडला तो उंदीर पार चिकटतो. >> आमच्याकडे त्या पॅडवरून तो निसटला आणि घरभर चिकट ठसे उमटवून गेला. नाकी नऊ आले तो चिक़टपणा घालवताना. कित्ती तरी दिवस मी घासणीने तो चिकटपणा घालवत बसले होते.

उन्दराची शेपटी पकदुन त्याला पकडायचा प्रयत्न केल्यास तो शेपटी झाडतो आणि अलगद सटकतो.>> नाय हो उदय आमच्याघरी शेपटीला पकडूनच पकडतात उंदरांना. स्पेशल एक्सपर्टीज आहे आमच्याकडे.

उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद. <<< उंदराचा सापळा थोडी चौकशी केलीत तर आजूबाजूला बाजारात सहज मिळेल. तो सगळ्यात सुरक्षित उपाय आहे.

(पण त्या उंदराला त्या सापळ्यात जायची बुद्धी होण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करून ठेवा. :फिदी:)

बीबी उंदरापेक्षा सुसाट पळतोय...

आता सिरियसली उपाय,
किचनमध्ये एका कोपर्‍यात जिलेबी ठेवा. आमच्या घरी केलेला उपाय मस्त ठरलाय. जिलेबी रॅट पॅड वर ठेवायची.

काळोख करून रात्र लवकर झालीये असे भासवायचे. आवाज अजिबात नाही करायचा. पकडला जातो.

उंदीर हा भयानक आहे. जेवणातू जंतू पसरवू शकतो. तेव्हा किचनम्ध्ये नसलेला बरा.

आधी हा उंदीर सेलिब्रिटी नाहीन ह्याची खात्री करून घ्या. चुकून एखाद्या जुन्या मराठी कवितेतून आलेला असेल तर पिपाची योजना करा. हिंदी सिनेमातील वाटत असेल तर नीट निरखून बघा. 'एक हसीना थी' मधला असेल तर तु.क. टाका. 'सागर' मधला असेल तर पुढील कुठलीही कारवाई करण्याच्या आधी त्याचा ओटोग्राफ घ्या. मग मांजर पाळा. जर मांजरीने उंदीर खाल्ला नाही तर मांजराला डॉक्टरकडे न्या. जर उन्दिराला न खाता त्याला मांजर साक्ष राहिले तर हा दैवी उंदीर आहे (किंवा मांजर राजकारणी आहे) हे जाणून घ्या आणि त्यावर दोन स्वतंत्र बा.फ. चालू करा. तुम्हाला शुभेच्छा!!
टीप: उंदीर पकडण्यासाठी 'Bait' म्हणून आप्पे वापरलेत तर ते मा.बो. वर सांगायला विसरू नका.

इथे बर्‍याच थोर लोकांची ओळख होते आहे. स्टीकपॅडवरून उंदीर सोडवून मग परत ते वापरणेबल करणे हे तर अल्टीमेट आहे. पु. पाटी लावता येईल घरावर.."स्टीकपॅड" भाड्याने मिळेल. Happy

गेल्या वेळेस आम्च्या घरी नाकतोडा आला होता व दिमाखात डा. टे. वर बसला होता. तेव्हा घरात मी एकटीच होते (ह्या कामातले डोमेन एक्स्पर्ट्स नव्हते) त्यामुळे आता त्याला हाकलण्याचे काम मलाच करायचे आहे हे समजले, तेव्हा मी रेनकोट व हेलमेट घालून माश्या मारायच्या प्लॅस्टीकच्या चौकोनी झार्‍याने त्याला झटकून झटकून मारले होते. नवरा घरी आल्यानंतर त्याला हा पराक्रम समजल्यावर म्हणाला...त्याला वेगळे मारायची गरज नव्हती खरे तर्...तो हसून हसून मेला असेल कधीच्.....असो....

नमस्कार.

मी अ‍ॅनिमल राईट्स "वुटा" तर्फे इथे आलेलो आहे. आम्हाला आपल्याविरुध्द तक्रार मिळालेली आहे..
आपण आपल्या घरातील गोंडस जनावराला विनाकारण त्रास देत आहे .. त्याने आपल्या घरातली फक्त काही मीटरच जागा वापरली आहे तरी तुम्हाला त्रास होत आहे.. विचार करा तुम्ही जंगले हटवुन त्यावर आपले बंगले बांधताना कित्येक एकर त्यां जनावरांची जागा हडप केली आहे ? त्यांना किती त्रास होत असेल याचा ?
ताबडतोब त्या गोंडस प्राण्याविरुध्द चालवण्यात आलेली मोहीम थांबवा अन्यथा आम्हाला आपल्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी लागेल..

हुकुमावरुन

Biggrin

उंदराच्या भावना दुखावल्याच असतील ना आतावर? Wink

इथे 'अनेकांची मनं दुखली' असे ओळखणारे(खरे तर कांगावा करणारे) लोकं आहेत मायबोलीवर... त्यांना विचारले पाहिजे उंदराचे मन दुखावले हे पण तुम्हाला कळते का हो? अरेच्चा, इथे हजेरी लावून गेल्या की त्या बाई, तरे त्या मन दुखावण्याविषयी बोलल्या नाहीत अजून.... Wink

उदयन Lol

या धाग्याला आज वाचण्यासाठी तरी अपडेट ठेवावा लागेल !
नाकतोड इतका निर्दोष प्राणी त्याला मारण्यासाठी एवढा पराक्रम !

Pages