ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

... आणि अश्या रितीने ववि सोहळा पूर्ण झाला. विसावा वाल्यांनी दिवे दिले! ( मायबोलीकर होण्यासाठी दिवे देणे मस्ट आहे असं पायलट झाला तेंव्हा सांगितलं गेल्याने Wink )

आणि सविस्तर स्पेशल वृ थोड्याच वेळात टाकत आहेत साजिरा विथ "स्पेशल चहा रिपोर्ट"

Proud

Light 1

kiti vavikar pratax hajar hote? Adventure sports madhe konala pahile baxis milale?

limbutimbu navate ase mala mazya saune aatach sangitale ... games majedar hote .... te tar nehamich asatat ... mumbaichi bus punayachya bus pexa mothi hoti ....

khup vichar karun karun lihave kagel .... baxis kay asel riya ...

मायबोली ववि म्हंजे एक दिवसाची मज्जानु लाईफ ! पुन्हा एकदा धमाल ववि अनुभवला ! नविन-जुन्या इति समस्त हजर वविमंडळीना भेटून मस्त वाटले... ! Happy ( वृत्तांत सावकाश टाका रे... :P)

खूप खूप मज्जा...........पण एका बालकलाकाराची लावणी मिसली ना ववि ने...... Proud

येऊ द्या एकामागुन एक वृतांत......... Happy

आणि हो टांगारुंनी वाचुच नये मग वृत्तांत...... Biggrin

यंदाचा पुण्याहून येणारा वविचा वृत्तांत चारोळीमय असणार आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी...

आपण रिसॉर्ट वर असताना नंदिनी मॅडम चा फोन येऊन गेला.. त्यांनी पहिल्यांदाच वविला येणार्‍यांना कम्पल्सरी वृत्तांत लिहायला सांगितला आहे. आणि न लिहिल्यास वृत्तांत कसा लिहावा ह्याची त्या स्वतः शिकवणी घेणार आहेत..

होता काल नेहमीचाच रविवार वगैरे वगैरे..
देव काका म्हणती त्याला वविवार वगैरे वगैरे...

तर चारोळीमय वविवार

आम्ही सकाळी सकाळी मयास फोन केला
दहा मिनिटात येतो त्याचा निरोप आला
पंधरा मिनिटात मग आम्ही प्रयाण केले
पोचलोच दोन मिनिटे, थांबा नजिक आला

थांब्यास आम्ही जाता हाय हॅलो झाले
श्यामली होती तिथेच तिथे मंजिरीही होती
तिथले दृष्य अजोनी नयनरम्य झाले
नतद्रष्ट आणि राम ही जोडगोळीही होती

क्रमशः

संयोजक, तो बाफ बघता येत नाहिये. ग्रूप सदस्यत्व घेता येत नाहिये. क्लोज्ड ग्रूप आहे.

Pages