ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए रॉक्सॅ तु तुझं फिक्स कर अगोदर >> नाही तर काशीमीराच्या नाक्यावर एक दगड (मैलाचा नाही) कायमचा फिक्स केला जाईल... आणि त्यावर लिहिलेलं असेल. ववि २०१३

आयरे... पुण्याच्या बसचे डिलेट आले रे... Wink

अरे ही पोस्ट मी चार पान मागे आशुब्शी बोलताना टाकलेली .... Uhoh
आशु मी तुम्हालाही त्यात धरलय ...
असो ...

सामी तु नक्की कुठे बसणारेस ?
आधी तु दादर म्हणलीस ,मग बोरीवली , मग दहिसर आता काशिमिरा ..... अस करत करत रविवार पर्यंत तुझा पिक अप मुरबाड होणार आहे ... Proud

काशिमिरा शिवाजी पुतळा ... हायवे वर ...

विन्याची पोस्ट वाचुन सद्ग्द्ग्द्ग्द्ग्दग्दीत झालो.... >>>> फार होऊ नकोस आनंद.. वविला पूर यायचा... Proud

नाही तर काशीमीराच्या नाक्यावर एक दगड (मैलाचा नाही) कायमचा फिक्स केला जाईल... >>>>>>>>>>> आणि उडीबाबा नाही आला तर काशिमिराला बस थांबवली जाईल आणि सर्व वविकर खाली उतरुन ५ मिनिटे उड्या मारत शिव्यांची लाखोली वाहिली जाईल आणि मग बस ठाण्याकडे मार्गस्थ होईल Proud ठाणेकर या सोहळ्याला मुकतील Proud

चला! कामे झाली!! ऑफिस संपले!!! आता ववि ववि ववि!!!
तर भेटूच लोक्स!!! Happy
हिम्सकूल, तेवढं टीशर्ट चं विसरू नका!! Happy

किती वाहवता बाफ एका दिवसात ( तुमच्या ). आज निघायच्या आधी तुंबलेली कामं आहेत . त्यात दीडएकशे पोस्टी वाचायच्या म्हणजे किती जाच Happy

ऑलमोस्ट हा एक सण म्हणून साजरा केला जातो>> अनुमोदन! एकदम टडोपा!!

मुंबैच्या बसमधल्या खानपान सेवेची काय व्यवस्था याबद्दल का मौन आहे बरे-)
मी कचोर्‍या आणेन. अन पग्याने अनेकवेळा दिलेल्या कानपिचक्या वेळेत लक्षात न आल्याने घरात सापडली ती चॉकलेटे भरलीत बॅगेत .

आणखी वाढल्यास डबल डेकर बस करण्याचा मानस आहे >> माझा रुमाल सर्वात पुढचा सीट वर , प्रेफेरेबली डावीबाजू Happy

माझा रुमाल सर्वात पुढचा सीट वर , प्रेफेरेबली डावीबाजू >>>>>>>>>>>>>> पुर्ण सीट घ्या, गाडी मध्ये मागे बसण्यासाठी चढाओढ असते

मेधा, पुढच्या सीटवर तुला ललीची कंपनी असेल नक्की Happy
आणि पग्या वविला नाही येणार आहे, त्यामुळे त्याची चॉकलेटं मी माझ्याकडे ठेवेन नक्की, काळजी नसावी!

तू तुझ्या आज निघून एवढा प्रवास करून उद्या मुंबईत पोचून परवा वविला येणार म्हणजे तुझी कमाल आहे खरंच. माझाही वविला येण्याचा उत्साह होता त्यापेक्षा तिपटीने वाढलाय आता Happy

द्या मुंबईत पोचून परवा वविला येणार म्हणजे >>
शनिवारी रात्री, रविवारी पहाटे साडेबारा ला लँडिंग आहे.
मायबोली टीशर्ट अन एक शॉर्ट्स हँडबॅगेत ठेवलेत . म्हणजे सर्व बॅग अनपॅक करायची गरज नाही Happy

कित्ती पोस्टी.... > ये तो शुरवात है... ववि अभी बाकी है|

मेधा... सांताक्रूजचा पिकअप नक्की आहे ना? आल्यावर वैभवला फोन करुन कन्फर्म करा.

मी वैभवला इमेल केली आहे , माझा नंबर पण दिलाय. मी एक वाजता घरी पोचेन. तेंव्हा करु का फोन ?
खंदे संयोजक काय झोपायचे नाहीत आदल्या रात्री Happy

कित्ती किलबिल चाल्लीया इथे.. मला वाटलं काहीतरी मोठा घोळ झाला आणि फटाफट पोस्ट्तायत सगळे.....
पण छान...
विनय तो कल्याण पिकअप लास्ट आहे तर पहील्या(धा***)चहाची स्टॉप तिठेच घेउ... बस मधल्यांसाठी ... माझा एकदा घरी आणि एकदा आनंद टोकिज जवळ होइलच ,

रीया... तुझं अजुन नक्की झालं की नाही....
मेधा खरीच माबोकर..... मालक/ वैभव .. हा पिकअप महत्वाचा आहे.... सगळा जेट्लॅग ठाण्यापर्यंत बशीतच बरा झाला पाहीजे......

Pages