ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडव्हेन्चर अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे कालचा दिवस डबल ऑस्सम्म, डबल अफलातून ठरला. Happy

सालाबादप्रमाणे, पहिलटकरांनी वृत्तांत लिहावेत अशी जाहीर मागणी करण्यात येत आहे.

अ‍ॅडव्हेन्चर अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे कालचा दिवस डबल ऑस्सम्म, डबल अफलातून ठरला. >>>> +१

Pages